न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! इकडे धम्माल चाललेली दिसतेय! मी आत्ताच भारतवारी संपवून पुन्हा उस गावाच्या शिट्टीत दाखल झालो. अमृता नि जुई अजून भारतातच मजा करतायत. मला कोणी शिट्टीकर / बोस्टनकर इकडून उचलण्याची व्यवस्था करतील किंवा त्यांच्या गाडीत कोंबला जायची परवानगी देत असतील तर मी येऊ शकतो. पण मी बाकी काही आणू शकणार नाही. सध्या रोजच्या खायचे वांदे झालेत Wink

कोण रे तो म्हणतोय इतकी नाटके असतील तर नाही आलास तरी चालेल Happy

>>बामा, कोण बसल्याने खुर्च्या मोडणार असं म्हणायच आहे ग तुला?

तसे नाही .. काल लोक भांडताना खुर्च्या मोडू असे म्हणालेत ..

सध्या रोजच्या खायचे वांदे झालेत << किरण बारात असतास तर जेवायला घातले असते. सध्या मी आणि माझ्या मुली जेवण करून खातो आहे.. Happy

यावेळचे करमणूकीचे कार्यक्रम काय आहेत? मागच्यावेळी त्या 'शब्द ओळखा' ला मजा आलेली.

झक्की, यावेळच्या तुमच्या भाषणाचा विषय काय आहे? मागच्या तुमच्याकडच्या जीटीजीला तुम्ही मला, परागला आणि चमनला चहा करतो असं आमिष दाखवून चांगलं तास-दिडतास भाषण ऐकवलं होतं. अगदी भारत-पाकिस्तान पासून ते अमेरिकेची आर्थिक आघाडीपर्यंत.. Proud Light 1

यावेळी वेगळे विषय घ्या. जसे भारतातील क्रिकेट आणि बॉलीवूडवर होणारा खर्च, शिवाजी महाराज, वगैरे.

यावेळी झक्कींना 'सीताबर्डीच्या किल्ल्याचे रहस्य' किंवा 'मी (त्यांनी स्वतः)टेकडीच्या गणपतीला १००१ प्रदक्षिणा का मारल्या' यावर बोलायला सांगा. वेऽ डाउन द मेमरी लेन जाऊ द्या. किमानपक्षी 'एलआयटीच्या टेकडीवरील धड्याळाच्या टॉवरजवळची गंमत' तरी सांगाच म्हणावं.

नाही, यावेळी संयुक्ता सोल्जर्स टीम येणार आहेत.
फचिन आज मी तुला फोन करणार आहे, यावेळीतरी उचल.

माझ्या भाषणाला विषय कशाला? कधी असतो का? पूर्ण भाषण ऐकून देखील लोकांना कळत नाही विषय कोणता होता. शेवटी म्हणतात, कालचे एवे एठि बरे होते.

मागच्या तुमच्याकडच्या जीटीजीला तुम्ही मला, परागला आणि चमनला चहा करतो असं आमिष दाखवून चांगलं तास-दिडतास भाषण ऐकवलं होतं. >>>>> आणि एव्हडं करून चहा झक्की काकूंनीच केला.. ! Happy

कोण रे तो म्हणतोय इतकी नाटके असतील तर नाही आलास तरी चालेल>>>
आता तूच म्हंटल्यावर आम्ही वेगळं कशाला म्हणायचं>>>> Lol
किरण, अमृता असती तर तांदळाच्या भाकर्‍या करुन न घेता आलीच नसती. अगदी भाकर्‍या नाहीत तरी प्रेमाने काहीही करुन आणलंस तरी आम्ही आनंदाने खाऊ हो Wink

मागच्या गटग ला बाईंनी दिलेल्या तुळशीच्या बियांची रोपं आली आहेत बरीच. ( २-३ इंच आहेत सध्या ) . कोणाला हवी असल्यास विपुत लिहीणे प्लीज.
पुस्तके हवी असल्यास पण लिहिणे. बाईंच्या POL च्या प्रतीवर माझा नंबर आहे (च).
नवी मराठी गाणी कोणाकडे असल्यास मला हवी आहेत .

नक्का मला त्या फाईलच्या घोळात पाडू!! नाही सेव्ह करत तो सेम नावाने!!
आणि नाहीतरी आता काही बदलावं लागेल असं वाटत नाही. हे नीडफुल पुरावं उद्यापर्यंत. Happy

नक्का मला त्या फाईलच्या घोळात पाडू!! नाही सेव्ह करत तो सेम नावाने!!
आताच घेतले वळायला लाडू!! ए वे ए ठि ची करते तयारी भक्तीभावाने !!

जरा यमक जुळवलं Proud

1442A Route 46 West, Parsippany, NJ 07054

Pages