न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा, माझ्या नावापुढून पार्टीचे सामान का काढून टाकले? आणू की नको? का स्वातीच्याच घरची ताटं, वाट्या वापरायच्यात? Proud

झक्की, मागच्या वेळी तुम्ही पुरूषांसाठी एवेएठीसाठी पेशल अवतार सांगितला होता. दाढीचे खुंट वाढवून यायचे होते. यावेळचा अ‍ॅवटार काय आहे?

श्री व सौ सुमंगला येणार आहेत. त्यांना यादीत अ‍ॅड करा.

त्यांना हे पान दिसत नव्हते. ग्रूपपुरते मर्यादित का ठेवले आहे? बाहेरचे कोणी येऊ शकत असेल तर त्यांना कळणार कसे?

भाई, पान पब्लिक करा.

फचिन, अरे पार्टीचं सामान म्हणजे नक्की काय काय आणि किती किती आहे ते सांग बघू नीट. म्हणजे बाकी मला आणता येईल.

वेळ आहे म्हणून विचारून घेतो.
माझ्याकडे खालील पेये आहेतः
कोक ०, फ्रेस्का, फँटा, स्प्राईट, सिएरा मिस्ट तर आपली आपली आवड कळवा म्हणजे त्याप्रमाणे स्टॉक आणता येईल.
वैद्यबुवा तुम्ही कोणती बीअर, ते सांगणार होता ना?
अहो माझ्या नावासमोर चिप्स वगैरे होते ते कुठे गेले? मी चिप्स आणून ठेवल्या आहेत. तेंव्हा स्नॅक आणणार्‍यांनी नोंद घ्यावी. कारण आम्ही चिप्स खात नाही (उगाच त्यात, सोडियम, फॅट, कोलेस्टेरॉल, इ. चविष्ट पदार्थ असतात. नि आम्हाला तर चांगली चव असेल तर पदार्थ वर्ज्य. म्हणून कडवट बीअर पितो.

हायनेकन, पेरोनी मला आवडतात पण कोणाला आवडत नसतील तर खुशाल बाद करा. माझ्या गावात किंगफिशर (खंड्या) मिळते, मी अजुन ट्राय नाही केली पण गंमत म्हणुन ती ही चालेल (मिळत असेल तर). Happy
आला रे आला ए वे ए ठि चा दिवस जवळ आला!!!!

मी घोळ केला!! अहो ती त्या नावाने सेव्हच करून घेत नव्हता! नवीन अपलोड केली तरी जुनीच दाखवत होता!
gtg_list.JPG

केली. बघा - रीनेम केली की जुनीच दाखवतो!!

.

अरे मला तो गोड मैसुरपाक आणू नका असे सांगीतले होते. नक्की काय ते सांगा रे.
मैसुरपाक पग्यासाठी होता Happy लोक तेवढे गोड खात असतील तर मी आणायला तयार आहे. Happy

भाई! Happy

केदार, अरे वरची यादी म्हणजे नुसती गाईडलाईन आहे. (तुला काय वाटलं, खरंच झुणकाभाकर असणार आहे?! :P)

<सायो , तू फक्त टोपलीभर वांगी आणून तसेच समोर ठेवून म्हणणार नाहीस ना "बघा रे बैंगन">
म्हणजे बघारे बैंगन नि दुधी हलवा! छान, छान!

<सायो , तू फक्त टोपलीभर वांगी आणून तसेच समोर ठेवून म्हणणार नाहीस ना "बघा रे बैंगन">
म्हणजे बघारे बैंगन नि दुधी हलवा! छान, छान!

Pages