न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहिण.>>>>> अरे तू ब्रिगेडशी मुद्दामून खुस्पटं काढतोयस का? भारतात गेला की धुतलाच समजा तूला! झक्कींनी आधीच वार्निंग दिली आहे की. दिसला बामन की काढा धूवून! त्यात तू असली विधानं करतोस?

तुमच्या यादीत भात नाही का ?
आणि सिंडी जिलब्या का नेणारे म्हणे ? आणि जिलब्या असतील तर मठ्ठा नाही का? Uhoh

मठ्ठा पिणारे मठ्ठ येणार नसल्याने मठ्ठा रद्द.. अगदीच हवे असल्यास ताकात भरपूर पाणी घालून दिले जाईल.. हुकूमावरून Happy

टोप्यावाले: उजवीकडून डावीकडे: वैद्य, झक्की, नितिन, चमन.

वैद्य, अहो तुमचं लग्न एकदाच झालय आणि त्याचा मेनु वेगळा होता. जाऊ देत. Wink

विशिष्ट शहरातला मेनू हो तो जिलबी आणि मठ्ठा! लक्ष देऊ नका. Proud

भाताचं मी विचारलं! कोणीच बोलत नाही. शेवटी झक्कींनाच आधण चढवावं लागणार असं दिसतंय. Proud
पण काळजी नको. त्यांना प्रॅक्टिस आहे पूर्वीपासून.
हा पुरावा :

man-cooking.jpg

सिंड्रेला, ते फोटो इतके अस्पष्ट आहेत की कोणाचेही नाव लावले तरी चालेल. Proud

भाताचं मी विचारलं! कोणीच बोलत नाही>>>>>> भात कशा बरोबर खायचा?

अहो त्यांच्या जावयाला प्रॅक्टीस असून आपल्याला काय उपयोग Wink

म्हटलंच नाही का मी?!
आणेन बरं! कोणी नाही आणला तर शेवटी मीच्च आणेन! Proud

शितावरून भुतांची परीक्षा होते ती अशी!! Proud

.

शितावरून भुतांची परीक्षा होते ती अशी!!>>>>>>> Biggrin
एकदा परत्येक्ष भेटलं की शित, जात, फळी सगळ्याची परिक्षाच काय डायरेक निकालच लागतो Proud

अरे अरे..इथे परत पदार्थांची "उथल पुथल" झालीये !!!
बाई, जिलबी-मठ्ठा हा काही विशिष्ठ शहरी मेन्यू नाहिये हा !

.

पग्या, तू येणार आहे का नक्की? नाव तर दुसतय नोंदवलेलं वर, ऐन वेळी आमच्या हाती "लिंबू" नाही ना येणार?
बाकी, जिलेबी-मठ्ठा बद्दल , खुन्नस मध्ये मुद्दामून ते काँबो खाऊ नकोस हां! पोट बिगडेल. Proud

Pages