न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिपाणी वाजता वाजता दटावणीच आली! आता घ्या!
बाईंनी आता सगळ्यांना लाईनीत लावायला सुरु केलं.

पग्या, तुझा काय पार्टी सपलाइज चा जोडधंदा आहे की काय?

ताज्या बातमीनुसार वृंदाताई मलई सँडविचेसव्यतिरिक्त दहीभातही आणणार आहेत.>>>>>>> ह्याला म्हणतात खरा निषेध!!! वृंदाताई, आगे बढो! हम तुम्हारे साथ है! Proud

मुसंबा
आपण त्याला शेजार्‍यांची कंपाऊंड वॉल चालवायला सांगू.

माझ्या घरच्या भिंतीबिंती चालवायचं काम नाही हाँ>>>> Lol स्वातीचा घाबरलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला.

स्वातीचा घाबरलेला चेहरा >>> म्हणजे नक्की कसा ? (बाई आणि घाबरलेल्या ह्या काँबिनेशनपेक्षा जिलबी आणि मठ्ठा काँबी बरय) Wink

बघा बघा.. मी म्हंटलं नव्हतं सकाळी पार्ल्यात
बाईंची शिस्त सुरु झाली.. वर नियमावली पण डकवा एक..

१. घराच्या भिंती चालवलेल्या चालणार नाहीत..
२. घरात रेडे आणलेले चालणार नाही. (ते रेग्यांच्या कोणासराखंतरी "रेडा ऐकायचा असेल तर स्वत:च रेडा व्हावं" असं काही केलं तर चालेल..)
३. व्याकरणदृष्ट्या शुध्दच बोलावं लागेल.
४. येण्याच्या आदल्यादिवशी किमान २ तरी कविता संग्रह वाचले पाहिजेत.
५. गटगला एक स्वरचित गझल (अचूज वृत, कल्पक मतले/मक्ते, शुध्दलेखनात कॉम्प्रमाईज नाही वगैरे वगैरे) सादर करावी लागेल.
६.
७.
.
.
.

Proud

कंपाऊंड वॉल हलवल्यावर जास्तीचं लॉन मो करायला काय सावतामाळी येणार आहे का? Proud

त्या पेक्षा माझ्या तर केदारचाच घाबरलेला चेहरा समोर आला! Proud

६. वेदकालीन संसकृती बद्दल आजिबात वार्निंग न देता प्रश्न विचारले जातील. उत्तर देता न आल्यास तुम्ही आधी वाचनात्/लेखनात पाडल्या/न पाडलेल्या उजेडाचा उद्धार करणेत येइल. Proud

सर्वांनी काय काय बोलणार ते आधीच लिहून पाठवून माझ्याकडून शुद्धलेखन तपासून घ्या. Proud
केदार, न चा ण किंवा उलट करणार्‍यांवर गारदी सोडण्यात येतील. Proud

केदार, न चा ण किंवा उलट करणार्‍यांवर गारदी सोडण्यात येतील.>>>> झालं, म्हणजे केदार संपलाच म्हणायचा. Proud

केदार, अरे ही तर झलक आहे. तिथे आल्यावर कळेल तुला की लोक कसे अजून वेड्यासारखे वागतात ते.. Proud

झक्की तर म्हणत होते की प्रचंड उन आहे. बाई म्हणतायेत की थंडरस्टॉर्म होणार आहे. बहुतेक ह्यापैकी काहीही होणार नाही. छान असेल त्या दिवशी. बारा एवेएठीच्या दिवशी आत्तापर्यंततरी वातावरण नेहमी चांगले राहिले आहे.

कणसं कॅन्सल करु का? ठीक आहे. मग पानं आणतो. पण भाकरी-वांग्याची भाजी असं जेवण केलं की पान खातात का?

फचिन
नसत्या शंका काढण्यापेक्षा तू वर्‍हाडी ठेचा, पातीचा कांदा, शेंगदाणे इ. आण भाकरी सोबत खायला. Proud

>>>भाकरी-वांग्याची भाजी असं जेवण केलं>>> स्वातीच्या पालेभाजीचा सरळ अनुल्लेख? ह्या फचिनच्याच पाठीवर कणसं भाजा रे. Wink

ऐका हो ऐका! मी ( एकटीच) येणार आहे शनिवारी . फिश फ्राय ( बहुतेक तिलापिया)किंवा कोलंबी भात यातलं काय आणू ?

रंपा आणली तर चालेल का बाईंच्या घरी ? . ९०-९५ डि असेल तर बियर चालेल का ?

चिनूक्स पुण्यात आहे. त्याला व्याकरणाच्या नियमाची ( २० पुस्तकं घेऊन , प्रताधिकार भंग नको व्हायला ) एकच स्कॅन करून पाठवायला सांगू का Happy ?

Pages