Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
नंदिनी च्या आग्रहासाठी
नंदिनी च्या आग्रहासाठी
मामेभावाच्या मुंजीतला
मामेभावाच्या मुंजीतला किस्सा...
तीस चाळीस कप चहा दोन बहिणीनी मिळून केला. चहामधे घालण्यासाठी अतिहुशार बहिणीने "दूध" आणून दिलं.
मी म्हटलं की "बाळे, हे मघाशी मी केलेलं ताक आहे की!!"
"नाय गं. हे दूध आहे. ताकाचं पातेलं मी फ्रीझमधे नेऊन ठेवलं"
चहामधे दूध घातल्यावर चहा नासला... कारण सांगायला हवं का?????
अतिहुशार बहीण कोण ते ओळखा
अतिहुशार बहीण कोण ते ओळखा बरं...
जाम मजा येतेय वाचून!!!!
जाम मजा येतेय वाचून!!!!
परवा ३ तास मिटिंगभर मोटर
परवा ३ तास मिटिंगभर मोटर (इलेक्ट्रीक) बद्दल डिस्कस करुन अस्मादिक घरी पोचले....
बायकोचा पहिला प्रश्न... अरे फोन का बंद तुझा?... कधीचा ट्राय करतेय...
अस्मादिक उत्तरले... मिटिंगला जाताना "टर्न ऑफ" केला होता परत "टर्न ऑन" करायलाच विसरलो
स्वरुप
स्वरुप
स्वरुप मी ही एकदा असंच
स्वरुप

मी ही एकदा असंच बोल्ले होते..
मला बाबांना "पासपोर्ट कधी रिन्यु करायचा आहे?" असे विचारय्चे होते..
मी विचारले " पासपोर्ट कधी reinstantiate करायचाय?" हाहाहा (तेव्हा मी C++ शिकत होते बाबांकडूनच)
बाबाही हाडाचे oops प्रेमी असल्याने त्यांना कळला माझा वेंधळेपणा आणि त्यांची हसून हसून वाट लागली
काल एका मित्राच्या घरी गेलो
काल एका मित्राच्या घरी गेलो होतो......हेल्मेट काढुन ठेवले टीपॉयवर. नन्तर निघताना विसरलो. बाहेर पडल्यावर लक्षात आले.... परत आत जाउन काकाना (मित्राचे वडील) सान्गितले जरा हॅम्लेट द्या.....
ते दोन मिनिट गप्प.....मी परत म्हटले काका हॅम्लेट द्या......
ते पण छत्रपती........त्यानी हेल्मेट शेजारचे पुस्तक उचलुन हातात दिले........त्याना काय वाटले कोण जाणे...
मित्र म्हणतो.....अरे गाढवा, हेल्मेट म्हण्.....हेल्मेट...........!
भ्रमर
भ्रमर
एक तासापासुन हेड्फोन लावुन
एक तासापासुन हेड्फोन लावुन बसले होते. गाणी लावायचे ठार विसरून
>>एक तासापासुन हेड्फोन लावुन
>>एक तासापासुन हेड्फोन लावुन बसले होते. गाणी लावायचे ठार विसरून
मायबोली वाचत होतात का?.... मग असे होणे साहाजिक आहे.... मी कित्येक वेळा बस मिस केलीये या मायबोलीच्या नादात
पनू मी अनेकदा यूट्यूबवर काही
पनू
मी अनेकदा यूट्यूबवर काही ऐकत-पहात असले आणि ती फिल्म संपली तरी कानावर हेडफोन ठेवून तसेच कॉम्पवरचे इतर काम चालू असते.... मग कधीतरी कान दुखायला लागतात आणि आपण नुस्तेच कानाला हेडफोन लावून बसलोत ह्याचा अगाध साक्षात्कार होतो!!!!
माय्बोलिच्या नादात बस कशी
माय्बोलिच्या नादात बस कशी मिस्स केलि भाउ.....
वाचत बसलो काहीतरी इंटरेस्टिंग
वाचत बसलो काहीतरी इंटरेस्टिंग किन्वा कुठलातरी बीबी पेटला असला की वेळेच भानच रहात नाही आणि चुकते मग बस
एक तासापासुन हेड्फोन लावुन
एक तासापासुन हेड्फोन लावुन बसले होते. गाणी लावायचे ठार विसरून >>>
>>>>एक तासापासुन हेड्फोन
>>>>एक तासापासुन हेड्फोन लावुन बसले होते. गाणी लावायचे ठार विसरून
पन्या अलौकिक शांती अनुभवत होती बहुदा.
ऑल एक से बढकर एक
ऑल एक से बढकर एक
अरे, बर्याच दिवसात कोणी
अरे, बर्याच दिवसात कोणी वेन्धळेपणा केलेला दिसत नाही...........थन्ड पडलेत......
तसेच कॉम्पवरचे इतर काम चालू
तसेच कॉम्पवरचे इतर काम चालू असते.... मग कधीतरी कान दुखायला लागतात आणि आपण नुस्तेच कानाला हेडफोन लावून बसलोत ह्याचा अगाध साक्षात्कार होतो!!!!
अरुंधती ,
आमच पण सेम असच होतं ...
हा हा हा.... आताचा ताजा
हा हा हा....
आताचा ताजा वेंधळेपणा....
मगाशी मी कॉम्प्युटर पुसताना गडबडीत माऊस उचलून बाजूच्या टेबलवर ठेवून दिला.
आणि आत्ता जेव्हा कॉम्प्युटर ऑन केल्यावर माझ्या हाताला माऊस नेहमीच्या जागी लागेना तेव्हा भयचकित होऊन त्या रिकाम्या जागेकडे ''असा कसा अदृश्य झाला हा?'' असे मनात म्हणत बघत बसले होते.... आणि हाताची बोटे जणू आपण चाचपडल्याने माऊस जादूने तिथे परत आधीच्या जागी परत येणार आहे अशा थाटात उगाच माऊसपॅडला चाचपडत बसली होती!!!!
काही काळाने मेंदूला योग्य सिग्नल मिळाला.... म्हणजे नजर भिरभिरत शेजारच्या टेबलावर गेली, माऊस गवसला आणि आमच्या कॉम्प्युटर राजधानीत सारे काही आलबेल झाले!
टी व्ही रिमोट , पहिल्या
टी व्ही रिमोट , पहिल्या अटेम्ट्ला कोणाला सापडतो बरे? मला त्याचे/तिचे दर्शन घ्यायचेय...
मी अनेकदा मोबाईल हा टि.व्ही.
मी अनेकदा मोबाईल हा टि.व्ही. रिमोट आहे असं समजून बराच वेळ बटणे दाबली अहेत. काहीही होत नाही हे समजल्यावर लक्षात येतं आपण काय करत होतो ते
मी अनेकदा मोबाईल हा टि.व्ही.
मी अनेकदा मोबाईल हा टि.व्ही. रिमोट आहे असं समजून बराच वेळ बटणे दाबली अहेत.
तु चुकुन कॉर्डलेस मोबाईल म्हणुन घेउन हिंडत असशिल..
तो ही वेंधळेपनाचा किस्सा म्हनुन टाक.
रिमोट एवढा मोठ्हा मोबाईल ?
मल्ल्या
मल्ल्या
मल्ली, रिमोट आणि मोबाईल
मल्ली, रिमोट आणि मोबाईल शेजारी शेजारी ठेवले असले की असे हमखास होते!
त्यात ते म्यूझिक सिस्टीम, डीव्हीडी प्लेयर वगैरे वगैरे चे रिमोट टीव्हीच्या रिमोटपेक्षा जरा नाजूक आणि आकाराने लहानच असतात!! पटकन अजिबात लक्षात येत नाही.....
चष्मा, रिमोट, किल्ल्या यांच्यासाठी एखादा बीपर का निघत नाही? आयत्या वेळेला गायब होतात ही मंडळी! अर्थात तो बीपर देखील त्या वेळी सापडायला हवा!
बीप् बीप् बीप्
बीप् बीप् बीप्
माझ्या बहिणीने एकदा घरातला
माझ्या बहिणीने एकदा घरातला कॉडलेस फोन पर्समधुन मोबईल समजून नेला होता....... सोसायटीच्या गेटवर गेल्यावर आईच्या लक्षात आले...हाक मारुन बोलावल्यावर पुन्हा वर आली, बघते तर मोबाईल समोर पडलाय्....आणि चक्क कॉड्लेस पर्समधे.........!
नशीब, आपल्याला मोबाईल खिशातुन न्यायची सवय आहे.....आणि खिसे कोड्लेस मावेल इतके मोठे नसतात....!
भ्रमर, माझ्या आईने टीव्हीचा
भ्रमर, माझ्या आईने टीव्हीचा रिमोट मोबाईल समजून दोन-तीनदा कामावर नेलाय.... एवढेच नव्हे तर त्याला कधी उशीच्या अभ्र्यात, कधी फ्रीजमध्ये, कधी किचन ओट्यावर तर एकदा चक्क वॉश बेसिन शेजारी मानाची जागा मिळाली आहे!
टीव्ही चा रीमोट उशीच्या
टीव्ही चा रीमोट उशीच्या अभ्र्यात्........आणि फ्रीज्मधे.....??? पण नक्कि काय समजुन???
Pages