मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल टीवीवर मुंबईचा नविन बांधण्यात येणारा टॉवरबद्दल सांगीतल ,
बायकोने फक्त बातमी ऐकली ,मला म्हणते अगोदरच बाकीच्या टॉवरमुळे पक्षी कमी होताहेत,रेडियेशन होतयं मग ... आणि हा आणखी एक टॉवर कशाला ?

रोज घरुन रिकामा डबा घेउन मेस मध्ये जाउन भरुन घेउन ऑफिसला येत असतो... आज रिकामाच डबा घेउन आलो Sad ऑफिसच्या अर्ध्या वाटेवर आठवले की मी डबाच भरुन आणला नाही. पुन्हा परत मागे मेसला जाउन भरुन आणले....

किरू Rofl Rofl Rofl Rofl Rofl

गाडी गेटच्या बाहेर काढली......हो......आमच्या गावात अजूनही हात वगैरे बाहेर काढून ...एस्पेश्यली जर तुम्हाला राईट टर्न हवा असेल तर........समोरून येणार्‍याच्या डोळ्यात बघून, कधे कधी खिडकीतून अर्धे बाहेर येऊन अगदी उजवीकडे बोट दाखवायला लागते ...तरच समोरून येणारा स्पीड कमी करून आपल्याला उजवीकडे वळू देतो.
ओके तर गाडी बाहेर काढली जेव्हा राइट टर्न आला तेव्हा हात दाखवण्यासाठी बाहेर काढला तर ग्लासच खाली केलेली नसते(म्हणजे पहा......असं बर्‍याच वेळा होतं) हात असा आपटतो ग्लासवर ! वेंधळेपणा दुसरं काय!

मी एकदा स्कूटर पार्क करुन चालत जात असताना रस्ता क्रॉस करताना शिस्तीत उजवा हात बाहेर काढून वळलो आहे Happy
सुदैवाने मागून मला कोणी पहाणारे नव्हते (अशी मी मनाची समजूत घालून घेतली) Happy

किरण तसे करावेच लागते हल्ली .बरेच जण , (मीही) तसेच करतो त्याने मागचे वाहनचालक गडबडत नाहीत.

म-८० वरून जात असताना उजवीकडे वळायचे म्हणून हात आणि इंडीकेटर दोन्ही दिला. पण अचानक मागची मैत्रिण म्हणाली अगं ही ती गल्ली नव्हे. मग इंडिकेटर बंद केला आणि परत उजवा हात बाहेर काढून फुली केली.
हे एकदा वेंधळेपणा म्हणून आणि मग नंतर मुद्दामून करायचे.

नी, तू हे पुण्यात केले होतेस का कधी? मागे जोंधळे चौकात माझ्या एका भावाच्या पुढे वाहनावर असलेल्या एका मुलीने टर्न कॅन्सल केला म्हणून अशीच हाताने फुली केली होती आणि तो बिचारा गाडी साईडला लावून हसून हसून कोसळायचा शिल्लक राहिला होता! Lol

मी नेहमीच हे पुण्यात केलेय पण हे असं करणारी मी एकटीच नाहीये. मला निदान १० मुली आणि १० मुलं माहितीयेत हे करणारी... (यातल्या बर्‍याचश्यांनी माझ्याकडून 'प्रेरणा' घेतलीय.. Wink )

आजचा माय्बोलीवरचा वेंधळेपण...

सकाळच एक कथा लिहायला घेतली. मधेच बाहेर जायचं होतं म्हणून कथा सेव्ह केला. ती अपूर्ण न ठेवता प्रकाशित करून टाकली.

आता येऊन बघते तर ८ प्रतिसाद. त्यातला सूर्यकिरण यांचा प्रतिसाद
नंदीनी ,सुंदर प्रसंग .. ही अजब दुनिया अन जगब रीत फक्त प्रेमातच अनुभवायला मिळते. खरतर दोघांनाही ऐकमेकांशिवाय जगता येत नाही तरीही मरणाच्या गोष्टी करून emotional blackmail करणं.

वाचून ताडकन उडालेच. Happy फक्त मधुकर याचा प्रतिसाद "काहीतरी घोळ झालेला दिसतोय" असा आहे... Proud

ता.क. आता कथा शोधायला जाऊ नका. वेंधळेपणा निस्तरलाय. Happy

>>>>>> टर्न कॅन्सल केला म्हणून अशीच हाताने फुली केली होती

हवेत पण पुणेरी पाट्या लिहतात काय Proud

ऑफीसला पाऊस असताना रेन कोट घालुन आलो, पण ५-६ वेळा तरी घरी जाताना विसरुन गेलो .....ते ही पावसात भिजत ! कारण सवयच नाही ते वापरुन !

काल लिफ्टमधून आमच्या मजल्यावर उतरले तर समोर आमच्या वरच्या मजल्यावर राहणारी शेजारीण तिच्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. मला वाटले, लिफ्टचीच वाट बघत असावी...म्हणून मी लिफ्टचे दार तिच्यासाठी उघडेच ठेवले आणि माझ्या घराची लॅच उघडू लागले.... बघते तर ती शेजारीण अजून तिथेच उभी! मग लक्षात आले की ती लिफ्टमधून जाण्यासाठी तिथे उभी नव्हतीच मुळी! तिला माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहाणार्‍या शेजारणीशी बोलायचे होते म्हणून तिच्या घराची बेल वाजवून ती त्या दारासमोर उभी होती! आमच्या समोरच्यांचे दार लिफ्टच्या अगदी जवळ आहे.
तरी तिला विचारून खात्री करावी म्हणून मी तिला लिफ्टविषयी विचारले तशी तिने जोरात जीभ चावली. मग ती आणि मी दोघीही एवढा वेळ उघडा असलेला आणि टॅssटूंssटॅssटूंss आवाज करणारा लिफ्टचा दरवाजा लावायला धावलो! तिलाही लक्षात आले नाही की मी तिच्यासाठी लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि मलाही कळले नाही की ती लिफ्टसाठी नव्हे तर शेजारणीशी बोलायला तिथे थांबलीय.... दोघीही वेंधळ्या! बिचारी लिफ्ट! Proud

माबोवरच्या Proud या स्मायलीचं मी एकदा सहज म्हणून चित्र काढलं. पण ते काही केल्या या मूळ दात विचकणार्‍या चेहर्‍याच्या जवळपासचंही वाटेना. मी बराच वेळ विचार केला पण लक्षात आलं नाही. मग नवर्‍याला दाखवलं. तर तो ते पाहिल्या पाहिल्या खो खो हसायला लागला. कारण मी त्या विचकलेल्या दातांच्या एकाखाली एक तीन ओळी काढल्या होत्या! Proud

ललिता Proud Proud

अरुं. Biggrin
ललिता,ती अजूनच विचकलेली दिसत असेल.. या स्मायली ला पाहून भ्यायली नाहीस का??? Biggrin

परवाच्या पावसातला वेंधळेपणा: स्टेशनला पोहोचलो जिने चढु लागलो, लोक माझ्याकडे बघत होते...म्हटल काय झालं? तसाच पुलावर गेलो, प्लेटफॉर्म चे जिने उतरलो, प्लेटफॉर्मवर येऊन उभा राहिलो, तरीही सगळे माझ्या कडेच बघतायत, अरे का सगळे बघतायत? नंतर लक्षात आलं छत्री उघडीच होती Lol

रामसेकडे बघ खपतो का हा नवा मुखवटा >>> Proud तोषभाय, मरे हुए को और क्यों मारते हो? Proud

वैभव Rofl Rofl Rofl Rofl

आज आम्ही इथले सी वल्ड पहायला गेलो, आणि जकार्ता मधे वेज फूड तसे सहज मिळत नाही म्हणुन थेपले दही, लेकासाठी उपमा, मफीन्स, असा सगळा प्रपन्च घेतला सॅक मधे आणि , उतरताना सॅक टॅक्सीत विसरलो. ५ मिनिटानन्तर लक्शात आले , पण तोवर टॅक्सी गेलेली होती.

छान......

डोक दुखत होते म्हणुन zandu balm चा वास घ्यायला बाटलि काढलि अन झाकणाचा वास घेतला वास येत नव्हता
Happy

Pages