Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
ऑफीस मध्ये automatic wash
ऑफीस मध्ये automatic wash basin आहे. (tap controller by infrared) त्याची एव्हढि सवय झालीय की बरेचदा घरी वॉश बेसिन समोर नुसताच हात पुढे करुन उभा राहतो. नंतर ल़क्षात येवुन नळ चालु करतो.
मायबोलीकर
मायबोलीकर
मुग्धा, एटीम कार्डाशिवाय पैसे
मुग्धा,

एटीम कार्डाशिवाय पैसे काढता आले असते तर ...
मायबोलिकर आत्ताच्या आता इथे
मायबोलिकर आत्ताच्या आता इथे एक वेंधळेपणा केला मी autmatic wash basin असं वाचण्या ऐवजी automatic washing machine असं वाचलं..
म्हणलं तुम्ही हापिसात कपडे बिपडे धुता की काय?
दक्शे मलाही तसेच वाटले
दक्शे मलाही तसेच वाटले
एकदा चक्क भज्याच पीठ आमच्या
एकदा चक्क भज्याच पीठ आमच्या एका मित्रानी पीठल म्हणून खाल्ल
आहेत इथच निळू भाउंच्या नावानी
त्यालाना चवीच कळतच नाही...
एटीम कार्डाशिवाय पैसे काढता
एटीम कार्डाशिवाय पैसे काढता आले असते तर ... <<< अजून काही दिवसांनी आंगठा, अगर Retine Scan ने नक्कीच काढता येणार आहेत..
कॉलेजमधले नविन दिवस होते. मी
कॉलेजमधले नविन दिवस होते. मी आणि माझे दोन मित्र कंप्यूटर सायन्स डिपार्ट्मेण्ट शोधत होतो.
बर्याच वेळाने सापड्ले.उजव्या दरवाज्यावर लिहीले होते "Use other door" आणि त्याच्या खाली
<-- हे चिन्ह लिहिले होते. आम्हाला वाटले इमारतीच्या डाव्याबाजुला मुख्य दरवाजा आहे, त्यामुळे डाव्याबाजुने शोधत निघालो. पुर्ण प्रदक्षिणा मारली तरी दुसरा दरवाजा नाही मिळाला. परत पुर्वीच्या दरवाज्याजवळ आलो, याच वेळेस एक माणुस डावा दरवाजा उघडुन आत शिरला.
एक्दम ट्युब पेट्ली आणि आम्ही तिघेही एक्मेकांकडे बघुन हसत सुटलो.
टिल्लू यात नक्की काय झाले
टिल्लू यात नक्की काय झाले कळले नाही...
मायबोलीकर, टिल्लू
मायबोलीकर, टिल्लू
बहिणीच्या लग्नाची पत्रिका
बहिणीच्या लग्नाची पत्रिका पाठवलीय सर्वाना. ई मेल मधे लिहिले की लग्नाची वेळ आणि स्थळ सोबत जोडलेल्या पत्रिकेमधे नमुद केलेय. आणि पत्रिका स्कॅन केलेली फाईल अटॅच केलीच नाही
धडाधड रिप्लाय येत आहेत.
साजिरादादा मायबोलीकर टिल्लु
साजिरादादा मायबोलीकर टिल्लु खुप खुप हासले
पने..
पने..
पनू, तू आणि तुझं ईमेल दोन्ही
पनू, तू आणि तुझं ईमेल दोन्ही विरक्त (without any attachment) का झाले? आता सॉरीचं ईमेल+ पत्रिकेची अॅटॅचमेन्ट नक्की पाठव!
एका पावसाळ्यात ट्रेकला जायचे
एका पावसाळ्यात ट्रेकला जायचे ठरले. ठरल्याप्रमाणे ट्रेकच्या दिवशी सकाळी ६:०० वाजता ग्रुपमधल्या मैत्रिणीच्या घरी जाऊन तिथून सामान (आणि तिला) घेऊन मला पुढे निघायचे होते. मी मैत्रिणीच्या बिल्डींगच्या गेटपाशी आलो. गेट लहानच होतं.. एक माणूस जाऊ शकेल एवढं. दररोज रात्री १०:०० नंतर ते गेट कुलूप लाऊन बंद केलं जायचं आणि सकाळी ७:३० - ८:०० ला उघडलं जायचं.
मी गेट बंदच असणार या कल्पनेने कुलूप वगैरे चेक न करता सरळ गेटवर चढलो. ज्याक्षणी वर चढलो त्याक्षणी माझ्या धक्क्याने ते गेट उघडलं गेलं. मी तसाच घट्ट पकडून गेटवर उभा होतो. त्याचवेळेस जॉगिंगला निघालेला एक माणूस तिथे आला आणि गेट पूर्ण उघडलं जाईपर्यंत माझी विचित्र परिस्थिती चमत्कारीक नजरेने बघत उभा राहिला. एक कुत्रा माझी गेट उघडायची पद्धत नं आवडल्यामूळे माझ्याकडे तोंड करून जोरजोरात भुंकायला लागला आणि हे सगळं बघून माझी मैत्रिण वर गॅलरीत खो खो हसत होती.
मी मात्र वॉचमनचा मनांत उद्धार करत होतो.. या गाढवाने गेटला कुलूप का लावले नाही काल रात्री?
अरु विरक्त>>
अरु विरक्त>>:)
माझी गेट उघडायची पद्धत नं
माझी गेट उघडायची पद्धत नं आवडल्यामूळे माझ्याकडे तोंड करून जोरजोरात भुंकायला लागला>> बापरे, सर्व दृश्य कसे असेल हा विचाराने जाम हसु आले.:हाहा:
.
.
किरू जॉगिंगला निघालेल्या
किरू जॉगिंगला निघालेल्या माणसाला आणि कुत्र्याला वाटलं असेल की हा एवढा मोठा मुलगा सकाळी सकाळी दारावर गाडी गाडी का बरं खेळतोय? हो ना?
<<< अजून काही दिवसांनी आंगठा,
<<< अजून काही दिवसांनी आंगठा, अगर Retine Scan ने नक्कीच काढता येणार आहेत
अहो परदेसाई ..
आमच्या कोल्हापुरला २ वर्षापुर्वीच वारणा बैंकेने अंगठ्या दाबुन एटीएम सुरु झालेलं आहे , पुण्यातही प्रयोग झालेला आहे, पण काही अडचणी असतील ...
आमच्या कोल्हापुरला २
आमच्या कोल्हापुरला २ वर्षापुर्वीच वारणा बैंकेने अंगठ्या दाबुन एटीएम सुरु झालेलं आहे >>> कसल्या अंगठ्या?? सोन्याच्या की चांदीच्या? खडे बसवलेल्या अंगठ्या चालतील का हो ?
अनिल७६
किरू, सीन इमॅजिन करून फार हसले.
किरू हा सिन सेम टू सेम चाची
किरू
हा सिन सेम टू सेम चाची ४२० मध्ये आहे.
किर्या
किर्या
किरु आज सकाळी चेहर्याला
किरु
आज सकाळी चेहर्याला क्रीम फासताना ते नीट लागलं आहे का बघण्यासाठी हातात धरायच्या छोट्या आरशाऐवजी क्रीमच्या डबीचे प्लास्टिकचे गोल झाकणच चेहर्यासमोर धरले आणि काही क्षण विचार करत होते...... आरशात आपलं तोंड दिसत का नाहीए?
किरु..
किरु..
किरु
किरु
नंदिनी, आपल्या स्वतःच्या
नंदिनी,

आपल्या स्वतःच्या हाताचा (दावा की उजवा ते एकदा विचारुन घेतो ) अंगठा !
टेकवायचा आणि नोटा खिशात घालायच्या ....
(खात्यावर असतील तर ....)
किरु, अरु.........लई हसवले
किरु, अरु.........लई हसवले बघा.......!
..
..
Pages