Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टीव्ही चा रीमोट उशीच्या
टीव्ही चा रीमोट उशीच्या अभ्र्यात्........आणि फ्रीज्मधे.....??? पण नक्कि काय समजुन???

आताच चहा आला........एकिकडे
आताच चहा आला........एकिकडे लॅप्टॉप्च्या स्क्रीन्वर माबो वाचन चालु होते........ जवळजवळ ३ वेळा कपाच्या काना नसलेल्या भागाला हात लावत कपाचा कान शोधत होतो..... पण नजर काही स्क्रीन्वरुन हटेना...... कप का पकडता येत नाही म्हणुन स्वतह्वरच वैतागलो.......
<< जवळजवळ ३ वेळा कपाच्या काना
<< जवळजवळ ३ वेळा कपाच्या काना नसलेल्या भागाला हात लावत >>
म्हणजे आतल्या बाजूला ? कारण कपाला दोन बाजू असतात आतली आणि बाहेरची... त्यातल्या आतल्या बाजूला कान नसतो.. कधीकधी बाहेरच्या बाजूलापण नसतो...
<< जवळजवळ ३ वेळा कपाच्या काना
<< जवळजवळ ३ वेळा कपाच्या काना नसलेल्या भागाला हात लावत >>
मग वेलांटी असलेल्या भागाला हात लावाय्चा.. हाकानाका
मल्ली, ये हुई ना बात
मल्ली, ये हुई ना बात
"मल्लिनाथी" म्हणतात ती यालाच
"मल्लिनाथी" म्हणतात ती यालाच का????
आलेल्या फोनवरून नम्बर लिहून
आलेल्या फोनवरून नम्बर लिहून घ्यायला कोणाला पेन /पेन्सिल लग्गेच सापडते. ? त्याचे /तिचे मला दर्शन घ्यायचे आहे.
(पेन मिळाल्यावर नम्बर कशाकशावर लिहून घेतला जातो?)
पेन मिळाल्यावर नम्बर कशाकशावर
पेन मिळाल्यावर नम्बर कशाकशावर लिहून घेतला जातो?
१. ट्रेन / बस / पार्किंग चे तिकिट
२. कॅलेण्डर
३. मुलांच्या वहीत
इ. इ.
तळ हात
ए टी एम ची स्लिप
पेनाअभावी लिपस्टिक सापडल्यास
आरसा
पेन मिळाल्यावर नम्बर कशाकशावर
पेन मिळाल्यावर नम्बर कशाकशावर लिहून घेतला जातो?
>> तळहात, तळपाय, मनगट, ई. शरीराचे भाग, जवळची भिंत...
अगदीच कॉन्फीडेंट असाल तर लिहुन न घेता आठवणीत ठेवला जातो
काल राजनीती पाहिला. त्याचा
काल राजनीती पाहिला. त्याचा वृत्तांत-
स्क्रीन ३ ला जाऊन बसलो. एका बाजूला बायको आणि दुसर्या बाजूला आई. रण्बीर बाळ आणि राम्पालादादांनी नायिकांसोबत धाडसी सीन्स करायला सुरुवात केली (यासाठी जाऊ नये. कृपया.) तेव्हा मला आईसमोर अवघडल्यासारखे होऊ नये, म्हणून मी ४-५ रांगा ओलांडून पुढे जाऊन निवांत पाय पसरून बसू या, असं ठरवलं. मग तेवढ्यात फोनच आला आणि मला उठायला निमित्त मिळालं. बाहेर जाऊन पाच मिनिटे फोनवर बोलून आत आलो, आणि पुढे जाऊन बसलो. स्क्रीनकडे पाहिलं, तर दहाच मिनिटांत पात्रांची भाषा, बोलणे, कपडे बरंच बदलल्यागत दिसत होते. प्रकाश झाचं मी मनात कौतुक केलं. फ्लॅश बॅक / फॉरवर्ड असावा म्हणून मी लक्षपूर्वक बघू लागलो. जास्त पात्रे आणि प्रसंग, गुंतागुंतीची कथा असली, की मला झेपत नाही. म्हणून जरा ताण देऊन पाहू लागलो.
बरेच मोठे युद्ध होऊन सिनेम्यातला कर्ण 'निहथ्था' झाला. मला थोडा वेळ दे, असं म्हणू लागला. आणि सिनेम्यातला अर्जून विचारात पडून पिस्तुल खाली करून 'आता कसा वार करू?' असं सिनेम्यातल्या कृष्णाला विचारता झाला. तेव्हा कृष्ण खुनशी हसून 'तेव्हा याचा धर्म कुठे गेला होता? आता हाण त्याला!' असं म्हणाला. आणि एकच डिश्क्यांव होऊन सिनेमा संपल्याची टायटल्स येऊ लागली, तेव्हा मी घाबरलो. फक्त १ तासाचा सिनेमा?
मी मागे बघितले, तर घरच्यांपैकी कुणीच दिसले नाही. झालेला राडा लक्षात आला. खाली मान घालून मी त्या स्क्रीन २ च्या तिकिटचेकरला स्क्रीन ३ चे तिकीट दाखवले. त्याने दयार्द्र नजरेने बघत आणि येड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस, गाढवांची जत्रा, उंदरांची हौस.. असे काहीतरी पुटपुटत प्रवेशाचा दरवाजा उघडून दिला.
परत स्क्रीन ३ ला आलो, तर तिथे इंटर्व्हल झाला होता. परत तिथूनच पुढे बघणे म्हणजे शिक्षा होती. मी निराश होऊन बाहेर पडलो. गेटकीपरांच्या नजरा चुकवून स्क्रीन-१,२,३,४ च्या दरवाज्यांकडे आळीपाळीने बघू लागलो. २ व ३ बाद. ४ मध्ये तिसराच कुठला तरी सिनेमा चालला होता. शेवटी देवाचं नाव घेऊन १ ला घुसलो. तर सुरुवात होऊन १५ मिनिटे झालेली. म्हणजे बरोबर वेळेला मी गेलो होतो. आता जरा जास्तच लक्षपूर्वक बघावे लागणार होते.
दरम्यान झालेला प्रकार घरच्यांच्याही लक्षात आला. आणखी तासाभरात 'आमचा सिनेमा पाहून झाला आहे. गुमान बाहेर पडून ड्रायव्हरकी कर' असा संदेश आला. मारक्या हेडमास्तकडे पोरानं बघावं, तशी स्क्रीनकडे एक शेवटची नजर टाकून मी बाहेर पडलो. जाताना माझी मान खाली, आणि इतर सारे तोंडाला फेस येईस्तोवर हसत होते.
राजनीतीच्या पझल गेमचे तुकडे तेव्हापासून जोडत बसलो आहे. जोडून झाल्यावर परीक्षण लिहिले तर चालेल काय??
साजिरा अशक्य!!!
साजिरा
अशक्य!!!
साजिरा, अशक्य आहेस तू.. सिटी
साजिरा, अशक्य आहेस तू..
सिटी प्राईड मध्ये भलताच "वट" दिसतोय तुझा
स्क्रीन-१,२,३,४ च्या
स्क्रीन-१,२,३,४ च्या दरवाज्यांकडे आळीपाळीने बघू लागलो >>>
साजिर्या भन्नाट रे !
साजिर्या भन्नाट रे !
<<<स्क्रीनकडे पाहिलं, तर दहाच
<<<स्क्रीनकडे पाहिलं, तर दहाच मिनिटांत पात्रांची भाषा, बोलणे, कपडे बरंच बदलल्यागत दिसत होते. प्रकाश झाचं मी मनात कौतुक केलं<<<
येड्यांचा बाजार, पेढ्यांचा
येड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस, गाढवांची जत्रा, उंदरांची हौस..

साजिर्या...............शब्द
साजिर्या...............शब्द नाहीत्........नशीब, दुसर्या स्च्रीन्मधे भलत्याच्याच आई आणि बायकोच्या मधे जाउन नाही बसलास.........नाहीतर बजुच्या बदललेल्या पात्रान्चे (आई आणि बायको - दुसर्याची) कपडे, बोलणे बदललेले पाहुन प्रकाश झा बरोबर मनातल्या मनात स्वतह्चे पण कौतुक केले असतेस.......!
साजिरा.... अशक्य आहेस तू.
साजिरा....:हहगलो:
अशक्य आहेस तू.
साजिरा
साजिरा
साजिरा निखळ करमणूक
साजिरा
निखळ करमणूक 
आपल्या सगळ्यांच्या
आपल्या सगळ्यांच्या वेंधळेपणाचे कारण माहितीचा विस्फोट आणि साधनांचा पूर.
http://epaper.indianexpress.com/IE/IEH/2010/06/08/ArticleHtmls/08_06_201...
अरे काय भन्नाट आहे हे
अरे काय भन्नाट आहे हे साजिरा!!
मला आधी वाटलं सिनेमाचे परिक्षण इथे टाकण्याचा वेंधळेपणा करतोयस की काय.. पण हे इथेच बरोबर आहे! :))
अरे सिगारेट वरून मित्राचा एक
अरे सिगारेट वरून मित्राचा एक वेंधळे पणा आठवला..
माझ्या घराजवळची काही टाळकी अन मी सकाळी ५ वाजता रनिंग ला जायचो. बसस्टॉपच्या खांबाला लोंबकळून उंची वाढवण्याचे प्रयत्न करायचो. त्यावेळे मी अन माझे काही मित्र असचं पहाटे रनिंगला गेलो. तेव्हा कुठेतरी आडोसा अंधार बघायचा अन फुकनळी ओढायचा कार्यक्रम करायचा. एकदा असचं झालं माझ्या मित्राच्या हातात सिगरेट आली आळी पाळीने अन त्याला समोरून त्याचे बाबा येताना दिसले ex army person , मग काय ते आले आमच्या जवळ गुड गुड म्हणायला लागले. तेवढ्यात मित्राने पँटच्या खिशात लपवलेली सिगरेट , रॉकेट लाँच होताना कस फेल होऊन धुर येतो तशी ती खिसा जाळून बाहेर
मग काय त्या ex army काकांनी AK 47 शिव्यांची चालू केली , सगळे त्यात धारातिर्थी पडले अन त्या बिचार्या मित्राला तर रस्त्यावरच धुतला. संध्याकाळी घरी बाबांसमोर हा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला तेव्हा मस्त एक ओल्या प्लॅस्टीक पाईपाचा फटका पाठीवर ! तरीही सिगारेट तेव्हा काही सुटली नाही.. पण आता मात्र अल्विदा आहे !
साजिराssssssssssss........ छे
साजिराssssssssssss........ छे छे, अशक्यच....
साजिरा
साजिरा
और आज के वेंधळेपणे के विनर
और आज के वेंधळेपणे के विनर हैं 'मि. साजिरा'

साजिर्याची स्टोरी काही म्हणा
साजिर्याची स्टोरी काही म्हणा मला काही खरी वाटत नाही...
टोणगा, तुला हा स्वतःकडे लक्ष
टोणगा, तुला हा स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रकार वाटला का?

असेल,असेल अनेकांना सवय आहे ही मायबोलीवर
काल बाबा, मी आणी माझी लहान
काल बाबा, मी आणी माझी लहान बहीण जिम हुन परततांना, मी खुप तावातावात म्हणाले "बाबा मला एटीएम मधुन पैसे काढायचे आहेत" . ते म्हणाले आज नको माझ्याकडे आहेत उद्या काढ...पण मी हट्ट केला आणि
.एटीएम पाहुन रस्ता ओलांडला..बाबांना रस्त्याच्या दुसर्या टोकाहुन म्हणाले " पैसे काढायला कार्ड लागतं बरं का?"
रोड क्रॉस केल्यावर मी ते ऐकलं आणि लक्षात आलं अरे पर्स तर घरीच राहीली आहे (कार्डही)..पैसे कसे काढणार?...
मी तसाच पुन्हा रोड क्रॉस केला आणि बाबांजवळ आले..बाबा हसत म्हणाले, तरी मी म्हणत होतो आज पैसे काढु नकोस म्हणुन ..
साजिरा..
साजिरा..
Pages