मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गेट बंदच असणार या कल्पनेने कुलूप वगैरे चेक न करता सरळ गेटवर चढलो. ज्याक्षणी वर चढलो त्याक्षणी माझ्या धक्क्याने ते गेट उघडलं गेलं. मी तसाच घट्ट पकडून गेटवर उभा होतो. त्याचवेळेस जॉगिंगला निघालेला एक माणूस तिथे आला आणि गेट पूर्ण उघडलं जाईपर्यंत माझी विचित्र परिस्थिती चमत्कारीक नजरेने बघत उभा राहिला. एक कुत्रा माझी गेट उघडायची पद्धत नं आवडल्यामूळे माझ्याकडे तोंड करून जोरजोरात भुंकायला लागला आणि हे सगळं बघून माझी मैत्रिण वर गॅलरीत खो खो हसत होती.
मी मात्र वॉचमनचा मनांत उद्धार करत होतो.. या गाढवाने गेटला कुलूप का लावले नाही काल रात्री?
>>>>>>>>>>>

किरु ___/\___

ए, कुणीतरी "मोठेपणीचे उद्योग" असा बीबी चालू करा रे ... किरु ला अग्रगण्य स्थान द्या त्यात Rofl

प्लेटफॉर्मवर येऊन उभा राहिलो, तरीही सगळे माझ्या कडेच बघतायत, अरे का सगळे बघतायत? नंतर लक्षात आलं छत्री उघडीच होती >>

वैभव, विक्रोळी स्टेशनला का? मी गेल्या शुक्रवारीच एका इसमाला पाहिले असे आणि त्याच्या समोरच हसायला आले मला. तो तूच होतास की क्कॉय :-०

अरे हे काय चाललये..........इथले सगळे वेन्धळे एकमेकाना वेन्धळेपणा करताना पहायला पण लागलेत....

परवा, नीधप ने हवेत मारलेली फुल्लि अरुन्धतिने "जोन्धळे चौकात" पाहिली होती.....
आता काय तर वैभ्या छत्री घेऊन उभा निम्बुडाने पाहिला....... "दुनिया गोल है बॉस.......!"

मला जर गेटवर चढलेला "किरु" पहाता आला असता तर मि धन्य झालो असतो.....त्यासाठी मी कितीही वेळ गेटजवळ वाट पाहिली असती...... दिवसाच्या कुठल्याही प्रहरी......

त्यासाठी मी कितीही वेळ गेटजवळ वाट पाहिली असती...... दिवसाच्या कुठल्याही प्रहरी......
पण गेटला कुलुप रात्रीच लावतात ते... Happy

आज morning shift ला बोलावलं होतं म्हणुन सकाळी लवकर उठलो..
झोपेत चहा करायला burner पेटवला आणि हातातला कप शेगडीवर ठेवला..
हाताला गरम जाणवलं तेव्हा चुक ल़क्षात आली आणि झोप मोड झाली Happy

लहानपणी एकदा घरी आलेल्या मैत्रिणीला बाहेर सोडून येताना तिची वस्तू माझ्याच हातात राहिली हे लक्षात आल्यावर, मी तिला तिच्या नावाने हाक मारायचे विसरून माझ्याच नावाने हाका मारल्या होत्या. Happy

बहिणीच्या लग्नात, कार्यालय सोडायच्या आधी लक्षात आले की एटीएम घरी विसरलेय, पैसे तर भरायला हवेत Sad
मग दादासोबत त्याच्या बाईक वर घरी निघाले, अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आठवलं की घराची चावी घेतली नाहीय. Sad
पुन्हा वापस आले, चावी घेतली अन निघाले. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आठवलं की कपाटाची चावी आईच्या पर्समधे आहे Sad
पून्हा वापस. आता दादा चडफडत होता. मला तिथेच सोडून सर्व चाव्यांसहीत माझ्या नवर्‍याला घेऊन गेला.
एटीएम्,सोन्याचांदीच्या सर्व वस्तू व रोख पैसे एका बॅगमध्ये आजीकडे सुरक्षीतपणे ठेवले होते. कपाटात एटीएम मिळत नाही म्हणून फोन आला तेव्हा लक्षात आले. बरीच बोलणी खाल्ली Sad

एटीएम कार्ड का पनू?

काल रात्री अंडी व्यवस्थित उकडून गार करून फ्रिज मध्ये ठेवली. सँडविच साठी. सकाळी उठून एक अंडे घेऊन ते सोलायला सुरुवात केली तर काय? ते कच्चेच होते पूर्ण. हातावर सांडलेच. तरी डोक्यात प्रकाश पड्ला नाही. काल अंडी नीट नाहीत वाट्ते उकड्ली असेच डोक्यात आले. दुसरे अंडे घ्यायला फ्रिज उघड्ला व मग लक्षात आले फ्रिजच्या दारात अंडी ठेवलेली असतात त्यातलेच एक घेतले होते. उकड्लेली दोन्ही सुरक्षित आत फ्रिज मध्ये ठेवलेली होती. Happy

मी सध्या असंख्य बारीक सारीक वेंधळेपणे करतेय. एकतर सगळं घर कपाटाकॅबिनेटाबाहेर आलंय त्यामुळे काहीच सापडत नाहीये. पण आज सकाळचा जरा गमतीशीर.
'माझा मोबाईल कुठल्या तरी पसार्‍यात गाडला गेला होता त्यामुळे तो शोधायसाठी मी नवर्‍याला म्हणाले माझा मोबाइल दे जरा फोन करून बघते कुठे गळपटलाय ते.'
नवर्‍याने शांतपणे त्याच्या फोनवरून माझ्या नंबरला फोन केला आणि माझ्याकडे 'काय ही बाई!' असा कटाक्ष टाकला.
माझा फोन वाजला. सापडला. हातात घेतल्यावर मी वर शहाजोगपणे नवर्‍याला म्हणाले इत्का काय तु.क. द्यायची गरज नव्हती. कळलं ना तुला मला काय म्हणायचं होतं ते मग झालं तर.. Happy

मी आणि मोदक मागल्या रविवारी एका मैत्रिणीच्या मुलीच्या १ल्या वाढदिवसाच्या celebration ला गेलो आणि अर्धे अंतर कापून गेल्यावर लक्षात आले की गिफ्ट घरीच राहिले. आदल्या दिवशीच गिफ्ट आणून gift paper मध्ये wrap वगैरे करून ready ठेवले होते. पुन्हा मागे फिरावे लागले.

selebration ???

आणखी एक वेन्धळेपणा..............

हाहहाआ.. पनू..चल्ता है रे.. सेलिब्रेशन...एस ..सी.. ?? निंबुडाच्या नकळत तिने केलेला हा वें पणाय

मोदक म्हण्जे तुमचे अहो ना? आम्हाला आत्ता कळलं !

>>>>>>
मला वाटल मोदक म्हणजे मुलगा असेल. मोदकासारखा गोड गुटगुटीत म्हणून टोपणनाव मोदक.
बाकी मला माबोच्या सवयीमुळे नुसते मोदक कोणी म्हणले तरी अनुमोदन देतायेत असे वाटते....
यात एक भावी वेंधळेपणा दडलाय. अजुनतरी घडला नाहीये.

पनू .. आणि कीरु .. Happy सकाळची सुरुवात हे वाचून केल्यामुळे अगदी मस्त वाटतंय..
पोळ्या ठेवायचा माझा डबा/क्यासेरोल कुठे ठेवले आहे काही कळतच नाही .. सगळे अपेक्षित जागी बघून झाले जरा मदत करा न .. मी नेहमीच सुरी किवा सानशी एक तर कुठल्या तरी क्लोझेत मध्ये ठेवते नाही तर बाथरूम मध्ये किवा मुलांच्या बेड च्या खाली सापडते.. पण ह्या वेळेस जरा कहरच झाला आहे . नाही सापडत आहे .. Happy कुठेअसावा..

मी आणि मोदक मागल्या रविवारी एका मैत्रिणीच्या मुलीच्या १ल्या वाढदिवसाच्या celebration ला गेलो आणि अर्धे अंतर कापून गेल्यावर लक्षात आले की गिफ्ट घरीच राहिले>> Happy मागच्याच रविवारी हा प्रकार झाला .. अहोना मागे फिरायला आवडत नाही .. आधीच उशीर त्यात परत काय जायच Uhoh वाटेत एका दुकानात धाडलं .. मग काय स्वारी दुकानात .. तिथे न गिफ्ट प्याक करायचा कागद न ब्याग .. तिथली बाई म्हणते होतं असा कधी कधी . Happy

Pages