Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40        
      
    पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations  इथे पहा.
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
ओके मग आइस्क्रीम किंवा
ओके मग आइस्क्रीम किंवा कुल्फी..आणि इटालियन नकोच म्हणता ना.. नाहितर मी विचार करत होते चिझ पिझ्झा आणणारच तर एक वेज पिझ्झा पण आणेन् म्हणजे अगदीच अमेरिकन लोकांना काहीच नाही आवडलं तर ते खाऊ शकतील कसं वाट्टंय?
यस्स मिनोती कमीत कमी कष्ट अगदी मान्य... लेमनेड तसच करणार्..केशर टाकायची आयडीया छान आहे...डायरेक्ट टाकायचं का केशर?
तु त्यांच्याकडे गेली होतीस
तु त्यांच्याकडे गेली होतीस जेवायला तेव्हा त्यांनी भारतीय जेवण बनवले होते का? नसेलच
 मग तू का काळजी करतेस ते खातील की नाही याची. आणि तुझ्याकडून आत्ता तरी कोणी एवढी अपेक्शा ठेवू नये असे मला वाटते.
खातील ग एक दिवस इंडियन. नान
खातील ग एक दिवस इंडियन. नान आहे न? अगदीच नाही आवडल तर नान साल्साबरोबर खातील. उलट नॉनइंडियन्सच तुझा इंडियन स्वयंपाक संपवतील बघ. मी तर सांगेन बुंदी आणून हवं तर रायता कर म्हणजे काही किसाकिसीपण करायला नको.
अगं मी जाते तेव्हा ते
अगं मी जाते तेव्हा ते एग्प्लांट, पिझा अशा वेजी डीश स्पेशली माझ्यासाठीच आणतात्.. अगं कुणी अपेक्षा करतय की नाही माहित नाही मीच माझ्या अकलेचे तारे तोडतेय्.. ही ही.. बुंदी रायता जाम सोपा आहे करायला मस्त वाटतेय ही आयडीया...
तु त्यांच्याकडे गेली होतीस
तु त्यांच्याकडे गेली होतीस जेवायला तेव्हा त्यांनी भारतीय जेवण बनवले होते का? नसेलच मग तू का काळजी करतेस ते खातील की नाही याची. आणि तुझ्याकडून आत्ता तरी कोणी एवढी अपेक्शा ठेवू नये असे मला वाटते.>>>>>
खरचं ग वरदा, नॉन इंडियन ठेवायची गरज नाही
त्यांना नान, पनीर भाजी, राईस, रायता आवडतं अगं बेबी शॉवर एन्जॉय कर चांगलं काम करून दमू नकोस
तु त्यांच्याकडे गेली होतीस
तु त्यांच्याकडे गेली होतीस जेवायला तेव्हा त्यांनी भारतीय जेवण बनवले होते का? नसेलच मग तू का काळजी करतेस ते खातील की नाही याची. आणि तुझ्याकडून आत्ता तरी कोणी एवढी अपेक्शा ठेवू नये असे मला वाटते.>>>>>
खरचं ग वरदा, नॉन इंडियन ठेवायची गरज नाही
त्यांना नान, पनीर भाजी, राईस, रायता आवडतं अगं बेबी शॉवर एन्जॉय कर चांगलं काम करून दमू नकोस
ओके मग आता असच करेन
ओके मग आता असच करेन गं...
लाइट पुलाव म्हणजे काय करायचं? तो केला तर दाल नाही का करावी लागणार?
लाईट पुलाव म्हणजे जास्त
लाईट पुलाव म्हणजे जास्त मसालेदार नाही. पुलाव केलास तर बुंदी/अननस रायता कर दाल करायची गरज नाही
अननस मला चालणार नाही ना?
अननस मला चालणार नाही ना? बुंदीच करेन...
वरदा, विपू बघ
वरदा, विपू बघ
वरदा काही करु नकोस घरी, आराम
वरदा काही करु नकोस घरी, आराम कर. मी गेल्या वर्षी याच वेळी (सातव्या महिन्यात ) एका कपलसाठी पुरणपोळ्या केल्या आणी तीन दिवस काही सुधरत नव्हते.
बायानो रागावु नका. पण
वरदा , फुड बाहेर ऑर्डर केलस तर तु व्यवस्थित enjoy करशील पार्टी अस वाटत. सगळ्यांशी गप्पा मारता येतील, भारतीय पद्धतीने डोहाळ जेवण करणार असाल तर तुला आणि पाहुण्यांना पण मस्त आस्वाद घेता येईल पार्टीचा. बाळ थोड मोठ झाल कि स्वतःच्या हाताने करुन घाल सगळ्याना.
पटत नसेल तर सोडुन द्या.
बाळ थोड मोठ झाल कि स्वतःच्या
बाळ थोड मोठ झाल कि स्वतःच्या हाताने करुन घाल सगळ्याना.>>> अगदी पटलं,
सीमा पटतय मला फक्त अॅपेटायझर
सीमा पटतय मला फक्त अॅपेटायझर जाम बोर असतात ना गं बाहेरची म्हणून करायची ठरवली... तिखट म्हणून काही नसतच्...सगळे गुजराथी मिळमिळीत करतात अगदीच... पुलाव म्हणून साध्या भातात थोडे मटार आणि जिरं घालून देतात गं आणि त्याचे $५५ घेतायत्.. म्हणून वैताग आला...
बाकी ठिक आहे पण, लहान मुलांना
बाकी ठिक आहे पण, लहान मुलांना म्हणून वेगळे अॅपेटायझरची गरज नाही. चिप्स सगळ्या मुलांना आवड्तात... स्वानुभव.
तुला दगदग न होता होइल अस सगळ कर.
माझ्या मैत्रीणिने तिच्या बेबी शॉवरला हा मेनु ठेवला होता(जस्ट अ सजेशन)
ईटालियन कुकि(कॉस्ट्को)
पेपर जॅक चिझ आणि ग्रेप्स(कॉस्ट्को)
पालक्-पनिर
छोले
नान
जिरा-राइस
गुलाब्-जाम
आणि केक
फक्त जिरा-राइस मैत्रीणीच्या मदतिने घरि केला होता. बाकि सगळ विकत आणल होत.तिचाही ग्रुप मिक्स होता.
मस्त गं मला आवडला मेन्यू..
मस्त गं मला आवडला मेन्यू.. छोले पालक्-पनीर खाल्लं का अमेरिकन लोकांनी पण? कुकी ची आयडीया मस्तच आहे... मी नक्की वापरणार...
मालपुवे कसे करतात? माझ्या
मालपुवे कसे करतात? माझ्या आईला रेसीपी हवी आहे.
इथे कृती आहे.
इथे कृती आहे. प्रतिक्रियांमध्ये इतरांनी व्हेरिएशन्स दिले आहेत. तुम्हाला आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वरदा, कॉस्कोमधे व्हेजी
वरदा, कॉस्कोमधे व्हेजी मीटबॉल्स पण छान मिळतात्.फक्त मावेमधे गरम करायचे. नुसते स्टार्टर म्हणून किंवा ग्रेव्हीमधे कोफ्ताकरी किंवा मंचुरियन सारखे वापरता येतात.आणि तिखट नसतात फारसे..
अरे वा माझ्याकडे नाहिये
अरे वा माझ्याकडे नाहिये कॉस्को मेंबरशिप.. बीजेज आहे..पण मैत्रीणीला विचारुन पहाते आणून...
कुणी ते कॉस्टको मधे रोटीसेरी
कुणी ते कॉस्टको मधे रोटीसेरी चिकन मिळतं ते ट्राय केलंय का? आपल्या देसी स्टाईल ग्रेव्ही मधे घालून चांगलं लागेल का?
धन्स सिंडरेला! आता गेल्या
धन्स सिंडरेला! आता गेल्या गेल्या आईला सांगतो.
बीजेची आहे का मे.शिप मग,
बीजेची आहे का मे.शिप मग, अलापिनो पॉपर आण, बच्चे आणि मोठे सगळेच खातिल.
छोले पालक्-पनीर खाल्लं का अमेरिकन लोकांनी पण? >> हो! याच फक्त ईंडियन डिश आहेत असा(गैर्)समज असतो त्यांचा इथल्या यच्चयावत रेस्तॉरंट मधे जेवण करुन
>>> हो! याच फक्त ईंडियन डिश
>>> हो! याच फक्त ईंडियन डिश आहेत असा(गैर्)समज असतो त्यांचा इथल्या यच्चयावत रेस्तॉरंट मधे जेवण करुन ..हे नक्की इथे सगळीकडे हेच दिसतं... बफे लावतात आणि त्याच त्याच भाज्या १० वेळा ठेवतात... अरे हा आल्पिनो पेपर मस्त आयडिया आहे.... डन... सहीचे काहीच नको करायला म्हणजे मला...किती काळजी करता सगळ्याजणी आणि मस्त मस्त आयडीया देता...खूप थॅन्क्स.....
Hi, Mala urlelya bread cha
Hi,
Mala urlelya bread cha kay karava kuni sangel ka..white breadcha ek akhha pack ahe..1-2 divsat expiry ahe
सुरेखा, - ब्रेड्-बटर पुडिंग
सुरेखा,
- ब्रेड्-बटर पुडिंग करु शकतेस.
- ब्रेड स्लाईसीस्चे बारिक तुकडे करुन त्यात उकडलेला बटाटा, आल लसुण हिरवी मिरची कोथिंबीर यांच वाटण, मिठ घालुन कटलेट्स करता येतिल. यातच इतर भाज्या - बीट, गाजर, मका वगैरे घालता येइल.
- ब्रेड कडकडीत उन्हात वाळवुन किंवा ओव्हन मधे कुडकुडीत होईपर्यंत गरम करुन मिक्सर मधुन त्याचा चुरा कर. पुढे ब्रेडक्र्म्स म्हणुन वापरता येइल.
- ब्रेड फ्रिझ कर. १-२ महिने टिकेल. लागतिल तेव्हढे स्लाईस काढुन टोस्ट करुन खायचे.
ब्रेड चा उपमा/चिवडा करू
ब्रेड चा उपमा/चिवडा करू शकतेस. - ब्रेड चे बारीक तुकडे करायचे. आणी पोह्यांसारखे कांदा, मिरची घालून फोडणीला टाकायचे. मीठ साखर लिंबू कोथिंबीर घालून खायचे
मला माझ्या कडे ५-६ जणींना
मला माझ्या कडे ५-६ जणींना ब्रेकफास्ट आणि जेवायला बोलवायचे आहे तर काय काय करता येइल.
शक्यतो सगले आधीच करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे असेच पदार्थ सुचवा जे करुन ठेवता येतिल. वेळेवर गरम करुन देता येतिल.
निर्मयी, मला सुचलेले काही
निर्मयी, मला सुचलेले काही पदार्थ :
ब्रेकफास्ट :
इडली-चटणी
सॅन्डविचेस : आयत्या वेळी ग्रिल करता येतील.
स्ट्फ्ड पराठे
उपमा
 ओले खोबरे, कोथिंबीर, लिंबू....
रव्यात कांदा, टोमॅटो, मिरच्या इ. भाज्या न घालता बाकी उपम्यासाठीच्या सर्व गोष्टी फोडणीत घालून तो व्यवस्थित कोरडा परतून गार करून हवाबंद डब्यात स्टोअर करता येतो फ्रीजमध्ये.... आयत्या वेळेस उपमा रूम टेंपला आणून, तेलात कांदा - टोमॅटो-मिरची वगैरे भाज्या परतून त्यात हे उपम्याचे मिश्रण घालायचे, प्रमाणात उकळते पाणी घालायचे, मीठ अॅडजस्ट करायचे.... वरून साजूक तूप चमचाभर
साबु खिचडी : दुधाचा किंवा पाण्याचा हबका मारून गरम करता येते.
व्हेज बिर्यानी बरोबर अजुन
व्हेज बिर्यानी बरोबर अजुन एखादी डिश सांगा!! घरचेच दोघ तीघ आहोत.
Pages