Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आरती, ६ मार्च, संध्याकाळी
आरती, ६ मार्च, संध्याकाळी ६.३० नंतर केव्हाही अगदी रात्रीपर्यन्त्.येतेस का? स्वागत आहे.मी कोल्हापूरची असल्यामुळे मिसळ करणार आहे.
कोल्हापूरचीच माणसे असे खुले
कोल्हापूरचीच माणसे असे खुले आमंत्रण देऊ शकतात. (माझेहि आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातलेच बरं का !!)
मंजू, गाजराचा हलवा पण छान
मंजू, गाजराचा हलवा पण छान वाटेल इडलीबरोबर. अर्थात, घरी करायला जरा कष्ट पडतील.
मंजू, श्रावणी, धन्यवाद ..
मंजू, श्रावणी,
धन्यवाद ..
प्राची, अगं गेल्या वर्षी गाजर
प्राची, अगं गेल्या वर्षी गाजर हलवाच केला होता. आत्ता गाजरं छान मिळतात, हलवा आदल्या दिवशी करून ठेवता येतो आणि माझा अत्यंत आवडीचा त्यामुळे पहिला पदार्थ तोच माझ्या डोक्यात येतो.
थान्क्यु पुनम. आणि हो पेप्सी
थान्क्यु पुनम. आणि हो पेप्सी आणि आवळा सरबत्/ज्युस [आयत्या वेळी जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे]आहे.
मंजु, तुमचा बेत पण सही आहे. तुमची मुलगी पण ४ वर्षाची होणार ना! तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा! बोलगाणी मधे तीच गाण पण ऐकल. मस्त्,खुप गोड म्हट्लय.
अभि नंदन छोटीला. मफिन्स पण
अभि नंदन छोटीला. मफिन्स पण आवड्तील मुलांना.
काही छोट्यांना ते ड्रायफ्रूट्स तोंडात आलेले आवड्त नाहीत. सगळे तसेच टाकतात. मग तुझी मेहनत वाया गेली तर? प्लेन फ्लेवर्ड शिरा बरा पडेल. सुका मेव्याची पाकिटे बनवून रिटर्न गिफ्ट मध्ये देता येइल. जस्ट सजेशन बरे का.
मृण्मयी, आर्च धन्स.
मृण्मयी, आर्च धन्स.
नमस्कार माबोकरी लोकहो! मदत
नमस्कार माबोकरी लोकहो!
मदत हवी आहे!
एका लेखात मी "खांतोळी" नावाच्या पदार्थाबद्दल उल्लेख केला आणि ओळखीच्या काही माबोकर्यांनी "कृयोजाटा"(पाककृती योग्य जागी टाका....) चा गजर केला. एखाद्या सडाफटिंग माणसाला हे जमण्याचा काहीही संबंध नाही हे जाणुन ते लोक फुल्ल मस्करी करतायत.. (ते असुदे, ) आता ही कृती घरी फोन करुन विचारणं वगैरे शक्य आहे, पण इथे इतका चांगला बा.फ. असताना ते कशाला? म्हणुन म्हटलं आवाहन करुन बघुया....
(पण एकंदर फारच कमी लोकांना माहिती दिसतोय हा... )
......तर आहे का कोण विडा उचलायला तयार?
......मदत....
आ. न.
ऋयाम
ऋयाम, खांतोळी हा काय प्रकार
ऋयाम, खांतोळी हा काय प्रकार असतो माहित नाही पण तुझी अॅडमिन कडुन खांडोळी व्ह्याच्या आत हा प्रश्न http://www.maayboli.com/node/2549 इथे टाक
पाककृती हवी आहे, माहित आहे का? या बीबीवर..
अॅडमिन इतका चिडका
अॅडमिन इतका चिडका बिब्बा/बिब्बी आहे का?
सांगितल्याबद्दल. मला वाटलं हेच ते म्हणुन इथं टाकलं....
पण आभारी!
मकाण्याचं खिरीशिवाय काय
मकाण्याचं खिरीशिवाय काय करतात?
नो वरीज ऋयाम चमकी, तुझा पण
नो वरीज ऋयाम
चमकी, तुझा पण बीबी चुकला... हे युक्ती सांगा/युक्ती सुचवा किंवा वर दिलेल्या बीबीवर विचार.
इथे मेन्यु सज्जेशन्स अपेक्षित आहेत.
हाय, एका पॉट्लक साठी गुजराथी
हाय,
एका पॉट्लक साठी गुजराथी मेन्यु ठरलाय.
नेहमीचेच, ढोकळा, कढी, उंदियु, खिचडी, हांडवो, मेथी थेपला, कचोरी, डाळढोकरी वगैरे सोडुन एखादा चमचमित आणि एखादा गोड पदार्थ सुचवा प्लिज.
मनु:स्विनीच्या रेसिपीने मोहनथाळ करायचा विचार आहे. पण बिघडलाच तर एखादा वेगळा ऑप्शन असु दे
ओह्...सॉरी सॉरी....
ओह्...सॉरी सॉरी....
लाजो, गोलपापडी कर. वड्या
लाजो, गोलपापडी कर. वड्या असतात त्यामुळे मुलं आली पार्टीत तरी सांडलवंड होणार नाही.
धन्स चिन्नु केली असती गं.
धन्स चिन्नु
केली असती गं. पण मागे एकदा केली होती तेव्हा गुळ्पापडी न होता गुळभगरा झाला होता
नंतर पोळीत भरुन त्यच्या गुळभगरा पोळ्या केल्या 
आणि जेवणाचा बेत आहे त्यामुळे जरा भरपेट काहीतरी लागेल.
चमकी, तुमची विपु बघा.
चमकी, तुमची विपु बघा.
गुजराथी लोक कंसार म्हणून एक
गुजराथी लोक कंसार म्हणून एक प्रकार असतो. आपल्या कणकेच्या शिर्यासारखाच. छान लागतो. शकुनाचा म्हणून करतात. ड्राय फ्रूट्स घालून स्पेशल करता येईल.
तेच लोक लिला चना, (बहुतेक) असा काळ्या चण्याचा एक प्रकार करतात. चटपटीत चाट सारखा असतो.
पांढरा ढोकळा वा अमिरी खमण पण चांगले लागते.
धन्स दिनेशदा, जमल्यास पाकृ
धन्स दिनेशदा, जमल्यास पाकृ टाका ना प्लिज. मला २७-२८ च्या विकांताला करायचाय. मधे थोडा वेळ आहे ट्रायल मारायला
लाजो, फरसाण प्रकार करायचाय की
लाजो, फरसाण प्रकार करायचाय की मुख्य जेवणापैकी काही पदार्थ?
भाजीपैकी तुला तुरीया पात्रा वाटाणा करता येईल किंवा ग्रीन गुजराथ.
गोड पदार्थात त्यांच्यासारख्या तूरीच्या डाळीच्या छोट्या पुपो करता येतील.
धन्स मंजुडी. मुख्य जेवणापैकीच
धन्स मंजुडी. मुख्य जेवणापैकीच काहीतरी करायचय.
गुजरथी पुपो कश्या करायच्या? पाकृ यो जा टा प्लिज
आणि ग्रीन गुजराथ काय प्रकार असतो?
लाजो गुजराती पुपो
लाजो गुजराती पुपो आपल्यासारख्याच असतात पण पुरण तुरिच्या डाळीचं करतात ते. ते ग्रीन गुजराथ मंजूलाच विचारावं लागेल
ग्रीन गुजराथ ही सगळ्या
ग्रीन गुजराथ ही सगळ्या हिरव्या भाज्यांची(वालपापडी, तूरीच्या शेंगा, मटार, तोंडली इत्यादी) केलेली एक ग्रेव्ही असणारी भाजी आहे.
गुजराथी पुपोची बहुतेक जुन्या मायबोलीवर पाकृ आहे. नसेल तर मी लिहिते इथे...
धन्स मंजु
धन्स मंजु
तुरीया पात्रा वाटाणा लिहीलीये
तुरीया पात्रा वाटाणा लिहीलीये : www.maayboli.com/node/14592
लाजो, गवार ढोकळी/ रसपात्रा
लाजो, गवार ढोकळी/ रसपात्रा आणि कणकेचा गुळ-ड्रायफूट घालून केलेला शिरा/ केशरी भात ?
लाजो , वरती आरतीने लिहिलाय
लाजो , वरती आरतीने लिहिलाय तोच कन्सार. तूपावर कणीक खमंग परतून त्यात पाणी वा दूध घालून शिजवायची आणि त्यात गूळ वा साखर घालून शिजवायचे.
आमरस वा खिरीबरोबर ते घडीच्या पोळ्या करतात. पाच ते सात कणकेचे छोटे गोळे, मधे तेल लावून एकावर एक ठेवून लाटायचे.
दिनेशदा या शिर्याचे नाव मला
दिनेशदा या शिर्याचे नाव मला माहिती नव्हते , धन्यवाद . कारण आम्ही त्या शिर्याला 'कणकेच्या गुळाचा शिरा' असं भन्नाट नाव दिलं होतं
आता नीट नाव घेउ 
मी वीकाताला ८ लोकाना डिनर
मी वीकाताला ८ लोकाना डिनर साठी बोलावात आहे माला सोपा मेनु सुचवा तायारि पहिल्या दिवशि करता आली पाहिजे कारण माझी मुलगि 1 year चि आहे .
Pages