बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

*

व्हेज बिर्यानीबरोबर व्हेज सॅन्डविचेस / समोसे/ ढोकळा / रगडा पॅटिस / कटलेट रगडा यातलं काही तरी करता येईल.

समोसे, रायता (दह्यातली कोशिंबीर) आणि काहीतरी गोड - गुलाबजांब वगैरे ठेवता येतील.

मला माझ्या कडे ५-६ जणींना ब्रेकफास्ट आणि जेवायला बोलवायचे आहे तर काय काय करता येइल.
शक्यतो सगले आधीच करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे असेच पदार्थ सुचवा जे करुन ठेवता येतिल. वेळेवर गरम करुन देता येतिल.
वर अरुन्धती नी दिले आहेतच पण अजून काहीतरी सांगा ना प्लीज.......

रविवारी माझे आई बाबा जेवायला येणार आहेत. सगळं ठिक असतं तर प्रश्नच नव्हता. डोळे झाकुन वडे कोबंडी केल असत. पण बाबांची हल्लीच बायपास झाली आहे. म्हणुन प्रश्न. चिकन करयाच आहे. पण खोबरं नको. चमचमीत हवं कारण बाबा आवडीने खाणारे आहेत. शक्य तितकं पारंपारीक हवं. कारण हाडाचे कोकणी आहेत. मी भात आणी उकडिच्या भाकरी करणार आहे. बाकीचा मेनु आणी सगळ्यात महत्वाचं चिकन रेसिपि सकट सुचवा.

१) पालक सूप, चिकन सलाड, ( उकड्लेले चिकन घेऊन) सोया नगेट्सचा रस्सा/ पात्रानी मच्छी. ब्राउन राइस.
यलो दाल.

२) टोमाटो रसम चिकन वर्तकारी, भाकरी, फिश फ्राय( कमी तेलावर) व्हेज बिर्यानी. रायता.

निकीता
चिकन खोबर न घालता कांदा आणि टोमॅटो मस्त तेल सुटेपर्यंत परतुन वाटल्यास आणि चालत असल्यास थोडे दहि घालुन मग अगदी मालवणी मसाला वापरुन केलेस तरी चांगले लागते.
नाहीतर मःनस्विनीने इथे चमचमीत मटण म्हणुन रेसेपी दिली आहे त्यात चिकन वापरुन केलीस तरी चांगले लागते.

चिकन आणी व्हेज एकत्र नाही आवडत बाबांना>> बरोबर आहे पण बायपास नंतर खाण्यावर बंधने येतात. म्हणून लिहीले. अर्थात त्यांचे डॉक्टर सांगतीलच बरोबर काय ते. माझ्या नणंदेला एंजिओ ग्राफीनंतर पालक सूप वगैरे दिले होते. कोलेस्टेरॉल कमी असलेले पदार्थ करावे. संजीव कपूरचे एक नो ऑइल कुकिन्ग म्हणून पुस्तक आहे ते उपयोगी पडेल. तुझ्या उत्साहावर तर विरजण नाही ना पड्ले? काय केले ते सांग नाहीतर रेसीपी टाकच.

निकिता, या बाबतीत काही महिने तरी डॉक्टरांचा सल्ला मानला पाहिजे. कितीहि आवडते पदार्थ असले, तरी या दिवसात संयमाने खाणे अत्यावश्यक आहे. साधा ठसका लागेल, असेही काहि खाता कामा नये.
आणि बाबांनाही हे समजावणे आवश्यक आहे.
चिकन सुप, वगैरे ठिक आहे, पण तेलकट, मसालेदार पदार्थ सध्या नकोत. गोडाचा प्रश्न नसेल तर शिरवळ्या, (नारळाच्या दूधातल्या शेवया ) वगैरे प्रकार चालतील. कोकणीच प्रकार आहेत हे.

निकिता, मी अचारी चिकन ची रेसिपी लिहिलीय त्यात खोबरं अजिबात नाहीये. तसंच लालूने चिकन पांढरा रस्सा लिहिलाय त्यात खोबरं कमी घालून पण करता येईल.
बायपास झाली असल्यास मटण किंवा इतर तेलकट / खोबर्‍याचे प्रकार टाळलेले बरे.
पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, कोरडे फुलके , ज्वारी / बाजरी / नाचणीच्या भाकर्‍या, कमी तेलावर शिजवलेल्या भाज्या, कच्च्या भाज्या ( सॅलड ) यांचा वापर जास्त असावा. चिकन ब्रेस्ट, एग व्हाइट, खोबरं न वापरता माशाची कालवणं हे पण चालेल.
कोलंबी, इतर शेल फिश, मटण यात कोलेस्टेरॉल जास्त असतं तेंव्हा हे पदार्थ जपून.

दही , दाण्याचं कूट, तीळ यांचा वापर देखील जपून .

सगळ्यांची खुप आभारि आहे. बायपास होवुन आत्ता ७ महिने झाले. मी संजीव कपुरच्या रेसीपीने मेथी चिकन, भाकरी, भात, सलाड असा साधाच मेनु ठेवला होता. बाबांना आवडला. Happy

या रविवारी पाच मोठ्यांना नाश्त्यासाठी बोलावलय. सगळे महाराष्ट्रीयन आहेत.
मेनू - आलू पराठे, मोड आलेल्या हिरव्या मुगाची चाट, मठ्ठा/पन्हे, विकतचा ढोकळा, जमल तर गोडाचा शिरा
ठिक वाटत आहे का?

सुप्रभात, शिर्‍याऐवजी दुसरी स्वीट डिश शक्य आहे का? आलू पराठे आहेत तर सोबत स्वीट म्हणून फ्रूट सलाड किंवा आईस्क्रीम छान होईल व तुलाही तेवढेच कमी कष्ट!

आणि जर शिराच करायचा असेल तर त्यात आंबा किंवा अननसाच्या फोडी वगैरे घालून त्याला जरा एक्झॉटिक लुक आणता येईल. बाकी मेन्यू ओके वाटतोय मलातरी! Happy

धन्यवाद अरूंधती आणि सिंडरेला. Happy
हो आंब्याचा पल्प टाकून शिरा करायचा विचार आहे. मधे लिहिलेली कोणीतरी कॄती. सोपी वाटली.

मोड आलेल्या हिरव्या मुगाची चाट, मठ्ठा/पन्हे, विकतचा ढोकळा, >>>> बायो, ह्या ३ गोष्टी आंबट चवीच्या होतील ना? चाट मधे लिंबू पिळतोच आपण. कडधान्याबरोबर मठ्ठा बरोबर आहे. पण ढोकळ्याऐवजी दुसरं काही बघ जमतंय का Happy

सिंडरेला... मला आईस्क्रीम सकाळी ब्रेकफास्टलाही चालतं ;-)! हा हा हा.... असो. मी आपलं जरा कमी कष्टाचं बघत होते Proud आलू पराठ्याचा ब्रेकफास्ट हेवी होतो जनरली असा माझा तरी अनुभव आहे (जरा जास्तच हादडले जातात त्यामुळे ;-)) मग नंतर तोंड गोड करायला म्हणून मिक्स मिठाईतील एखादी वडी/ लाडू वगैरे पुरतो कसाबसा! Biggrin

बायो, ह्या ३ गोष्टी आंबट चवीच्या होतील ना? चाट मधे लिंबू पिळतोच आपण. कडधान्याबरोबर मठ्ठा बरोबर आहे. पण ढोकळ्याऐवजी दुसरं काही बघ जमतंय का >> माझ्या लक्षात नाही आल हे. मग फक्त पराठे (सोबत चटनी), चाट, मठ्ठा आणि आंब्याचा शिरा करते.
मला कोणी अंदाज सांगेल का पराठ्याचा? आम्ही दोघ धरून ७ लोक होतील. मी कधी एवढ्या जणांसाठी नाही बनवलय.
पराठे - ३-४ मोठे बटाटे? प्रत्येकाचे २-३ असे धरून २५ पराठे?

मैत्रिणीच्या मुलासाठी केळवण आहे. तीन कपल्स व एक नवरा मुलगा असे लोक आहेत.
सात पैकी ३ व्हेज व ४ नॉन व्हेज आहेत. माझा टेंटेटिव्ह प्लॅन - नॉनव्हेज मी स्वता: खात नाही व करत नाही. त्यामुळे ते बटर चिकन वगैरे मागवू.
स्टार्टर्स - आधी करून ठेवण्यासारखे - कोथिंबीर वड्या/ सुरळीच्या वड्या ........अजून काही सुचवा.
भाज्या १) बेक्ड व्हेजिटेबल २)दिनेशदांचं कॉर्न पालक
सॅलड - मोडाचे मूग(थोडे शिजवून) + बीट + कांदा वगैरेचे.

पोळ्या, जीरा राईस, दाल --- यात मसूर डाळीची पंजाबी पद्ध्तीने ..किंवा नेहेमीची दाल फ्राय/तडका.
स्वीट डिश सुचवा. व अजूनही काही मेनू असल्यास सुचवा.

धन्यवाद!

नॉनव्हेज करायलाच हवे का? म्हणजे केळवणाला करतात का? मला माहिती नाही म्हणून विचारते आहे टीका करायची म्हणून नाही.
अजून एक म्हणजे जर सगळे महाराष्ट्रीयन असतील तर सगळा नॉन मराठी मेनु करता येईल का?
बेक्ड वेजीटेबल्स पोळीबरोबर जरा ऑड वाटतेय मला. त्याऐवजी फ्लॉवरची एक ड्राय भाजी सांगू शकते. एकदम हीट होते.
भिजवलेली मुगाची डाळ - काकडी-टोमॅटो घालून एक कोशिंबीर करतात तशीच मोडाची करता येतील.
नेहेमीचा जिरा राईस - दाल काँबोपेक्षा बिर्यानी आणि ग्रेव्ही करता येईल का?
स्वीट म्हणून फालूदा करता येईल का? किंवा फिरनी?

चिकन असेल तर दोन भाज्या लागतील का? दाल फ्रायही आहेच.

एक भाजी कमी करून एखादी थंडगार कोशिंबीर करता येईल. घट्ट दह्यातली किंचीत गोडसर अशी.. आणि मग स्वीट डिश पेक्षा डेझर्टच ठेवायचं.

Pages