Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल नवर्याचा वाढदिवस होता
काल नवर्याचा वाढदिवस होता आणि तो ट्रॅव्हल करत होता, पण आज संध्याकाळी घरी येतोय. मी केक ऑर्डर केलाय, पण अजून काहीतरी लवकर होणारी डिश बनवायचा प्लॅन आहे (वर्स्ट केस, बाहेरुन आणेन). मी ऑफिसमधून घरी पोहोचून तो येईपर्यंत माझ्याकडे साधारण दीड तास आहे. रोजच्या जेवणापेक्षा काही तरी वेगळे बनवण्याचा प्लॅन होता. काही लवकर बनणार्या आणि सोप्या रेसिपीजची सजेशन्स आहेत का मायबोलीकरांची?
बेक्ड वेजिटेबल पास्ता करु
बेक्ड वेजिटेबल पास्ता करु शकशील सोबत रोस्टेड रेड बेल पेपर सूप. केक घेशील तेव्हा इटालियन ब्रेड आणुन ब्रुशेटा करता येईल. सगळे मिळुन नक्की तासाभरात होईल.
ब्रुशेटा आणि सूपची आयडिया
ब्रुशेटा आणि सूपची आयडिया चांगली आहे. नवरा पास्ताचा फॅन नाही आहे, त्यामुळे अजून काही तरी वेगळे बनवेन.
नॉन व्हेज चालत असेल तर , होल
नॉन व्हेज चालत असेल तर , होल फूड्स किंवा तत्सम ठिकाणून स्मोकड सामन , सामन कॅव्हियार ( १५-२०$ ) , वेगवेगळे चीझ, थोडे क्रॅकर्स, ऑलिव्ह्स, हमस, असे घे, तिथेच छोटे ब्राउनिज किंवा इन्डीविजुअल केक्स /पेस्त्रिज घे. डिस्पोजेबल काटे चमचे, ब्लॅन्केट , पाण्याच्या बाटल्या, नवरा, मुलगा सगळे गाडीत घाल अन मस्त पार्कमधे जाउन स्नॅक-पिकनिक डिनर कर
त्याला वा दि हा शु
वडा पाव. वडा करायला जमणार
वडा पाव. वडा करायला जमणार नसेल तर विकत आण. बटाटेवडा मराठी माणसाला कुठेही कधिही चालतो.
दोन प्रॉब्लेम्स - नॉन व्हेज
दोन प्रॉब्लेम्स -
नॉन व्हेज खात नाही आणि सध्या पॉलन अॅलर्जीजचा भयंकर त्रास होत असल्याने पार्कपासून आम्ही दूर पळतो
चायनीज आवडत असेल तर हक्का
चायनीज आवडत असेल तर हक्का नुडल्स , स्वीट कॉर्न सुप.
पुर्या आणायला वेळ असेल तर पाणीपुरी .
शेव दही बटाटा पुरी
जीरा राईस किंवा पुलाव .
सीमाच्या मेनुवरुन अजुन एक
सीमाच्या मेनुवरुन अजुन एक सुचलं.
व्हेज/गोबी मंचुरियन आणि व्हेज फ्राईड राईस, हॉट अँड सोर सुप.
प्रिती तिच्याकडे फक्त दिड तास
प्रिती तिच्याकडे फक्त दिड तास आहे ग. व्हेज मांचुरियन दिड तासात कस होणार? वडा पाव तरी दिड तासात कसा होणार?
सेमाय होम मेडच केल पाहिजे.
भेळ्,समोसा चाट,जिरा
भेळ्,समोसा चाट,जिरा राईस्-टोमॅटो सार.
व्हेज म्हणजे पनीरचे मोठे
व्हेज म्हणजे पनीरचे मोठे तुकडे, बेबी कॉर्न आणि फ्लॉबरचे तुरे ह्यावर पाण्यात कॉर्न फ्लावर मिसळुन टाकायचं आणि हे तळुन ग्रेव्हीत टाकायचं. होणार नाही का हे एक दिड तासात?
छान छान मुलींनो. चांगले
छान छान मुलींनो. चांगले सजेशन्स आहेत. धन्यवाद.
काल केलं (किंवा आणलं) ते कळवते उद्या!
काय केलं ते सांग नक्की
काय केलं ते सांग नक्की
गुजुबुजु हा बाफ उघड्त नाहीत
गुजुबुजु हा बाफ उघड्त नाहीत ना कधी?
हो ना मिनी! मला ही तेच वाटलं,
हो ना मिनी! मला ही तेच वाटलं, नाही तर सर्प्राइजचा पोपट!!
होपफुली उघडणार नाही! आणि गुजुबुजु नाही बुजुगुजु
मो अजुन एक छोले (कॅन्ड)
मो अजुन एक
आणि श्रीखंड (विकत आण)
छोले (कॅन्ड) भटुरा आणि पालक कॉर्न पुलाव
लेकी च्या वाढदिवसासाठी
लेकी च्या वाढदिवसासाठी स्टार्टर म्हणून भेळ , शेव पुरी, मग छोले ,मिक्स वेज्/कुर्मा ,पुर्या, दही वडे, जिरा राईस गोड म्हणून गुलाबजाम. आणि केक आहेच,हा बेत कसा वाटतोय?
आणि ह्यासाठी आदल्या दिवशी काय तयारी करता येइल मला?
तोषवी, आम्हालासुध्दा बोलव.
तोषवी, आम्हालासुध्दा बोलव.
बेत वाचून दिलेला अभिप्राय.
तोषवी, अगदी हाच बेत मी माझ्या
तोषवी,
अगदी हाच बेत मी माझ्या वाढदिवसाला करणार आहे.
अनिलभाई, मग आम्हालासुध्दा
अनिलभाई, मग आम्हालासुध्दा बोलवा.
ये ग नक्की ये. न सांगता आलीस
ये ग नक्की ये. न सांगता आलीस तरी चालेल. पता तो मालुमीच है आपको.
अनिलभाई,तुमचाही २४ लाच का
अनिलभाई,तुमचाही २४ लाच का बड्डे!तुम्हाला ही शुभेच्छा!
ह्यातील काय काय तयारी करू आधी?सगळ त्या दिवशी करायला जमणार नाही.पाहूणे राहायला असतील बहुदा आणि ३० लोकान्साठी दहीवड्यासाठी किती डाळ भिजवू ? आणि छोले किती भिजवू? देशात जायचय पुढल्या आठवड्यात मला.उराउरी व्हायला नकोय जास्त. नवर्याच्या एकट्याने सम्पणार नाही ना..म्हणून
तोषवी, गिट्सच्या इंस्टंट
तोषवी, गिट्सच्या इंस्टंट दहिवड्याचे पॅक्स आणून कर. मस्त होतात. भिजवाभिजवी नको. जास्त झले तर फ्रीझ करुन जा. आल्यावर उपेगी पडेल.
माझ्याकडे १०-१२ लोकं
माझ्याकडे १०-१२ लोकं वीकांताला रात्री जेवायला येणार आहेत. मी खाली दिलेला मेनु ठरवत आहे, अजून काही बदल किंवा काही सजेशन्स?
व्हेज पफ/हराभरा कबाब, टोमॅटो सूप
मलई कोफ्ता, तवाभाजी/कुर्मा, बीटाची कोशींबीर, पोळ्या
गट्टा पुलाव, पापड
पुडींग(खजूर/ब्रेड)
भाग्य, बेत छाने. पण मलाई
भाग्य, बेत छाने. पण मलाई कोफ्ता केलास तर गट्टा पुलाव नको आणि vice versa. दोन्ही प्रकारात गोळे आहेत म्हणून.
तोषवी, भेलपुरी नंतर बटाट्याची भाजी किंवा साधा कुर्मा-पुरी ठेवलेले बरे. छोले आणि दहीवडेपण केलेस तर हेवी होतील. पुन्हा चिप्स, केक, ज्युस असं सगळं असतच ना? तरी दहीवड्यांसाठी मिनोतीची आयडीया बेस्ट.
वा काय मेन्यू आहे. पण चिन्नु
वा काय मेन्यू आहे. पण चिन्नु ला अनुमोदन.
माला tea party साथि काहितरि
माला tea party साथि काहितरि snack सुचवा.
स्वरा , दिपचे समोसे/कचोरी
स्वरा ,
दिपचे समोसे/कचोरी आणुन आयत्यावेळी बेक कर.
किंवा वेळ असेल तर व्हेज पफ ,स्प्रिंगरोल असे बनव
चिन्नु, मामी धन्यवाद! मलई
चिन्नु, मामी धन्यवाद!
मलई कोफ्ता ऐवजी पनीर माखनी करेन मग, अजुन सोपं
साबुदाणा वडा +
साबुदाणा वडा + चट्णी
सँडविचेस+ मफिन्स
देसी असतील तर कांदा भजी/ बटाटा वडा
भेळ. दाबेली.
Pages