बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी एक जरा वेगळी कोशिंबीर सांगू का? सफरचंदाचे चौकोनी तुकडे ,त्यात संत्र्याच्या फोडींचा गर काढून तो टाकायचा. दाण्याचा कूट, आणी वरून तूप, जिरं, सुक्या लाल मिरच्यांची फोडणी. चवीला मीठ साखर आणी कोथिंबीरीची सजावट. खूप छान लागते.
थोडा खडा मसाला घालून फोडणी वर भात शिजवून घ्यायचा. शिजतानाच केशर घालायचं, तळलेले काजू, पनीरचे छोटे गोळे तळून चांदीच्या वर्खात घोळवायचे.हे सर्व भातात घालून काजू मोती पुलाव.
भेंडी उभी चिरून घ्यायची त्यात थोडा लिंबाचा रस तिखट मीठ घालून पाणी सुटू द्यायचं. मग बेसन, थोडी तांदूळ पिठी, धणे जिरे पूड, हिंग घालून तळून कुरकुरीत भेंडी., किंवा भरली भेंडी.
टोमॅटोचं सार
फ्लॉवर+ मटार + बटाटा रस्सा. ह्यात अगदी उतरवताना थोडी घरची ताजी दुधावरची साय घालायची. खूप छान वेगळी चव येते. जोडीला पोळ्या
गोडाला मिनोती म्हणते तशी फिरनी, किंवा गाजर हलवा आणी व्हॅनिला आईसक्रीम.

मानुषी, तू जर नॉन व्हेज खात नसशील आणि करत नसतील तर मागवू वगैरे पण नकोस!! कारण, जरी ते नॉन व्हेज वगैरे खाणारे लोक असतील तरी ते व्हेज पण तितक्याच आवडीने खाऊ शकतात. त्यातही मागवायचे झालेच तर स्टार्टर्स नॉन व्हेजमधे मागवले तर चालेल. म्हणजे उरलेला मेनू तुला नीट बनवता येइल आणि अंदाज पण राहील.

हा मेनू बघ.
स्टार्टर्सः पनीर फिंगर्स किंवा व्हेज कबाब (अंजलीच्या कृतीने)
त्यानंतर दम आलू/काश्मिरी व्हेज सोबत फुलके किंवा पोळ्या.
व्हेज बिर्यानी (दिनेशदाची एक शाही व्हेज बिर्यानी आहे ती किंवा अंजलीची पण एक कृती आहे अर्थात शाही व्हेज बिर्यानी फारच "शाही" आहे, त्यामुळे डायबेटेस वगैरे असलेले लोक असेल तर ते पण बघ) सोबत एखादी ग्रेव्ही, काकडी कांद्याचे थंड रायते.
शेवटी गोड म्हणून फिरनी.

वॉव नंदिनी मस्त आहे बेत. येत्या सोमवारचं(२८) आहे गं पण जरा अ‍ॅडव्हान्समधे सल्ला घेते.
ठांकू.
आणि प्रॅडी थँक्स गं. बघते. सगळ्यांचं थोडं थोडं करते.

मिनोती मंजू धन्यवाद. मिनोती फ्लॉवरची कोरडी भाजी कुठे आहे सांगशील? सर्च करीन.
आणि बेक्ड व्हेजबरोबर काय कॉम्बिनेशन करता येईल?

आणि मिनोती केळवण म्हणजे त्या निमित्ताने एक गेट टुगेदर. तसं तर केळवणाला नॉन व्हेज करत नाहीत पण हे अगदी इंफॉर्मल गेट टुगेदर असल्याने नॉन्व्हेज ठेवावे असं फक्त मनात आहे.........करीनच (अर्थातच ऑर्डर) असं नाही.

माधुरीताई ती भाजी इथे आहे.
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/02/blog-post.html

यात अगदी एखादा बटाटा उकडुन घालता येतो. कितीही फ्लॉवर खपतो तरी भाजी चोरटी होते. मायबोलीवरच्या वृषालीची रेसिपी आहे ही.

लेकिचा ५ वा बड्डे घरि आहे.३५मोठि -२० पोरे अमेरिकन जअस्ति (चिकन व वेज्जि )अअणि आपली आहेत
मेनु काय करु? मून्बाउनस आनि बाहेर आहे सन्ध्यअकालि

सामान भरताना काश्मिरी मीरची पावडर ऐवजी चूकून अख्खी काश्मीरि मीरची दीली आहे...त्याचे काय करता येईल? जास्त कुटाणा नसलेली एखादी चटणी कुणी सान्गु शकेल का? (कूटाणा म्हणजे वाळवणे वगेरे)...

साही एक सजेशन.
१) एक स्टेशन :
फळे सफरचंद, केळी, छोट्या बोल मध्ये बेरीज काय तुमच्या सीझन मध्ये असतील त्या. स्वच्छ धुवून ठेवायचे व मुलांना आवडीप्रमाणे द्यायचे. कापलेल्या भाज्यांचे तुकडे: गाजर, काकडी प्रत्येकी दोन दोन मुलांना द्यायचे डिस्पोजेबल बोल मधून. एका आईला तिथे बसवायचे सर्व करायला.
२) सॅंडविचेसः ब्रेड बटर, चीज स्लाइसेस बटर व ब्रेड, जॅम घालून हे पार्टी सुरू करण्याआधी करून ठेवता येइल. पाच वर्शे व खालील मुले फार तिखट खावू शकत नाहीत म्हणून.
३) टॅन्ग मुलांच्या आवडीचे फ्लेवर्स. / ज्यूस कॅन्स सांड्लवंड टाळण्यासाठी. कोक/ पेप्सी शक्यतो नको.
किंवा होममेड सोडा एक फाउंट्न ठेवायचे व मुलांना डिस्पोजेबल कप्स मधून द्यायचे. हे मुलांना आवडेल.
४) केक पण खूप लागतील एक बर्थडे केक कापायला व दोन किंवा तीन तसलेच सर्व करायला. टोट्ल ३ किलो चे केक्स लागतील.
५) पोटेटो चिप्स.
६) रेडिमेड समोसे व चट्णी/ इड्ली चट्णी/ छोले पुरी/ वेज हाका नूड्ल्स/ फ्राइड चिकन बिट्स यापैकी काहीतरी एक जरा मोठ्या मुलांना पोट भरीचे. व बरोबर येणार्‍या पालकांना.
७) समर पार्टी असल्याने आइस्क्रीम २/३ फ्लेवर्स. बेकरेला. कॉम वर सुन्दर केक पॉपस च्या क्रुती आहेत.
परफेक्ट फॉर लिटिल वन्स.

आभारी आहे आश्विनिमामी.
पुढच्या शनिवारी पारटी झाली की अपडेट करते.

लहान मुलिच्या वाढदिवसाची पार्टी आहे तर सोपा मेनू सुचवा ना
३-४ बायका आणि त्यांची मुलं आहेत.
मला बरे नसल्यामुळे खुप वेळ उभी नाही राहु शकणार त्यामुळे असे काही पदार्थ सुचवा कि जे करायला अगदी सोपे असतील आणि पार्टी ला चांगले पण वाटतील.

निर्मयी, तुला जर बरे नसेल तर घरी करायचा ताण घेऊ नकोस शक्यतो, पदार्थ बाहेरुन मागव असेच सुचवेन. पण तरी तुला घरीच करायचं असेल तर हे पर्याय सुचत आहेत :

१] इडली - चटणी, केक, वेफर्स, मिनी समोसे/ कोथिंबीर वडी इ. फरसाण (बाहेरून)
२] पावभाजी - आईसक्रीम, तयार स्वीट
३] मिनी सॅन्डविचेस (ह्यात अनेक पर्याय वापरता येतील), ज्यूस(बॉक्सेस) , चिप्स, फ्रूट/स्प्राऊट चाट
४] भेळ, केक, आईसक्रीम/ कुल्फी, चिप्स/ ढोकळा
५] पास्ता/ मॅकरोनी -चीझ, गार्लिक ब्रेड(आवडत असल्यास) , स्प्राऊट चाट, आईस्क्रीम
६] पिझ्झा, आईस्क्रीम/ मिल्कशेक

अजूनही इतर पर्याय नक्कीच असतील. पण हे पटपट सुचले तसे लिहिले. वर अश्विनीमामींनीही इतर पर्याय सुचवले आहेत ते बघ.

Contact
Information:

Sales & Service
Phone: (704) 827-7400
Fax: (800) 761-0042

Email Address:
support@sodadispenserdepot.com

Physical Address:
725 Cason Street
Belmont, NC 28012
http://www.sodadispenserdepot.com/contactus.html

हे तुमच्या गावातील सोडा मशीन बद्दल माहिती देउ शकतील. पण विकत घेउ नये रेन्ट करावे शक्यतो.
बर मी पाहिलेले प्लास्टिकचे कारंज्यासारखे होते एवढे हाय टेक नव्हते.

हो माझा पण आधी तोच विचार होता कि बाहेरुन मागवावे. पण स्नक्स मिळत नाहीत. त्यामुळे घरीच सोपे काहीतरी करावे असे ठराविले. पिझ्झा चा ओप्शन होता पण कालच एका वाढदिवसाला होता म्हणुन ते नको आहे आता.

भेळ, केक, आईसक्रीम हे चांगले वाटते आहे. पण इतकेच ठेवले तर हे चांगले वाटेल का?
तसेच मिनी सॅन्डविचेस हे पण चांगले वाटते आहे. त्यातले वेगवेगळे पर्याय सांगाल का? मोठ्याना पण चालेल असे.
फ्रूट/स्प्राऊट चाट कसे कराय्चे ते पण सांगा प्लिज.....

निर्मयी ब्रेड कुकी कटरने कापून त्याची सँडविचेस करता येतील. ही माझी जुन्या मायबोली वरची लिंक पहा केवळ एक कल्पना.बरीच व्हेरिएशन करता येतील.किंवा पिनव्हील सँडविचेस.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/123727.html?1173896506

कॉर्न चिप्स मिळतात का तुमच्या ईथे? त्यावर थोडं स्वीट कॉर्न, ब्लॅक बीन्स, कांदा भोपळी मिरची बारीक चिरून, एखादा माईल्ड साल्सा, सावर क्रीम, श्रेडेड चीज असं घालून शेवपुरी सारखा थोडा वेगळा प्रकार करता येईल.

लहान मुलं असली की मी अजून एक हमखास करते ते म्हणजे टूथपिक्स मधे लाल द्राक्ष, अननसाचं क्यूब आणी चीज क्यूब असं टोचून प्लॅटर. मुलांनाच काय मोठ्यांना पण आवडतं. आणी जोडीला तू ठरवल्या प्रमाणे भेळ , केक , आइसक्रीम.

अरे वा! प्राडी, मस्त ऑप्शन्स आहेत गं! मी त्या प्लॅटरमध्ये दर वेळी लाल द्राक्षं मिळतातच असे नाही, म्हणून मग त्याऐवजी कॅन्डीड चेरीज मिळतात त्या वापरते. सह्ही लागते हे कॉम्बो!

निर्मयी, सँडविचेस मध्येही मुलांसाठी थोडे गोड सँडविचेस ( ब्रेड, बटर, मध/ जॅम, फळांचे काप उदा: सफरचंद, केळे, अननस) आणि तिखट सँडविचेस (क्रीम चीझ, काकडी, टोमॅटो, पुदिना चटणी किंवा नुस्ते चीझ सँडविचेस) असेही करता येतील.

भेळेच्या जोडीला वर प्रॅडीने सांगितलेले कॉर्न चिप्सचे कॉम्बो किंवा फ्रूट प्लॅटर ठेवलेस तरी चालू शकेल.

स्प्राऊट चाट / फ्रूट चाट साठी माबोवरच्या ह्या काही रेसिपीज/ आयडियाज मिळाल्यात, बघ :
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/134976.html?1196193488

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/107801.html?1146706914

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/127892.html?1183665582

अरुंधती अगं खरं तर चीज चेरी पाइनॅप्पल अशीच असते ना ती डिश. पण मला त्या चेरीज ईथे नाही मिळाल्या कधी. त्यामुळे हा लाल द्राक्षाचा ऑप्शन शोधला.

धन्यवाद prady आणि अरुंधती.....

मी भेळ आइस्क्रीम केक हे ठेविन आणि ते प्लॅटर ची आयडीया पण मस्त आहे. ते पण ठेविन. फक्त त्यात अजुन वेगवेगळे काय फळे वापरता येतिल.

निर्मयी पिझ्झा नको असेल तर बेक्ड पास्ता किंवा मॅकरोनी चीज ठेवता येईल का? भेळ लहान मुलांना तिखट वाटु शकते. मोठ्याना ठेवणार असाल तर ठिक आहे.
समर आहे , आईसक्रीम ऐवजी पॉपसिकल ठेवता आल तर? फळामध्ये वॉटरमेलन , स्ट्रॉबेरी मुलाना आवडत.

निर्मयी मस्क मेलनचा केशरी, हनी ड्यू मेलनचा हिरवा आणी स्ट्रॉबेरीचा लाल चुटुक रंग देखील टूथपिक मध्ये छान दिसतो. चीज क्युब बरोबर काँबो पण छान लागेल. गाजर आणी सेलेरीचे उभे तुकडे,फ्लॉवरचे तुरे आणी रँच ड्रेसींग असं प्लॅटर पण छान दिसेल आणी थोडं हेल्दी Happy

निर्मयी मस्क मेलनचा केशरी, हनी ड्यू मेलनचा हिरवा आणी स्ट्रॉबेरीचा लाल चुटुक रंग देखील टूथपिक मध्ये छान दिसतो. चीज क्युब बरोबर काँबो पण छान लागेल>> करून बघितले पाहिजे. आजकाल टूथ पिक्स पण
तर्हे तर्हे च्या मिळतात. आमच्या बालाजी कडे बारकी बारकी गुलाबाची कापडी फुले लावलेल्या टूथ पिक्स पाहिल्या आहेत.

Pages