Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुलाबजाम करायला खूप वेळ
गुलाबजाम करायला खूप वेळ लागेल, त्या मानाने मूगडाळ शिरा लवकर होईल.
मूगडाळ कोरडिच मिक्सरमधून भरड वाटायची. मग ती मैद्याच्या चाळणीने चाळायची. म्हणजे अगदी बारीक पिठ निघून जाते. मग ती कोरडीच तूपावर खमंग परतायची. आणि मग दूध / पाणी घालून शिजवायची. असे केले तर वेळ फार वाचतो.
सगळं मोजून घे आणि नंतर त्या
सगळं मोजून घे आणि नंतर त्या प्रमाणात नंतर किती नग झाले/ किती लोकांना पुरलं हे लिहून ठेव. नंतर रेफरन्सला खूप उपयोग होतो. >>> आणि इथे डकव. आम्हाला पण रेफरंसला बरे
थोडी प्रस्तावना : ३ महिने
थोडी प्रस्तावना :
३ महिने गरोदर आहे आणि मला मोहरी, जीरे यांची फोडणी अजिबात आवडत नाही. वासाने तर् मळमळतेच पण जेवणातही कडु लागते..भाज्या सगळ्याच बंद आहेत कारण एकही भाजी पहावी पण वाटत नाही
बेत काय करावा या बीबी वर प्रश्न विचारला कारण मला रोजच्या जेवणात असं मोहरी/जीरं नसलेलं साधंसुधं काय करता येईल? हा प्रश्न पडलाय.
साधं वरण भात तूप खाता येतंय. अगदी फोडणीत काही नं टाकलेली कढी भात, पोळी खातेय..अजुन काय काय करता येईल? कृपया मदत करा.
पौर्णिमा, धन्यवाद गं अवांतर
पौर्णिमा, धन्यवाद गं
अवांतर सल्ला कसला..तोच सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आहे.खरंच लिहून ठेवेन.तुझी ही आधी करून ,मोजून बघायची पण कल्पना आवडली.लगेचच शनिवारी-रविवारी करून बघेन.
दिनेशदा मूगडाळ शिरा छान वाटतो आहे.पण इकडे मूगडाळ चांगली मिळत नाहिये सध्या.चक्क पिवळा रंग लावलेला असतो
खिचडी वगैरे करताना पण ४-५ वेळा चोळून धुतली तर नॉर्मल होते.
माझा चितळे चे इंन्स्टंट गुलाबजाम करायचा बेत होता.म्हणजे आदल्या दिवशी करून मुरले असते.बघते आता.
ज्यूस बरोबर द्यायला स्टार्टर्स म्हणून कॉर्न भेळ शिवाय अजून काय चांगले वाटेल?
एम्बी, २:१ रवा:डाळ ह्यांच्या
एम्बी, २:१ रवा:डाळ ह्यांच्या बरोब्बर २४ इडल्या होतात. ३:१ प्रमाणाच्या कधी केल्या नाहीत >> यात वाटी का पेला की मेजरिंग कप हे लिहिणे आवश्यक आहे. तसेच इडलीच्या साच्यातल्या वाटयांचे प्रमाण पण लहान मोठे असते.
मी मेजरिंग कप वापरून केलेल्या प्रमाणात मोठ्या इडल्या साधारण ४० होतात पीठ छान फुगले असेल तर.
१ कप (मेजरिंग कप) उडीद डाळ
३ कप (मेजरिंग कप) तांदूळ
आवडत असतील तर १/२ टीस्पून मेथ्या
या प्रमाणात २" रुंदीच्या साधारण ४०-४२ इडल्या होतात.
जो, तुला तेल/तूप/लोण्यात काळे
जो, तुला तेल/तूप/लोण्यात काळे मिरे, लवंग, वेलदोडा, तमालपत्र, दालचिनी असा खडा मसाला परतून त्यावर शिजवलेली डाळ घालून, कढी करून खाता येईल. किंवा आमसूल सार, सूप, दाल शोरबा असेही करता येईल.
तसेच वेगवेगळ्या खिरी, चटण्या, कोशिंबिरी, शिकरण, दही-मिरची असेही तोंडीलावणे करता येईल. अजून काही सुचले तर सांगतेच!
जो तुम्ही मिपावर पण असता ना?
जो तुम्ही मिपावर पण असता ना? मी तुमचा ब्लॉग वाचला आहे. विपूची सोय दिसली नाही म्हणून इथेच लिहीले. मी कायम चेन्नैला येत असते. इथून मराठी पद्धतीचे काही हवे आहे का? अरूण जोशी कडून घेऊन पाठविते. साधे सोपे पदार्थ मधे
मूग डाल खिचडी तेजपत्ता वगैरे हलके घालून
पास्ता हर प्रकारचा
चीज खायला मस्त सबब आहे.
पराठे हरप्रकारचे, चिले डाळीचे, आपले तामीळ आडे
आपम स्ट्यू? चिकन क्लीअर सूप,
रवा इड्ली उपमा त्यात भिजविलेली हरबरा डाळ घालून. शिरा गोड व काजू बदाम घालून,दूध पचते का तर ते व पनीर, दही वगैरे. पण तुम्हाला आता आयर्न व कॅल्शियम ची गरज आहे ती पूर्ण केली पाहिजे.
जो, पनीर भुर्जी ह्या
जो, पनीर भुर्जी ह्या प्रकाराला फोडणी अजिब्बात लागत नाही.... खड्या मसाल्यावर करता येते भुर्जी. त्यात कांदा, मिरची, टोमॅटो घालायचे की नाही आपला चॉईस!
शिवाय मोड आलेल्या हिरव्या मुगाची धिरडी, डोसे, नाचणीचे डोसे, अप्पम, रव्याचा/ मुगाचा शिरा इ. इ.
नाचणीची लापशी/ कांजी/ आंबील
पास्ता, नूडल्स इ. वर मामींनी सांगितलेच आहे....
पराठ्यांसारखेच धपाटे, ठेपले, खाकरे इत्यादी.
मूग डाळ व तांदळाचा एकत्र शिजवून भात : अत्यंत रुचकर लागतो, पचायला हलका. त्यात तूप -मीठ व आवडत असल्यास दूध घालून खाता येते.
तसेच तांदळाचे खिमट, मेतकूट-तूप-भात खाता येईल.
भाजणीचे थालिपीठ
साबुदाणा/ राजगिरा लाह्या/ साळीच्या लाह्या/ ज्वारीच्या लाह्या दूध+साखर / ताक -मीठ - मिरची घालून, दही-पोहे/दूध-गूळ-पोहे, राजगिरा लाडू इ.
फोडणी न करता नुसते जिरे किंवा मोहरी तडतडवून, त्यावर आले/ लसूण किंचित पाण्याचा हबका घालून भाजायचे, तिखट पाण्यात कालवून, हिंग पाण्यात कालवून, हळद पाण्यात कालवून घालायची व त्यावर भाज्या/ डाळ/ उसळी घालू शकता. भाजी करत असाल तर पाण्याचा हबका मारून भाजी करपत नाही ना हे बघावे लागेल. लोणी/ तूप वरून सोडू शकता. ह्या प्रकारात फोडणीचा जो टिपिकल वास/ खकाणा असतो तो येत नाही.
एम्बी, २:१ रवा:डाळ ह्यांच्या
एम्बी, २:१ रवा:डाळ ह्यांच्या बरोब्बर २४ इडल्या होतात. ३:१ प्रमाणाच्या कधी केल्या नाहीत >> यात वाटी का पेला की मेजरिंग कप हे लिहिणे आवश्यक आहे. तसेच इडलीच्या साच्यातल्या वाटयांचे प्रमाण पण लहान मोठे असते. >>> मेरे को भी सेम ऐसाच लगा
२ वाटी रवा:१ वाटी डाळ ह्या प्रमाणात माझ्या ३२ इडल्या झाल्या. कालच केल्या होत्या त्यामुळे नंबर अचूक आहे
माझ्याकडचे इडली पात्र मध्यम आकाराचे आहे. पीठ भरपूर फसफसले होते.
सिंडरेला माझ्या कडे पण हेच
सिंडरेला माझ्या कडे पण हेच पात्र आहे.आता वाटी/मेजरींग कप या पैकी काहीतरी मापाने करून बघते आणि इकडे पण आकडा टाकते.
प्रत्येकी ४-५ ईडल्या धरल्या तरी १००-१२५ कराव्या लागतील ना? बापरे!! अजून १ स्टँड(आणि तो पण शक्यतो याच साईझ चा) पैदा केला पाहिजे कुठून तरी नाहीतर अवघड आहे.
मग पाव भाजी, मिसळ असे काही
मग पाव भाजी, मिसळ असे काही जमते का पहा
जो, मोहरी जिरं यांचा वास आवडत
जो, मोहरी जिरं यांचा वास आवडत नसेल तर एखादी लवंग -दालचिनी -मिरी यांची फोडणी घालता येईल. नाहीतर हिरवी मिरची आल लसूण, किंवा नुस्तंच आलं फोडणीत घालता येईल. मेथ्या- कलौंजी बडिशेप हे ही ट्राय करु शकता. या दिवसात शक्य तितक्या वेगवेगळा प्रकारच्या भाज्या खाणं जरूर आहे. त्यामुळे वेगळे ऑप्शन्स ट्राय करत रहा. घरी केलेले पदार्थ खाववत नसतील तर बाहेरुन / शेजार्यांकडून / मित्र-मैत्रणींकडून मागवून खाउन पहा.
रोजच्या जेवणात पालेभाजी / फळभाजी / कच्च्या भाज्या असायला हव्यात .
मिनोती, सिंडीची सूचना पटली.
मिनोती, सिंडीची सूचना पटली. पुढल्या वेळेला प्रमाण सांगताना लक्षात ठेवेन. थँक्स
इडलीचा स्टँड स्टँडर्ड साईझचा आहे हिंदालियमचा जो तुळशीबागेत 'इडलीचा स्टँड द्या' असे म्हटल्यावर देतात तो.
माझे २:१ प्रमाण वाटीचे आहे, नेहेमीची आमटीची गोल वाटी. कमलाबाईं ओगलेंच्या पुस्तकावर वाटीचे चित्र आहे, तशी वाटी
ह्या वरच्या प्रमाणात भरपूर पीठ फसफसूनही २४च इडल्या होतात. माझाही आकडा अचूक आहे

धन्स सगळ्यांना... मुगाची
धन्स सगळ्यांना...
मुगाची खिचडी, आपम, आडई, अवियल(स्ट्यु), पराठे,शिरा हे खात असते...पण नूडल्स खातांना जरा भिती वाटते....पण तरीही मनापासुन इच्छा झाली तर खातेच..पास्ता ट्राय करावा लागेल..
पनीर अजिबात खावं वाटत नाही...त्यामुळे पनीर भुर्जी चं ऑप्शन थोड्या दिवसांनी ट्राय करुन बघेन नक्की.
नाचणीच्या लापशीची पाककृती आहे का माबोवर?
भाजणीचे थालीपिठ एक्दम भन्नाट आयटम आहे..नक्की करेन..
पुन्हा एकदा मामी आणि अरुंधती तुम्हाला मनापासुन धन्यवाद..
जो, ही बघ नाचणी लापशीची लिंक
जो, ही बघ नाचणी लापशीची लिंक : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/94016.html?1136364607
नाचणीची आंबिल : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59982.html?1086068476
धन्स अरुंधती.
धन्स अरुंधती.
माझ्याकडे २ जन जेवायला येनार
माझ्याकडे २ जन जेवायला येनार आहेत..आणि माझी मुलगि २ महिन्याचि आहे .. त्यामुळे पट्कन करता येइल असा मेनु सुचवा
नवरात्रीतून माझ्या बाळाचे
नवरात्रीतून माझ्या बाळाचे बारसे करायचा बेत आहे.
संध्याकाळची वेळ असल्याने आणि लोकाचे उपास असल्याने काय मेनू ठेवता येइल? बारसे हॉलवरच करायचे असल्याने केटररकडेच ऑर्डर द्यायची आहे.
नंदिनी, स्वीट डिश म्हणून
नंदिनी,
स्वीट डिश म्हणून श्रीखंड/ आम्रखंड/ फ्रूटखंड/ अंगुरमलाई/ फ्रूट सलाद/ खोबरा बर्फी सारखे पदार्थ ठेवता येतील.
साबुदाणा वडा/ खिचडी, हिरवी चटणी, उपासाची काकडी कोशिंबीर, रताळे भजी, बटाटा वेफर्स, चहा/ कॉफी/ सरबत इत्यादी.
प्रिया९९, पटकन करता येणारे
प्रिया९९, पटकन करता येणारे बरेच मेन्यू इथे आहेत. तुम्ही हा धागा आधीपासून वाचा, बरीच कॉम्बिनेशन्स मिळतील.
तरीही झटपट बनणारा मेनू म्हणजे :
वरणभात, बटाटा उकडून भाजी/ बटाटा - टोमॅटो-फ्लॉवरचा रस्सा, मसूर उसळ, पोळ्या (वेळ नसेल तर विकतच्या) किंवा ब्रेड, टोमॅटो-कांदा कोशिंबीर/ बुंदी रायता, तळण/ तयार सुरळी वडी/ अळूवडी/ कोथिंबीर वडी/ ढोकळा आणि स्वीट बाहेरचे विकत मिळणारे. (किंवा घरी बनवायचे असेल तर नारळाचे पायसम/ ड्राय फ्रूट्स घालून खीर इ.)
नंदू, गोड : खोबर्याची बर्फी
नंदू,
गोड : खोबर्याची बर्फी / फ्रूट सॅलड / मलई बर्फी / केळ्याचा हलवा
तिखट : उपवासाची कचोरी, साबुदाणा वडा/खिचडी, बटाटा सळी, खमंग काकडी/ भोपळा भरीत, उपवासाची मिसळ.
रताळा हलवा, वरी + काजू नाहीतर
वरील पदार्थ आई नवरात्रात येणार्या भजनी बायकांसाठी करायची पुर्वी.
सर्वाना धन्यवाद. आमंत्रण
सर्वाना धन्यवाद. आमंत्रण देताना "तुमचे उपवास आहे का?"असे विचारल्याचा फायदा झाला. उपवासवाले लोक फार कमी आहेत. त्यामुळे त्याच्यापुरते साबुदाण्याची खिचडी ठेवणार आहोत.
त्यामुळे व्हेज कटलेट आणि गुलाब जामुन असा मेनू केटररने सुचवलाय. गुलाब जामुनशिवाय अजून काय गोड ठेवता येइल???
नारळाची बर्फी? सर्व्ह करायला
नारळाची बर्फी? सर्व्ह करायला पण सोपी.
अरुंधती, अश्विनी, मनु तुम्ही
अरुंधती, अश्विनी, मनु तुम्ही सुचवलेले उपवासाचे मेन्यु बघून नवरात्रात उपास करावा की काय असं वाटायला लागलयं. पण हे सगळं आयतं मिळायला पाहिजे खायला.
नंदिनी.... आइसक्रीम?? कोणाला
नंदिनी.... आइसक्रीम??
कोणाला हवं असल्यास गुलाबजाम + आइसक्रीम कॉम्बो करून खातील. किंवा रबडी!
हो चालेल की. आणा ते रबडी व
हो चालेल की. आणा ते रबडी व आइस्क्रीम व जामून.
३२ मोठी माणस आणी १० मुल (३-४
३२ मोठी माणस आणी १० मुल (३-४ वर्षाची) येणार आहेत. बेत काय करु? मेनु व्हेज हवा आहे.
आणी आधी तयारी करुन ठेवता येईल असा आणी पटकन होणारा हवा आहे.
मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळे केक तर असेलच.
अनुजय, मिसळ आणि गुलाबजाम,
अनुजय, मिसळ आणि गुलाबजाम, किंवा पावभाजी आणि मुगाचा हलवा असा मेन्यू ठेवता येईल.
मिसळीसाठीची उसळ/ पावभाजीची भाजी आधी करून फ्रीज मध्ये ठेवता येते.
सोबत पाणीपुरी/ दहीबटाटाशेवपुरी / समोसा चाट/ ढोकळा ठेवता येईल. लहान मुलांसाठी जरा कमी तिखट बनवावे लागेल.
धन्यवाद अरुंधती , मी पण
धन्यवाद अरुंधती ,
मी पण पावभाजी आणि पापडी चाट ठेवायचा विचार करत आहे.
सामोसा चाट साठी सामोसे आधी (आदलेदिवशी ) बनवुन ठेवले तर चांगले लागतील का?
Pages