Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुलीच्या वाढदिवसासाठी हा बेत
मुलीच्या वाढदिवसासाठी हा बेत कसा वाटतो? २० मोठे आणि १० (अडिच-तीन वर्षे) लहान आहेत.
मला ३ महिन्याचे बाळ आहे, त्यामुळे आधी तयारी करुन ठेवता येईल असा सुटसुटीत बेत हवा होता.
स्टार्टर -
चीझ्/पाइनॅपल्/स्ट्रॉबेरी स्टीक
कॉर्न चिप्स, सालसा, सावर क्रीम, ग्वाकामोले
ग्रीन सॅलॅड
मेन -
पनीर-बटर मसाला
पराठे
पाइनॅपल रायते
बटाटा भाजी (मुलांसाठी)
डेझर्ट
गुलाब-जामुन
केक
छान आहे मेनु. भाताचा प्रकार
छान आहे मेनु. भाताचा प्रकार करता येइल का अजून? थोडासाच पुरेल पण, एवढं सगळं आहे म्हटल्यावर. कारण काही मुलांना आणि मोठयांना भात लागतोच, त्यांचं आडणार नाही. बाकी मस्तंच आहे, तू बे एरियात आहेस का? मागे तुझा मेसेज पाहिला होता तिथे.
मेनु छान आहे सांगण्याचं हे अजून एक कारण की मी पण बे एरियात आहे
मी NJ ला रहाते. २-३ दिवस बहेर
मी NJ ला रहाते.
२-३ दिवस बहेर फिरायला जाताना बरोबर काय न्यावे? व्हेजिटेरिअन पाहिजे. बाहेर काही खायचं टाळतेय. शाकाहारी असल्यामुळे फार तर १-२ पदार्थ मिळतात बाहेर.
पालक पराठे, "स्वाद" ची भेळ, सॅण्ड्वीच वगैरे खूप वेळ खाऊन झालंय. हॉटेल मधे प्रत्येक वेळी मायक्रोवेव असतोच असं नाही. काही सुचवाल का प्लीज?
प्रज्ञा तुम्ही फिरायला
प्रज्ञा तुम्ही फिरायला कुठल्या भागात जाणार आहात ? कारने जाणार असाल तर इलेक्ट्रिक राइस कूकर नेऊ शकाल का ? तर खिचडी साठी डाळ तांदूळ परतून नेता येतील. तांदूळ अन पुलिहोराचं मिक्स नेता येईल. एखादी लोणच्याची बाटली न्यायची. जवळपासच्या दुकानातून ताक / दही घेतल्यास मस्त जेवण होईल.
चिनी किंवा थाय रेस्टॉ असल्यास तिथे व्हेज जेवण मिळेल.
प्रज्ञा, मेधा म्हणते
प्रज्ञा, मेधा म्हणते त्याप्रमाणे डाळ-तांदळाच्या खिचडीचा मुक्कामी पोचल्यावरचा पर्याय आहेच. त्याचप्रमाणे तुम्ही उपमा/ तिखटमिठाचा सांजा ह्यांचीही कच्ची तयारी ( फोडणीत रवा भाजून व परतून, मीठ, तिखट वगैरे घालून) घेऊन जाऊ शकता. आयत्या वेळी गरम पाणी घालायचे व वाफ येऊ द्यायची.
भोपळ्याचे घारगे, तिखटमीठाच्या किंवा पालकपुर्या, ठेपले, धपाटे, खाकरे, दशम्या हेही प्रकार आहेतच.
वाटली डाळ (परतायची, कोरडी-गणेशविसर्जनाच्या दिवशी करतो ती), मेथीची/ कोथिंबिरीची पीठ पेरून केलेली भाजीही दोन दिवस टिकू शकते. कोरड्या चटण्या(तीळ/ लसूण/ दाणे/ कारळे/ पूड चटणी), अशा प्रकारची भाजी, ब्रेड-बटर/जॅम/चीझ आणि सॅलड हाही एक जेवणाचा पर्याय होऊ शकतो.
मायक्रोवेव्हची सोय असल्यास रेडी-टू-कुकची फूडची (पास्ता/ नूडल्स इ.) पाकिटेही घेऊन जाऊ शकता.
श्री सत्यनारायणाची पुजा सकाळी
श्री सत्यनारायणाची पुजा सकाळी (७ वाजताच) घरातच करणार आहे पण सन्ध्याकाळी काही फॅमिलीज ना जेवायला बोलावले आहे. काय करून ठेवता येईल? ढोकला अॅपेटायझरला होइल. पण बाकी काय करावे?
साधंच जेवण चांगलं वाटेल.
साधंच जेवण चांगलं वाटेल. बटाट्याची सुकी भाजी किंवा मटकीची उसळ, काकडी ची कोशिंबीर , वरण भात , मसालेभात , मठ्ठा , कुणाची मदत असेल तर पुर्या आणी श्रीखंड नाही तर पोळ्या. प्रसादाचा शिरा असेलच त्यामुळे श्रीखंड ठेवायलाच हवं असं नाही. नारळाची चटणी , एखादी रस्सा भाजी जसे मटार उसळ हिरवं वाटण लावून, फ्लॉवर मटार रस्सा , किंवा मिळाला तर अळूची पातळ भाजी अथवा ताकातला पालक. असतील तर पापड कुर्डया तळून.
प्रॅडी हा मेनू साधा आहे?
प्रॅडी हा मेनू साधा आहे?

फिरवलेस का डोळे .. साधाच आहे
फिरवलेस का डोळे .. साधाच आहे की. फार काही वाटण घाटण नाही. ऑप्शन्स दिलेत तिला. जे जमेल ते करता येईल.
प्रॅडी, उसळ आणी मटार रस्सा,
प्रॅडी, उसळ आणी मटार रस्सा, कोशीन्बीर बर वाटत. बाकी शीरा गोड आहेच. पोळ्या बाहेरुन मागवते. नन्तर आएसक्रीम सन्डे....धन्स.
दोन्ही कडधान्यं करण्या पेक्षा
दोन्ही कडधान्यं करण्या पेक्षा एखादी फळभाजी बघ करता आली तर. उकडलेला बटाटा किंवा मनिषाने काल दिलीय तशी गाजराची भाजी ( त्यात वाटल्यास मटार ऐवजी भिजवलेली मुगाची डाळ घालून), जुन्या मायबोलीत तोंडली काजू उपकरी आहे ती पण छान होते., फरसबीची भाजी ( फक्त जिरं मिरचीची फोडणी, त्यावर फरसबी वाफेवर शिजू द्यायची.अगदी चिमूटभर सोडा घातला तर रंग छान राहातो फरसबीचा. पण सोडा ऑप्शनल आहे. उतरवताना दाण्याचा कूट,मीठ, साखर,आवडत असेल तर लिंबू पिळायचं आणी उतरवल्यावर वरून भरपूर ओलं खोबरं आणी कोथिंबीर घालायची.). पूजेचं जेवण म्हणजे कांदा लसूण बादच ना. म्हणून साध्याच सुचवल्या आहेत भाज्या.
मस्त मेन्यू.
मस्त मेन्यू.
काही दिवसांपुर्वी हल्दिरामची
काही दिवसांपुर्वी हल्दिरामची भेळ आणली होती. या पाकिटात चुरमुरे, शेव ई सुख्या भेळेच्या साहित्याबरोबरच दोन प्रकारच्या चटण्या होत्या. ते सर्व एकत्र करून त्यात बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो मिसळला. खुप छान भेळ तयार झाली. बाहेरगावी जाताना नेण्यासाठी उत्तम. दोन्-तीन जण घरी येणार असतील तरी पटकन बनवता येण्यासारखी
.
.
अमि, तू कुठे असतेस ? इथे
अमि, तू कुठे असतेस ? इथे अमेरिकेत अशीच स्वादची भेळ मिळते. भेळ आणि चटण्या यम्मी आहेत एकदम.
ब्लॅकबेरीज खूप आंबटढोण आहेत.
ब्लॅकबेरीज खूप आंबटढोण आहेत. फेकून देण्याव्यतिरीक्त काय करता येइल ?
सिंडरेला, साखर जरा जास्त
सिंडरेला, साखर जरा जास्त वापरावी लागेल, पण त्यांचे सिरप किंवा जॅम करता येईल का?
>>>अमि, तू कुठे
>>>अमि, तू कुठे असते>>><<
सिंड्रेला, मी मुंबईत असते.
घरच्या घरी श्रावणात घालायच्या
घरच्या घरी श्रावणात घालायच्या पुजेसाठी काही सोप्पा, सुटसुटीत अणि कमी वेळ खाउ मेनु सुचवा. शनिवारी पुजा आहे. साधारण १२-१५ लोकं असतील जेवायला.
नेहमीचा बटाट्याची भाजी, उसळ वैगरेच कंटाळा आला आहे.
फ्लॉवर बटाटा मटार रस्सा करता
फ्लॉवर बटाटा मटार रस्सा करता येईल. टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खोबर्याचं वाटण करायचं. कांदा लसूण विरहीत भाजी होईल..
निंबुडाचे डुबकीवाले आलू देखील
निंबुडाचे डुबकीवाले आलू देखील मस्त पर्याय आहे. किंवा शाही अरबीदेखील!
दिनेशदांनी जैसलमेरी चने/ छोलेची पाकृ दिली होती, जुन्या माबोवर सापडेल. तोही पदार्थ मस्त होतो. वरणाच्या वेगवेगळ्या प्रकारांवरही त्यांनी लिहिले होते. त्यातील मालवणी वरण, कोथिंबीर वरण, श्रावणातले वरण इ. इ. प्रकारही मस्त लागतात.
घरच्या घरी श्रावणात घालायच्या
घरच्या घरी श्रावणात घालायच्या पुजेसाठी काही सोप्पा, सुटसुटीत अणि कमी वेळ खाउ मेनु सुचवा. शनिवारी पुजा आहे. साधारण १२-१५ लोकं असतील जेवायला.
नेहमीचा बटाट्याची भाजी, उसळ वैगरेच कंटाळा आला आहे. >>
मझे सजेशन्स
बटाट्याची - सिमला मिरचिची भजी / छोटे बटाटे वडे, खोबर्याची चटणी / कोथिंबीर पुदिन्याची चटणी, काकडिची तडका दिलेली कोशिंबिर, पांढरा पुलाव, दाल तडका, तांदळाची खिर, ग्रेव्ही - व्हेज कुर्मा (फ्लॉवर, मटार, गाजर, बटाटा), सुकी भाजी - धणा जिरे पावडर - सुक खोबर - लाल तिखट टाकुन तोंडलिची सुकी भाजी / भेंडिची भाजी.
रात्री माझी खास मैत्रीण आणि
रात्री माझी खास मैत्रीण आणि तिचे हे जेवायला येत आहेत .. तिला कढी खिचडीच हवी आहे .पण ती पहिल्यांदाच माझ्याकडे येत असल्याने मला तेवढा मेनू पुरेसा वाटत नाही .त्याच्यासोबत दुसरे काय बनवता येईल ?
भाजी, चपाती, चटणी, कोशिंबीर,
भाजी, चपाती, चटणी, कोशिंबीर, भजी, पापड-कुरड्या भाजून/तळून/मायक्रोवेव. एक गोड पदार्थ. १-२ अॅपेटायझर्स.
रात्री माझी खास मैत्रीण आणि
रात्री माझी खास मैत्रीण आणि तिचे हे जेवायला येत आहेत >> मी पण तुझी खास मैत्रीण आहे.
भजी, पापड-कुरड्या भाजून/तळून/मायक्रोवेव करणार असशील तर अजुन काही अॅपेटायझर्स करायची गरज नाही.
एक कोरडी भाजी आणि एक रस्सा भाजी कर. भेंडी किंवा फॉवर. रस्सा भाजीत मटकी किंवा शाही आलू आणि फुलके.
धन्यवाद दोघांना .. मिनी ये की
धन्यवाद दोघांना .. मिनी ये की बिनधास्त
गणपती साठी मेनु सुचवा. ६
गणपती साठी मेनु सुचवा. ६ दिवसांसाठी.
निकिता, ह्या लिंक्स बघा, इथे
निकिता, ह्या लिंक्स बघा, इथे बरीच कॉम्बिनेशन्स आहेत!
http://www.maayboli.com/node/2602?page=2
http://www.maayboli.com/node/2602?page=14
बेत काय करावा मधील आधीची पाने चाळलीत तर अशी बरीच कॉम्बिनेशन्स मिळतील!
१७ सप्टेंबर ला १४ मोठी माणसे
१७ सप्टेंबर ला १४ मोठी माणसे आणि १० ३-६ वयोगटातली मुले मुलाच्या वाढदिवसाला संध्याकाळी आहेत.
मी ठरवलेला बेत :
ज्यूस, चिप्स,सालसा,शेव-बटाटा-पुरी किंवा कॉर्न भेळ, केक
इडली,चटणी,सांबार,
गुलाबजाम
कसा वाटतो आहे.काही कमी जास्त करावे का?
आणि मला जरा कोणी अंदाज सांगू शकेल का? म्हणजे इडली ला ३:१ रवा आणि डाळ या प्रमाणाने इडली रवा आणि उडीद डाळ किती लागेल? सांबार किती लागेल(तूर डाळ किती)?गुलाबजाम किती लागतील?
एम्बी, २:१ रवा:डाळ ह्यांच्या
एम्बी, २:१ रवा:डाळ ह्यांच्या बरोब्बर २४ इडल्या होतात. ३:१ प्रमाणाच्या कधी केल्या नाहीत. पण १७ला अजून वेळ आहे. त्याच्या निम्मं प्रमाण घेऊन आधी एकदा घरी कर आणि अंदाज घे. आणि लिहून ठेव.
एक वाटी तूरडाळीचं सांबार पाच ते सहा जणांना पुरतं. हे सांबार थोडं दाट, अगदी हॉटेलसारखं पाणचट नाही.
गुलाबजाम स्वीटडिश म्हणून असतील ना? आकाराप्रमाणे माणशी, मुलं धरून, तीन ते चार धर.
अवांतर सल्ला- सगळं मोजून घे आणि नंतर त्या प्रमाणात नंतर किती नग झाले/ किती लोकांना पुरलं हे लिहून ठेव. नंतर रेफरन्सला खूप उपयोग होतो.
Pages