बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो च्या क्रुती प्रमाणे ओरिगामी सुशी विथ मिंट डिपींग सॉस करुन बघाय्चा विचार आहे. त्याच्या जोडिला अजुन काय करता येइल.
२ फ्रेन्डस आहेत जेवाय्ला. खुप हेवी जेवण नको आहे त्याना.
गोड मधे जिलेबि करणार आहे.

लाजो ची क्रुती म्हणजे दहीभात आहे ना त्या सुशी मधे?जिलेबी आहे म्हणजे १ ठरावीक ओरीएण्टल अशी काही थीम पण नाहीये ...
मग एखादा तळलेला पदार्थ चालू शकेल..
कोथिंबीर वडी/फ्रोझन सामोसे/मिनी बटाटे वडे/मिक्स पकोडा(पनीर/बटाटा/कॅप्सीकम/ओनियन) वगैरे...
संध्याकाळ असेल तर भेळ/पापडी चाट पण चांगली लागेल.
पेस्ट्री पफ मधे सारण घालून बेक केलेले पॅटीस
बेक्ड मॅक्रोनी पण चालू शकेल पण मग जिलेबी जरा ऑड वाटेल.

आता कळलय Sad आज संध्याकाळी ६ मोठे आणी ४ लहान जेवायला यायचे आहेत ..
मला पनीर ची एखादि ग्रेव्ही नसलेली भाजी ( रेसिपी हवी अहे नविन कोणाकडे असेल तर)
पोळ्या विकत
आणी अजून १ भाजी
१ अ‍ॅपेटाईझर
मेन्यू सुचवा ना जरा.

आर्च, कढाई पनीर चांगला ऑप्शन आहे
भाग्य दीप- समोसे किंवा अळूवडी .. बरेचदा झाले आहेत अजून काही ट्राय केलय का फ्रोझन मधे

अंजली चांगली वाटते आहे Happy आज ट्राय करते.
चला १ पदार्थ ठरला Wink
आता ति़खट भाजी काहीतरी Happy
ते रसोई/परम्परा/संजीव कपूर्...मसाले तिखट नाहित फारसे Sad

सायली चिकनला करतो तशी झणझणीत ग्रेव्ही करून त्यात मटार आणी तळलेले बटाट्याचे क्युब्स.हवं तर मिक्स व्हेज. बघ वाटण घाटण करायला जरा वेळ असेल तर.

रेडीमेड ईडली पीठ आणून त्याच्या कॉकटेल ईडल्या किंवा रेग्युलर साईझ ईडल्या करून त्याचे छोटे तुकडे करायचे.थोड्याशा ऑऑ मधे किंवा साध्या तेलात तिखट, मीठ, चटणी पूड(किंवा लसूण चटणी/तीळ दाण्याची चटणी) कोथिंबीर घालून त्यात मिक्स करायचं.

झटपट अ‍ॅपेटायझर फ्रोझन नको असतील तर..
बटाट्याची भजी , बेबी कॉर्न भजी
किंवा

SPDP ( स्वाद च तयार पॅकेट आणुन )

भाजीच्या जोडीला बुंदी रायता (ग्रोसरीला जाणार आहे म्हणुन लिहिल.)

ग्रोसरीला जाणार आहे <<<<

हप्त्या हप्त्यात मलापण जसं सुचतंय तसं लिहितेय. तुमच्या इथे देसी ग्रोसरी मधे मिंट फ्लेवरचं ताक मिळतंना? ते दह्यात घालून थोडं सरसरीत करून घ्यायचं. आणी त्यात गाजराचा थोडा वाफवलेला कीस, पालकाची पानं ब्लांच करून आणी सहज मिळाले तर डाळिंबाचे दाणे. चवीला मीठ, साखर,चाट मसाला. हे रायतं पण छान लागतं.

त्या सुशी बरोबर जिलेबी जमणार नाही का?
मग त्याच्या जोडीला दुसरे काय करु?
गोड नकोच आहे त्याना. त्यामुळे सुशी च्या जोडीला दुसरे काय करु?

मी २० मोठे आणि १० लहान मुलांना बेबी शॉवर ला लंच साठी बोलावलय... काही अमेरिकन काही इंडीयन आहेत... हा मेनू बरोबर आहे का?

ढोकळा/आळुवडी
भेळ
बेगल बाईटस (फ्रोझन आणून बेक करेन)
चिप्स आणि सालसा

थोड्या पोळ्या थोडे नान (हॉटेल मधून आणेन)
पनीर माखनवाला (हे पण हॉटेल मधुन)
बटाट्याची भाजी ( उकडलेल्या बटाट्याची वाटण लावून भाजी...बटाटा सगळ्यांना आवडेल असं मला वाटतय... चालेल का?)
चीझ पीझा (बाहेरून आणेन)
एगप्लांट पार्माजॉन (बाहेरुन आणेन पण किती आणावं कळत नाहीये)
जीरा राईस आणि दाल फ्राय

केक
फ्रुट सॅलेड (ह्याची पा क्रु नाहिये माझ्याकडे)

प्लीज मदत करा...एकटीलाच सगळं करायचं आहे त्यामुळे बाहेरुन बर्‍याच गोष्टी आणायचा विचार करतेय...७ महिन्यात नाही होणार खूप जेव्ण घरी करायला...

हा हा हा... सिंडी अगं मी त्या सगळ्यांकडे भरपूर वेळा जाते...माझ्याकडे कधीच काही नसतं म्हणून मी ठरवलं की या वेळी मी बोलावते आणि एक मैत्रीण आहे ती मदत करणारे...

वरदा, अमेरिकन आणि भारतीय दोघेही आहेत म्हणुन दोन्ही प्रकारचे पूर्ण मेनू ठेवायची गरज नाही असे मला वाटते. थोडे कमी स्पायसी केले तर अभारतीय लोक नक्की भारतीय जेवण जेवतील असे वाटते. मुलांसाठी पिझ्झा ठीक वाटतेय.

३-४ स्टार्टर्स ठेवण्यापेक्षा सरळ चिप्स आणि ग्वाकमोले आणि सालसा ठेवा. अगदीच वाटले तर आळूवडी विकत आणायला हरकत नाही. सोबत लिंबाचे गार सरबत (तुमच्या इथे थंडी नसेल तर)

जेवणात बटाटा भाजी करणार ती अती तिखट नसावी कारण मग नॉन देशी जनता पण नीट खाऊ शकेल
पनीर माखनवाला ठिक आहे
साधा अगदी लाईट पुलाव केला तर लोक नक्की खातील
गाजराची (बिना दह्याची) कोशिंबीर
रोटी/नान

आणि स्वीट म्हणुन शक्य असेल तर मलाई कुल्फी आणि कापलेली फळे असे ठेवता येईल.

पण मग लहान मुलांना काहीच स्टार्टर्स नाही रहाणार असं वाटलं.. ओह एगप्लांट नकोच आणू का मग? पण इंडीयन नाहीच आवडले जेवण तर? येस लिंबू सरबत आयडिया मस्त आहे कारण इथे उन्हाळा सुरु झालाय..

मलाई कुल्फी एवढ्या लोकांसाठी खूप करत बसायला लागेल ना?

अग, तू सात महिन्यांची प्रेगनंट आहेस न? आईस्क्रीम आण डिझर्ट म्हणून. हवं तर दोन प्रकारची. मुलांना चॉकलेट आणि मँगो आईस्क्रिम. नॉन इंडियन्सना मँगो नाही आवडलं तर चॉकलेट खातील.

पुष्कळ आईवडिल मुलांना स्टार्टर्स देत नाहीत कारण मुलं नंतर जेवत नाहीत.

मलाई कुल्फी एवढ्या लोकांसाठी खूप करत बसायला लागेल ना? >> विकत आण ग. घरी नको करु.

लिंबू सरबत म्हणजे फ्रोझन लेमोनेड विकत आणुन त्यावरच्या डिरेक्शनप्रमाणे बनव. हवी तर एखादी वेल्ची आणि चार पाच काड्या केशर घाल.

जितके कमी कष्ट करुन करता येईल तेवढेच कर. उगीच करायलाच हवे म्हणुन काहीही करु नको.

Pages