बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काही लोकांना हफ्त्याहफ्त्यात जेवायला बोलवायचे आहे. घरात स्मोक्ड गूडा आणि फाँटीना अशी चिजेस आहेत. ती मला संपवायची आहेत. त्यासाठी रोस्टेड व्हेजी पास्ता करणार आहे ( ह्या आणि पुढच्या आठवड्यात दोन्ही वेळा ) एक बॅच व्हेज आहे, एक नॉनव्हेज.
अ‍ॅपेटायझर्स विकत आणून घरी बेक करायच्या कॅटेगरीगले आणायचे आणि सोबत चिप्स्,हमस ठेवायचे ठरले आहे.
पण पास्त्याच्या जोडीला मेन कोर्स मध्ये काय ठेवू अजिबात सुचत नाही. ते प्लीज सुचवा.

आणि दोन्ही वेळा पास्ता करुनही चीज उरल्यास कसे स्टोअर करायचे. पंधरा-वीस दिवसांत चीजला बुरशी येते आणि फेकावे लागते असा अनुभव. आणि ही वेगळ्या प्रकारची चीजेस संपवायला खूप दिवस लागतात.

अगो, गार्लिक ब्रेड आणि बटरनट स्क्वाश सूप करता येईल पास्त्याच्या जोडीला. किंवा रोस्टेड बेलपेपर सूप आणि गार्लिक ब्रेड.
चिझ खिसुन फ्रीझ करता येत असेल बहुदा. अनुभव नाही मला.

अ‍ॅपेटायझर्स : विकत,चिपस,हमस
मेन(व्हेज): बटरनट स्क्वाश सूप/मिनीस्ट्रोन सूप/ओनियन सूप +मस्टर्ड पोटॅटो सॅलड/ ग्रीक सॅलड/गार्डन फ्रेश सॅलड + रोस्टेड व्हेजी पास्ता +चीझ गार्लिक ब्रेड + एगप्लांट पार्मेजाँ

मेन(नॉनव्हेज): चिकन कॉर्न सूप/क्रीम ऑफ चिकन& मश्रूमस सूप +सिझार सॅलड/ ग्रीक सॅलड/गार्डन फ्रेश सॅलड + रोस्टेड व्हेजी पास्ता +चीझ गार्लिक ब्रेड + एगप्लांट पार्मेजाँ/कुठलाही बेक्ड कॅसेरॉल..

एखादा हेवी गोड पदार्थ...

मला एशियन इन्स्पायर्ड मेन्युसाठी स्टार्टर्स सुचवा प्लिज.
स्प्रिंग रोल्स, मंचुरियन, सुशी व्यतिरीक्त अजुन काही करता येइल का? शक्यतो वेज हवाय Happy

दीपचे फ्रोजन कचोरी /समोसे
नाचो चिपस वर चीज व ऑलिव्ज
क्रॅकर्स वर चीज+ पुदिना चट्णी+ केचप
सुरळी वड्या
सेसमी फिंगर्स - ब्रेड्ला बटाट्याचे फिलिन्ग लावून तीळात घोळवून तळतात ते.
मिनिएचर चटणी सँडविचेस/ बर्गर्स/ मिनि पिझ्झाज
शेव पुरी.
गोभी ६५
व्हेज कट्लेट्स
पालक भजी?
पनीर टिक्का. लय भारी.

लाजो, टेंपुरा करु शकतेस. तसेच पॉटस्टिकर्स(डंप्लिंग्स) पण करता येतात. न तळलेले स्प्रिन्ग रोल्स, राईस रॅपरमधे फ्रेश भाज्या भरुन करता येतील. फ्रेश सोयाबीन्स मिळणार असतील तर ते मिठाच्या पाण्यात उकळून ते देता येईल.
कॉर्न, सोयाबीन्स, सोयासॉस, कांद्याची पात वगैरे एकत्र करुन चायनीज भेळ करता येईल.

मामी, मिनोती आणि प्रिती धन्यवाद Happy

मिनोती नाहीतर प्रिती, डंप्लिंग्ज ची पाकृ योजाटा प्लिज Happy

परवा एक बाई आम्म्ही सारे खवय्ये मध्ये एंचिडालाज म्हणत होती. ते खरे तर एंचिलाडा आहे ना?

रेडिमेड कॅनॅपे केसेस मध्ये ते भेळ नाहीतर कॉर्न मिक्ष भरून देता येइल.
टाको शेल्स रेडिमेड आणून त्यात फिलिन्ग भरून
मी अडी नडीला चक्क अमूल चीज चे तुकडे सर्व केलेत( चिल्ड बीअर बरोबर चांगले लागतात)
पण इन्फॉर्मल क्राउड मध्येच.

अगदी साधे म्हण्जे गाजर काकडी मुळा फ्रेश कापून व एक मस्त डिप बरोबर. हे उन्हाळ्यात खूप आवड्ते लोकांना. अमूल चीज स्प्रेड मध्ये चिली सॉस, थोडीशी किसलेली कॅप्सिकम एक टे स्पून केचप हे माझे डिप.

इथे दक्षिणेत सर्वत्र हॉट चिप्स नावाची दुकाने अस्तात त्यात ताजे तळलेले बटाट्याचे वेफर्स, तिखटे, आंबट, मसालेदार, तसेच फरसाण, केळा वेफर्स, इतर तळीव अजब चकणा जसे तळलेली मसालेदार कार्ली
वाटाणे वगैरे अगदी वाजवी भावात मिळते त्यामुळे पार्टी प्लॅनिन्ग अतिशय सोपे आहे.

अगो,फ्लॅट्ब्रेड अजुन एक ऑप्शन आहे. व्हेज आणि नॉन्व्हेज दोन्हिहि करता येतिल. आणि चीज ला बुरशी असेल तरी ती स्क्रेप करुन बाकिचे चीज वापरता येते. कुठले चीज आहे त्यावर अवलंबुन असते. हार्ड चीज असेल तर बुरशी स्क्रेप करुन बाकिचे चीज वापरता येते. सॉफ्ट असेल तर मात्र फेकुन द्यावे लागते.

माझ्याकडे आठ दिवसांसाठी पाहुणे यायचे आहेत. आम्ही दोघे धरुन एकूण ६ मोठे असतील. कमीत कमी वेळात होईल असे, मदतीशिवाय करता येईल असे, तरी पोटभरीचे/जेवणाचे पोळीभाजी व्यतिरिक्त काय करता येईल?
(एक ऑप्शन मिसळ आहे, मसाला वाटला, मटकी शिजवली, ब्रेड आणला की झाले. )अजून एक-दोन ऑप्शन सुचवा.

*पावभाजीची भाजी,
*बिसिबेळेभात,
*पास्त्याच्या भाज्या परतून (ग्रिल करून) / मीट तयार करून ठेवायचं. पास्ता सॉस आयता आणि ऐनवेळी पास्ता उकडून. एंजल हेअर घेतला तर लवकर शिजेल.
*टाको आणि त्यात भरायचं आयतं साहित्य.
*सँडविचेस. (ब्लॅक बीन्स आणि भाज्यांचं रेचेल रे स्टाइल सँडविच मस्त होतं. पोटभर.) व्हेजी पॅटीज, बोका बर्गर, पुल्ड पोर्क, ग्रिल्ड भाज्या, आयतं रोटेसरी चिकन ह्यांची सँडविचेस.
*चटण्या करून ठेवल्या आणि पिट्।अं भिजवून ठेवली तर धिरडी-चटणी.
*कढी-मसालेभात.
*एखादे दिवस बारबीक्यु.

इड्लीचं पीठ तयार करुन ठेवू शकतेस. खोबर्‍याची/दाण्यांची चटणी करुन फ्रिज करु शकतेस. वेळेवर नुसती फोडणी मिक्स करु शकतेस.

ज्ञाती, वन डिश मील http://www.maayboli.com/node/14647 धाग्यात तुला खूप ऑप्शन्स दिसतील! Happy

तरीही माझ्यातर्फे :

* दहीवडे + साबु खिचडी (किंवा ह्यापैकी काहीही एक)
* छोले + नान/ भटुरे/ ब्रेड/ पुर्‍या + रायते
* इडली चटणी सांबार / डोसे + बटाटा भाजी + चटणी + सांबार
* ग्रिल्ड सँडविचेस, पोटॅटो चिप्स, सलाड
* भाताचे फॅन्सी प्रकार : बिर्याणी/ चित्रान्न/ मसालेभात/ वांगीभात/ फ्राईड राईस इ. इ. व सोबत रायती, सार वगैरे.
* वडा - सांबार [ बटाटेवडे/ मेदूवडे], चटणी.
* कच्छी दाभेली/ रगडा पॅटीस/ पाणी-पुरी/ शेव-दही-बटाटा-पुरी इ. सारखे चटकमटक पदार्थ.
* बेक्ड व्हेजिटेबल्स ( कॉर्न+ बटाटा+ इतर भाज्या+ व्हाईट सॉस+चीझ+मिरपूड+मीठ ) आणि गार्लिक टोस्ट.

थालिपीठाचे पीठ भिजवून ठेवायचे. ऐनवेळी करता येतात.
रगडा पॅटीस देखील करुन ठेवता येतात.
कट्लेट्सचे साहित्य करुन ठेवायचे. ऐनवेळी ब्रेड, एखादे सूप/सॅलड्/कोशिंबीर केली की काम भागते.

ज्ञाती,
एखाद्या पराठ्याचं सारण करुन ठेऊ शकतेस.
दलिया खिचडी
कांद्याची भरड भाजी करुन ठेवायची, आयत्या वेळी ताक आणि भात करायचा.

झी, गोड दशमी, तिखट मीठाच्या पुर्‍या, चिवडा, चकली, कुकीज.

मृ, मिनोती, निवेदिता, अकु धन्यवाद.
पावभाजीची भाजी,*बिसिबेळेभात,, इडलीसांबार बरे वाटताहेत. वन्डिश मील मध्ये सगळे उपयोगी नाही पडणारे. वडा-सांबार करायचे तरी बरेच काम आले. (इथे लेक सलग १० मि स्वयपाकघरात काम करु देत नाही Happy )

इथे दक्षिणेत सर्वत्र हॉट चिप्स नावाची दुकाने अस्तात >>>
मुंबइ पुण्यातही आहेत हे हॉट्चिप्स वाले. मस्तच असतात यांचे चिप्स. येकदम टेश्टी.

झी, मेथीचे किंवा अन्य प्रकारचे ठेपले, खाकरे, मुठिया वगैरे गुजराथी पदार्थ टिकतात चांगले प्रवासात. धपाटेही टिकतात बर्‍यापैकी. बाकी फराळाचे पदार्थ आहेतच!
काहीजण २-३ दिवसांच्या प्रवासासाठी रावणपिठलं बरोबर घेऊन जातात. पण ते किती टिकते ते माहीत नाही.

झी , डाळ तांदूळ खिचडी साठी परतून नेता येईल. उपम्याचा रवा अन फोडणी परतून नेता येईल. पुलिहोराचा मसाला करून किंवा तयार नेता येईल. जिथे रहाल तिथे टपरवेअर मधे ठेवून पाणी घालून मायक्रोवेव्ह करू शकता. किंवा राइस कूकर बरोबर घेऊन गेल्यास त्यात पण हे पदार्थ करता येतील.

Pages