Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत जाऊन आले द. भारतात पण
भरत जाऊन आले द. भारतात पण तोपर्यन्त माझं भाषाप्रेम असं उफाळुन आलं नव्हत त्यामुळे वाचले.
पण हल्ली खरच मला सारख सारख जिकडे तिकडे मराठीच बोलायला होतय
मने, मराठीच बोलत रहा. मी तर
मने, मराठीच बोलत रहा. मी तर हिंदी बोलायचचं विसरून गेलोय !
मराठी भाषेवरून चालू आहे
मराठी भाषेवरून चालू आहे म्हणून...
काल नवरा आणि माझा सुसंवाद असा चालू होता.
मी: आज माझं डोकं दुखतय. आकाशात माड आलेत म्हणून.
नवरा: काय? म्हणजे?
मी: अरे.. डोकं दुखतय.. माड आलेत. दिसत नाही का तुला?
नवरा: कुठले माड? आणि माड कसे येतात?
मी: अरे, (खिडलीतून बाहेर हात दाखवत) माड बघ ना बाहेर. मघाशी ऊन होतं आता नाहिये.
नवरा: तुला शहाळी हवी आहेत का? त्याचा उन्हाशी काय संबंध?
एव्हाना माझ्या भावाला काय घोटाळा चाललाय ते समजलं होतं आणि तो फिदीफिदी हसत आमच्याकडे बघत होता.
मी: (परत एकदा खिडकीतून बाहेर आकाशाकडे हात दाखवत..) अरे ढग बघ ना... म्हणून डोकं दुखतय माझं.
नवरा: मग त्याचा माडाशी काय संबंध हेच विचारतोय मी..
** कानडीत माड म्हणजे मळभ** हे माझा भाऊ सांगितलं तेव्हा वेंधळेपणा समजला.
नंदिनी.. नवर्यालापण कानडी
नंदिनी..
नवर्यालापण कानडी शिकव ना..
,सुकि..अरे हिन्दी आपली राष्ट्रभाषा आहे तिचा पण अभिमान बाळगायला हवा रे..
नंदिनि....
नंदिनि....
नंदिनी, कानडीने केला मराठी
नंदिनी,
कानडीने केला मराठी बभ्रतात ही म्हण उगाच नाहे हे मला आज कळले. डोकेदुखीचा माडाशी काय संबंध, हे कळेपर्यंत नवर्याचे डोके दुखायला नाही लागले का? जत तुमच्या घरासमोर माड (नारळाचे झाड) असते, तर त्याना वाटले असते की डोक्यावर शहाळे पडले की काय!!!
म. न. से.
म. न. से. ईफे़क्ट.........
मला "हेराफेरी" मधला बाबुराव आपटे आठवला.........."मराठी माणसा जागा हो............!"
हे माझा भाऊ सांगितलं तेव्हा
हे माझा भाऊ सांगितलं तेव्हा वेंधळेपणा समजला >> नंदिनी लिहिताना पण
कानडी आणि मराठी टोन मिक्स केलिस बघ...
लग्न झल्यावर किचेन मध्ये चहा
लग्न झल्यावर किचेन मध्ये चहा करायला गेले लायटर शोध शोध शोधला कुथे सापडेचना.

किचेन भर गोल गोल फेर्या मरुन झाल्या लायटर कहि सापडेना..
१० मि. अशिच गेलि सासरे बाहेर चहाची वाट बघत होते.. शेवटि नवर्याला बोलावले खुणेनेच.. आणि त्याने शोधुन दिला मग चहा केला
असे बरेच्दा व्हाय्चे...
नविन नवरी म्हनुन खप्ले
किचेन भर गोल गोल फेर्या मरुन
किचेन भर गोल गोल फेर्या मरुन झाल्या ...नविन नवरी म्हनुन खप्ले


हलके घ्या
मी लग्नानंतर स्वैपाक करायच्या
मी लग्नानंतर स्वैपाक करायच्या वेळेला कावळा कुठेय विचारलं होतं. आणि सासू चकीत होऊन बघत होती. मी आपलं ते तेलाचं हो असं सांगत होते. शेवटी त्यांचा चकितपणा ओसरेतो मला तेलाचं भांडं सापडलं.
तेलाचा कावळा, कुंचा असे बरेच शब्द माहीत नव्हते माझ्या सासूसासर्यांना.
पण हे मी इथे का लिहितेय?
हा माझा वेंधळेपणा....
नी कौव्वा बिर्यानी आठवली असेल
नी कौव्वा बिर्यानी आठवली असेल ना त्यांना मग?

(No subject)
कौव्वा बिर्यानी मल्ल्या ते
कौव्वा बिर्यानी
मल्ल्या ते काय असत?
अरे वो PSPO (कौव्वा बिर्यानी
अरे वो PSPO (कौव्वा बिर्यानी ) नहीं जानता ...................
अभिषेक अभिनीत "रन" बघा.
मेलोडी खाओ खुद जान जाओ ...
http://www.youtube.com/watch?v=9dwswVjunEw
मनिषा नंदिनी : << आज माझं
मनिषा

नंदिनी : << आज माझं डोकं दुखतय. आकाशात माड आलेत म्हणून.>>
नविन नवरी म्हनुन खप्ले <<<
नविन नवरी म्हनुन खप्ले <<<
तू खपलीस की वागणे खपले...
सगळ्यांना कारल्याचे वेफर्स
सगळ्यांना कारल्याचे वेफर्स खुप आवडता. पाहुने आलेत म्हणुन काल रात्री खुप झोप येत असताना पण कारल्याच्या चकत्या करुन मिठ लावुन ठेवल्या. सकाळी लवकर उठुन सगळे व्यवस्तीत तळले. छान झाल्या होत्या. घाइत ऑफिसला निघताना डबे भरले. घरच्या पण सादाळु नये म्हणून एका टप्परवेअरच्या डब्यात भरल्या.
आत्ता ऑफिसमधे आल्यावर बॅगेतून डबे काढले तर घरच्यासाठीचा वेफर्सचा डबा पण माझ्याबरोबर आलाय
वर्षे... अरे देवा..
वर्षे...
अरे देवा..
तेलाचा कावळा, कुंचा <<< नीधप,
तेलाचा कावळा, कुंचा <<<
नीधप, कोकणस्थ आहेस ना तू.....तरीच........!!
माझ्या साबा ही तेलाचा कावळा,कुंचा च म्हणतात.
दिड वर्षापुर्वी आमच्या
दिड वर्षापुर्वी आमच्या ऑफिसातून एक मुलगी मुंबईला ट्रान्स्फर होऊन गेली..
बोललो वगैरे, ती माझ्याच डेस्कजवळ बसलेली. मी पुर्णवेळ तिचं नाव आठवण्याच्या प्रयत्नात गुंतलेली... काही केल्या तिचं पुर्ण नाव आठवेना.. मग आडनाव आठवलं "गुप्ता..." आणि नावाच्या शेवटी "श्री" आहे ते एक आठवलं... सेल नं उडवला, आता तिला थेट नाव कसं विचारायचं?
म्हणून गप्प बसले..
गप्पा मारताना बॉस त्याच्या ऑफिसातून बाहेर आला.. त्याने तिला पाहिलं.. थोड्या वेळाने ती गेली
ती आणि मी चांगल्या मैत्रिणी... पुढे थोडे दिवस बोलाचाली झाली, मग बंद, थोड्या दिवसांनी मी तिचा सेल नं माझ्या सेल मधून उडवला.
मागच्या आठवड्यात ती पुण्याला आली केटी साठी... तिने फोन केला "कहा हो?" मी म्हणलं डेस्कवर (मी तिला अजिबात ओळखलं नव्हतं.)
बॉसने विचारलं... This lady was in BI practice, right? what's her name?'
माझी दांडी गुल, त्यात मी आठवलेलं आडनाव पण विसरले... 
आणि अनावधानाने बोलून गेले, "तनुश्री दत्ता"
बॉस - .....
बुचकळ्यात...
नंदिनी, वर्शे, दक्षे
नंदिनी, वर्शे, दक्षे
बाय द वे, मुलिचं नाव आठवलं
बाय द वे, मुलिचं नाव आठवलं "अनुश्री गुप्ता"
निधप.... कव्वा बिर्यानी
निधप.... कव्वा बिर्यानी
मने टू मच. मनसेत जा आता.
मने टू मच. मनसेत जा आता.

वेंधळेपणाची लाट आलीय का काय परत?
मयेकर, दुर्दैवाने आमच्या
मयेकर, दुर्दैवाने आमच्या घराच्या कुठल्याही खिडकीतून बाहेर पाह्यलं तर नारळाचीच झाडे दिसतात
वर्षू, कानडी शिकवणी जोरात चालू आहे आमच्याकडे सध्या. नवर्याला कानडी मुलुखातच नोकरी लागलेय.
मी नविन नवरी असताना जावेने भांडंभर पाणी घेऊन ये म्हणून सांगितल्यावर मी पातेलेभर पाणी नेऊन दिलं
तेव्हापासून मला भांडं म्हणजे ज्याला तुमच्याकडे मराठीमधे "ग्लास" म्हणतात... असं ऐकावं लागतय!!!!
भांडंभर पाणी घेऊन ये >> सेम
भांडंभर पाणी घेऊन ये >>
सेम पिंच, नंदिनी. माझ्या माहेरी फुलपात्र म्हणतात आणि इथे सासरी "भांडं"........ आता मलाही सवय पडली.
तुझं सासर कोकणस्थ आहे का?
>>>>माझ्या माहेरी फुलपात्र
>>>>माझ्या माहेरी फुलपात्र म्हणतात

आमच्याकडे पातेलभर पाणी आणून देणार्याला पात्र म्हणतात.
आणि हो निंबुडा.. रच्याकने मी कोकणस्थ नाही.
नंदिनी च्या आग्रहासाठी
नंदिनी च्या आग्रहासाठी
:.
:.
Pages