स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

तुम्ही सांग्ताय तशी खुप उदाहरणे आहेत आजुबाजुला लिंबुदा..पण आम्ही अजुनही मं. सू घातलेली, जोडवी घातलेली, सगळ्या रुढी परंपरा पाळणारी स्त्री कशी काकूबाई आहे हे लोकांना दर्शवण्यातच धन्यता मानतो..याचं काय करता येईल..?

सगळं पाहुन जोखुन व्यवस्थितपणे लग्नं केल्यावरही पुढचा डाव बिघडतो असेही बरेचदा बघायला मिळते. तेव्हा
"तुम्ही सांगता आहात तशा संकटात मुलिनी स्वताहुन उडी मारु नये" वगैरे विधानं मला पटली नाहीत..

घरच्या सुनेने मोठ्या माणसांसमोर कधी हॉलमधे यायचे नाही. दारातुनच बोलायचे, हॉलमधे सास-यांच्या बरोबरीने म्हणजे सोफ्यावर किंवा त्यांच्यासमोर बसायचे नाही. जमिनीवर बसायचे. ते ही मांडी वाळुन बसले असं नाही. मोठ्याने हसा-बोलायचे नाही.>>> हे सगळं माझ्या सासरी मी करायचे अजुनही करते...त्यात जाच तो काय?<<
नॉर्मल माणसासारखं व्यक्त न होता येणं यात जाच वाटतो माणसांना. ज्यांना आपली ओळख एक माणूस असण्यापेक्षा केवळ अमुकतमुकची सून म्हणूनच अपेक्षित असते त्यांना कदाचित नसेल वाटत.>>
नीरजा, आमच्याकडे स्त्रियांनी आणि पुरुषांनी वडीलधार्या मंडळींसमोर पाळायच्या काही मर्यादा आहेत.. त्या आम्ही स्वखुषीने पाळतो..

कुणाची तरी बायको, कुणाची तरी सून, घराणं एवढीच लेबलं ज्या बायांना महत्वाची असतात. आपलं एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून अस्तित्व समजण्याच्या पलिकडे ज्यांचं माइंड कंडिशनिंग केलेलं असतं त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य हे बांडगुळच वाटणार. पण अश्या बायांच्यापायी मी माझं जे जगते ते मी का सोडू?>>
मोठ्या हुद्द्यावर असणार्या बायका सुध्दा सगळ्या रुढीपरंपरा पाळतात याची कैक उदाहरणे आहेत.. त्यांनी जगणं सोडलंय वाट्टं

>>पण आम्ही अजुनही मं. सू घातलेली, जोडवी घातलेली, सगळ्या रुढी परंपरा पाळणारी स्त्री कशी काकूबाई आहे हे लोकांना दर्शवण्यातच धन्यता मानतो..याचं काय करता येईल..?<<
हे रूढीवादी लोक विपर्यास करण्यात जाम पटाईत असतात याचं प्रत्यंतर आलं या एकाच वाक्यात.
हे सगळं घालणं किंवा न घालणं हे बंधनकारक असणं याचा जाच आहे. कोणी घालावं की नाही घालावं हा वैयक्तिक प्रश्न आहे हे साधारण प्रत्येकाने इथे सांगितलंय तरी समजत नाहीये की समजून घ्यायचंच नाहीये.

>>नीरजा, आमच्याकडे स्त्रियांनी आणि पुरुषांनी वडीलधार्या मंडळींसमोर पाळायच्या काही मर्यादा आहेत.. त्या आम्ही स्वखुषीने पाळतो..<<
स्वखुशीने पाळतेस ना. आम्हाला जर त्याच जाचक वाटत असतील तर? की तुझी ती स्वखुषी आणि आमचा तो स्वैराचार?
तुमच्या घरातल्या त्या मर्यादा. आणि आम्ही तस्संच जगत नाही म्हणून आम्ही तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्याची बांडगुळं..

>>मोठ्या हुद्द्यावर असणार्या बायका सुध्दा सगळ्या रुढीपरंपरा पाळतात याची कैक उदाहरणे आहेत.. त्यांनी जगणं सोडलंय वाट्टं<<
काय लिहिलंय ते समजत नसेल तर विचार.
ज्या बाया पाळतात त्यातल्या ज्या स्वखुषीने पाळत असतील आणि स्वतः सोडून इतर कोणालाही ते पाळणे बंधनकारक करत नसतील तर ठिके. पण अश्या बर्‍याचश्या बायांना इतर लोक पाळत नाहीत याबद्दल वाकडंतिकडं बोलायला आवडतं. आता त्यांना पचावं म्हणून मी मला जे पटतच नाही ते करायची गरज नाही. हा मुद्दा आहे. समजेल अशी अपेक्षा बाळगणं चूकच दिसतंय पण हा शेवटचा प्रयत्न.

<<सगळं पाहुन जोखुन व्यवस्थितपणे लग्नं केल्यावरही पुढचा डाव बिघडतो असेही बरेचदा बघायला मिळते. >> अगदि मान्य. पण जी मुलगी खंबीर, स्वतंत्र आणि विचारी असेल ती आपल्या आयुष्यातील २० वर्षे त्या एका चुकीपोटी वाया घालवणार नाही. स्वतःला योग्य वाटणारा निर्णय घेउन ती लवकरात लवकर स्वतःचे आयुष्य सावरेल.

जाऊदे ग मुग्धा! Happy सोड हा विषय! मी तरी सोडून देतोय....
काय हे ना, यान्च्या उतू जाणार्‍या सुल्ट्या घड्यान्पेक्षा आपला "पालथा घडा मोडच" ठीके! नै? Proud

is there any proof that all these customs is actually started by mens for womens and not by womens for womens? .. just curious to know this. Thx.

बी हो, बायकांच्या पायात आज जे पैंजन असतात ते पुर्वी खुप जड असायचे तीला नीट चालता पण येणार नाहीत असे जेनेकरुन ती पळुन जाउ नये,नाकात आज जी नथनी असते ती सुध्दा वेसण या अर्थाने घातली जायची पुर्वी, प्रचंड जड की नाकाला पेलवणार नाही, ही बायाकाना गुलामगिरीत ठेवण्यासाठी पुरुषांनी सुरु केलेली प्रथा होती, पुधे त्याला दागिना हे नाव मिळाले् .हे सगले करताना प्रचंद brainwash केला जात असे की मग बायकासुध्दा या प्रथा चालु ठेवण्यात हातभर लाउ लागल्या.आणि मग बाईच बाईवर अन्याय करते अशी ओरड सुरु झाली पण सुरवात मात्र पुरुषांनीच केली.

Thank you Arc but sorry to say I deny to accept it as there are no evidences. These customs might have been crated either by men or by women or both of them! If my observation is correct then I see women only pressurise other women to follow these customs as compared to men. In fact on this BB itself most of the girls have agreed that their better-half do not bother at all whether she has worn Mangal-sutra, joDawee, kunkoo etc. Then this raise question in my mind that, the voice must be raised first against those women who goes with these customes and then against men or against both at a time. But here this is not happening. If I understood this BB well, most of you girls talking against men and forgettting those women who are supporting these customs. Again thx, Arc.

arc

सॉरी पण तुम्ही केलेले विधान काही पटले नाहित कारण ते मला तरी अगदीच बिनबूडाचे वाटत आहेत.

कुठे ही पुरावा आहे का की दागिने पुरुषांनी बायकांवर लादलेत?

मी वरची विधाने दत्त्ता सामंत यांच्या एका व्याख्यानात ऐकलेली आहेत. दत्त सामंत हे अत्यंत व्यासंगी,अभ्यासु,समाजवादी नेते आहेत. गेली ४० वर्षांचा त्याम्चा धर्म,ईतिहास,राजकारन अशा अनेक विषयांचा दांडगा अभ्यास आहे, त्याम्ची विधाने बिन्बुडाची असण्याचे शक्यता शुन्य आहे. आता मी हे नाही सांगु शकत की त्यांनी कुठली पुस्तके refer केली आहेत?

कोणीतरी लिहिलंय जीन्सवर टिकली लावली की इतर मुली का हसतात ...
डीजे , एक फॅशन विषयक सल्ले देणारा बाफ उघड आता . फार गरज दिसतेय . >>>>>>>>>>

मुळातच जीन्स परदेशातुन आपल्याकडे आली,त्यामुळे त्या मुली जसं वापरतात तसच आपण वापरतो.पण त्यावर टिकली वापरु नये असं कुठे लिहिलय्.ज्यांना आवडत नाहि त्यांनी वापरु नये.पण जे वापरतात त्यांना हसु तरी नये.तसंपण मी आधी लिहिल्याप्रमाणे आधी नाकात पण रिंग किंवा चमकी वापरणे सो कॉल्ड फॅशनला धरुन नव्हतेच,माझ्या कित्येक मैत्रिणी जीन्स घातली कि नाकातलं काढुन ठेवायच्या.
पण जर मी चुकत नसेल तर रवीना टंडनने पहिल्यांदा ´nosering वापरली होती कुठल्यातरी गाण्यात्,आणि १ परदेशी मॉडेलने पण्,त्यानंतर ती पण फॅशन सुरु झाली.
आता जर एखाद्या एखाद्या अभिनेत्रीने (त्यातही हॉलीवूडच्या) जर टिकली लावलीच तर तीपण फॅशन सुरु होईल.

मी जर्मनीत एका मुलीला छुमछुम वाजणारे पैंजण घातलेले बघितलं आहे,ते पण बॅकलेस टॉपवर.
मी ज्या लॅबमध्ये काम करते तिथे माझ्याबरोबर काम करणार्‍या मुलींनी मला विचारलं होतं कि तु टिकली का लावत नाहिस?´that looks so good.

अमेरिकेत असताना भारतीय कार्यक्रमांना अमेरीकन मुली मोठीच्या मोठी टीकली वापरायच्या,ते ही जीन्सवर्,कदाचीत त्यांना फॅशन कळत नसावी.जर ईथे तत्सम बाफ उघडला तर मी त्यांना पण नक्कि दा़खवेन :).

मी लावते टीकली जिन्स वर पैंजन पन घालते एनी प्रॉब्लेम
एकीकडे व्यक्ती स्वातंत्र्यावर बोलायचे व दुसरीकडे कुनी आपल्या मर्जीनुसार वागले की जाहीर टवाळी करायची ह्याला काय म्हनावे
आतापर्यंत स्वताला इअथे लिहिन्यापासुन रोखले होते पन ह्या रीकामटेकद्या सो कॉल्ड फॅशनेबल बायांना अस बोललेल पाहुन आवडल नाही
मुग्दा तुला अनुमोदन सर्व मुद्द्यासाठी ह्या बायकांना काय कळनार नियम वगैरे जास्त डोइफोड करु नकोस ह्यांच्या समोर
विरोधाभास कशाला म्हनतात ते दाखवले मी इथेच

घरच्या सुनेने मोठ्या माणसांसमोर कधी हॉलमधे यायचे नाही. दारातुनच बोलायचे, हॉलमधे सास-यांच्या बरोबरीने म्हणजे सोफ्यावर किंवा त्यांच्यासमोर बसायचे नाही. जमिनीवर बसायचे. ते ही मांडी वाळुन बसले असं नाही. मोठ्याने हसा-बोलायचे नाही.>>> हे सगळं माझ्या सासरी मी करायचे अजुनही करते...त्यात जाच तो काय?<<
नॉर्मल माणसासारखं व्यक्त न होता येणं यात जाच वाटतो माणसांना. ज्यांना आपली ओळख एक माणूस असण्यापेक्षा केवळ अमुकतमुकची सून म्हणूनच अपेक्षित असते त्यांना कदाचित नसेल वाटत.>>
नीरजा, आमच्याकडे स्त्रियांनी आणि पुरुषांनी वडीलधार्या मंडळींसमोर पाळायच्या काही मर्यादा आहेत.. त्या आम्ही स्वखुषीने पाळतो..>>>>>>> मुग्धा,तुमच्याकडे पुरुषमंडळीपण ""मोठ्या माणसांसमोर कधी हॉलमधे यायचे नाही. दारातुनच बोलायचे, हॉलमधे सास-यांच्या बरोबरीने म्हणजे सोफ्यावर किंवा त्यांच्यासमोर बसायचे नाही. जमिनीवर बसायचे. ते ही मांडी वाळुन बसले असं नाही. मोठ्याने हसा-बोलायचे नाही"" हे सर्व करतात.? कि फक्त स्त्रीयांनाच के नियम? आणि तुमचे पती त्यांच्या किंवा तुमच्या आईंसमोरपण असच वागतात.? कि वडीलधार्‍यांमध्ये फक्त पुरुषमंडळींचा समावेश होतो?

मुग्धा,
>>>नीरजा, आमच्याकडे स्त्रियांनी आणि पुरुषांनी वडीलधार्या मंडळींसमोर पाळायच्या काही मर्यादा आहेत.. त्या आम्ही स्वखुषीने पाळतो..<<<
ह्यालाच मी म्हणते "स्लो पॉयझनिंग"! कोणालाही मान "असे बसून" "तसे बोलून" दिला जातो का? ह्या मर्यादा पुरुषांना शिकवता का?
अस म्हणतात की लक्ष्मणाला जेंव्हा सीतेचे अलंकार दाखवले तेंव्हा त्याने फक्त पैजणच ओळखले कारण वहिनीची पावले सोडता इतरत्र कुठे त्याने कधी पाहिलेच नव्हते. आज आहेत का असे कोणी? येणार्‍या जाणार्‍या पोरींची मापे काढणारेच जास्त (उरलेले जे थोडेफार ह्या सदरात नाहीत त्यांना हे विधान लागू नाही)! आज आपण आपल्या मुलाला शिकवतो का की तुझी आई, बहीण, बायको, मैत्रिण ह्या केवळ "स्त्री" नसून व्यक्ती आहेत, त्यांच्या मतांचा, गुणांचा आदर कर? जेंव्हा एकादी व्यक्ती नाही म्हणते तेंव्हा त्याचा आदर कर? स्वतःची सगळी वैयक्तिक कामे स्वतः कर? एकादी स्त्री जेंव्हा प्रगती करते तेंव्हा तिच्या बौद्धिक क्षमतेमुळे ह्याचा सन्मान कर?

आणि बादवे, वडीलधारे म्हणजे आपलेच नातेवाईक की सगळे? एखाद्या वेडसर पण वयाने मोठ्या व्यक्तीशीपण त्याच अदबीने वागता का? घरातल्या मोठ्या आत्त्येने संपत्तीत समान वाटणी मागीतली तरी तेवढ्याच संयतपणे वागता का? की आत्तेला असे मागण्याचा अधिकारच नाही, पण तिच्या नवर्‍याने हिस्सा मागवा, चार चौघात?

लिंबुदा,
अहो काय मंगळसूत्र आणि कुंकू चालवलयं? मी नाही वापरत आठवणीने कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, पैजण असे काही. पण त्याने माझे माझ्या नवर्‍यावरचे प्रेम कमी होतय का? इतर कोणी कसलेही अचरट प्रकार केले (मंसू ,कुंकू गळ्यात असो वा नसो) तर त्याचे दात त्याच्या घशात घालेन मी, अचरटपणा सहन करण्यापेक्षा..! आणि हे मी माझ्या नवर्‍याची मालमत्ता आहे नि माझ्या शुचितेवर याने परीणाम होईल म्हणून नव्हे तर मी एक व्यक्ती म्हणून माझ्या नवर्‍याला माझा सहचर म्हणून निवडलयं आणि इतर कोणाचे आक्रमण, मला गृहीत धरणं मला अमान्य आहे म्हणून!

मंदार, अहो घरातले कपडे मळतातच का पण? हा विचार करणं आवश्यक आहे. "अशा" गोष्टी लोकात बोलू नयेत असे शिकवतो ना समाज म्हणून "न बोलण्यासारख्या" गोष्टी करणार्‍यांच फावतं!

मामी, उत्तम पोष्ट(स)! आणि दोन्ही कविताही सही!

अमुक केल्याने मोठ्यांचा अपमान होतो नि तमुक न केल्याने एकादी मॉड आणि दुसरी काकुबाई हा विचारच नाहीये. एक स्त्री म्हणून माझ्या गरजा आणि क्षमता काय आहेत हे ओळखून त्यानुसार वागण्याचे स्वातंत्र्य मिळणे हे आवश्यक आहे. त्यासाठीचे आत्मभान मुलींमध्ये लहानपणापासूनच जागवावे लागते. जेंव्हा ह्याची जाणीव होते तेंव्हा मग "बांडगुळं" वै. सारखे शब्द सुचत नाहीत.

As someone has correctly said "you would never know how much you can soar, unless you do not open your wings" आणि हे पंखच मर्यादांनी छाटले तर क्षितिजं काय शोधणार? आणि शोधलीच नाहीत सगळी क्षितीजं तर आपलं आभाळ कोणतं हे कधी कळणारच नाही!

आमच्याकडे स्त्रियांनी आणि पुरुषांनी वडीलधार्या मंडळींसमोर पाळायच्या काही मर्यादा आहेत.. त्या आम्ही स्वखुषीने पाळतो >> तुझा नवरा तुझ्या माहेरी पण असच करतो तुझ्या माहेरच्या वडीलधार्यान्समोर ?? सोफ्यावर न बसणे etc ????

छान चर्चा चालुये... बरीच वेगवेगळी मतं कळत आहेत.... बरेच विचार मनात येत आहेत पण लिहाता येत नाहीयेत...
पण मधेच हे वाचलं... आणि खटकलं...
>>>>>>
मंजिरी सोमण | 26 March, 2010 - 06:09
एक मनुष्य प्राणी सोडला तर इतर सगळ्या जीव जातींमधे पुरुष म्हणजेच नर हा फक्त reproduction या एकाच क्रियेसाठी वापरला जातो. एकदा का जीव जन्माला आला की 'कोण तू?' असं म्हणून त्याचा संबंध संपतो. बाकी सगळं आत्मविश्वासाने, धीराने एकटी स्त्री/मादी च निभावून नेत असते. मनुष्य हा सुद्धा जर अशाच जीवसृष्टीत अवतरला असेल तर त्याला वेगळे रुल का?

समस्त पुरुष जमात, समाधान माना की निसर्गातल्या इतर जीव-जमातींप्रमाणे कर्तव्य भाग साधल्यावर तुमची हकालपट्टी होत नाहीये
<<<<<<
Its an intelligent interpretation of scientific facts!!! स्त्रीचा मोठेपण सांगायला असा शब्दछल का?
निसर्गात कोणी कोणाला 'वापरत' नसतो, 'आत्मविश्वासाने, धीराने एकटं निभावून नेत' नसतो किंवा 'हकालपट्टी' करत नसतो! एकतर इतर प्राण्यांची तुलना मनुश्यप्राण्याशी करता येणार नाही... प्रत्येक प्राण्याची लाखो वर्षात नर/मादीचा फायदा/तोटा आजमाउन तयार झालेली वंशवृद्धीची एक strategy असते.
माहितीसाठी, http://web.missouri.edu/~gearyd/paternalinvest%5BChapFINAL%5D.pdf

"For the majority of species, the evolutionary is males invest more in mating (typically competition for access to reproductive females) than in parenting, and females invest more in parenting than in mating (Andersson, 1994; Darwin, 1871), although there are readily understandable exceptions (Reynolds & Székely, 1997). Females benefit from male-male competition and the male focus on mating, because their offspring are sired by the most fit males, and successful males benefit because they produce more offspring by competing for access to multiple mates than by investing in parenting. The basic pattern is especially pronounced in mammals, where male parenting is found in less than 5% of species and where females invest heavily in offspring Clutton-Brock, 1991)."
(विकीवर बघा, Parental investment)

हो अर्थात करतो..

काही वाक्यांचे अर्थ इथे लिटरली घेतल्या जातात त्यामुळे जास्त स्पष्टीकरण देणं व्यर्थ आहे...

कोणालाही मान "असे बसून" "तसे बोलून" दिला जातो का? ह्या मर्यादा पुरुषांना शिकवता का?>> हो शिकवतो..वेळ पडल्यास समजावुनही सांगतो..
कुठल्याही घरचे काही डेकोरम असतातच ते माझा नवरा पाळतो..आजी आई सोफ्यावर बसली असतांना धाडकन त्यांच्या अग्दि बाजुला जाऊन बसत नाही..हे तर प्रत्येकाकडुन अपेक्षित असते..

मला वाटते की वडीलधार्‍यांसमोर धाडकन जाऊन बसलं म्हणजे काय लगेच त्यांचा अपमान होतो असं नाही. ज्या त्या घरच्या वातावरणावर आणि संस्कारांवर अवलंबून आहे ते. मी माझ्या वडलांना अरेतुरे करते.... पण त्याना तो अपमान नाही वाटत. उलट एखाद्या दिवशी मी त्यांना अहोजाहो केलं तर मला विचारतात, 'रागवलियेस का?' पण तेच कुणा तिसर्‍या व्यक्तीनी ऐकलं तर त्यांना वाटतं की काय ही बापाचा अपमान करतेय. पण खरी गोष्टं मला आणि बाबांनाच माहित ना?
इथेही तोच घोळ झालाय थोडा...
ज्यांना जसं हवं तसं वागा स्वत:च्या मर्जीप्रमाणे.
कुणी रिच्यूअल्स पाळतंय म्हणून त्याला सनातनी किंवा अतिजुनाट विचाराची व्यक्ती म्हणावं का? तसंच कुणी नसेल फॉलो करत तर लगेच ती व्यक्ती नास्तिक आणि वडीलधार्‍यांचा अनादर करणारी ठरते का?
डोक्यावर पदर आणि वेशिवर नजर ठेवणारी बाई आवडेल का तुम्हाला?
पण आपल्या इथे तोच मेजर प्रॉब्लेम आहे. बाई बाह्यत: जितकी सुंदर (फक्त) दिसेल तितकं चांगलं, तिचे विचार कसे आहेत हे नगण्य. मध्ये कुणितरी ती चौकट म्हणून कविता टाकली होती तेच आठवलं एकदम मला. समाजाला चित्रं सुरेख दिसलं पाहिजे, मग आतली नाती कितीही पोकळ असली तरी काय झालं? तसंच... समाजाला दिसलं पाहिजे की आम्ही कसे जात-धर्म, कर्म्-कांडं, रिती-रिवाज विधीवत पाळतो... "मनातून मानतो की नाही ते गेलं खड्ड्यात"

ज्यांना जसं हवं तसं वागा स्वत:च्या मर्जीप्रमाणे.
कुणी रिच्यूअल्स पाळतंय म्हणून त्याला सनातनी किंवा अतिजुनाट विचाराची व्यक्ती म्हणावं का? तसंच कुणी नसेल फॉलो करत तर लगेच ती व्यक्ती नास्तिक आणि वडीलधार्‍यांचा अनादर करणारी ठरते का?
डोक्यावर पदर आणि वेशिवर नजर ठेवणारी बाई आवडेल का तुम्हाला?>>>>>>>>> १००% अनुमोदन दक्षिणा.

--- मी स्वतः स्त्री - पुरुष समानतेचा कट्टर पुरस्कर्ता आहे ( माझी आई गेली २८ वर्षे काम करतेय आणी ती माझी रोल मॉडेल आहे कदाचित त्यामुळे ) आणी त्याच मुळे पाळी पाळणे वगैरे मुर्खपणा आहे हे मलाही मान्य आहे

पण मला हा बीबी फारच एकान्गी वाटत्तोय . पुरुष म्हणजे वाईट हेच दाखवण्याचा प्रयत्न चाललाय .

माझ्या मते तुम्ही सगळी सरमिसळ करताय . तरीही म्हटल जाउ दे त्यान्चा Internal Matter आहे

या पोस्टने मात्र मला लिहायला भाग पाडल

एक मनुष्य प्राणी सोडला तर इतर सगळ्या जीव जातींमधे पुरुष म्हणजेच नर हा फक्त reproduction या एकाच क्रियेसाठी वापरला जातो. एकदा का जीव जन्माला आला की 'कोण तू?' असं म्हणून त्याचा संबंध संपतो. बाकी सगळं आत्मविश्वासाने, धीराने एकटी स्त्री/मादी च निभावून नेत असते. मनुष्य हा सुद्धा जर अशाच जीवसृष्टीत अवतरला असेल तर त्याला वेगळे रुल का?
समस्त पुरुष जमात, समाधान माना की निसर्गातल्या इतर जीव-जमातींप्रमाणे कर्तव्य भाग साधल्यावर तुमची हकालपट्टी होत नाहीये

तुम्हाला अस वाटत असेल की पुरुष खुप सुखी असतात तर गैरसमज आहे तुमचा .
सगळ्यात मोठा पुरुषान्चा जाच पाहिलाय तुम्ही ? सगळ्यात जाचक प्रथा ?
यात भाग घेणार्या बर्याच स्त्रिया स्वतः कमवतात , घर चालवतात . पण अजुनही ( भारतात तरी ) ९० % कुटुन्बात घर चालवायची जबाबदारी पुरुषाचीच आहे . हजार प्रॉब्लेम असतात , टेन्शन्स असतात , कुणाला सान्गायचे ? ही प्रथा वाईट नाही ? एखाद्या स्त्रीने नोकरी केली तर कर्तबगार , पण पुरुष मात्र Taken for Granted .
नोकरी / व्यवसाय नसलेल्या पुरुषाशी किती नोकरी असलेल्या स्त्रिया लग्न करतील ? मोडा पाहु ही प्रथा
असेही पुरुष असतील की जे घरादाराची काळजी करत नसतील . पण Most of them त्यासाठी आपल आयुष्य खर्च करतात. याचीही थोडी जाण ठेवा .
नाण्याची दुसरी बाजु हि पहा .

केदार जाधव,
जसं बाईला घरकामाला जुंपलं तसं अर्थार्जनाला पुरूष जुंपला गेला... आणि हीच तर विचारसरणी बदलायची आहे... की स्त्री पुरूष कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही... सगळेच सारखे आहेत. दोघांनी हवे तसे जगावे, हवे ते घालावे, एकमेकांनी एकमेकांच्या मतांचा आदर करावा... नात्याची जबाबदारी, आनंद, दु:ख एकत्रितपणे वाटून घ्यावीत. हे माझं काम नाही, हे मी करणार नाही.. असे सूर दोघांनीही धरू नयेत.... पुर्वापार चालत आलेल्या परंपरागत रूढीमुळे दोघांनाही वाटते आपला जाच होतो.... दोघांनीही पुढे सरसावून कार्य केले पाहिजे, आपसात वाद घालून काय साध्य होणार? Uhoh (हुश्श! हे पुर्णपणे माझं मत आहे...कृ. आ. त. म्या.घा.)

>>>> जसं बाईला घरकामाला जुंपलं तसं अर्थार्जनाला पुरूष जुंपला गेला... आणि हीच तर विचारसरणी बदलायची आहे...
आयला दक्षे, तू स्यामच्या पोस्टला वाया घालवलेस की! Happy

जसं बाईला घरकामाला जुंपलं तसं अर्थार्जनाला पुरूष जुंपला गेला... आणि हीच तर विचारसरणी बदलायची आहे... की स्त्री पुरूष कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही... सगळेच सारखे आहेत. दोघांनी हवे तसे जगावे, हवे ते घालावे, एकमेकांनी एकमेकांच्या मतांचा आदर करावा... नात्याची जबाबदारी, आनंद, दु:ख एकत्रितपणे वाटून घ्यावीत. हे माझं काम नाही, हे मी करणार नाही.. असे सूर दोघांनीही धरू नयेत.... पुर्वापार चालत आलेल्या परंपरागत रूढीमुळे दोघांनाही वाटते आपला जाच होतो.... दोघांनीही पुढे सरसावून कार्य केले पाहिजे, आपसात वाद घालून काय साध्य होणार?

>>>> दक्षीणा , माझही हेच मत आहे . पण एखाद्याने चुकिची पोस्ट टाकली तर सगळ्या पुरुषजातीविरुद्ध सन्युक्त आघाडी उघडू नये ही अपेक्षा .

दक्षिणा आणि केदारला अनुमोदन.
>> आयला दक्षे, तू स्यामच्या पोस्टला वाया घालवलेस की!
लिंबूजी, मला मधे ओढू नका... वातावरण आधीच स्फोटक आहे... कुणी माझ्या पोस्टचा 'सोइचा' अर्थ लावण्याआधी पुन्हा सांगतो... माझा आक्षेप इतर प्राण्यांच्या वागणुकीचा सोइस्कर अर्थ काढण्याला होता. ('[नराला] वापरणे', '[मादीने] आत्मविश्वासाने, धीराने एकटं निभावून नेणे', '[नराची] हकालपट्टी करणे' इ.)
इतर प्राणी तसं करतात म्हणजे आपण पण तसं केलं पाहिजे हा [तुम्हाला सोइचा] अर्थ कृपया काढू नका!

बी तू इंग्लिशमध्ये लिहितो आहेस म्हणून सांगते.

woman pl women (womens नाही)
man pl men (mens नाही)

बाकी चालू द्या तुमचं.

समस्त पुरुष जमात, समाधान माना की निसर्गातल्या इतर जीव-जमातींप्रमाणे कर्तव्य भाग साधल्यावर तुमची हकालपट्टी होत नाहीये
>> मलाही नाही पटलं हे वाक्य! माहित नाही बाकीच्यांचं कसं आहे.. पण मुलबाळांना जन्म द्यायला मदत वगैरेच्या पलिकडे जाऊन बाईपुरुषाचं नातं असतं.. असावं.. साहचर्याचं.. Its one of the beautiful things in life.. मग एखाद्या बाईला मुल होत नाही म्हणून दुसरं लग्न करणार्‍या नवर्‍यात (पूर्वीच्या काळातली गोष्ट) आणि असा विचार करणार्‍या आपल्यात फरक तो काय राहिला?

मुग्धाची एकही पोस्ट नाही पटली. बाबांच्या एका मित्राची बायको माझ्या आईला सांगत होती.. "काय करणार, साखर संपलेली आणि चहा करायचा होता.. शेवटी बोलावं लागलं मला सासर्‍यांशी!"
आम्हाला सगळ्यांना हा इतका मोठा धक्का होता!
मुग्धा, अर्थातच तुला जे बरोबर वाटतं ते करण्याचा तुला अधिकार आहे... पण प्रेम आणि स्वतः बद्दलचा आणि दुसर्‍याबद्दलचा आदर ह्या सगळ्यात बेसिक गोष्टी आहेत. आणि आदर म्हणजे मोठ्यांदा न हसणे, समोर न बसणे, असं काही नाही बरं का! आदर म्हणजे दुसराही एक माणूस आहे - स्वत:चे विचार, भावना, स्वतःचे वीकनेस असलेला हे मान्य करण.. त्याप्रमाणे स्वतः जगणं आणि दुसर्‍याला जगू देणं. म्हणजे आदर.

दक्षीणा , माझही हेच मत आहे . पण एखाद्याने चुकिची पोस्ट टाकली तर सगळ्या पुरुषजातीविरुद्ध सन्युक्त आघाडी उघडू नये ही अपेक्षा .<<
पुरूषजातीविरूद्ध आघाडी उघडल्याचा रंग मुद्दामून देणारे काही जण आहेत इथे.
इथे केवळ आणि केवळ कपडालत्ता, दागदागिने, आचारविचार यात कुठेही बाईच्या इच्छेपेक्षा संस्कृती, मर्यादा याचे अवडंबर करणे याला विरोध आहे. मुद्दा तोच आहे.
कोणी मंसु, कुंकू, जोडवी घालत असेल तर त्याला विरोध असण्याचा मुद्दा नाही पण पाळीच्या दिवसात लोणचं खराब होतं, दूध नासतं प्रकारच्या शेंडाबुडखा नसलेल्या विधानांना नक्कीच विरोध आहे मग ती बाईने केलेली असोत की पुरूषाने.

Pages