स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

माफ करा. पण मला आपले हे पोस्ट दिसलेले नाही. कदाचित बीबी खूप भरकटल्यामुळे तसे असेल. आपण या पोस्टचा सन्दर्भ मला देऊ शकाल का???>> सगळ्या पोस्ट्स नं वाचता केवळ अर्ध्या माहीतीवरुन टीका करणे बरोबर आहे का? >>> कशावरून आपणाला असे वाटले की मी सर्व पोस्ट्स वाचलेल्या नाहीत?? मला तो स्पेसिफिक संदर्भ आढळला नाही. असे मी म्ह्टलेले आहे. कृपया सन्दर्भ द्याल का?? दिलात तर मी स्वतः ते पोस्ट डिलीट करेन.

भर उन्हात बुरखा घालून वावरणे.. तो सक्तीचा असणे. -- माफ करा, हा या बीबीचा विषय नाही. जर कुणी त्या धर्माची व्यक्ती इथे येऊन लिहत असेल तर ठिक आहे, अन्यथा दुसर्‍या धर्माविषयी आपण "सहिष्णु हिंदू" चर्चा करत नाही!!>> बीबी चा विषय काय आहे काय नाही हे ठरवणार्या तुम्ही कोण? मुस्लिम धर्मातली स्त्री ही स्री नव्हे का?
बीबी च्या विषयात असं कुठे लिहीलंय की हिंदु स्त्रियांबद्दलच चर्चा हवी?>>>> मुग्धा. इथे लिहिणार्‍यापैकी कुणीही मुस्लिम स्त्री नाही (असे आपण मानू, कुणी असल्यास कृपया लक्षात आणून द्या). त्यामुळे "मुस्लिम स्त्रीने" बुरखा घालावा की घालू नये (उन्हात किंवा सावलीत) हे आपण कसे ठरवू शकतो???? तुम्हाला तुमच्याच धर्मातील अत्यंत क्षुल्लक प्रथादेखील योग्य वाटतात तर तुम्ही इतर धर्मातील बायकाबद्दल लिहिणे हेच इथे हास्यास्पद आहे!!!! लक्षात घ्या.. की तुमच्या मुद्द्यामधे हा पहिलाच मुद्दा तुम्ही नमूद केलाय. तुम्हाला "विटाळशी" बाईने लोणच्यात हात घातलेला चालत नाही तर तुम्ही इतर धर्मातील स्त्रियासाठी काय करणार आहात??? बीबीचा विषय "लोणचे टिकवणे" हा नव्हता, मग तुम्ही तरी तो मुद्दा कसा मांडलात बुवा???

मुग्धा, इथे वैयक्तिक टीका करण्याचे वास्तविक कारण काहीच नाही, पण तुमची मते पोस्टगणिक बदलत आहेत, त्यामुळे जर सर्व्जण तुम्हाला उद्देशून लिहत असतील तर त्याला नाईलाज आहे!! तुमची मते क्लीअर करा आणि मगच लिहा, की म्हणजे कुणाचेच कन्फ्युजन होणार नाही!!!!

किती बायकाना स्वतःचा संपूर्ण पगार नवर्‍याच्या अथवा सासरच्याच हातात द्यावा लागतो?? तसा दिला नाहीतर त्याचे तथाकथित नवरे पब्लिक फोरमवर येऊन स्वतःच्या बायकोविषयी किंवा सर्वच स्त्रियाविषयी कितीही हीन मजकूर लिहित राह्तात. हे याच नव्हे तर इतर कित्येक बीबीवर मायबोलीने पाहिलेलेच आहे!!

हे माझ्या पोस्टमधील वाक्य आहे.


बायकोने सगळा पगार आपल्याच हातात द्यावा म्हणून भांडणारा नवरा या मायबोलीने पाहिलेला आहे...... कोण बरं हा? नंदिनीबाई, ओपन चॅलेंज स्वीकारा आणि त्याचं नाव डिक्लेअर करा..............

हे जागोमोहनप्यारे याच्या पोस्टमधील वाक्य आहे!!

वरील दोन वाक्यातला विरोधाभास इतर वाचकानी ध्यानात घ्यावा. बाकी जामोप्या तुमचे उरलेले पोस्ट मी वाचलेले नाही पण त्यात काय लिहिले असेल याचा अन्दाज आलाच.

कोणतरी एक मन्दार जोशी वॉशिन्ग डर्टी लायनेन इन पब्लिक असे या बीबीला म्हणत होता. आता जामोप्या याचे पोस्ट म्हनजे "धोबीतलाव" झाल्यासारखे वाटत नाही का??

ताक. मी येते चार दिवस माबोवर येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. बीबी बंद झालाच तर माझ्यासाठी कुणीतरी स्क्रीन शॉट घेऊन ठेवा, ही विनंती!!!!

वरील दोन वाक्यातला विरोधाभास इतर वाचकानी ध्यानात घ्यावा. बाकी जामोप्या तुमचे उरलेले पोस्ट मी वाचलेले नाही पण त्यात काय लिहिले असेल याचा अन्दाज आलाच.

कोणतरी एक मन्दार जोशी वॉशिन्ग डर्टी लायनेन इन पब्लिक असे या बीबीला म्हणत होता. आता जामोप्या याचे पोस्ट म्हनजे "धोबीतलाव" झाल्यासारखे वाटत नाही का??

(हा मजकूर नंदिनी यांचा आहे... )

***********************************************

माझे पोस्ट तुम्ही वाचलेले नाही, हेही तुम्हीच म्हणताय.... आणि माझे पोस्ट म्हणजे धोबी तलाव झाला हेही म्हणताय!!! धन्य आहे तुमची!!!!! Proud ..

स्क्रीन शॉटची तुम्ही चिंता करु नका.. मी तो आधीच घेऊन ठेवला आहे..... आणि तुम्हाला तुमचे पोस्ट एडिट करुन कोलांटी उडी मारता येऊ नये एवढ्याचसाठी मी माझ्या पोस्टमध्ये तुमच्या संपूर्ण पोस्टची कॉपी टाकलेली आहे... अन्यथा 'त्या' एका वाक्यासाठी मला तुमचे पोस्ट इतके लांबलचक कॉपी पेस्ट करुन टाकायची गरजच नव्हती..... Happy .... बरं, आता 'त्या' माणसाचे नाव कधी डिक्लेअर करताय? चार दिवस पुरतील का? Happy

काही निवडक "पुरुष आयडीन्नी" इथे येऊन काही लिहीण म्हणजे देखिल जाच आहे अशी बोम्ब सुरू झाली नाही म्हणजे मिळवली! Proud
लिम्ब्या, पळ इथून, कलटी मार सत्तरच्या स्पीडने!

जामोप्या, "कोलाटी उडी" मारणे हा तुमचा स्वभाव झाला. हे तुम्ही इतक्या वेळा केलय की मागे एकदा बीबीवर "आता मी डोंबारी झालोय" हेही लिहिलं होतंत. विसरलात का??? दुर्दैवाने मी नाही विसरलेय!!!

मी पोस्टस एडिट करून मजकूर बदलत नाही. तसे केलेले असल्यास पुराव्यासकट दाखवून द्या.
ती तुमची खोड आहे. "ब्रह्मदेव" वगैरे पोस्ट्स विसरलात का?? की इथे त्या स्क्रीन शॉटची इमेजेस टाकू??

<<वॉशिन्ग डर्टी लायनेन इन पब्लि<<>>
बायका खुप बड्बड करतात परंतु त्यान्च्या खर्‍या समस्या कधीच ओठावर आणत नाहीत आणि म्हणुनच त्यांच्या वरच्या अन्यायाला वाचा फुट्त नाही. हे मत विद्या बाळ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. आणि अशा बायकांनी 'बोलावे' म्हणुनच विद्या बाळ यांनी उपक्रम सुरु केला.

मी पोस्टस एडिट करून मजकूर बदलत नाही. तसे केलेले असल्यास पुराव्यासकट दाखवून द्या.

आजवर तसे नसेल केलेत तसे, याचा अर्थ उद्या करणारच नाही, असा काही नियम नाही.... त्यामुळे मी काळजी घेतली इतकेच.... एडिटिंगची सोय पळवाट ठरु नये इतकेच... ब्रम्हदेवाच्या पोस्टबाबत तुम्हाला मी स्पष्टीकरण एकदा दिलेले होते.... ते मात्र दुर्दैवाने विसरलात की काय? Happy

किती बायकाना स्वतःचा संपूर्ण पगार नवर्‍याच्या अथवा सासरच्याच हातात द्यावा लागतो?? तसा दिला नाहीतर त्याचे तथाकथित नवरे पब्लिक फोरमवर येऊन स्वतःच्या बायकोविषयी किंवा सर्वच स्त्रियाविषयी कितीही हीन मजकूर लिहित राह्तात. हे याच नव्हे तर इतर कित्येक बीबीवर मायबोलीने पाहिलेलेच आहे!!

हे तर तुमचेच वाक्य आहे ना? मग आता त्या माणसाचं नाव जाहीर करा, अन्यथा आपले विधान ही केवळ मायबोलीच्या पुरुषांवर केलेली चिखलफेक आहे, हे मान्य करा..... मायबोलीवरचे किती तरी आय डी (स्त्री पुरुष) आपली खरी नावे, फोटो व इतर माहिती वापरून वावरत असतात... तुम्ही वर लिहिलेला आरोप करुन समस्त पुरुष आय डी ना संशयाच्या नस्त्या भोवर्‍यात ढकललेले आहे... त्यामुळे आता एक तर हा आय डी कोण ते सांगा अन्यथा आरोप मागे घ्या.... याबाबत मी अ‍ॅडमिनना मेल टाकतच आहे....

नंदिनी,
आपल्याला आपल्या खोट्या धार्मिक रुढी, परंपराविरुध्द लिहीता येत, त्या टाकुन देता येतात. त्याबाबत आपला शिकलेला समाज आपल्याला प्रोत्साहन नाही पण पाठींबा देतो. मुस्लिम स्त्रियांचे तसे नाही. अजुनही तोंडी तलाक, बुरखा इ गोष्टी बाबत जागरुकता आहे पण उपयोग नाही.

अगदी मान्य, पण तशाच काही प्रथा या हिंदूंमध्ये ही आहेत, पण त्या विशिष्ट वर्तुळात बायकांना तितकंसं एक्स्पोजर नाही. बर्‍याच मुस्लिम मुली/बायका मला माहीत आहेत ज्या बुरखा वापरत नाहीत, उलट माझ्या ऑफिसात मी २-३ बायका पाहिल्या आहेत ज्या बुरखा घालून येतात. परत सांगावंसं वाटतं की हे रितीरिवाज पाळणं हे ज्या त्या घरच्या वातावरणावर आणि संस्कारांवर अवलंबून आहे. दुसर्‍याच्या घरात जाणार म्हणून माहेरी विनाकारण घरची कामं करण्याची सक्ती, साडी नेसण्याचं बंधन, केस वाढवण्याचा तगादा.... पण आपल्या सगळ्यांना असंच का वाटतं की हे सर्व केल्यानेच आपली मुलगी सासरी सुखी होईल? ह्या सर्व गोष्टीत इनव्हेस्ट करण्यापेक्षा तिला मोठं करा, शिक्षण द्या, तिची वैचारीक पातळी वाढवा, तिचे इंटरपर्सनल स्किल वाढवा, स्ट्रॉंग करा तिला... खरं सासरी सुखी रहायला ह्याच गोष्टी जास्त गरजेच्या असतात. पण आपण नको त्या गोष्टीत फसून वरच्या ढोंगाला भूलतो. का तर समाज.

स्त्री असो वा पुरूष कुणावरही बंधन/ जाच हा नसायलाच हवा.. मुलांनीच मिळवलं पाहिजे, बाहेरची कामं, नारळ फोडणे, गॅस उचलणे... ही आणि अशी शक्तीची कामं पुरूषांना करण्याची बंधनं असता कामा नयेत... स्त्रिया ही ती करू शकतात. कारण शक्तीपेक्षा यूक्ती श्रेष्ठ. तसंच घरीही कामात एकसमानता असावी.. त्याही पेक्षा एकमेकांच्या मतांचा आदर राखणं हे सर्वात महत्वाचं आहे. मुलगी स्वतंत्र विचारांची असेल आणि नवर्‍याचा ही पाठिंबा असेल तर संसार उत्तम चालतो, पण घरात सासु-सासरे असतील तर मतभिन्नतेमुळे नवरा काही बोलु शकत नाही. त्यातून सुवर्ण मध्य म्हणजे आईवडीलांना (त्यांच्या) सुनेच्या व्यक्तीस्वातंत्राची जाणिव करून द्यावी, त्याचबरोबर बायकोशी समजुतदारीने आई-वडीलांच्या अपेक्षा बोलून चर्चा करावी. स्त्रिया नक्कीच समजूतदार असतात. काही छोट्या मोठ्या अपेक्षा पूर्ण करून घराची शांतता वाढणार असेल तर त्या गोष्टी स्त्रिया कोणतेही आढेवेढे न घेता नक्कीच करतील. पण सक्ती मात्रं करू नये..

मला खटकणारी एक प्रथा/ पध्दत :

घरातील बाईने शिळे/ उरलेले/ कमी खाणे. घरातील ताजे, चांगले-चुंगले अन्न पुरुषांसाठी राखीव. मुली, स्त्रियांचा हक्क त्यांनी खाऊन उरलेल्या अन्नावर. आजही अनेक सुसंस्कृत, सुशिक्षित घरांमध्ये ही प्रथा दिसून तर येतेच शिवाय अशिक्षित, खेड्यातील समाजातही ही प्रथा दिसून येते.

खरं तर स्त्री बाळाला जन्म देते, आणि स्वतः एक माणूस आहे, त्यामुळे तिचे पोषण तर नीटच व्हायला हवे. पण अगदी श्रीमंत घरातील लेकी-सुनाही कुपोषित असतात असे आढळून आले आहे. त्याचे एक कारण म्हणजे लहानपणापासून 'तू कमीच खाल्ले पाहिजेस' वगैरे वगैरे मनावर बिंबवले गेलेले असते. पुढे 'आकार राखण्यासाठी' त्यात अजून भर पडते. अशा कुपोषित, अ‍ॅनिमिक मुलींची संततीही मग कशी सुदृढ, बुध्दिमान, निरोगी निपजणार?

खेड्यातील/ झोपडपट्टी अनेक मुले मागे राहायचे एका सर्वेक्षणानुसार हे कारण सांगितले गेले : ह्या मुलांच्या माता कुपोषित. गर्भारपणात त्यांना ना धड आराम मिळाला, ना आरोग्य सुविधा, ना पुरेसे अन्न. त्यामुळे ह्या मुलांची मुळातच बौध्दिक वाढ, झेप कमी आहे. अशी मुले मग जगण्याच्या स्पर्धेत कसा टिकाव धरणार? ह्यातून निरोगी, सशक्त, सक्षम नागरिक कसे निर्माण होणार?

अनेक सुसंस्कृत घरांमध्ये आजही मुलींना दूध, साय, लोणी, तूप इ. पदार्थांपासून दूर ठेवले जाते. माझ्याच परिचयातील अशी घरे आहेत. मुलींनी कमीच खावे ह्यासाठी घरातील बायका जागरूक असतात. लहान वयापासून तिला उपास, सर्वांच्या नंतर जेवणे वगैरे सवयी लावल्या जातात. माझ्या मते हा स्त्रीच्या आरोग्याला बाधा आणणारा प्रकार असून आता तरी तो थांबणे गरजेचे आहे. स्त्रीला दोन वेळेला पुरेसे, ताजे, पौष्टिक/ संतुलित अन्न वेळेवर मिळणे ही तिची व समाजाची गरज आहे.

ज्या घरात अशी उपासाची जबरदस्ती असेल Angry त्या घरातल्या समस्त स्त्रियांनी
घरच्यांना दाखवण्यासाठी उपास करावा, भाजी आणण्याच्या निमित्ताने बाहेर पडावे आणि एखाद्या मैत्रिणीकडे/हॉटेलात मस्त काहीतरी चमचमीत हाणून मगंच घरी जावे. Proud जशास तसे.
गरजूंनी कृपया Light 1 घ्यावा.

अरुन्धती अतिशय अनुमोदन. यामुळे तरूण मुलींच्यात फूड इन्सेक्युरिटी व इमोशनल इटिन्ग सारखे गंड उद्भवतात. जे त्यांना जन्मभर त्रास देतात.

दक्षे अनुमोदन. त्यात वजन वाढ्ते पण. मला आठवते मी नवी नवरी अस्ताना एफ वायलाच होते. लकी रेस्टॉरंट मधून आम्ही मैत्रीणींनी काय ते ५ रु. चे व्ह्यॅनिला आइस्क्रीम घेतले व बाजुला सायकली वगैरे लावून खात होतो. तितक्यात साबांची स्वारी तिथून जाती झाली. मग घरी आल्यावर व्यवस्थीत चंपी, रागराग झाला. आता फाइव स्टार मधे एकट्याने आपल्या पैशाने खाताना सुद्धा गिल्टी वाट्ते.

दक्षे, भाजी आणण्याच्या निमित्ताने नाही गं देवळात जाण्याच्या निमित्ताने Proud

अमा, साबां साठी पण एक पटकन खरेदी करुन त्यांनाही तिथेच खायला लावायचं आग्रह करकरुन Biggrin

अरुंधती, छान पोस्ट.

अजूनही लग्न ठरलेल्या किंवा झालेल्या मुलींना 'वटपौर्णिमेचे' व्रत पाळायची जबरदस्ती केली जाते, कधी इमोशनली कधी या घराची प्रथा म्हणून, तिला कितीही पटत असो वा नसो. आणि तिने नाहीच पाळलं तर दरवर्षी ती किती घोर अपराध करतीये हे तिला भासवलं जातं.

काही घरांमधे लग्नानंतर सूनेने २४ तास साडीमधेच वावरण्याचं बंधन असतं..... का? तर म्हणे, सासर्‍यांची एक पोझिशन आहे समाजात, त्यांची सून म्हणूनच पाहणार तुझ्याकडे, ड्रेस घातला तर काय विचार करतील? वास्तविक पंजाबी ड्रेस हा अत्यंत सोयीचा आणि पूर्ण अंग झाकणारा ड्रेस आहे आणि रोजच्या कामात, घरात वावरताना साडीसारखा बेक्कार पोशाख नाही.

<<घरातील बाईने शिळे/ उरलेले/ कमी खाणे. घरातील ताजे, चांगले-चुंगले अन्न पुरुषांसाठी राखीव<<
अगदी अगदी अरुंधती! मलाही ह्या रिवाजाची चीड आहे.
आणि एवढच नाही तर नव-याने जेवल्याशिवाय बायकोने जेवायचे नाही....त्याला रात्री कितीही उशीर झाला तरी त्याच्यासाठी जेवायला थांबले म्हणजे किती कर्तव्यपरायण स्त्री!! आणि सर्वांची पोटे तृप्त करुन (उरलेच तर) उरलेले अन्न खाते ती खरी अन्नपूर्णा वै. वै. प्रकार ही मी पाहिलेत.

आशु, अगदी अगदी. आणि खरंतर साबांचा राग त्यासाठीच असेल कदाचित की 'एकटी एकटी खाते, मला मात्र नाही बोलावलं..... आम्हाला मेलं जन्मभर असलं काsssssssssssही करायला मिळालेलं नाही.' Lol

>>अमा, साबां साठी पण एक पटकन खरेदी करुन त्यांनाही तिथेच खायला लावायचं आग्रह करकरुन >> अस्व्हे अगदी हेच हेच लिहायला आले, तोवर तुझी पोस्ट पडली होती आधीच, तुला १००० वेळेला अनुमोदन...
मंजे Lol Rofl

दक्षिणा, आवडली तुझी आयडिया! Happy माझ्या एका मैत्रिणीला तिच्या सा.बा. कंपल्सरी नोकरीला डब्यात आदल्या दिवशीचे शिळे न्यायला लावायच्या. सुरुवातीला तिने खाल्ले, मग कंटाळली, आता अशी वेळ येते तेव्हा ती डबा नेते, त्यातले अन्न भिकार्‍याला देते व स्वतः मस्त कॅन्टिनमधले अन्न चापते! Happy पण तिच्यावर अशी वेळ यावी व तीही दुसर्‍या स्त्रीनेच आणावी हे दुर्भाग्य आहे! अनेकदा आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसलेल्या बायका स्वतःवर, आपल्या खाण्यापिण्यावर बाहेर जाऊन पैसे खर्च करायलाही नाखूष असतात. किंवा घाबरतात. सासरचे लोक काय म्हणतील वगैरे वगैरे. किंवा कोणी पाहिलं तर काय म्हणेल इ. इ.
....मला वाटतं मुली, बायकांनी आता ह्यातून तरी बाहेर यायलाच हवे!

मंजिरी, व्रतांची जबरदस्ती केल्याने जर 'फलप्राप्ती' होते अशा घोर गैरसमजात अजून लोक वावरत असतील तर कठिण आहे. मनापासून केलेल्या व्रताला मीपण मानते. पण असे मारुन मुटकून केलेले व्रत काय कामाचे? शिवाय 'हीच बायको मिळावी' म्हणून पुरुषांनाही एखादे व्रत करायला लावावे काय ह्या विचारात आहे Wink माझ्या परिचयातील काही पत्नीव्रता पुरुष बायकोबरोबर वटपौर्णिमेचा उपास करतात. Happy

माझ्या परिचयातील काही पत्नीव्रता पुरुष बायकोबरोबर वटपौर्णिमेचा उपास करतात.>>>>>

अरुंधती, प्रेमाने आणि आवडीने केलेल्याला आपली ना नाही, मग ते स्त्री ने केलेले असो अथवा पुरुषांनी. त्या गोष्टीची जबरदस्ती आणि बंधन वाईट.

अशाच पद्धतीच्या अजून काही गोष्टी म्हणजे, स्त्री ने जेवताना मांडी घालून बसायचं नाही, एक पाय उभा ठेऊन च जेवायचं (हे पूर्वी जास्त असायचं... आता आहे की नाही माहिती नाही). केस कापायचे नाहीत.

रोजच्या कामात, घरात वावरताना साडीसारखा बेक्कार पोशाख नाही.>> अनुमोदन. आमच्या नात्यातील एक बाइ कायम पाणी भरत असत व त्यांची साडी खालून काय्म भिजलेली असे. घरचे पुरुष नातेवाइक कायम त्यांची खिल्ली उडवत. त्या जरा बोलायला बोबड्या होत्या. शमाच्या आइ तर त्यांना सर्व तमात्या आइ म्हणून हसत. त्यांचा काय दोष? घरातील कोणी ही त्यांना पाणी भरायला मदत करत नसे. माझ्या सक्ख्या सासू बाइ ज्या कॅन्सर ने गेल्या त्यांनापण जड बादल्या पाणी भरून पहिल्या मजल्या वर आणावे लागे. मीही हैद्राबादेत खालून पाणी भरले आहे.

बहीण खूप कमावते पण घरी कामवाली/ स्वयंपाकीण नाही कारण अहोंना आवड्त नाही. तिने सकाळी उठून पोळ्या करायच्याच. दुक्ख होते मला.

पांढरे डाग किंवा अधु डोळेअसणार्‍या/ फिट्स येणार्‍या स्त्रीला पण फार अवहेलना सहन करावी लागते. माणूस म्हणून समजावून घेतले जात नाही.

डायनिंग टेबल आल्यापासून जेवताना कसं बसायचं हा प्रश्न तरी सुटला Happy

आवडीने, स्वेच्छेने केलेलं कोणतंही काम, व्रत, कृती जाच असूही शकत नाही. मात्र ते लादलं गेलं, किंवा त्यासाठी पुरतं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं गेलं की मग संपलंच!

अरुंधती- छान पोस्ट.
सर्वात शेवटी जेवणे हा तर अलिखीत नियम मी अजूनही आजुबाजुला पाहते.

आमच्या सासुबाईंच्या सासुबाई म्हणे त्यांची ३ पैकी कुठलेही मुल आजारी (म्हणजे साधे सर्दीपडशानेअसले तरी) पडले की त्यांच्या वतीने परस्पर उपासाचा नवस बोलुन ठेवायच्या जेणेकरुन सून महिन्याकाठी १-२ आठवडे तरी उपाशी राहील. Sad

विशेषतः घरात सगळे एकत्र असतात, किंवा सणावाराला -- धार्मिक कार्य वगैरे -- तेव्हा तर कळस होतो अगदी. घरातील कर्त्या स्त्रीने सकाळपासून काही खायचे नसते, उपाशी पोटी सर्व स्वयंपाक करायचा, सर्वांना जेऊ घालायचे व मग स्वतः ''मागच्या पंगतीला'' जेवायचे.... साधारण दुपारी ३/४/५ वाजता.....
अजून तरी अशा कार्यात स्त्रियांची पहिली पंगत बसलेली मला बघायची आहे....

रैना, ऐ ते न खरंच!
सून महिन्याकाठी १-२ आठवडे तरी उपाशी राहील. >>>>>> Lol

ग्रहणकालात गर्भवतीने काहीही न करता देवाचे नाव घेत बसायचं हे पण मला कधीच न कळलेलं कोडं आहे.... त्या भौगोलिक घटनेचा या जीवशास्त्रातील घटनेशी काय संबंध?? Uhoh
तिला या काळात काही कापलं तर म्हणे जिथे आईला कापलं असेल तिथेच बाळाला पण कायमचा व्रण येतो जन्मापासूनच Uhoh

मन्जिरी... ग्रहणकाळातही स्त्रीने, गर्भवती स्त्रीने आनन्दात राहावे ह्यासाठी खरं तर उपाय करायला हवेत....

रैना.... थँक गॉड सध्या अशा सा.बा. केसेस पहायला मिळत नाहीत.... आणि त्या तशा असल्या तरी सुना हुशार होत चालल्यात Happy

अ.कु. बीबीच्या संदर्भात अनावश्यक माहिती देतेय, कुठचीही गर्भारशी स्त्री कुपोषीत राहू नये यासाठी आता सरकार त्यांना पाचव्या महिन्यापासून कॅल्शिअम आणि लोहाच्या गोळ्या पुरवते, धनुर्वाताची इंजेक्शनेदेखिल दिली जातात. त्याचप्रमाणे शिशुलादेखिल जीवनसत्वांचे डोस दिले जातात. हे सगळे निदान कागदोपत्री तरी आहे, किती अंमल बजावणी होते माहित नाही. Sad

जामोप्या, तुमचा वैयक्तिक अनुभव बाजूला ठेवला तरी बर्‍याच घरात हा पैसा जबरदस्तीने स्त्रीकडून घेतला जातो. माझे वैयक्तिक मत जे माझ्या नवर्‍याला मान्य आहे- मला माझा पैसा माझ्या घरासाठी (नवरा, मुले व मी जिथे रहाणार) वापरावासा वाटतो. अथवा माझ्या अपत्याच्या शिक्षण/संगोपन आणि आमच्या वृद्धापकाळासाठी साठवावासा वाटतो. दीराचे/नणंदेचे लग्न/शिक्षण, माझ्या बहिणींचे लग्न/शिक्षण यासाठी मी आमच्या दोघांच्याही पालकांना मदत करू इच्छित नाही. संबधीत व्यक्तीला बिनव्याजी पैसे देऊ शकते. त्याचप्रमाणे माझ्या उत्पन्नातून बनणार्‍या प्रॉपर्टीमध्ये माझ्या नावाचा सहभाग आणि नॉमिनेशन असणे आवश्यक आहे.

माझ्या ओळखीच्या बर्‍याच मुलींना हे स्वातंत्र्य मिळत नाही. समाजातल्या सर्व जातीय आणि अर्थिक स्तरांवर मी हे पाहिले आहे. माझ्या एका कलीगच्या नवर्‍याने तिच्या "not so earning" दीरासाठी मुम्बईत घर घेतले आहे. त्यामुळे त्याला चांगली बायको मिळेल म्हणे. त्याचे हफ्ते भरताना त्यांची दमछाक होतेय. तरी तिच्या सासूचे असे म्हणणे आहे की दीराच्या होणार्‍या बायकोचे मंगळसूत्र करण्यासाठी यांनी मदत करावी.

माझ्या ओळखीच्या ३ स्त्रियांना त्यांना नको असताना दुसरे मूल जन्माला घालण्यासाठी जाच सहन करावा लागला आहे. (तिघींनाही पहिले अपत्य मुलगा आहे तरीही). त्यातल्या एकीचा पगार नवरा घर चालवण्यासाठी वापरत असे. आणि नविन घर मात्र स्वतःच्या नावावर घेतले होते. त्यामुळे तिने दुसरे मूल नको म्हटल्यावर ह्याच्या घरच्यांनी आणि ह्याने तिला घराबाहेर पड असे सुनावले. दुसरीचीही सेम केस. दोघींनाही घराबाहेर पडलीस तर पहिले मूलही बघायला मिळणार नाही, त्याचा ताबा देणार नाही असे धमकावले. (त्यांनी परीस्थितीला शरण जाऊन सेकंड चान्स घेतला) तिसरीने ठाम नाही सांगीतले आणि घराबाहेर पडणार नाही असे सुनावले. तिच्या नवर्‍याने असहकार पुकारला आहे. तिचा पैसा वै. सगळे वापरतो पण तिला घरकामात, मुलाचे संगोपन करण्यास कसलीच मदत करत नाही. साधे बिल देखील भरत नाही.

केदार, अशी माणसे जास्त दिसतात आजूबाजूला. त्यामुळे "पुरुष" वि. "स्त्रिया" असे वादाचे स्वरूप होते. कृपया ते "पुरुषधार्जिणी संस्कृती" वि. "स्त्रिया" असे वाचावे. जर सासूच सुनेचा जीव घेत असेल आणि आईच लेकीला अर्धपोटी ठेवत असेल तर त्यात पुरुषांचा काय दोष असे वरवर पहाता वाटते. पण हे सगळे वागणे "पुरुषधार्जिणे"पणातून येते. आमच्या वैयक्तिक अनुभवानुसार - लेकीच्या संगोपनासाठी मी आणि नवर्‍याने आम्हाला शक्य होत्या त्या सर्व तडजोडी केल्या आहेत. मी अर्धवेळ काम करणे, आम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणे, दोघांनीही कमी हुद्द्याचे आणि पर्यायाने कमी जबाबदारीचे काम स्विकारले आहे. माझ्या बदलीच्या काळात नवर्‍याने लेकीची छान काळजी घेतली आहे. परंतु माझ्या कुटुंबातल्या आणि त्याच्या कुटुंबातल्या बर्‍याचजणांनी मला "Guilty as Charged" ठरवले आहे आणि माझ्या नवर्‍याला "महान" ठरवले आहे; कारण मी आई असून लेकीपासून दूर रहाते आणि नवर्‍याला तिचे संगोपन करायला लावते. (ह्यात मुलीला आई बाबा दोघांची गरज आहे म्हणणारे अंतर्भूत नाहीत) नवर्‍याने ती २.५वर्षांची झाल्यावर जून २०१०पासून पुन्हा कामात आघाडी घ्यायची ठरवलीये. तेंव्हा लेकीची काळजी मी घेतली तर मात्र मी माझे कर्तव्य करतेय, त्यात काय? असा सूर असेल.

बाकी नंदिनीचे जाचणार्‍या मुद्द्यांना अनुमोदन.

माझ्या ओळखीत अश्या स्त्रिया आहेत ज्यांनी ठोस उत्पन्न नसलेल्या पुरुषांशी लग्न केलेय आणि त्या पुरुषांनी देखिल मुले, घर आणि इतर कामांकडे जातीने लक्ष दिलेय.

अरुन्धती, तुमच्या पोस्ट्स प्रचण्ड सेन्सेबल (अचूक या अर्थाने) अस्तात! Happy आता हेच बघा ना
>>>>>> माझ्या एका मैत्रिणीला तिच्या सा.बा. कंपल्सरी नोकरीला डब्यात आदल्या दिवशीचे शिळे न्यायला लावायच्या. सुरुवातीला तिने खाल्ले, मग कंटाळली, आता अशी वेळ येते तेव्हा ती डबा नेते, त्यातले अन्न भिकार्‍याला देते व स्वतः मस्त कॅन्टिनमधले अन्न चापते! पण तिच्यावर अशी वेळ यावी व तीही दुसर्‍या स्त्रीनेच आणावी हे दुर्भाग्य आहे! <<<<<<
हे जे ठळक केलय, तेच मी सान्गायचा प्रयत्न करतोय केव्हापासून! Happy
मी जिथे जिथे स्त्रीयान्ची छळवणूक बघितलीये, तित, पुरुषान्चा सहभाग वीस टक्के, तर बाकि नणन्दा/भावजया/जावा/सासवा यान्चा सहभाग ८० टक्के बघितलाय! हे क.ब.? अन हे मान्यच करायचे नसेल, तर बदलण्याची अपेक्षाही धरणे व्यर्थ आहे! Happy
असो... मी वाचतोय

लेकीची काळजी मी घेतली तर मात्र मी माझे कर्तव्य करतेय, त्यात काय? असा सूर असेल.>>>>

जाजु, अगदी खरं आहे.

<<विशेषतः घरात सगळे एकत्र असतात, किंवा सणावाराला -- धार्मिक कार्य वगैरे -- तेव्हा तर कळस होतो अगदी. घरातील कर्त्या स्त्रीने सकाळपासून काही खायचे नसते, उपाशी पोटी सर्व स्वयंपाक करायचा, सर्वांना जेऊ घालायचे व मग स्वतः ''मागच्या पंगतीला'' जेवायचे.... साधारण दुपारी ३/४/५ वाजता..... >>>
अगदी अगदी, हे तर सर्व सुशिक्षितांमधे अजुनसुद्धा होते.
<<....मला वाटतं मुली, बायकांनी आता ह्यातून तरी बाहेर यायलाच हव<<>>
मी तर यात कधीच नव्हते , पण जसे कळायला लागले तेव्हापासुन आईला यातुन बाहेर काढण्यासाठे भरपुर प्रयत्न करते आहे. काही बाबतीत प्रगति आहे पन अजुन ही परिस्थिती म्हणावी तशी सुधारलेली नाही.
म्हण्जे शिळे अन्न उरले तर आईच खाते अजुनही फक्त आता शिळेच उरु नये म्हणुन प्रयत्न करते एव्हढ्च

ग्रहणकालात गर्भवतीने काहीही न करता देवाचे नाव घेत बसायचं हे पण मला कधीच न कळलेलं कोडं आहे.... त्या भौगोलिक घटनेचा या जीवशास्त्रातील घटनेशी काय संबंध??

या बाबतीत नन्दिनी अधिक माहिती देउ शकेल. अर्थात स्वखुशीने असेल तर त्यात आक्शेपार्ह काही नाही. लादलेले नसावे.काही स्त्रिया स्वखुशीने सती देखील जात.

Pages