स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

विवाहीतंच असं नाही पण लहान मुलिंवरही जाचक प्रथा लादल्या जातात आणि त्या त्यांच्या मनावर इतक्या खोलवर बिंबवल्या ही जातात. ह्या प्रथा एकमेकिंकडे पास ऑन करणार्‍या ह्या स्त्रियाच असतात (बहुतेक करून) पण त्यात त्यांचा दोष तो काय? त्यांनी जे पाहिलं, भोगलं ते त्या पुढे सांगतात, शिवाय त्यातून त्यांना घातलेल्या भित्या खर्‍या होतील या भितीपोटी कुणी त्या मोडून पाहण्याचं ही धाडस कधी केलं नसेल. कारण निव्वळ अज्ञान..... Sad

शाळेत असताना माझे केस खूप लांब होते, शाळेत कंपल्सरी २ पेडाच्या (वर लटकवलेल्या) वेण्या घालाव्या लागायच्या..... माझं डोकं रिबिनी घट्ट बांधून जाम दुखायचं, घरी आल्यावर मी कधी एकदा केस मोकळे सोडून विंचरतेय असं व्हायचं. आत्या मला नेहमी ओरडायची की संध्याकाळी केस विंचरू नयेत... Sad खूप बोलणी खावी लागायची.

पुढे मोठं झाल्यावर हळू हळू समजायला लागलं की आरोग्याच्या दृष्टीने, कधीही केस विंचरणे, नखं कापणे, अंघोळ करणे, केशकर्तन करणे हे उत्तमच आहे, त्यात अशास्त्रीय असे काही नाही. पण मनावर इतकं बिंबवलंय की अजूनही कधी कधी मैत्रीण संध्याकाळी केस विंचरताना दिसली की नकळत तोंडून विरोधदर्शक वाक्यं निघून जातात. Sad

>>>> अजूनही काही घरांमधून नवर्‍याला 'अहो' च म्हटलं पाहिजे ची सक्ती होते स्त्री वर,<<<<
याबाबत एक पाठभेद वा अनुभवसिद्धभेद असाही आहे..... (झोडण्याकरता) विचारार्थ मान्डतोय

आमच्यात असले काही नियम मी पाळत नाही, लिम्बी अरे तुरे करुनच नावाने हाक मारते! तसे तिलाही माहित आहेत हे नियम, कदाचित "खानदानी" असल्याने माझ्यापेक्षा जास्त!
कालान्तराने आम्हाला मुले झाली, अन आईचे (अर्थात लिम्बीचे) ऐकुन ती देखिल मला अरेतुरेच करु लागली, नशिब नावाने न हाक मारता, ए बाबा, ए बाबू, ए बाबुली वगैरे काहीही जे सुचेल आवडेल ते!
परवाच थोरलीने तिच्या ऑफिसमधुन मला फोन लावलेला व ए बाबा करुन काय काय सान्गत होती ते तिच्या कलिगने अन बॉस (दोन्ही स्त्रीयाच) ऐकले, व तिला विचारु लागल्या, अग्गोबाई तू बाबान्ना अरेतुरे करते? थोरली म्हणाली हो.
आता करावे न करावे यावर मी भाष्य करणार नाही, पण पोरान्नी बापाला अरे बापा असे न म्हणता अहो बाबा असे म्हणावयास हवे असेल, तर घरातील शिल्लक व्यक्तिने त्या बाप्याला अहोजाहो करणे भाग आहे असे मला तरी वाटते!

पुढे मोठं झाल्यावर हळू हळू समजायला लागलं की आरोग्याच्या दृष्टीने, कधीही केस विंचरणे, नखं कापणे, अंघोळ करणे, केशकर्तन करणे हे उत्तमच आहे, त्यात अशास्त्रीय असे काही नाही.<<<<<<
अगदी बरोब्बर!
ओळखीच्या १ काकू कायम अंगावर जाण्याच्या शेवटच्या दिवशी न्हायला लावायच्या, आता यात जाचक असं काही नाहि, पण जर आदल्याच दिवशी केस धुतले असतिल, आणि हिवाळा असेल तर तो जाचही ठरू शकतो, अशा वेळेस उगा तोंड चालवण्यापेक्षा केसांवरून पाण्याचा हात फिरवुन बाहेर पडायचे, समोरचाही खुश, आणि मीही Wink

दक्षे, हे तर आमची लिम्बी देखिल ठणाणा ओरडत पोरीन्ना सान्गत अस्ते Proud
पोरीन्नाच काय? मलाही शनिवार्-सोमवार व सन्द्याकाळनन्तर दाढी करु देत नाही/केस कापु देत नाही, नखे कापु देत नाही! भलतीच बुवा ही जाचक बाई! Lol

मंजिरी, पूर्वी वीज नव्हती तेव्हा अंधारात/ कमी प्रकाशात केस विंचरणं (गुंता/ केस खाली पडतात म्हणून), केर काढणं (केरात एखादी महत्त्वाची वस्तू जाऊ शकते), नखे कापणे (पुन्हा नीट न दिसल्यामुळे जिव्हारी लागणे/ नखे इकडे तिकडे पडणे) वगैरे गोष्टी ठीक होत्या. पण आत्ता लखलखीत उजेडात काहीच प्रॉब्लेम नाही. त्यासाठी जर काही ''वैज्ञानिक'' कारणे असतील तर मी तरी ती आतापर्यंत ऐकली नाहीत. अज्ञान, गैरसमजुती, अंधश्रध्दा, भीती.... काहीही म्हणा....

मलाही अनेक मुली केस मोकळे सोडून इकडे तिकडे, किचन मध्ये फिरतात ते आवडत नाही....कारण केस अन्नात, किचनमध्ये पडू शकतात....शिवाय केस मोकळे असले तर सारखा केसात हात जातो ते सावरायला, मग अनेकदा तोच हात न धुता अन्नाला..... आता इथे माझ्यापुढे दोन पर्याय असतातः एक म्हणजे त्यांना प्रथा, परंपरा [ बायकांनी केस मोकळे सोडू नयेत, चांगलं नसतं...इ. इ. ] सुनावणे किंवा त्यांना सरळ सरळ 'केस गळतात, अन्नात जातात, जे अनारोग्यकारक आहे' हे सांगणे. माझ्यामते अनेक बायका आधीचा पर्याय 'सेफ' / न दुखावणारा म्हणून स्वीकारताना दिसतात.

लिंबु तुझं बरोबर आहे. आई जर का वडिलांना नावाने किंवा अरेतुरे करून हाका मारत असेल तर मुल सुद्धा तसंच शिकतं. पण आमच्या घरी तशी परिस्थिती नसून ही मी माझ्या वडलांना अरे तुरे करते, माझी बहिण करत नाही... असो.....
बाकी घरात स्त्रियांवर पतीला 'अहो' च म्हणलं पाहीजे ह्या सक्तीमागे नक्की भावना जर आदराची असेल तर, तो आधी त्या स्त्रिच्या मनात आहे की नाही ते तपासून पहायला हवे, मनात काडीमात्रं आदर नसेल आणि तोंडावर मारे अहोजहो च्या पुजा बांधल्या तर त्यातून आदराचा आनंद काय मेला लूटता येणार? Uhoh
हा बीबी वाचताना मला वारंवार दोन ओळी आठवतायंत
काय भुललासी वरलिया रंगा
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा...

योगिता, लग्नाआधी अगदी पंकू, पंक्या, पंक्स (पंकज नाव असेल तर) वगैरे म्हणणार्‍या मुली प्रेमविवाह असेल तरी लग्नानंतर अहो म्हणताना आढळतात. आता याला काय म्हणावं?>>>>>> नाही पण मी त्याला कधीच अहो म्हणले नाही.. आणि नावाचीही कधीच वाट लावली नाही... सरळ पुर्ण नावानेच हाक मारते..

>>>> बाकी घरात स्त्रियांवर पतीला 'अहो' च म्हणलं पाहीजे ह्या सक्तीमागे नक्की भावना जर आदराची असेल तर, तो आधी त्या स्त्रिच्या मनात आहे की नाही ते तपासून पहायला हवे, मनात काडीमात्रं आदर नसेल <<< अगदी अगदी दक्षे,
पण सर्वच ठिकाणी, विशिष्ट आदरभावना एस्टॅब्लिश करायला हे नियम असतात
यातुन सुप्रिमकोर्ट हायकोर्टही अपवाद नाही, तिथे जज्जना सम्बोधायचे कसे इथपासुन ते गळ्यात कोणते फडके कुणी का बान्धायचे इथवर नियम अस्तात, भले आदरभावना असेल वा नसेल. विशिष्ट भुमिकान्ना मिळालेला तो एक पदसिद्ध अधिकार आहे, व या दृष्टीने एक बाप आपल्या अपत्याला जितक्या कठोरपणे शिक्षा करु शकेल तितके एक आई करु शकत नसते, व शिक्षा होण्याची वेळच येऊ नये म्हणून भितीयुक्त आदर बापाबद्दल पोरान्च्या मनात ठसवावयाला ही सम्बोधने उपयोगी पडतात.
दरवेळेसच वा वाढत्या वयाच्या मुलान्करता काय पचास पचास कोस दूरवरच्या आईला गब्बरसिन्ग वा बागुलबोवा मदतीला येणार नस्तो! Proud तिथे तुमच्या घरातील तुमची भाषा/उल्लेख्-अनुल्लेख इत्यादीच कामी येते हे निश्चित!
[झोडपण्यास सुपुर्द Lol ]

>>>> प्राकृतमध्ये बाबाला 'बप्पो'च म्हणजे ''बाप''च म्हणायचे! <<< Lol
अरुन्धती, आपल्याला भविष्यकाळात पुढे पुढे जायचे आहे कि भूतकाळात मागे मागे? Happy

मला ''अहो'' हा शब्द विलक्षण creative वाटतो! Wink त्या एका शब्दाला मी अनेक बायकांना एवढ्या वेगवेगळ्या पध्दतीने, ठसक्यात, लाजत मुरकत, रागाने, हेल काढून वगैरे वगैरे ऐकलंय की काय सांगू!
घरातल्या बायका जनरली इतर कोणासमोर ''अहो'' करताना दिसतात आणि बाकीच्या वेळेस अरे-तुरे!
मजा म्हणजे अनेक पुरुषही आपल्या बायकोला अपत्यप्राप्तीनंतर थेट नावाने हाक न मारता 'अमुक तमुक ची आई' किंवा 'अगं' आणि इतरांकडे आमची 'ही', 'मंडळी', 'बायको' असा थेट नाव न घेता उल्लेख करताना दिसतात. मजा आहे.

पण मी खूप जुन्या सिनेमात पुरूष आपल्या बायकांना "अहो कुळकर्णी आलेत थोडा चहा टाका.... असं म्हणताना ऐकलंय.... Uhoh

अगदी अगदी अरुन्धति, अन तस पहाता, नवराबायको, वेगवेगळ्यावेळेस एकमेकान्ना काय सम्बोधतात हा खर तर सम्पुर्णपणे त्यान्च्या खाजगी जीवनाचा भाग आहे, गुह्य आहे! Happy
मी तरी लिम्बीला नावानेच हाक मारतो,
अगदीच चिडलो अस्ता, समस्त पुरुषजात जसे दोन हात दाण्णकन कपाळासमोर जोडून "अगो माझे आऽऽऽईऽऽ" असे म्हणते तसेच मी देखिल म्हणतो Proud
कधी कधी मायबोलीच्याच मुड मधे असलो तर लिम्बी म्हणूनही हाक मारतो Lol
विशेष काही सान्गायचे असेल, अन माझ्या परवानगीबिरवानगीची जरुरी असेल, तर लिम्बी इतर सर्वसाधारण स्त्रीयान्प्रमाणेच मला अहो जोडून आडनावाने हाक मारते!
कदाचित "अहो आर्यपुत्र" या ऐतिहासिक सम्बोधनाचा हा आधुनिक अवतार असेल! Happy
बर, ही चान्गली चर्चा झाली
पण "अहो" म्हणण्यात जाचक नेमक काय ते कळलच नाहीये मला अजुन Wink

>>>> पण मी खूप जुन्या सिनेमात पुरूष आपल्या बायकांना "अहो कुळकर्णी आलेत थोडा चहा टाका.... असं म्हणताना ऐकलंय....
दक्षे दक्षे, अग नटसम्राट मध्ये गणपतराव बेलवलकर आपल्या पत्नीला "सरकार" म्हणून सम्बोधताना दाखवलेत! आहेस कुठ! Happy

कालचक्र दोन्ही बाजुनी फिरतो. एके काळी स्त्रियाच कुटुंब प्रमुख असायच्या.
ते दिवस नक्कीच परत येतील. किंबहुना सुरुवात झालीच कि.
------------------------------------------------------------------------

बाकी

Sad

जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो
मैत्र जीवाचे

जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणीजात

अमित भावोजी आले, पाट पाणी घ्या मुलींनो. जेवण वाढा गरमागरम. मग सुपारी द्या. बरोबर लिंबूभावजींना वाढा. मग त्यांचे झाले की काही उरलेच तर जेवा. नाहीतर ब्रेड बटर. ......:) दिवे बरे का.

हे शेवटी जेवायची पीडा आमच्या सासरी पण आहे. संतापजनक गोष्ट म्हण्जे चुलत सासुबाई चुलत सासर्‍यांच्याच ताटात जेवत. प्रेम म्हणे. मला अगदी इयू फीलिन्ग येत असे. काहीही प्रथा अन आख्यायिका.
त्यात रात्री अडीच परेन्त ते दारू वगेइरे पीणार मित्रांबरोबर. मग कधी जेवायला बसतील तेव्हा गरम पोळ्या तव्यावरून करून वाढायच्या फिश फ्राय करायचे मट्न रस्सा परत गरम करायचा. मला अतोनात बोअर होत असे व झोप येत असे.

सत्ता आणि मालकी हक्कावरुन वाद उत्पन्न होतातच आणि सासु - सुनेमधे निर्माण होणारे वादांचे मुळ कारण हे ' या घरात माझेच चालणार ' याच वरुन होतात.
सासु - सुन , नणंद -भावजय याच्यात जेव्हढे वाद तसेच किंवा जास्त वाद मालकी हक्कवरुन सख्या / चुलत भावांमधे बघायला मिळतात. कित्येकदा जमिनीच्या वादा वरुन तर कोर्ट केसेस किंवा मारमार्‍या खुना पर्यंत गोष्टी जातात. ही अशी भाउबंदकी पिढ्यानेपिढ्या चलवली जाते. आणि जुन्या लोकांमधेच सध्याच्या पीढीपेक्षा जास्त दिसुन येते. वडिल आणि मुलग्यामधे ही वाद असतातच.
तर मला खटकणारी गोष्ट म्हण्जे बायकांएव्हढेच किंवा जास्तच पुरुषांच्या नात्यात वाद असुन्ही फक्त बायकांचे नावच तेव्हढे बदनाम केले जाते. स्वार्थ साधणे हा मनुष्यस्वभाव आहे परंतु एकंदरीत बायकांचाच स्वार्थी स्वभाव highlight केला जातो. म्हण्जे बहिणीनी संपत्तीमधे हिस्सा मागितला तर ती स्वार्थी , पण दोन सख्खे भाउ जर संपत्तीच्या वादवरुन एकमेकांच्या जीवावर उठले असतील तरीही लोकांना त्यात फारसे वावगे काही वाटत नाही.
माझ्या माहितीमधे तरी वडील गेल्यावर जर वडीलांची खुप स्थावर - जंगम मालमत्ता असेल तर सलोख्याने ती वाटुन घेणारे सख्खे भाउ मी बघितले नाहीयेत. थोड्याफार कुरबुरीपासुन ते कोर्ट कचेर्‍यांपर्यंत गोष्टी जाउ शकतात. अर्थात हा जर माझाच वैयक्तिक अनुभव असेल आणि मी जेनरलाईज करते आहे आसे वाटत असेल तर सोडुन द्या.

पुर्ण ३०० पोस्ट्स मधे ९९.९% बायकांचे मत आहे की सगळ्या जुन्या प्रथा जाचक आहेत आणि त्या प्रथा त्या पाळत नाहीत. मग झालीच आहे की सुधारणा. बीबी बंद करा Proud

नाही रचना,

८७.५% स्त्रियांच मत हे रुढी जाचक आहेत हे आहे
१०.४१% स्त्रियांनी न्युट्रल मतं मांडली आहेत (त्यांनी मुळ मुद्द्यावर मत न मांडता कुणाच्यातरी मुद्द्यावर काहीतरी मत मांडलं आहे)
२.०९% विरोधी मत असलेल्या स्त्रिया.. (खरतर एकच, पण % काढलं तर येवढं येतं Wink )

आणि पुरुषांची मतं कदाचित ४०% बाजून, ६०% विरोधी असतील.
त्यातल्या लिंबूटिंबू ह्यांच मत दोन्ही कडेही (इन फॅक्ट मल्टी डायमेंशनल) असल्यानं (आधी बाजूनं नंतर विरोधी, मधे मधे वेगळ्याच विषयावर) मला युनिव्हर्सल डायग्राम काढून युनियन, इन्टरसेक्शन असलं काहीतरी दाखवायला लागेल.. म्हणून त्या फंदात नाही पडत Wink

तात्पर्यः मला इतर काही कामं नाहियेत! वेळ घालवायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद Proud

नानबा Biggrin

नानबा Lol

Lol

Pages