स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

<<आम्हि नै बै कस्ल्या जुन्या प्रथा/रुढी पाळत, अम्केच कप्डे घालतो, पुरुषान्ची हुकुमशाही नै ऐकत, नै त्याच्याकर्ता कुन्कु लावत की मन्गळसूत्र घाल्त इत्यादी इत्यादी अनेक प्रकार देखिल, चारचौन्घासारखे न वागता त्यावेगळे विचित्र वागून " बहुसन्ख्य स्त्रीपुरुषान्चे" लक्ष वेधून घेण्याचाच एक प्रकार आहे असे म्हणले तर ते देखिल बरोबरच म्हणायला हवे, नाही >>

अशा वैवाहिक चिन्हे न घालणार्‍या बायाका बहुतेक करुन पुण्या मुम्बई सारख्या मोठ्या शहरातुन किंवा परदेशीच रहातात. तिथे बहुतेक कोणीही त्यांच्या बाह्य रुपाकडे फारसे निरखुन पहात नाही. त्यामुळे त्या काही" बहुसन्ख्य स्त्रीपुरुषान्चे" लक्ष वेधून घेउ शकत नाहीत हो Sad
मला तर वाटते आजच्या बायकांपेक्षा पुर्वीच्या बायकांमधेच जास्त धारीष्ट्य होते हो. आजच्या बायका सध्याच्या काळानुसार जगावेगळे फार काही करत नाहीत.
शकुंतला बाई परांजपे त्या काळी 'कुटुम्ब नियोजनाचा ' प्रसार करायच्या आणि त्यांची वागणुक ही तेव्हाच्या चारचौघींसारखी नव्हती. त्यांच्या बद्दल काय म्हणाल तुम्ही ?

लिंब्या तुझ्या मावशीला यातला काहीही प्रॉब्लेम नसतानाही आपलं अस्तित्व जाणवून द्यायची गरज पडतीये असले बोगस प्रकार करून तर मग मानसोपचाराची गरज अजूनच जास्त आहे.
आता वैयक्तिक टिका म्हणून बोंबलू नकोस. उदाहरण तू दिलेस तेव्हा त्यावर प्रतिक्रिया येणारच.
आणि मी लिहिलेलं जे काय आहे ते कुठल्याही मानसोपचार तज्ञाशी बोलून खात्री करून घे. तसंच मी जनरली असं म्हणलंय याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न कर.
आणि अंगात येणं बिणं प्रकारच्या अंधश्रद्धा इथे खपवू नकोस.

मुद्दामून फाटे फोडून लक्ष वेधून घेण्याचा तुझा पण प्रकार चालूच आहे की एवढा वेळ.

>> ह्यातल्या बर्‍याचशा पोस्टी पुढील सदरात मोडणार्‍या आहेतः

"Washing your dirty linen in public">> मला तर वाट्ले मनाचा निर्मळ तळ गाठ्ला आहे. तुझ्याकडे लिहिण्यासारखे नाही का काही? का कधी विचारच केला नाही.

अश्विनीमामी, मी लिहिणारच नव्ह्तो, पण राहवले नाही
(लिहिण्यासारखे बरेच आहे, पण इथ्ल्या भलत्या सलत्या प्रतिक्रिया पाहून हिंमतच नाही झाली)

आपल्या काही गोष्टी जनात सांगू नयेत अस म्हणतात,
तशा गोष्टी हिरिरीने सांगितल्या गेल्या म्हणून तसे म्हणालो.

>> तुझी खण नारळाने ओटी.

चालेल. खण बायकोला देतो. नारळाचाही उपयोग आहेच Happy

असो. बाकी तुमच्या पोस्ट चांगल्या, वाचनीय असतात.

मृदुला,
अगदी करेक्ट बोललीस.
इथे मंगळसूत्र घातलंय न घातलंय बघायला वेळ कुणाला असतो. त्याने कोणाचं लक्ष वेधलं जातं... डोंबल.
आपल्या आपल्यासाठी जे पटत नाही ते करायचं नाही एवढंच.

पण इथ्ल्या भलत्या सलत्या प्रतिक्रिया पाहून हिंमतच नाही झाली)<<
Rofl
स्वतः बिनकामाच्या रिकाम्या प्रतिक्रिया देऊनही असं लिहायची हिंमत बरी होते.

नीरजे, ज्याला तू बोगस म्हणतेस ते आम्हि तसे मानत नस्लो तर? अन असे न मानणार्‍या असन्ख्य भारतीयान्ना देखिल सामुहिक मानसोपचाराची गरज असेल, नाही? Wink
असो, मन्दार, वरील मावशिच्या उदाहरणात, मावशी या स्त्रीने, अन्गात येणे वगैरे (नीरजाच्या व अन्य विदुषीन्च्या म्हणण्याप्रमाणे) बोगस प्रकार करुन माझ्या सासर्‍याचा, पक्षी एका पुरुषाचा "जाच" केला असे मानून, त्यापासून सुटकेकरता एखादा बीबी उघडावा काय आपण दोघान्नी मिळून? हव तर प्रयोगलाही सामिल करुन घेऊयात! Biggrin

>>> स्वतः बिनकामाच्या रिकाम्या प्रतिक्रिया देऊनही असं लिहायची हिंमत बरी होते.

नीधप, वैयत्तीक कमेंट करु नकोस प्लीज...

लिंबुदा LOL!

मंगळसूत्र नं घातल्याने, कुंकुबिंकु नं लावल्याने, जोडवी नं घातल्याने आणि कुठल्याही प्रकारच्या रुढी/ परंपरा नं पाळल्याने जर स्त्रीला असलेला जाच,निरजा म्हणते त्याप्रमाणे इतक्या लो लेवल वर स्त्री च्या मानसिकतेचे होणारे खच्चीकरण कमी होत असेल तर मग सगळ्यांनीच या प्रथांना झुगारुन द्यायला हवे.

सगळ्या प्रथा रुढी पाळुन..वडीलधार्यांसमोर आपली डिग्नीटी मेंटेन करुन आपले मतं वेगळेपणाने मांडणार्या आणि घरातल्या इतर लोकांना पटवुन देणार्या मुली आहेत अजुन...

त्यांना तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्याच्या बांडगुळाची कधीच गरज भासत नसावी..

आपल्या काही गोष्टी जनात सांगू नयेत अस म्हणतात,
तशा गोष्टी हिरिरीने सांगितल्या गेल्या म्हणून तसे म्हणालो.
>>हेच तर चुक आहे ना, का नाही साम्गायच्या, मला जर वाटत असेल तर अमुक तमुक गोष्ट चुक आहे तर बोललेच पाहिजेना उघडपणे, जनाच्या भीतीपायी का तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करायचा?त्यनिमिताने काही प्रबोधन झाले तर चांगलेच आहे की.confused असाल काय चुक नी काय बरोबर हे ठरविण्यात तर नुसते वाचा की पण जनात बोलुच नये हे मात्र पटत नाही.कित्येक वेळा अशा चर्चामुळे माझे स्वतःचे मतपरिवर्तन झाले आहे.

>>>>> त्यांना तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्याच्या बांडगुळाची कधीच गरज भासत नसावी.. <<<<<
तुला १०० गावे बक्षीस Happy

(जपुन ग बै, नैतर तुझ्या आयडीमागुन कोणी पुरुषच बोलत नै ना अशि शन्का घेतिल हो Rofl
जम्लच तर तुझ्या आयडीला मानसोपचाराचा भाग म्हणून वीजेचे शॉकहि देतील Lol )

>> असो, मन्दार, वरील मावशिच्या उदाहरणात, मावशी या स्त्रीने, अन्गात येणे वगैरे बोगस प्रकार करुन माझ्या सासर्‍याचा, पक्षी एका पुरुषाचा जाच केला असे मानून, त्यापासून सुटकेकरता एखादा बीबी उघडावा काय आपण दोघान्नी मिळून? हव तर प्रयोगलाही सामिल करुन घेऊयात!

गप्प बस.
मी आणी तू इथे बोलतो ही आपली घोड्चूक आहे.
काही सरळ बोलायला गेलो तर वैयत्तीक कमेंट होतात.
आपण बिनकामाचे, आपण रिकामटेकडे, म्हणून इथे मत व्यक्त करतो.
ह्यापुढे अशा बी.बींवर लिहिणारच नाही मी.

Happy

अन असे न मानणार्‍या असन्ख्य भारतीयान्ना देखिल सामुहिक मानसोपचाराची गरज असेल, नाही? >>
हो एका senior doctorशी बोलताना मला कळले की भारतात मानसिक आजार सर्व आजारांमधे क्रमांक २वर आहेत. पन दुर्देवाने मानोसपचार घेणे हा social tabu असतो.त्यामुळे प्रत्यक्ष treatment घेनारे खुप कमी लोक असतात, पुर्वी रोग जसे अंगावर काढले जात तसे ह्या रोगांचेही होते.
तुमची प्रतिक्रिया उपहासात्मक असली तरी मी मुद्दाम serious उत्तर देत आहे कारन तुमच्या निमित्तने जे लोक खरेच ही चर्चा गम्भीरपने वाचत आहेत त्याना तरी कळेल.

>>>>> त्यांना तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्याच्या बांडगुळाची कधीच गरज भासत नसावी.. <<<<<
तुला १०० गावे

मुग्धा, माझ्याकडून ५० गावं
मी लिंबु पेक्षा लहान म्हणून फक्त ५० Wink

नीरजे, ज्याला तू बोगस म्हणतेस ते आम्हि तसे मानत नस्लो तर? अन असे न मानणार्‍या असन्ख्य भारतीयान्ना देखिल सामुहिक मानसोपचाराची गरज असेल, नाही? <<
हो. अंगात येण्यासारख्या गोष्टी करणार्‍या बाईला आणि त्यामागे वहावत जाणार्‍या सगळ्यांनाच आहे. अर्थात ही अंधश्रद्धा आहे हे माहीत असूनही कोणी इतर फायद्यासाठी हे करत असेल तर त्याला मानसोपचार तज्ञ नाही कायद्याच्या बडग्याची गरज आहे.

>>> स्वतः बिनकामाच्या रिकाम्या प्रतिक्रिया देऊनही असं लिहायची हिंमत बरी होते.

नीधप, वैयत्तीक कमेंट करु नकोस प्लीज...<<
वैयक्तिक काहीही लिहिलेलं नाहीये. तू इतरांच्या प्रतिक्रियांना भलतं सलतं म्हणालास. तुझ्या प्रतिक्रियेला मी रिकाम्या आणि बिनकामाच्या म्हणाले. खरंतर मी वस्तुस्थितीच मांडली की.

हिस्टेरिया, शिझोफ्रेनिआ, अटेन्शन सीकिन्ग डिसॉर्डर...... असे अजुन ढीगभर प्रकार आहेत.. तो भूलभुलैय्यावाला.. वगैरे...

सगळ्यांनाच शॉक देऊ नका, आधीच लोड शेडींग भरपूर आहे.... सगळी वीज शॉक देऊनच संपली तर अवघड होईल.. Happy

>>>मंगळसूत्र नं घातल्याने, कुंकुबिंकु नं लावल्याने, जोडवी नं घातल्याने आणि कुठल्याही प्रकारच्या रुढी/ परंपरा नं पाळल्याने जर स्त्रीला असलेला जाच,निरजा म्हणते त्याप्रमाणे इतक्या लो लेवल वर स्त्री च्या मानसिकतेचे होणारे खच्चीकरण कमी होत असेल तर मग सगळ्यांनीच या प्रथांना झुगारुन द्यायला हवे.<<
मी जे आणि ज्या पद्धतीने म्हणलेय त्याच पद्धतीने ते मांड. उगाच नको ते अर्थ लावू नकोस.

>>सगळ्या प्रथा रुढी पाळुन..वडीलधार्यांसमोर आपली डिग्नीटी मेंटेन करुन आपले मतं वेगळेपणाने मांडणार्या आणि घरातल्या इतर लोकांना पटवुन देणार्या मुली आहेत अजुन.<<
म्हणजे कश्या? पाळीच्या दिवसात लोणच्याला हात न लावणार्‍या?

>>त्यांना तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्याच्या बांडगुळाची कधीच गरज भासत नसावी..<<
कुणाची तरी बायको, कुणाची तरी सून, घराणं एवढीच लेबलं ज्या बायांना महत्वाची असतात. आपलं एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून अस्तित्व समजण्याच्या पलिकडे ज्यांचं माइंड कंडिशनिंग केलेलं असतं त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य हे बांडगुळच वाटणार. पण अश्या बायांच्यापायी मी माझं जे जगते ते मी का सोडू?

>>>> सगळ्या प्रथा रुढी पाळुन..वडीलधार्यांसमोर आपली डिग्नीटी मेंटेन करुन आपले मतं वेगळेपणाने मांडणार्या आणि घरातल्या इतर लोकांना पटवुन देणार्या मुली आहेत अजुन...<<<
मुग्धा, तुझ्या या वाक्याचा अधिक विचार करता मला एक प्रकर्षाने जाणवले, की वरील सर्व चर्चा, "स्त्रीचे व्यक्तिस्वातन्त्र्य" याच बिन्दूभोवती, पुन्हा व्यक्तिसापेक्ष रितीने घोटाळते आहे! अमका नियम मोडला, तम्का पाळला नाही, अमक्याला मानसरोगी ठरवले इत्यक्यावरच हे वर्तुळ पूर्ण होतय, मात्र प्रॅक्टिकली, मी जे बाहेर बघतो आहे, तिथे स्त्री करता सबली करणाची गरज फार म्हणजे फारच वेगळ्या पातळीवरची आहे!
एक छोट उदाहरण देतो, माझ्या माहितीतील जैन मुलगी, लग्न झाले, एक मुलगा/मुलगी, नवरा दारुडा भयन्कर अहंमन्य, लग्नानन्तर वीस वर्षान्नी डायव्होर्स होतोय आत्ता...... यात विशेष ते काय? विशेष पुढेच आहे, आईवडीलान्नि वरील मजल्यावर रहायची सोय करुन दिली, अर्थात तिचा वाटा आहेच, बाकि दोन मुले (भाऊ) व त्यान्च्या बायकान्ना हे पटत नाही, समाजात डायव्होर्सला पुरेशी मान्यता नाही व डायव्होर्स न घेऊन एकत्र रहाण्याबद्दल दबाव, भावानी नानाप्रकारे शाब्दिक दुषणे देऊन, शेवटी ती मुलगी आता वसतीगृहात रहायला गेली मुलीसोबत, मुलाला दुसरीकडे वसतीगृहातच ठेवले आहे, कोर्टात तारखा पडताहेत, वाट बघत्ये डायव्होर्सची, नोकरी चालूच आहे, नवरा नाहीनाहीते घाणेरडे आरोप करतोय वगैरे वगैरे.........!
या सर्व प्रश्नात, कुन्कु लावणे/बानगड्या घातल्या न घातल्या/जोडवी घातली न घातली/अन्गात येऊदिल न दिल Proud यातच मर्दुमकी मानुन त्यासच जाच समजणार्‍यान्कडून, बीबी च्या निर्मातीस "जाचाच्या" खरोखरीच्या बाह्य परिस्थितीबाबत काही ठोस माहिती मिळणे व त्यावरील चर्चा शक्य होणार आहे का?
तुझे वाक्य बघितले, अन मला हे सर्व सुचले, कारण ती मुलगी आमच्या समोर लहानाचि मोठी झालेली, अन्य कोणत्याही बान्डगुळान्चा वापर न करता अती झाले तेव्हा ते त्यागुन, स्वाभिमानाने ताठ उभी आहे!
कुन्कु लावणे न लावणे वा तत्सम बाबिन्मधेच "स्वातत्न्र्य" शोधणार्‍यान्कडुन वेगळी कस्ली अपेक्षा करता येईल?
की स्त्रीच्या जाचाचा विषय केवळ हिन्दू धर्मप्रथान्पुरता कुन्कु/मन्गळसुत्रात न घालण्याच्या भ्रामक स्वातन्त्र्य कल्पनात गुम्फवून मूळ वास्तव प्रश्नान्च्या उत्तरान्चा कात्रज तर केला जात नाहीये ना स्त्रीयान्कडूनच?

गो नीधप. तुला गावे नाहीत. राष्ट्रे!

व्यक्तिस्वातंत्र्याचे कधी बांड्गूळ असू शकते? मग वरील सारी विचार प्रक्रीयाच वाया जाइल की. व्यक्ती स्वतंत्रच जन्मलेली असते. बाकी नात्यांची बांड्गुळे होतात. कधी सिंबायोटिक तर कधी पॅरासायटिक तर कधी मूळ व्यक्तीलाच नष्ट करणारी.

लिंबू वडाची साल पिंपळाला असे तर नाही ना झाले तुझे?

>>>> व्यक्ती स्वतंत्रच जन्मलेली असते. बाकी नात्यांची बांड्गुळे होतात.<<<
मामी, व्यक्ती जन्मायला आईबाप कारण अस्तात हे तरी मान्य आहे ना?
व्यक्तीस स्वतःच्या पायावर उभे राहिस्तोवर आयशीबापान्नीच खस्ता खाल्लेल्या अस्तात हे ही मान्य असेल्च ना?
अन त्या आयशीबापसान्ना, पोरान्ना जन्माला घालुन वाढविण्याइतपत सबल बनविणारा समाजच अस्तो हे मान्य करावयास हरकत नसावी!
यात नात्यान्ची बान्डगुळे कुठे नजरेस पडतात?
हां, कृतघ्न पणे यातील काहीच मान्य करायचे नसेल, तर आयशीबापसान्ना देखिल "तुम्ही झक मारलीत म्हणून आम्ही जन्माला आलो" अस्से व्यक्तिस्वातत्न्र्याच्या तारेत सुनावणारी असन्क्य आधुनिक प्रजा मी माझ्या नजरेने पाहिली आहे/ऐकली आहेच! हाच का व्यक्तिस्वातत्न्र्याच्या आदर्श मानायचाय? तस असेल तर आईबाप हे नात देखिल बान्डगुळच! नाही का?

<< या सर्व प्रश्नात, कुन्कु लावणे/बानगड्या घातल्या न घातल्या/जोडवी घातली न घातली/अन्गात येऊदिल न दिल यातच मर्दुमकी मानुन त्यासच जाच समजणार्‍यान्कडून, बीबी च्या निर्मातीस खरोखरीच्या बाह्य परिस्थितीबाबत काही ठोस माहिती व त्यावरील चर्चा शक्य होणार आहे का?
>>
लिम्बु दादा या सर्व परिस्थितीची ठोस माहिती आहे म्हणुनच आज त्या मुलीच्या जागी मी आणि माझ्या सारख्या इथल्या इतर मैत्रीणी नाहियेत ना !! ते कसे ते जरा स्पष्ट करते. नोकरी लागुन आर्थिकरीत्या स्वतंत्र झाल्याशिवाय लग्न करणार नाही ' -- तसेच मनाप्रमाणे मुलगा मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही , तसे न झाल्यास लग्न झाले नाही तरी चालेल. असे पक्के विचार वयाच्या २० व्या वर्शीच होते. त्यामुळे लोकांच्या दृष्टिने खुप उशीरा म्ह्ण्जे २८ चालु असताना माझे लग्न झाले. आणि मला त्यचे अजीबात वैषम्य वाटत नाही.
तुम्ही सांगता आहात तशा संकटात मुलिनी स्वताहुन उडी मारु नये , पण त्यासाठी एक वेगळाच बीबी उघडावा लागेल.

या सर्व प्रश्नात, कुन्कु लावणे/बानगड्या घातल्या न घातल्या/जोडवी घातली न घातली/अन्गात येऊदिल न दिल यातच मर्दुमकी मानुन त्यासच जाच समजणार्‍यान्कडून, बीबी च्या निर्मातीस खरोखरीच्या बाह्य परिस्थितीबाबत काही ठोस माहिती व त्यावरील चर्चा शक्य होणार आहे का?
>> मुळात ह्या साध्या जसे की मानविरुध्द कुंकु लावणे अशा अन्यायग्रस्त गोष्टीचा विरोध करायला त्या मुलीला तिच्या आईवडेलांनी लहानपणापासुन शिकवले असते तर २० वर्शे सहन करायची वेळ तीच्यावर आललीच नसती . "अबक१" अन्यायची तीव्रता कमी म्हणुन तो सहन करायचा आणि आणि तो सहन करत करत "अबक२" सहन करायची सहनशक्ती तयार होते, मग २० वर्षानी ती संपली (जोपर्यंत निम्मे आयुष्य संपलेले असते)की मग अन्ययच्या विरोधात उभे रहायचे , आणिअ तीच मोठी मर्दमुकी ,वा छान.

त्या मुलीच्या आयुष्याची वाट तिने स्वतः आणि तिच्या आइ वडिलांनी आधिच लावली आहे. आता २० वर्शांनी आम्हि चर्चा करुन काय फायदा ? पण यापुढे कोणी स्वतःच्या आयुष्याची वाट लावु नये यासाठीच तर अशा चर्चा जरुरी आहेत. प्रत्येक व्यक्तिला स्वतःच्या मनाप्रमाणे आणि स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क आहे हेच तर अशा सर्व मुलींनी लक्षात घेण्याची गरज आहे.
प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते आपण फक्त मानसिक बळ देउ शकतो.

कुन्कु लावणे न लावणे वा तत्सम बाबिन्मधेच "स्वातत्न्र्य" शोधणार्‍यान्कडुन >>>>>>

याच्यात केवळ या बाबींमधे'च' हा शोध तुम्ही कुठून लावलात लिंबूटिंबू?? इथे बीबी काढताना कुन्कु व मंसु इत्यादी बाबी आल्यामुळे हे विषय इथे येतात.
केवळ कुंकू मंगळसुत्र वापरणे / न वापरणे एव्हढंच तुम्हाला दिसत असेल व त्यात प्रत्येक स्त्रीचे म्हणणे हे "हा प्रत्येक स्त्रीच्या इच्छेचाच केवळ मामला आहे, कारण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे , तिला विचार आहेत" असे म्हणणे आहे, हे जर दिसत नसेल तर व्हेरी गुड!! बोलणंच खुंटलं!!

Pages