स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

डिजे आणि मै कुठेत?>>>. अमेरिकेत... आपल्या रात्री उगवतील आणि ह्या बीबीचा नक्कीच फडशा पाडतील..

आयला, यान्ना उद्या, रस्त्यावरुन डाव्याबाजुनेच जायचे, लाल सिग्नलला थाम्बायचे वगैरे नियमान्चा देखिल जाच होत असेल Proud
तसाही बर्‍याच सुशिक्षीत आधुनिक पुणेकर/पुणेकरणीन्ना हेल्मेट घालुन गाडी चालविण्याच्या कायद्याचा जाच होतोच, अन तो नियम रस्त्यारस्त्यातून सर्रास मोडला जातोच!
हे बोम्बलायला घरातल्या घरात दिवाणखान्यातल्या नियमान्च काय विशेष सान्गता? ऐशी की तैशी त्यान्ची! Biggrin

welcome.gif

लिंब्या,
नाही ते उपकथानक सुरू करू नकोस. ते नियम आहेत आणि त्यात लॉजिक आहे आणि ते तमाम जिवित मनुष्यप्राण्यांना बंधनकारक आहेत.

मंगळसूत्रातलं तेही केवळ बाईनेच आणि नवरा जिवंत असतानाच घालायचं लॉजिक काय ते सांग आणि असं चिन्ह पुरूषांना का बंधनकारक नाही ते सांग.

आज काय तू आणि मुग्धानी ठरवून इथे विनोदाच्या फोडण्या द्यायचं ठरवलंय काय?

जुलाब होणाराच काय, साधा परसाकडे जाऊन आला तरी हातपाय धुतल्याशिवाय बाकी कुठे प्रवेश निषिद्ध असे मानण्याचे आम्ही तरी शिकलो, अन पाय कसे धुवायचे, तर टाचा-खोटेसहित!>>>>>>>लिंबुटिंबु,परसाकडे जाऊन आल्यावर तुम्हाला लोणचं,(;)),देव,ईत्यादिंना स्पर्श तर करु शकत असाल ना,? घरात पुजा,गणपती असेल तर तुम्हाला बंदी तर नसते ना?

लिंबू, सिग्नल, घरातले दिवाणखान्यातले नियम, गाडी चालवतानाचे नियम इ. विषय काढून फाटे फोडू नकोस. त्याबद्दल बोलायचं असल्यास वेगळा बीबी उघड.

हात पाय धुवून पुसून कुठेही हात लावणे, स्वच्छ अंगाने देवाकडे जाणे ह्यात हायजिनचा विचार आहे.
पण पाळीतल्या बाईने लोणच्याला हात न लावण्यामधे आणि तत्सम गोष्टींच्यात काहीही लॉजिक नाही.

>>>>लग्नात वरपक्ष, वधुपक्षाकडून पाय धुऊन घेतो त्या प्रथेची मनोमन चिड आहे मला>>>>>
खरच.
माझ्या लग्नात हा विधी झाला तेव्हा मला इतक ऑकवर्ड वाटलेल.......(>>>>>>

झकासराव, हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर बाकी उपवर मुलांकरताही--आपली काही मतं असतील जी आधीच्या चालीरितींपेक्षा वेगळी असतील तर व्यक्त करायला काहीच हरकत नाही. तुम्ही सांगितलं होतंत का ह्याबद्दल?

लोणच्या च्या बरणीला जर विटाळशी बाई ने हात लावला तर ते नक्की खराब होते हा माझा अनुभव आहे..<<<<<<

भयंकरच विनोदी वाक्य........ Biggrin Rofl कुठच्या कुठच्या स्मायली ताकु असं झालय मला.

विधवा बायकांनाही आजकाल बर्याच प्रमाणात लोक रिस्पेक्ट देतात..असं नसतं तर सोनिया गांधी सारखी स्त्री भारताच्या राजकारणात एवढा महत्वाचा रोल निभावुच शकली नसती..>>>>>>>>

भन्नाट विनोदी बीबी झालाय हा आता. Biggrin

अहो ती गांधी [नेहरु घराण्याशी निगडित आहे म्हणुन हो हा रिस्पेक्ट. ] नाहीतर मागच्या शतकातल्या इंदिरा गांधीना कसं काय पंतप्रधान होता आलं असत? त्यांच घराण हेच त्यांच क्वालिफिकेशन आणि म्हणुन पर्यायानी मिळणारा रिस्पेक्ट आहे तो. त्यात विधवा सधवा आणखी कशाही असत्या ना त्या तरी त्याम्ना तो मान मिळालाच असता :हताश बाहुली:

मलाही हे वाक्य मुळीच पटलं नाहीये. पण त्यावर हसत बसण्यापेक्षा आणि जिनं कुणी लिहीलय तिला उगीच लिहीलं असं वाटायला लावण्यापेक्षा

"पण पाळीतल्या बाईने लोणच्याला हात न लावण्यामधे आणि तत्सम गोष्टींच्यात काहीही लॉजिक नाही.
पूर्वी घरातली एखादी बाई (अविटाळशी) लोणच्याच्या बरणीत ओलासर चमचा घालत असेल, त्याने लोणच्याला बुरशी आल्यावर विटाळशी बाईवर ढकलत असेल, हेच कारण असावं त्यामागचं."

अशा पोस्टस टाकुन तिला विचार करावासा वाटेल असं केलं तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतय. बाईनच दुसर्‍या बाईला समजावुन, सांभाळुन घ्यायला हवं.
पटलं तर बघा नाहीतर जावु द्या.

रूढीबाह्य विचारांना हसायची परंपरा आहे ना आपली. मग कधीतरी रूढीप्रिय लोकांनाही कळूदेत की आपल्या विचारांवर कुणी हसलं की काय होतं ते.

बाप रे!!
खरंच अजून रेलेव्हन्ट आहेत की या सगळ्या बाबी! Sad

व्यक्तिशः मी तथाकथित सौभाग्यचिन्हं वापरत नाही. 'विटाळा'ची कल्पना त्यातला आराम मिळण्याचा भाग नजरेआड होत असेल तर हास्यास्पद वाटते. देवधर्म एरवीही करत नाही - त्यामुळे त्या बाबतीत प्रश्नच नाही. तुळशीला, लोणच्याला इ. कोणत्याही दिवशी स्पर्श करायला घाबरत नाही. आणि लोणचे आणि तुळसही आजतागायत बधली नाहीयेत.

मला खरंच वाटलं होतं की हे विषय संपले! Sad

स्वाती म्हणून मी पार्ल्यात म्हणाले ना की आपल्याला रिलेव्हन्स जाणवत नसला तरी तो संपलेला नाही. Happy

आपण बोवा आमच्या पोरीन्च्या लग्नात वरपक्षाकडल्या झाडून सगळ्यान्चे हातपाय धुणारे

पूर्णपणे सहमत आहे..... यात काय वाईट आहे समजलेले नाही....

बायकानी नवर्‍याना त्यांच्या (म्हणजे बायकोच्या माहेरच्या) घरी नांदायला न्यायची प्रथा पाडावी.. मग वरपक्षाचे लोकही वधूचे/वधूपक्षाचे पाय धुतील की.. ! Happy ... हा केवळ एक आदर दाखवण्याचा प्रकार आहे, शिरजोरी करण्याचा नव्हे..

पूर्णपणे सहमत आहे..... यात काय वाईट आहे समजलेले नाही....

बायकानी नवर्‍याना त्यांच्या (म्हणजे बायकोच्या माहेरच्या) घरी नांदायला न्यायची प्रथा पाडावी.. मग वरपक्षाचे लोकही वधूचे/वधूपक्षाचे पाय धुतील की.. ! स्मित ... हा केवळ एक आदर दाखवण्याचा प्रकार आहे, शिरजोरी करण्याचा नव्हे.>>.>>>>>>>>>>>>>>>>>> _/\_

>>घरी नांदायला न्यायची प्रथा पाडावी..

ओके, म्हणजे ते घरी नांदायला नेणार, जन्मभर पोसणार म्हणून आदर दाखवायला पाय धुवायचे का? मग या पाय घुवून घेणार्‍या लोकांनी ती वधू कमावत असली तर तिच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करु नये. बरोबर?

असं नसतं तर सोनिया गांधी सारखी स्त्री भारताच्या राजकारणात एवढा महत्वाचा रोल निभावुच शकली नसती.. >>>> Rofl हे ह्या बाफचं सार आहे. आता बंद केला तरी हरकत नाही.

पूर्ण वाचल्याशिवाय बंद करायला सांगू नये. हुकुमावरुन.. Proud
आणखीनही बर्‍याच गोष्टी ह्या बाफचं सार आहेत. त्या ही नजरेखालून घालव्यात.

बापरे!!! आता लिहायला फार काही उरलच नाहिये. तरीही

सौभाग्यचिन्हे.. खरच हा शब्दच विचार केला तर हास्यास्पद आहे.
नशिबाने माहेर सासर कुठेही जाचक प्रथा नाहियेत किंवा मला स्वतःलाच मंगळसुत्र घालायची आवड असल्याने कदाचित जाणवल्या नसतिल Proud

गावी गेल्यावर मात्र साडी नेसुनच जायच अस वहिनी पहिल्यांदा म्हणाल्याच आठवतय पण त्याच कारण तिने सांगितलेल अस कि आमच गाव अगदीच खेडेगाव आहे. एकच दिवस जायचय तर साडीच नेसलेल बर. उगिच लोकांना चर्चा करायला कशाला विषय द्यायचा म्हणुन असल्या रुढी मी आपली पाळते.

लग्नात पाय धुण्याची पद्धत मलाही आवडली नव्हती. तेव्हा मी सरळ आमच्या भटजींना विचारलेल कि हे अस का करायच? तर त्यांनी सांगितलेल कारण म्हणजे 'लग्नात नवरामुलगा विष्णूचा अवतार आहे अस मानतात त्यामुळे त्याचे पाय धुवायचे' Uhoh बहुतेक काहितरी कारण सांगुन त्यांनी माझ तोंड गप्प केलेल असाव Proud
अजुनही काही गोष्टी लग्नात खटकलेल्या पण त्यावर न बोललेलच बर.. त्याने मलाच त्रास होइल. बाकी काही नाही.

वर जामोप्यांनी जे काही लिहिलय त्यावर तर काही बोलावस पण वाटत नाहिये.

ओके, म्हणजे ते घरी नांदायला नेणार, जन्मभर पोसणार म्हणून आदर दाखवायला पाय धुवायचे का? मग या पाय घुवून घेणार्‍या लोकांनी ती वधू कमावत असली तर तिच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करु नये. बरोबर?

याचे उत्तर वर आलेले आहेच की..!!!! नवरा विष्णूचा अवतार म्हणजे लक्ष्मीवर त्याचाच अधिकार की!!!! Happy ..

_/\_ (गुड नाईट, क्षिरसागरात आडवे होण्याची वेळ झाली... उद्या भेटू.. Proud )

मुग्धा,
'छान दिसतं..आवडतं म्हणुन घाला...
आवडत नसेल तर घालायची गरज नाही.. असं आजकाल सगळीच कडे दिसुन येतं..

माझी आई हे सगळं घालायची..तिचा बांगड्यांनी भरलेला हात, पायातले जोडवे, कपाळावरचं कुंकु..सगळं खुप छान दिसायचं..म्हणुन मला लग्नाआधी पासुनच सगळं घालायची इच्छा होत असे..

ज्याचा त्याचा प्रश्न आहे..'

तेच तर. हा प्रश्न आमचा रहावा इतकंच. कोणी जोर जबरदस्तीनं हे घालायला लावू नये.

नवरा विष्णूचा अवतार म्हणजे लक्ष्मीवर त्याचाच अधिकार की!!!! >>> चुकिच घेतलत जामोप्या... फक्त लग्नात विष्णू नंतर नाही अस मला सांगितल गेलेल आणि ते सुद्धा मी पुढे काही बोलु नये म्हणुन .

फक्त लग्नात विष्णू नंतर नाही अस मला सांगितल गेलेल

असं कसं होईल ? लग्न-संसार म्हणजे काय दशावतारी नाटक आहे ? दहा मिनिटेच नवरा विष्णू म्हणे!! Happy नंतर श्रीराम लागू त्याला रिटायर करतात की काय? .. Proud

Pages