स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

याच्या उलट विवाहीत पुरुषाच्या प्रेमात अविवाहीत मुलगी पडली असे कुठे कधी वाचले वा ऐकले नाही. >>> हाहा अतिशय मर्यादित वाचन व ऐकणं दिसतय बी Proud Light 1

या रुढी जाचक आहेत हे दुसर्‍यांना पटवून देण्याचा प्रयत्न किती दिवस करणार आपण? आता त्या मोडून काढण्यासाठी पावलं उचलायची वेळ आली आहे. नाही का>>> ह्म्म्म्म चला फायनली काहितरी करूयात :)नाही त र ही चर्चा बीबी पुरतीच राहील आणि बाकी ०

बाकी टीपी चालु द्या Wink

एक फूल ची सगळी पोस्ट मस्त.
बाकी हा बाफ आता खरंच बंद करावा ! कायमच फालतू वाद उकरून "बघा कसा मला मस्त वाद घालता येतो" म्हणून स्वतःची करमणूक करून घेणार्‍यांची इथे फुकटात सोय होते आहे !!
<<< अगदी !!!
एक फूल, भरत उत्तम पोस्ट्स !

ब्यांकेतल्या बायका, तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधी, अभिनेत्री, गायिका इत्यादी लिंब्याच्या पाया पडायला जातात?? >>>>>>>>> नीधप Rofl

बाकी उगीच असंबध्द लांबलचक आणि नुसतेच पोस्टस ची संख्या वाढवणारे रटाळ लिखाण आणि लोकसंख्या वाढवणारे तद्दन फालतु आशिर्वाद सगळच भयानक टाकाउ !

>>>>ब्यांकेतल्या बायका, तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधी, अभिनेत्री, गायिका इत्यादी लिंब्याच्या पाया पडायला जातात??
बाप रे!! आणखी एक जाचक प्रथा सुरू होणार बहुदा...

दागिने घालायला नाकं मुरडणार्‍या बायांचे सगळे दागिने मायबोलीने काढून घ्यायला पाहिजेत... नको आहेत दागिने तर दान देऊन टाका... मायबोली मॅनेजमेंटने आता असे काहीतरी सिरियसली करावे आणि बीबी ला टाळं (पितळेचे,, न्हायतर सोन्याचे कुलुप म्हणून आणि एक धागा निघायचा..) लावावं...:)

>>>> लोकसंख्या वाढवणारे तद्दन फालतु आशिर्वाद <<<<<<
श्श्याऽऽऽऽ, ही धाव भलतीकडेच चाल्लीये...... Lol
माझी किमान अपेक्षा अशी होती की अष्टपुत्रासौभाग्यवतीभव मधे पुत्रच का पुत्री का नकोत असे कोणतरी एखादतरी विद्वानवाविदुषी विचारेल! Proud पण हा हन्त हन्त..................
असो.
माझे शेवटचे वाक्य लिहून झाले, खरे तर उद्या लिहीणार होतो, पण अगदीच रहावले नाही!
आता हा बीबी बन्द करण्यास माझी तरी कसलीही हरकत नाही! Happy
आता मी सुखाने झोपायला जातो!
जाता जाता,
उदयराव, तुम्मच्या शेवटच्या पोस्ट मधिल मुद्दा बरोबर आहे, पण अस हे की पेटवापेटवी पेक्षा विनोदनिर्मिती केव्हाही चान्गलीच, नाही का?

ता.क. (ताजा कलम) अर्थात पुनःश्चः
बी, तू मान्डलेले प्रश्न कधी नव्हे ते मला त्यातिल प्रामाणिकपणामुळे अन आत्यन्तिक कठोर वास्तविक सत्यामुळे प्रचण्ड भावलेत, या बाकी भाऊ/बहिणीगर्दीत दखल घेतली गेली नाही, म्हणून वेगळे सान्गतोय Happy
अशाच प्रकारच्या वास्तविक सत्यामध्ये मी अशाही स्त्रीया बघितल्यात्/अनुभवल्यात ज्या नवरा जिवन्त असेस्तोवर स्त्रीमुक्तीच्या भरात, सासरच्या लोकान्ना तेथिल प्रथान्ना न जुमानता, मला जे वाटेल तेच मी करेन या जोशात कुन्कु बिन्कु न लावता, मन्गळसुत्राची पत्रास न ठेवता, कसलीही व्रतवैकल्य न करता, देवधर्म न पाळता वावरायच्या, पण जेव्हा नवरा ऐन तरुणपणीच मेला तेव्हा नन्तर वैधव्यात "समाजातील अस्तित्वातील अन्य दुष्ट/वासनान्ध पुरुषान्च्या नजरा व अधिक्षेपापासुन" बचाव होण्यासाठी मात्र त्याच मेलेल्या नवर्‍याच्या नावाने कुन्कू लावुन मन्गळसुत्र घालून फिरू लागल्या! मग तेव्हा कुठे गेला होता त्यान्चा धर्म नि तत्वनिष्ठता?
त्यातिल एका पुरुषाचे वाक्य आजही माझ्या कानात गुन्जते आहे, की ती कुन्कू लावत नाही, बाकी काहीच पाळत नाही तर तुम्ही का चिडता? तिच्या नशिबातच जसे असेल, तसेच ती जगेल. !
हे वाक्य बोलल्यानन्तर उण्यापुर्‍या दोन वर्षात तो पुरुष मेला! अन मग कुन्कू/मन्गळसुत्र वगैरे सुरू झाले!

असो, असली वाक्ये म्हणजे इथे आगीत तेल. तेव्हा हे वाक्य तुझ्या नि माझ्यातच फक्त!
माझा या जाच बीबीवरील सहभाग मी सम्पुष्टात आणतो आहे!
गुडबाय, अन बेस्टलक......... स्त्रीमुक्तिला!

असली वाक्ये म्हणजे इथे आगीत तेल. तेव्हा हे वाक्य तुझ्या नि माझ्यातच फक्त!>>>> असं म्हणून इथे लिहायची पंचाईत कशाला? संपर्कातून मेल पाठवता येते हे काय माहित नाही?
बाकीच्या पोस्टचं जाऊ देत. माझ्याकरता महत्वाचं फक्त हेच आहे की नवरा असताना नी नंतर नसतानाही त्यांनी स्वतःच्या इच्छेने मंगळसूत्र घातलं, कुंकु लावलं किंवा बाकीची व्रतं बितं पाळली

लिम्बुटिम्बु,
तुम्ही काय शुक्रवार का अशाच कुठ्ल्या तरी वाराची कहाणी सांगत आहात काय? कुणीतरी म्हणे कुंकु, मंसु पाळत नसे म्हणून तिचा नवरा मेला..श्या!!
इथे लोकांची बौद्धिक पात्रता फार कमी आहे असे वाटते(?)

बाकी स्त्रीमुक्तीला असले नमुने नवीन नाहीत.. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर घाण टाकणार्यांचे वंशज अजुन्ही जिवन्त आहेत म्हणायचे!! पण स्त्रीमुक्ती जेव्हा यांच्या ancestors ना पुरुन उरली, तिथे अशा अजुन थोड्याफार लोकांना नक्कीच पचवू शकते!!

Pages