स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

टोणगा, आक्षेप स्वखुशीवर नाहीच्चे..... आवडीने, मर्जीने तुम्ही काहीही करा ना..... ग्रहण काळात उलटे लटकवून घ्या स्वखुशीने, नाही कोण म्हणतंय?
फक्त स्त्रीवर केल्या जाणार्‍या सक्तीवर आक्षेप आहे आणि तेही अश्या पद्धतीने कसलीतरी भीती घालून.

माझ्या मते अन्नाच्या बाबतीत बायकांनीच स्ट्राँग स्टॅन्ड घ्यायला हवा.... नवरा, घरातील इतर पुरुषांना समोर बसवून - की आतापर्यंत जे झाले ते झाले, पण ह्यापुढे घरात काही शिळे उरले तर ते सर्वांनी खायचे, किंवा मग ते देऊन टाकायचे. किंवा घरातील पुरुषही हा स्टॅन्ड घेत असेल [किंबहुना त्याने असा स्टॅन्ड घेतला तर ते स्वागतार्ह आहे] तर बायकांनी त्याला पूर्ण अनुमोदन द्यायला हवे.

कित्येकदा मी पाहिलंय, घरातला पुरुष सांगतो, मी नाही खाणार काही शिळं....मग त्याला चांगलंचुंगलं वाढा, आपण शिळं खा आणि वर बाहेर 'आमच्या ह्यांना काहीही शिळं बिल्कुल खपत नाही खायला' वगैरे बोला.... अरे! हे काय चाललंय?

विशेषतः घरात सगळे एकत्र असतात, किंवा सणावाराला -- धार्मिक कार्य वगैरे -- तेव्हा तर कळस होतो अगदी. घरातील कर्त्या स्त्रीने सकाळपासून काही खायचे नसते, उपाशी पोटी सर्व स्वयंपाक करायचा, सर्वांना जेऊ घालायचे व मग स्वतः ''मागच्या पंगतीला'' जेवायचे.... साधारण दुपारी ३/४/५ वाजता..... >>>
अनुमोदन, हा असला प्रकार घडताना बघुन तळपायाची आग मस्तकात जाते, तिथेच माझ्या सासुसारख्या विचारी स्त्रिया, एकिकडे मला ताटलीत भाजी पोळि देउन स्वतः ही २ घास खाउन घेतात, जेणेकरून उशिर झाला कार्याला तर पोटाला तडस नको.
सासर्यांसारखे पुरूष मला लग्नाला आलेल्या पाहुण्यांना उद्देशून म्हणतात, अर्रे इतक्या लोकांच्या पाया पडत राहीली तर शुद्धिवर राहिल का माझी सून? तेंव्हा (४-५ जणांच्या पाया पडुन झाल्यावर) ते स्वतःच म्हटले बाकिच्यांना नमस्कार पोचला असे समजावे...
सर्वांना जेवायला वाढुन मगच जेवणे किंवा उरलेले , जळके मागे राहिलेले खाणे हे तर अत्यंत चिड आणणारे आहे, मीच बनवणारी मग मीच काय म्हणुन उरलेले खाउ, एकतर हाच नियम मी माझ्याही घरी केलाय. सर्व सोबत बसुन खायचे नी जे काय केलेय ते मस्त विभागणी करून खायचे.
उगा त्याग मुर्ती बळें बळें च बनवाअयचे आणि वर न करणार्यांना नावे ठेवायची यात काही हशिल नाहि.
जाइजुई, निधप ..हवे तितके मोदक Happy

माझ्या घरी आईला बाबा नेहमी रागवायची की तू जेवायला माझ्यासाठी थांबू नको आणि शिळे खावू नकोस हे तर १००० वेळा सांगून झाले पण तिने ते कधीच ऐकले नाही. वहिनींनाही आम्ही हेच सांगितले पण त्यांनी ते त्वरीत ऐकले Happy बहिणींमधे पहिल्या दोन बहिणी नवर्‍यासाठी जेवायला थांबतात पण नंतरच्या तीन बहिणी नाही थांबत. मावशी थांबत होती. आत्यापण थांबत होती. वहिनी जर आधी जेवल्यात आणि घरी पहिल्या दोन बहिणी असतील तर त्या लगेच वहिनींना म्हणतील. अजून दादा आला नाही तुम्ही जेवलात पण Happy मला वाटतं हे नियम स्त्रियांनीच बनवले असावेत Happy

जाई- स्पष्ट पोस्ट आवडली.
अरुंधती/मंजिरी- अगदी अगदी. सणवाराच्या नावाखाली कंपॅरेटीव्ह दमणुक आणि त्यागमूर्ती किस्से य वेळा ऐकलेत. मी पूर्वी संयुक्तामध्येही लिहीलं होतं की नवरा घरी नसेल तर कुकर लावायचा नाही असा सासुबाईंचा नियम होता जो आम्ही अर्थातच मान्य केला नाही.

नीधप ते कॉर्सेटवरचे पोस्ट बेस्ट आहे.

मला वाटतं हे नियम स्त्रियांनीच बनवले असावेत>>>>> पण स्त्री जर स्वतः त्या सगळ्या जाचक प्रथांमधून भरडली गेली असेल तर खरंतर तिने पुढच्या पिढ्यांना यातून सोडवलं पाहिजे स्वत:हून. पण ती तर वचपा काढताना दिसते... असं का?
जे जे मला भोगावं लागलंय ते मी माझ्या सुनेला नाही लावणार असा विचार का नाही केला जात??

माझ्या मैत्रिणीच्या साबा ती नवर्‍याबरोबर कुठेही निघाली तरी लगेच तब्येत बिघडली च्या नावाखाली त्यांचं जाणं हाणून पाडतात वरती आणि परत 'आमची परिस्थिती कुठे होती, आम्हाला तरी कुठे जायला मिळत होतं' हे आहेच.

मंजिरी, मला वाटतं बर्‍याचदा सा. बां.ना sense of deprivation, jealousy छळत असावी! Wink अशा वेळी सासूला प्रेमात, लाडात घेऊन, सासूबाईंचे भरपूर लाड करून त्यांना खिशात टाकणार्‍या सुना पण बघत आहे मी! शेवटी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! Happy

बी, Sad पुन्हा तेच, अहो तुमच्या आजुबाजुला घडणार्या तथाकथीत प्रसंगानवरून पुर्ण दुनियेची पारख करू नका हे अनेकदा लक्षात आणुन दिले गेलेले आहे तुम्हाला.
बरं ठिक आहे, जर स्त्रियाच इत्क्या स्त्रिच्या नाशाला कारणिभूत असतील तर तुम्ही त्यांच्या प्रगतीला हातभार लावा पाहु, म्हणजे ते तुमच्या सौ आणि पुढ्च्या पिढिला उपयुक्त ठरेल.

जे जे मला भोगावं लागलंय ते मी माझ्या सुनेला नाही लावणार असा विचार का नाही केला जात?? >>> आमच्या घरी वहिनी आईला शिळ्या पोळ्या गरम करुन द्यायची यावर माझा कधी विश्वास बसत नसे. एकदा मीच हे डोळ्यानी पाहिले तेव्हा फार वाईट वाटले. घरात भाचे भाची आले तर त्यांना जर काही हवे असेल जेवताना तर वहिनी त्यांना द्यायची नाही. समोर जर कुणी मोठ असलं तरच द्यायची. हे सर्व प्रकार नंतर नंतर आम्हा सर्वानाच जाचत गेलेत. म्हणजे सुनेला कठोरपणे सांगणे नियम लावणे हे आम्हाला पटत नव्हते तर एकीकडे घरात नवीन आलेली सून सर्वांनाच परक्या नजरेनी पाहते तेही आवडायचे नाही. शेवटी ती दोघेही वेगळी झालीत. त्यामुळे नवीन सुना चांगल्याच असतात आणि सासवा खाष्ट हेही सरसकट म्हणता येत नाही.

>>>>> माझ्या मैत्रिणीच्या साबा ती नवर्‍याबरोबर कुठेही निघाली तरी लगेच तब्येत बिघडली च्या नावाखाली त्यांचं जाणं हाणून पाडतात वरती आणि परत 'आमची परिस्थिती कुठे होती, आम्हाला तरी कुठे जायला मिळत होतं' हे आहेच.

प्रतिसाद अरुंधती कुलकर्णी | 29 March, 2010 - 14:07 नवीन
मंजिरी, मला वाटतं बर्‍याचदा सा. बां.ना sense of deprivation, jealousy छळत असावी! अशा वेळी सासूला प्रेमात, लाडात घेऊन, सासूबाईंचे भरपूर लाड करून त्यांना खिशात टाकणार्‍या सुना पण बघत आहे मी! शेवटी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ!
<<<<<<<
युक्ति श्रेष्ठ हे खरेच Happy
पण अशा वेळेस तो मैत्रिणीचा नौरा काय करतो? त्याला अक्कल नको का?
आयला, "पुरुष एकतर आईलवेडा अस्तो वा बाईलवेडा" अस कोणसस म्हणलय तेच खर!

जाईजुई - तू सरकार तर्फे गर्भारशी बायकांना दिल्या जाणार्‍या उपचारांची माहिती अगदी योग्य दिलीस.... पण त्या बाबतीतही अजूनही जागरुकता कोठे आहे? आमच्या घरात काम करणार्‍या मोलकरणीला माहितच नव्हतं पहिली दोन बाळंतपणं होईस्तोपर्यंत! आणि शेतमजूर, बांधकाम मजूर, शारीरिक काबाडकष्टांची कामे करणार्‍या स्त्रियांपर्यंत अजूनही अशा अनेक सुविधा/ त्यांची माहिती पोचत नाही. शिवाय एवढी इंजेक्शने, गोळ्या घेऊनही ती स्त्री शिळे पाके, उरलेसुरले खाणार/ अर्धपोटी -उपाशी राहणार, अतिश्रमाची कामे करणार व आरामाची शक्यताही नाही.... तर त्या औषधे-गोळ्या तरी काय काम करणार?

>>>> त्यामुळे नवीन सुना चांगल्याच असतात आणि सासवा खाष्ट हेही सरसकट म्हणता येत नाही.
बी, या वाक्याबद्दल तुला दहा गावे बक्षिस Happy
माझ्या पहाण्यात तरी हल्लीच्या काळच्या "सासवा" गरीब बिचार्‍या झालेल्या वाटतात, ठिकठिकाणची उदाहरणे पाहून अगदी दया येते! Sad असो
[हे मी केवळ माझ्या आयुष्यातीलच नव्हे तर केवळ माझ्या पहाण्यातील उदाहरणान्वरुन लिहीतोय]

आईलवेडा वा बाईलवेडा >>>> लिम्बुभाऊ, हे तुम्हीच म्हणालात ते बरं झालं Proud

अशा वेळेस तो मैत्रिणीचा नौरा काय करतो? त्याला अक्कल नको का?>>>>> नाही, त्यावेळी त्याचा 'ख.सा.ना.सू. मधला नितिश भारद्वाज झालेला असतो Proud

मंजे पुर्वीच्या बायका एक पाय उभा मुड्पून जेवायला बसायच्या कारण त्या पोझिशनमुळे जेवण कमी जाते... Sad अत्यंत जाचक असा नियम की स्त्रियांनी जेवायला कसे बसावे Angry (नशिब स्त्रियांनी परसाकडे कसे बसावे यासाठी काही नियम केला नाही ते.)

.

लिं.टिं अर्रे बाबा तू ज्या वाक्यासाठी बि ला १० गावे बक्षिस देउ करतोयस तेही त्याच्या केवळ घरगुती उदाहरणातून आले आहे ...पण त्या वाक्याला माझा दुजोरा अर्थात आहे, माझेही वरील पोस्ट वाचता आजच्या युगातल्या सुना आपल्या सासरकड्च्या लोकांचा मोठेपणा मान्य करायला क्षणभरही मागे पुढे पाहत नाहित, हे का नाही नजरेस आले आपल्या?

दक्षे, परसाकडे कसे बसावे हा जरी स्त्रियांसाठी नियम नव्हता तरी कधी जावे हा नियम होताच..... एकतर भल्या पहाटे उजाडण्यापूर्वी नाहीतर सगळीकडे निजानिज झाल्यावर गुपचुप रात्रीच्या वेळेस. कारण स्त्री 'तिकडे' चाललीये हे कुणाला कळू नये. काय बालिशपणा आहे हा.

दक्षिणा, त्याबाबत शहराकडच्या स्त्रिया नशीबवान! खेड्यांमध्ये ज्या घरांत शौचालये नाहीत व लोक निसर्ग विधीसाठी गावाबाहेर हागणदारीत जातात, तिथे बायकांना एकतर पहाटे किंवा रात्री उशीराच आपले नैसर्गिक विधी आटोपून यायला लागतात. कारण अंधार असतो ना....दिवसाउजेडी कसे जाणार? अशा पध्दतीने नैसर्गिक आवेगांचा अवरोध केला जातो. त्यामुळे त्यांना पोटाचे विकार जडतात. अर्थात हा ह्या बीबी चा विषय नव्हे, पण तू म्हणालीस म्हणून राहावले नाही. त्या बायकांची होणारी कुचंबणा पाहिली आहे मी!

मला वाटतं हे नियम स्त्रियांनीच बनवले असावेत>>>>> पण स्त्री जर स्वतः त्या सगळ्या जाचक प्रथांमधून भरडली गेली असेल तर खरंतर तिने पुढच्या पिढ्यांना यातून सोडवलं पाहिजे स्वत:हून. पण ती तर वचपा काढताना दिसते... असं का?
जे जे मला भोगावं लागलंय ते मी माझ्या सुनेला नाही लावणार असा विचार का नाही केला जात??

मंजिरी, लिम्बुटिन्बु आणि बी,
मला वाटतं हा मनुष्य स्वभाव आहे. हाच आपल्याला collge ragging मध्ये ही बघायला मिळतो. शिवाय office मध्ये ज्येष्ठ लोक कनिष्ठांशी हाच प्रकार करतात. त्यात स्त्री-पुरुष असं काही नाही. सासू-सून ह्या जाचात सासू ही आधीच्या काळी receiving end ला असली की तिला तिच्या सूनेला त्रास देताना काही वाट्त नाही. नेमक्या दोन्ही स्त्रिया अस्ल्याने बरेचदा असा समज होतो की स्त्रीया च स्त्रियांना त्रास देतात.

बाकी शिळ्या अन्नाचा आणि शेवटि जेवण्याचा मुद्दा अगदी योग्य. अतिशय चीड आणणारे प्रकार.

अजूनही काही घरांमधून नवर्‍याला 'अहो' च म्हटलं पाहिजे ची सक्ती होते स्त्री वर Angry

परसाकडे जाण्याचे बाबतीत अजुन एक नियम असायचा, ते म्हणजे कुणाला तरी सान्गुन जाणे!

[ही शिस्त आमच्या अन्गात येवढी भिनलेली आहे कि आजही, घरात वा ऑफिसमधेही सन्डासला जाताना मी सान्गुनच जातो! Happy याबाबत आईने सान्गितलेली कारणे म्हणजे परसाकडे गेले असता, स्त्री म्हणून होऊ शकणारा सम्भाव्य धोका, याशिवाय विषारी किडामुन्गीजीवजन्तू चावल्यास उद्भवणारा प्रसन्ग ही होत - वरील शिस्त आम्हाला आमच्या आईने पुण्यातील चाळवजा बिल्डिन्गमधे लावली होती जिथे स्वतन्त्र सन्डास बाथरुम होते!
आजही ही शिस्त मी पाळतो कारण वयपरत्वे, न जाणो, सन्डासात बसलेला अस्तानाच हार्ट अ‍ॅटॅक वगैरे आला तर काय घ्या? कितीतरी वेळ कुणालाच माहित पडणार नाही! त्यातुन माझ्या अष्टमात केतू..... Sad
याशिवाय, किती मोठ्या आवाजात, काय भाषेत - कोडभाषा वगैरे सान्गायचे याचे नियम स्थळकाळपरिस्थितीप्रमाणे बदलत असायचे-असतात]

नेत्रपल्लवी व हस्तपल्लवी :

लिंबु टिंबु : ह्याबाबतीतही स्त्रिया केवळ अनेकदा मोठ्याने बोलता येत नाही म्हणून डोळ्यांच्या किंवा हातवार्‍यांच्या भाषेत बोलताना दिसतात. फार पूर्वी हे म्हणे कौशल्य समजले जायचे...स्त्री व पुरुष, दोघांसाठी....एक प्रकारची सांकेतिक बोली...ज्यामुळे इतरांना आपण काय बोलत आहोत ते कळू नये.... आता ते फक्त बायकाच जास्त करून वापरतात.

पण सध्याच्या आधुनिक जमान्यातही स्त्रियांना इतरांसमोर असे 'नेत्र'पल्लवीत किंवा 'हस्त'पल्लवीत बोलताना पाहून मजा वाटते. विनोदाचा भाग सोडला तर त्यांना आता तरी आपल्याला काय म्हणायचे आहे हे विनासंकोच सांगता आले पाहिजे, नाही का?

अजूनही काही घरांमधून नवर्‍याला 'अहो' च म्हटलं पाहिजे ची सक्ती होते स्त्री वर>>>>>>> हो अगदी.. माझे सा.बु. आणि सा.बा या गोष्टीसाठी तर फारच आक्रमक होते...

मी माझ्या नवर्‍याला लग्नाआधी ६ वर्षांपासून ओळखत होते.. साहजिकच मी त्याला नावानेच हाक मारत असे.. मी त्यांना हेच म्हणत असे, अरे मला सवयच झाली आहे त्याला नावाने हाक मारण्याची... तुमचे काहीही असो.. तु नवर्‍याला अहो' च म्हटलं पाहिजे...

यात गंमत अशी की.. मी नवरा अगदी शेजारी असेल आणि अहो म्हटलं, तर तो मला ओ देणं दुरच पण बघतही नसे माझ्याकडे... पण जर भोवती गोंगाट असला आणि मी नावने हाक मारली.. तर महाशय दुसर्‍या सेकंदालाच समोर हजर.. अगदी सगळे खुप हसत असत या गोष्टीसाठी.. Happy

आता सा.बु. आणि सा.बा ही सवय झाली आहे मी नावाने हाक मारण्याची.. :;

>>>> विनोदाचा भाग सोडला तर त्यांना आता तरी आपल्याला काय म्हणायचे आहे हे विनासंकोच सांगता आले पाहिजे, नाही का?
हम्म, सान्गता आले पाहिजे हे खरे, सान्गतातही, पण सान्गुन उपयोग काय?
एकदोन वर्षामागे मी धाकटीला स्कुटरवरुन पुण्यात घेऊन आलेलो, तिने ऐनवेळेस, पण नि:सन्कोचपणे मला सान्गितले की एक नम्बरला जायचेय! माझी दान्डी गुल्ल! जवळपास कुठेही सोय नाही, हिला तर घाईची लागलेली,मग जिथे होतो तिथुन आठवुन आठवुन, शिवाजीनगरकडून न.तानाजी वाडीकडे जाताना डावीकडे एक सुलभ आहे तिथवर घेऊन आलो, मला आत येता येणार नाही तुझ तुलाच उरकाव लागेल अस सान्गुन, एक रुपया देऊन पाठवले!
सोय नसणे, असल्यास रुपया द्यायला लागणे वगैरे असन्ख्य खटकणार्‍या बाबी सार्वजनिक आयुष्यात आहेत! साठ वर्षात यात काहीच सुधारणा नाही! आश्चर्य याचे वाटते की पुलन्च्या महानगर का तशाच नावाच्या कादम्बरीतील इन्ग्रज नायिके(प्रेयसि) च्या तोन्डी देखिल त्या काळातील एक पेनी खर्चायची आहे असा उल्लेख आढळतो! हल्लीची इन्ग्लन्डमधील परिस्थिती माहित नाही
येवढ्यात मी इन्ग्लन्डात गेलो नाहीये, अन पुल हयात नाहीत!

योगिता, लग्नाआधी अगदी पंकू, पंक्या, पंक्स (पंकज नाव असेल तर) वगैरे म्हणणार्‍या मुली प्रेमविवाह असेल तरी लग्नानंतर अहो म्हणताना आढळतात. आता याला काय म्हणावं?

लिम्बु Lol

.

Pages