स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

मामी , उत्तम पोस्ट. मनापासुन आवडली. हे असे मनात यायचे नेहेमी , पण तुम्ही एकदम व्यवस्थित सर्व गोष्टी मांडल्या आहेत.
मायबोलीच्या भाषेत तुम्हाला १००० मोदक !!

मामी आणि जाजु
उत्तम पोस्टस..

मंदार जोशी,
चर्चेचा त्रास होत असेल तर बंधनकारक नाहीये इथे येणं. अज्जिबात आलाच नाहीत तरी आमचं काहीसुद्धा बिघडणार नाही.

माझा ' स्त्रीला पुरुषाचा आधार लागतो जगण्यासाठी' या संकल्पनेलाच विरोध आहे. व त्या अनुषंगाने त्या संकल्पनेची सर्व मॅनिफेस्टेशन्स. त्यामुळे स्त्रीया उगीचच मनाने अधू होतात. आपण स्वतंत्रपणे जीवन उभारलेले आहे व त्यात फक्त प्रेम/ मैत्री/ सहजीवनाची गरज या साठी पुरुष आहे. अशी व्यवस्था का नाही आकाराला येत? यात पुरुषांवरही कमी ताण पडेल.>> अगदी मनातले.पण महान भरतीय कुटुंब व्यवस्थेत प्रेम, मैत्री ,सहजीवन ह्याहीपेक्षा कुटुंब ,नातेवाइक ह्यांच्याप्रतीची कर्त्यव्ये जास्त महत्वाचे असल्याने प्रत्यक्षात येणे अवघड.

पण महान भरतीय कुटुंब व्यवस्थेत प्रेम, मैत्री ,सहजीवन ह्याहीपेक्षा कुटुंब ,नातेवाइक ह्यांच्याप्रतीची कर्त्यव्ये जास्त महत्वाचे असल्याने प्रत्यक्षात येणे अवघड.<<<
अगदी अगदी.
प्रेम, मैत्री, सहजीवन याबरोबर peace of mind, माणूस म्हणून व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हे पण टाक.

>>>> आपण स्वतंत्रपणे जीवन उभारलेले आहे व त्यात फक्त प्रेम/ मैत्री/ सहजीवनाची गरज या साठी पुरुष आहे. <<<<
जग हे दिल्याघेतल्याचे आहे असे आजवर ऐकत्/वागत/पहात आलोय.
तर वरील प्रेम्/मैत्री/सहजीवन देखिल आपोआप, काही न दिल्याशिवाय मिळेस असे वाटते का?
तसे ते मिळण्यास नशिबात असणे ही सन्कल्पना मान्य आहे का? जर नसेल, तर ते काय रितीने प्राप्त व्हावे? कुणी जाणकार महिला यावर प्रकाश टाकू शकतील का?
की जिथे ते तसे काहीही न दिल्याखेरीज मिळते त्यासच स्वर्ग म्हणतात? Wink (अन काही खुळचट लोक तर म्हणतात की "मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही" Proud )

बायदिवे, काही बायकान्च्या अन्गात येते (तसे तर ते पुरुषान्च्याही येते! पण त्यान्ना स्वतन्त्ररित्या विचारेन) तर प्रश्न असा की महिलान्च्या "अन्गात येणे" वा "आणणे" हे देखिल जाचक प्रथेमधे मोडते का? मला सगळ्यान्ची बहुमुल्य मते वाचायला आवडतील! Happy

अंगात येणे हा प्रकार जनरली घरातली जाम पिचलेली, बेसिक माणूसपण नाकारलेली, कदाचित मूल नसलेली, आश्रित थोडक्यात घरातली सगळ्यात गांजलेली अशी जी बाई असते तिच्या बाबतीत होतो. स्वतःचं अस्तित्व टिकवणं, लोकांना मान्य करायला लावणं अश्या मूळ प्रेरणांचा उद्रेक होऊन हे प्रकार सुरू होतात. अश्या बाईला (आणि तिला पिचवणार्‍या, माणूसपण नाकारणार्‍या, मूल नसण्यावरून हिणवणार्‍या सगळ्यांनाच) मानसोपचारांची गरज असते.
लिंब्या उगाच उचकवण्यासाठी नसते फाटे फोडू नकोस. हा आणि अंगात येणे हा खरंच देवी बिवीचा प्रकार आहे असं समजवण्याच्या प्रयत्नात असशील तर ते मानायला लागणं हे जाचक आहे हे आम्ही सगळ्याच तुला पटवून देऊ हं!

तर वरील प्रेम्/मैत्री/सहजीवन देखिल आपोआप, काही न दिल्याशिवाय मिळेस असे वाटते का?<<
प्रेम मैत्री आणि सहजीवन यापलिकडे काय देणं अपेक्षित आहे?

एका दिवसात लईच पुढं गेलाय हा बीबी. सकाळी सकाळी वाचून जाम मनोरंजन झालं. सायो, नानबा, मामी, नीदी सॉलिड पोस्ट्स आहेत तुमच्या...

मामी, उत्तम पोस्ट.
माझा ' स्त्रीला पुरुषाचा आधार लागतो जगण्यासाठी' या संकल्पनेलाच विरोध आहे. व त्या अनुषंगाने त्या संकल्पनेची सर्व मॅनिफेस्टेशन्स. त्यामुळे स्त्रीया उगीचच मनाने अधू होतात. आपण स्वतंत्रपणे जीवन उभारलेले आहे व त्यात फक्त प्रेम/ मैत्री/ सहजीवनाची गरज या साठी पुरुष आहे. अशी व्यवस्था का नाही आकाराला येत? यात पुरुषांवरही कमी ताण पडेल.>>> १००% पटलं

एक मनुष्य प्राणी सोडला तर इतर सगळ्या जीव जातींमधे पुरुष म्हणजेच नर हा फक्त reproduction या एकाच क्रियेसाठी वापरला जातो. एकदा का जीव जन्माला आला की 'कोण तू?' असं म्हणून त्याचा संबंध संपतो. बाकी सगळं आत्मविश्वासाने, धीराने एकटी स्त्री/मादी च निभावून नेत असते. मनुष्य हा सुद्धा जर अशाच जीवसृष्टीत अवतरला असेल तर त्याला वेगळे रुल का?
समस्त पुरुष जमात, समाधान माना की निसर्गातल्या इतर जीव-जमातींप्रमाणे कर्तव्य भाग साधल्यावर तुमची हकालपट्टी होत नाहीये Proud

>>>>>> अंगात येणे हा प्रकार जनरली घरातली जाम पिचलेली, बेसिक माणूसपण नाकारलेली, कदाचित मूल नसलेली, आश्रित थोडक्यात घरातली सगळ्यात गांजलेली अशी जी बाई असते तिच्या बाबतीत होतो. स्वतःचं अस्तित्व टिकवणं, लोकांना मान्य करायला लावणं अश्या मूळ प्रेरणांचा उद्रेक होऊन हे प्रकार सुरू होतात. अश्या बाईला (आणि तिला पिचवणार्‍या, माणूसपण नाकारणार्‍या, मूल नसण्यावरून हिणवणार्‍या सगळ्यांनाच) मानसोपचारांची गरज असते. <<<<<

वरील सर्व मजकुर नीरजा तू कुठल्या पुस्तकातून्/कुठल्या विदुषीकडून शिकलीस? Wink
कालच माझ्या मावशीच्या अन्गात आले होते! लिम्बीच्या माहेरी गेलो अस्ताना आले.
ही मावशी कुठेही पिचलेली, माणुसपण नाकारलेली वगैरे नाही,
तिला दोन "मुलगे" आहेत म्हणजे विनापत्य नाही,
पैकी मोठ्याचे लग्न होऊन त्याला अपत्ये आहेत म्हणजेच हिला नातवण्डे आहेत.
वयाने मात्र ही माझ्यापेक्षा बारा/पन्धरा वर्षान्नीच मोठी असेल
खानदानी शेतीवाडी वगैरे असलेल्या देशस्थ घरात लग्न होऊन गेलेली आहे ही मावशी.
नवरा सरकारी पाटबन्धारे खात्यातून सेवानिवृत्त, स्वतचा दुमजली बन्गला वगैरे सर्व!
सासू, दीर वगैरे जवळ रहात नाहीत.... म्हणजे सासुरवास व अन्य सासरच्या पुरुषान्चा "जाच" नाही Proud
हिच्या अन्गात यायचे ते लग्न होण्या आधीपासूनच, म्हणजे सासरचा जाच म्हणुन अन्गात येते असेही म्हणण्यास वाव नाही!
ही बाई चार इतरान्ना आश्रित म्हणून ठेवू शकेल अशी आर्थिक परिस्थिती, स्वतः आश्रित नाही,
सुनेचा जाच होतोय असेही नाही कारण मुलगा-सून स्वतन्त्र बिर्‍हाडात रहातात.....
अन तरीही हिच्या अन्गात येते हा कस्ल्या जाचाचा परिणाम असेल तुम्च्या व्याख्येप्रमाणे?
अन्गात आल्यावर काय काय झाले हे सान्गणार होतो, पण राहुदे शिल्लक ते! आधी तुमच्याकडून त्या "प्रेरणान्च्या उद्रेकाबद्दल" कळून घेऊदे, नाही का?
अन मी फाटे फोडलेले नाहीत, तुमची चर्चा उत्कृष्ट अभिनिवेशात चालू आहे, म्हणल त्याच वेळेस याबाबतही काही मौलिक माहिती मिळेल तुमच्याकडून! अशी अपेक्षा बाळगण म्हणजे चूक आहे का?

आत्ये Lol

>>>>> हा आणि अंगात येणे हा खरंच देवी बिवीचा प्रकार आहे असं समजवण्याच्या प्रयत्नात असशील तर ते मानायला लागणं हे जाचक आहे हे आम्ही सगळ्याच तुला पटवून देऊ हं!
मी काय मानतो हा प्रॉब्लेम वा चालू प्रश्न नाहीच्चे नीरजा, त्या अन्गात देवि येणार्‍या मावशीला (अर्थातच स्त्रीला) मी काय कस पटवुन देऊ ते सान्गा आधी! Biggrin

स्त्रियांच्या आंगात येणे हे भारतातच का आढळते? अंगात देवी येणे हा मानसिक आजार आहे, मानसोपचारांची गरज दिसते. लोकांनी दुर्लक्ष केले तर अंगात येण्याचे प्रमाण कमी होईल, लक्ष वेधुन घेणे हा पण एक प्रकार आहे.

त्या अन्गात देवि येणार्‍या मावशीला (अर्थातच स्त्रीला) मी काय कस पटवुन देऊ ते सान्गा आधी!
--- लिम्बु जी मावशी ला सांगा 'माझ्या अंगातही देव येतो. त्याने मावशी ला मानसोपचार तज्ञा कडे नेण्याची आज्ञा केली आहे, ते बहुधा विजेचा धक्का देतात'. क्षणात देवी पळुन जाईल.

उदय Lol

इंदिरा संत यांची मध्यमवर्गीय गार्गी ही कविता सुपर्णा कुलकर्णींच्या ब्लॉग वर सापडली..

मध्यमवर्गी गार्गी

एक दगड कष्टाचा
एक दगड त्यागाचा
वात्सल्याचा थर
घाटासाठी वापरायचा
तिचेच नांव गृहलक्ष्मी….

कातरवेळी दमून भागून
उजव्या डाव्या हातातील
पर्स, पुडकी सांभाळित
घरी परतणारी ती
गार्गी

पर्सच्या हुद्यांबरोबरच
सांभाळून आणलेली
त्या वाक्यांची लाकडे चुलीत लावते….
( इथे वाक्य म्हणजे स्त्रीच्या प्रगतीची पेपरवरील आकडेवारी होय)

मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या,
थोरापोरांच्या मनधरण्या,
मग नोकरांच्या काचण्या…..
शिजवणारी ही तीच
शिजणारी तीच
मध्यमवर्गी गार्गी……

त्यांचा मध्यमवर्गी गार्गी हा लेखही वाचण्यासारखा आहे..
http://www.kachapani.com/2010/03/blog-post_2553.html

>>> लक्ष वेधुन घेणे हा पण एक प्रकार आहे.
मावशीबाबत तर हे नक्कीच अमान्य, पण तरीही, याच आधारावर,.....
आम्हि नै बै कस्ल्या जुन्या प्रथा/रुढी पाळत, अम्केच कप्डे घालतो, पुरुषान्ची हुकुमशाही नै ऐकत, नै त्याच्याकर्ता कुन्कु लावत की मन्गळसूत्र घाल्त इत्यादी इत्यादी अनेक प्रकार देखिल, चारचौन्घासारखे न वागता त्यावेगळे विचित्र वागून " बहुसन्ख्य स्त्रीपुरुषान्चे" लक्ष वेधून घेण्याचाच एक प्रकार आहे असे म्हणले तर ते देखिल बरोबरच म्हणायला हवे, नाही का? मग खरोखर मानसोपचारान्ची गरज कुणाला आहे?
अन इथे किती जणान्ना "विजेचे शॉकच्या" ऐकिव माहिती व्यतिरिक्त मानसोपचारान्ची माहिती आहे? की आपल उगाच माहिती आहेत शब्द म्हणून वापरायचे कुठेही कसेही?

लिम्बुतिम्बु, तुमच्या मावशीला attention seeking disorder आहे, ह्या रोगाचे शास्त्रीय नाव काय असते ते मला माहित नाही.पण औषधानी आटोक्यात येउ शकेल.
वरची पोष्त पाहिली नव्हती म्हणुन संपादन..
असा रोग असतो.घरात बरेच doctors आहेत म्हनुन खत्रीने सांगते, विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः तज्ञाना भेता, प्रत्येकाची लक्ष वेधुन घ्यायचे पध्दत वेगली असते. माझी एक मैत्रिण आत्महत्येचा प्रयत्न करायची, म्हनजे हातात ब्लेडने जखमा करुन घेणे इत्यादी..treatmentनंतर बरी झाली.depression नव्हते. मानोसपचार्कदे जाणे म्हणजे वेदे असने नव्हे.एका नोबेल विजेत्या scintistला scnizophrenia होता.
विषयांतराबद्दल क्षमस्व, पण तुमच्या वरच्या पोष्टवरुन तुम्ही रागावलेले दिअसलातअ म्हनुन explain केले.

अजून एक पण कविता आहे..........

ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं

लिम्बु, अगदी अगदी... हा देखिल लक्ष वेधून घेण्याचाच प्रकार आहे.... पण म्हणून मावशीच्या अंगात येण्याचं हे जस्टीफिकेशन होऊ शकत नाही ना?

स्त्रीला पुरुषाचा आधार लागतो जगण्यासाठी' या संकल्पनेलाच विरोध आहे. व त्या अनुषंगाने त्या संकल्पनेची सर्व मॅनिफेस्टेशन्स. त्यामुळे स्त्रीया उगीचच मनाने अधू होतात. आपण स्वतंत्रपणे जीवन उभारलेले आहे व त्यात फक्त प्रेम/ मैत्री/ सहजीवनाची गरज या साठी पुरुष आहे. अशी व्यवस्था का नाही आकाराला येत? यात पुरुषांवरही कमी ताण पडेल. >>>>>>मामी एकदम सौ आने सच बात कही. बायका तशाही मनाने खूपच स्ट्राँग असतात, पुरुषांपेक्षा कैक पटीने. एखाद्या पुरुषाच्या आधी बाई गेली तर तो पुरूष मनातून खूप खच्ची होतो, पण याच्या उलट झालं तर बाई धीराने येईल त्या परिस्थितीला तोंड देते.

@मामी, गाडीबद्दल अभिनंदन. शेवटी कोणाची निवड केलीत?

@मंदार्_जोशी : तुम्ही एकंदर चर्चा खूपच एंजॉय करताय असं दिसतंय. पण ही चर्चा कोणाचं मनोरंजन व्हावं ह्यासाठी चालली नाहीये. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माबोकराने या बी.बी वर हजेरी लावायची तर अजिबातच सक्ती नाही, त्यामुळे .............सूज्ञास अधिक सांगणे न लगे.

ह्यातल्या बर्‍याचशा पोस्टी पुढील सदरात मोडणार्‍या आहेतः

"Washing your dirty linen in public">> मला तर वाट्ले मनाचा निर्मळ तळ गाठ्ला आहे. तुझ्याकडे लिहिण्यासारखे नाही का काही? का कधी विचारच केला नाही. तुझी खण नारळाने ओटी.

मामी Lol

मुग्धा, एआर्सी म्हणते त्याप्रमाणे कुठल्यातरी इन्ग्रजी नावाचा, पाश्चात्यान्नी शोधून काढलेला (की शब्द जुगवलेला) आजार खरोखरच असेल असे मानले तरी मग,.....
अन्गात आल्यावर पुढच्या तीन मिनिटात तिनी लिम्बीच्या बाबान्ना, एकेदिशेकडे हात करुन तिथे पूर्वी उम्बराचे झाड असल्याचे सान्गितले, (बाबान्नी ते मान्य केले कारण सध्या तिथे काहीच नाही), तिथे मान ठेवा पोर्णिमेला नारळाचा असे सान्गितले.
वास्तवात २०१० साली तिथे उम्बराचा मागमूसही नाही, फरसबन्दी वगैरे झालिये, १९८५ पूर्वी एक झाड होते, पण फळे धरलेली नस्लयाने ते लिम्बीच्या बाबान्नीच तोडवुन घेतले होते, हे झाड १९८५ नन्तर तरी आमच्यापैकी कुणीही बघितलेले नाही वा त्याचा असण्याचा/तोडण्याचा उल्लेखही कुणाच्याच तोन्डून ऐकला नाही, मी तर १९८५ पासून त्यान्चे घरी येतोजातो आहे, अन तरीही, वरील "डिसॉर्डर" की कायशाश्या मानसिक रोगात, अन्गात आलेल्या मावशीला तब्बल पन्चवीस वर्षान्पूर्वीच्या झाडाचे जाणवलेले अस्तित्व कसे काय सान्गता आले?
असेल, असेल, कदाचित हा देखिल "अटेन्शन सिकिन्ग डिसॉर्डर" चा भाग असेल व "वीजेचे धक्केच" देण्याचीच गरज असेल, नाही का? Wink

Pages