स्त्रिया आणि खटकणार्‍या/ जाचक प्रथा

Submitted by डेलिया on 24 March, 2010 - 20:37

या विषयावर अतिशय समतोल आणि सखोल विचारांचा लेख लोकसत्ता मधे वाचनास आला त्याचीच लिन्क -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

सौभाग्यचिन्हे या बीबी वरुन मला हा विषय सुचला. तो बीबी आता फक्त 'संयुक्ता' पुरता मर्यादित केलेला दिसतोय म्हणुन आणि या विषयाची व्याप्ती त्याच्या पेक्शा मोठी वाटत असल्याने नवीन बीबी उघडावा असे वाटले.

आपल्या समाजात बायकांच्या शारीरिक स्थिती वरुन ( उदा. - पाळी चालु असणे ) किंवा वैवाहिक स्थिती वरुन ( कु. , विवाहित , विधवा ई. ) अनेक प्रथा आहेत. यातल्या काही प्रथा तर स्त्रीसाठी अतिशय अपमानास्पद अशाही आहेत. असे असुनही त्यातल्या काही प्रथा आजही अनेक उच्चशिक्षित स्त्रियांकडुन देखिल पाळल्या जातात. काही स्त्रिया त्या प्रथा मनापासुन पाळतात तर काही जणी घरच्यांच्या / समाजाच्या दबावामुळे पाळतात.

इथे मला हे जाणुन घ्यायचेय की तुम्हाला अशा कोण्त्या प्रथा खटकतात? त्या नाहीशा करण्यासाठी तुमच्या परीने तुम्हि काय प्रयत्न करता ? तसेच तुमच्या पुढच्या पिढीवर या प्रथा लादल्या जाउ नयेत म्हणुन तुम्ही काय करता ? तसेच काही प्रथा खटकुन देखिल त्या तुम्हि पाळता का आणि कशामुळे ?

याचे उत्तर देउन माझ्यापासुनच मी सुरुवात करते.
१. पाळी ( menstrual periods ) सुरु असताना बाजुला बसणे ही जरी प्रथा अता बहुतेक सुशिक्षित घरातुन बंद झालेली असली तरी अजुनही पाळी सुरु असताना देवघरात जाणे , देवाची पुजा करणे ई. सारख्या गोष्टींना मनाई असते. पाळी चालु असणार्‍या स्त्री चा देवाला 'विटाळ' होतो असे म्हणले जाते. :
मला स्वताला या प्रथेत कोणतेही तथ्य वाट्त नाही. तसेच 'पाळी चालु असणार्‍या स्त्री चा विटाळ होतो' असे म्हणणे ही अतिशय अपमानास्पद वाटते. मी स्वता हे अजीबात पाळत नाही तसेच माझ्या मुलीला पण असे काहीही मी सांगणार नाही. ईतर कोणी तिला काही शिकवलेच तर ते का योग्य वाटत नाही हे तिला सांगेन.
२. सौभाग्यचिन्हे ( मंगळसुत्र ) ही बायकांची वैवाहिक स्थिती दर्शवितात. त्याच्या अनुषंगाने बायका - बायकात त्यांच्या वैवाहिक स्थिती वरुन भेद भाव केला जातो. : हा भेद भाव दुर व्हावा आणि सर्व बायकाना समाजात समान वागणुक मिळावी असे मला मनापासुन वाटते. रोजच्या आयुष्यात मंगळ्सुत्र वापरत नसले तरी लग्न , मुंजीसारख्या कार्यक्रमांना जाताना घालते. पटत नसले तरी नातेवाइकांच्या आणि घरातल्या मोठ्याच्या टीकेला सामोरे जावे लागु नये आणि उगीच वाद नकोत म्हणुन.

गुलमोहर: 

आणि आदर म्हणजे मोठ्यांदा न हसणे, समोर न बसणे, असं काही नाही बरं का! आदर म्हणजे दुसराही एक माणूस आहे - स्वत:चे विचार, भावना, स्वतःचे वीकनेस असलेला हे मान्य करण.. त्याप्रमाणे स्वतः जगणं आणि दुसर्‍याला जगू देणं. म्हणजे आदर.

---------------------

SmileyCentral.com

एकदम पटेश!

समस्त पुरुष जमात, समाधान माना की निसर्गातल्या इतर जीव-जमातींप्रमाणे कर्तव्य भाग साधल्यावर तुमची हकालपट्टी होत नाहीये

किती विनोदी वाक्य आहे हे.... Proud

लग्नामधील नवर्‍याची पाय धुण्याची प्रथा फार चुकीच्या पद्धतीने साजरी होते, म्हणून हे असले काहीतरी विचार आधुनिक ललनाना सुचतात.. Happy

बायका नवर्‍याचे पाय फक्त लग्नाच्याच दिवशी धुतात, म्हणून त्याना नवर्‍यातला विष्णू एकच दिवस दिसतो... ही प्रथा लग्नानंतर खर तर रोज पाळायला हवी. म्हणजे त्याना नवर्‍यातला विष्णू रोजच दिसू लागेल... सारांश, पाद्यपूजेची प्रथा वाईट नाही, ती फक्त एकच दिवस फॉलो केली जाते, हे वाईट आहे... Proud

( चला, क्षिरसागरात परतायची वेळ झाली.... गरुडा, कुठे उलथला आहेस रे.. लवकर ये रे बाबा न्यायला!!! Happy )

माझ्या बाबतीत मी ठरवलं आहे की रोजच्या जीवनात मला इच्छा होईल तेव्हाच मी साडी, मंगळसूत्र, कुंकू लावेन. याबद्दल मी कुणालाही विचारत वगैरे बसत नाही. मला वाटतं 'आज मी कुठला ड्रेस घालावा' यासारख्याच याही गोष्टी आहेत. अतिशय पर्सनल! त्यामुळे मी काय घालावं याबद्दल बाकीच्यांनी न बोललेले (रादर सूचना/अपेक्षा न ठेवलेल्या) उत्तम.

बाकी कुंकू/, मंसू, जोडवी वगैरे ज्या घालतात त्यांना मी कधीच हसत नाही किंवा तो गावंढळपणा आहे असं जराही मनात येत नाही.
तसंच मी यापैकी काहीही घातलं नाही तर बाकीच्यानीही मला हसू/टोमणे मारु नयेत आणि हाच आधुनिकपणा आहे असंही (कुचकटपणे) म्हणू नये ही अपेक्षा.

आणि त्यातूनही जर वाद घालणार्‍या व्यक्ति भेटल्या (अजूनपर्यंत भेटल्या नाहीत सुदैवाने), उदा. गावी गेल्यावर देवळात जाताना एखाद्या आजींची अपेक्षा असली कुंकू लावणे वगैरे तर मी त्या काही तासांपुरतं तसं करेन असं ठरवलं आहे. याची कारणं
१) अश्या व्यक्तींना कितीही समजावलं तरी अर्थ नसतो. त्यामुळे तो प्रयत्न एक-दोन वाक्यांच्या वर करण्यात मतलब नाही.
२) त्यामुळे आपोआप चर्चा करण्यातला आपला वेळ, शक्ती वाया जाणे व चिडचीड होणे टळते
माझी एक मैत्रिण म्हणायची, 'जर एखाद्या छोट्या गोष्टीने समोरच्याचं समाधान होणार असेल तर आणि त्याने आपलंही फार काही बिनसणार नसेल तर तसं करुन आपलाच मनस्ताप वाचवावा.':)
इथे 'छोट्या' मध्ये कुंकू लावणे, मंसू, जोडवी, बांगड्या घालणे इ. किरकोळ गोष्टी मोडतात. त्यामुळे माझ्या कुंकू लावण्याने आजींना संतोष होत असेल आणि मला फायदा क्र. २ होत असेल तर मी ते करेन.
पण हो अर्थात, हे जर एखादा मोठा काळ करणे अपेक्षित असेल, उदा. गावी १५ दिवस राहिले तर सॉरी, १५ दिवस मी असं नक्कीच नाही असं करु शकणार. . Happy

>>>> मंगळसूत्रला मंगळसूत्र म्हणने देखील सोडले आणि फक्त मसू म्हणायच
आयला, कस्ल अचूक निरीक्षण केलस रे बी! Happy मानल पाहिजे

.

फक्त दिवाळी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी पती बाहेरुन येतो तेव्हा त्याच्या पायावर दूध व पाणी घालते (पुसत वगैरे नाही)>>>>
मुलाची आई सुनेला लक्ष्मीस्वरुप मानते परातीत पाण्यात तिचे पाय धुते, कुंकवाने स्वस्तिक रेखाटतेच शिवाय सुनेच्या कपाळावर चांदीची लक्ष्मी ओल्या कुंकवाने चिकटवते.>>>>
ह्या दोन्ही पद्धती मी आजवर ना पाहिल्यात ना ऐकल्यात. Uhoh

प्रयोग, वरचं पोस्ट चांगलंय. पण ते जर तुम्ही डिलीट करुन स्मायली टाकणार असाल तर टाईप करायचे कष्ट का घेतलेत?

मुलाची आई सुनेला लक्ष्मीस्वरुप मानते परातीत पाण्यात तिचे पाय धुते, कुंकवाने स्वस्तिक रेखाटतेच शिवाय सुनेच्या कपाळावर चांदीची लक्ष्मी ओल्या कुंकवाने चिकटवते
<<< विदर्भात बहुदा सा.पु ला असते ही नाण्यानी कुंकु लावाय्ची पध्दत .
आणि सुनेचे पाय धुणे, स्वस्तिक काढणे हे लग्नातच काय इतर पूजांनाही असते विदर्भात.

रोजचा स्वयंपाक बाईनेच केला पाहिजे, मुलांचे डबे आईनेच भरले पाहिजेत, बाईच्या हाताला कशी चव असते, ती(च) घर कसे टापटिप ठेऊ शकते असे म्हणणारे हेच लो

या लेखिकेने पार्ले बाफवर जे तारे तोडलेले असतात त्याच्याशी सुसंगत वाटत नाही. वेगवेगळ्या बाफवर वेगवेगली मते असू शकतात का?

आणि त्यातूनही जर वाद घालणार्‍या व्यक्ति भेटल्या (अजूनपर्यंत भेटल्या नाहीत सुदैवाने), उदा. गावी गेल्यावर देवळात जाताना एखाद्या आजींची अपेक्षा असली कुंकू लावणे वगैरे तर मी त्या काही तासांपुरतं तसं करेन असं ठरवलं आहे.<<<
अगदी अगदी वर्षा...
यावरून एक आठवण.
आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा गावाकडे गेलो होतो. कसल्या कसल्या पुजा करायच्या होत्या आणि त्यादिवशी रामनवमी पण होती त्यामुळे ऐन एप्रिलच्या रणरणत्या उन्हात साडी, मंसु, कुंकू इत्यादी जामानिमा करून चिपळूणहून निघालो गावी पोचलो. गावाकडच्या देवळातली पुजा, आईंच्या माहेरच्या गावातलं देवांचं दर्शन असं सगळं करून रात्री परत चिपळुणात. साडीचा उत्तम बोळा झाला होता.
दुसर्‍या दिवशी मुंबईकडे परतताना झालेल्या चर्चेत मी म्हणाले की आज एक दिवस म्हणून ठिक होतं पण कायमच गावात साडी नेसून वावरणं मला काही झेपणार नाही. सासर्‍यांचा सूर दिसला की गावाकडे गेल्यावर कायम साडीच नेसायला हवी. नवरा म्हणे कशासाठी सलवार कुडता बरा पडतो की.
त्यानंतर गेल्या वर्षभरात लोकेशनच्या कामानिमित्ताने गावाला जायचा योग आला एकदोनदा. कामासाठी म्हणून बाहेर पडलेले असल्याने ट्राउझर्स- कुर्ता अश्याच वेषात होते. ते कळल्यावर आईच म्हणाल्या की बरंय गावातल्यांना पण सवय होऊदेत अश्या वेषातली सून बघायची. मी सुटकेचा निश्वास टाकला.. Happy

<<<ते कळल्यावर आईच म्हणाल्या की बरंय गावातल्यांना पण सवय होऊदेत अश्या वेषातली सून बघायची. मी सुटकेचा निश्वास टाकला<<<

अगदी अगदी निधप...गावातल्याही लोकांना सवय व्हायला हवी अशा गोष्टींची !माझ्या एका चुलतबहिणीच्या सासरी (जळगाव जिल्ह्यातील एक छोटं गाव आहे), स्त्रीयांनी गावात पाऊल टाकले की चप्पल काढुन ठेवायची . अनवाणी पायांनी आणि डोक्यावरुन पदर घेऊनच गावात वावरायचे असं अजुनही पाळतात. सुनाच नाही तर वयस्क स्त्रीयाही हे पाळतात. उत्तर महाराष्ट्रात ऊन फार म्हणुन डोक्यावर पदर चालु शकेल एकवेळ पण अनवाणी गावात फिरायचे... ???? का? तर पुरुषांना मान म्हणुन!!

परवाच्या "हॉलमधे स्त्रीयांनी मोठ्या माणसांसमोर यायचे नाही...वै.वै." या गोष्टीवर इतका उहापोह होईल अशी कल्पना नव्हती. माझ्या सांगण्याचा मतितार्थ होता की एकवेळ वडीलधा-यांबद्दल आदर म्हणुन ठीक आहे. तो स्त्री-पुरुष दोघांनीही ज्याचा त्याला द्यावा. अगदी सास-याच्या मांडीला मांडी लावुन आम्हीही हॉलमधे बसणार नाही.
मनातुन कितीही पटलेले नसले तरी मोठ्यांचा मान/ मताचा आदर म्हणुन विरोध प्रदर्शीत करायचा नाही....केला तरी तो सौम्य शब्दात करावा. इथपर्यंत ठिक आहे, पण त्यांनीही स्त्रीच्या मताची कदर करायला हवी. पुष्कळदा निर्णयप्रक्रीयेत स्त्रीला सहभागी करुन घेतलं जात नाही. अगदी पुण्या-मुंबैत नसलं तरी नाशिक, औरंगाबाद अशा विकसित /विकसनशिल शहरात ही हे चित्र दिसतं. "तुला काय कळतं त्यातलं? किंवा "तुमची बुद्धी तिकडे किचनमधेच दाखवा" असा अजुनही अविर्भाव असतो....मग ते किचनच्या टाईल्सचं सिलेक्शन असो...कि पडद्यांचं!!!

माझ्या नात्यातला एक पुरुष स्वतः एल आय सी डिविजनल ऑफीसर होता पण बायकोला कधीही तिच्या पसंतीची साडी घेउ देत नसे. स्वतःच एखाच्या साडीच्या दुकानात जायचा .... आणि तर्जनी निर्देश करुन "ह्या ह्या साड्या काढा,आणि पॅक करुन घरी पाठवुन द्या" अशी ऑर्डर सोडायचा. बरं असही नव्हतं की त्याच्या बायकोला काही चॉईस नव्हता....! पण तीही हे कौतुकाने सांगायची....आता काय म्हणावे याला!! ('नवरा-बायकोतील सामंजस्य' किंवा 'ती किती नव-याचा मान ठेवते' वै.वै. अशी गोंडस नावं देतील लोक याला) "गुलामाला जोपर्यंत गुलामीची जाणिव होत नाही तोपर्यंत हे असंच चालायचं....
Sad

बायका नवर्‍याचे पाय फक्त लग्नाच्याच दिवशी धुतात, म्हणून त्याना नवर्‍यातला विष्णू एकच दिवस दिसतो>>> भयान्क विरोधी वाक्य.

लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी या दोघामधेही लक्ष्मी विष्णुचा अंश आहे असे लोक मानतात. आणि हे फक्त लग्नाच्याच दिवशी नव्हे तर इतर वेळेला देखील "लक्ष्मी नारायणाचा जोडा" असे लोक म्हणतातच!!\

साखरपुड्याला किंवा सीमंतपूजनाच्या वेळेला वरमाय होणार्‍या सुनेचे पाय धुते. तिची ओटी भरते. काहीतरी गिफ्ट देते (साडी अथवा एखादा दागिना) पण बहुतेक हल्ली बहुतेक लग्नामधे फक्त वरप्क्षाचेच पाय धुण्याची विचित्र परंपरा आहे. नवरीने नवर्‍याच्या हातात अंगठी अडकवल्याबरोबर नवरीचे साखर्पुड्यामधले काम संपते :)\

हा बीबी फार विचित्र मार्गाने चालला आहे. स्त्रियाना खटकणार्‍या प्रथा फक्त कुंकू लावणे. इतर सौभाग्यचिन्हे वापरणे इतवरच का म्हणून सीमित आहेत??

एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर तिला समाजाकडून काय वागणूक मिळते??
हुंडाबळी ही समस्या किती जणानी पाह्यलेली आहे?? (एखादी स्त्री गॅसचा भडका उडाल्याने ४० ते ५० टक्के भाजलेली असते तरी तिला एखाद्या सरकारी इस्पितळात फेकून तिचे सासूसासरे निघून गेले असतात))
मुलगाच पाहिजे या हट्टासाठी चार पाच गर्भपात करवून घेणार्‍या स्त्रियाच्या शरीराची नंतर काय अवस्था होते याचा विचार केला आहे??
जातीबाहेर लग्न करून नातेवाईकात नाक कापणार्या स्त्रियाना नंतर माहेर आणि सासर दोन्हीकडून काय वागणूक मिळते ते अनुभवलय का??
अजून किती घरामधे "पुरूष" मंडळी जेवल्याशिवाय बायकानी जेवायचे नाही ही पद्धत आहे?
दोन पुरूष आपापसांत भांडत असतील तर त्याना एकमेकाच्या आईच्या व बहिणीच्या जननेंदियाच्या अवयवाचा उल्ल्लेख करूनच शिव्या का द्याव्याशा वाटतात??
किती बायकाना स्वतःचा संपूर्ण पगार नवर्‍याच्या अथवा सासरच्याच हातात द्यावा लागतो?? तसा दिला नाहीतर त्याचे तथाकथित नवरे पब्लिक फोरमवर येऊन स्वतःच्या बायकोविषयी किंवा सर्वच स्त्रियाविषयी कितीही हीन मजकूर लिहित राह्तात. हे याच नव्हे तर इतर कित्येक बीबीवर मायबोलीने पाहिलेलेच आहे!!

स्त्रीने कसे वागावे? काय कपडे घालावे? कशा पद्धतीने घालावे? तिचे नाव काय असावे?? तिने कधी हसावे कधी बोलावे? तिने सर्वासोबत बसून क्रिकेटची मॅच पहावी की पाहू नये?? तिने कधी लोणच्याला हात लावावा अथवा लावू नये हे जरी तसे बघायला गेले फारच क्षुल्लक मुद्दे आहेत!!!

पण तरीही या अशा क्षुल्लक मुद्द्यासाठी देखील इथे हिरीरीने बाजू मांडणार्‍या मुगधा सारख्या स्त्रिया पाहिल्यावर "जाचक" या शब्दाची व्याख्या पुन्हा एकदा पडताळून घ्यावीशी वाट्ते. या साध्या सुध्या बाबतीत जर स्वतःला हवे ते करायचे स्वातंत्र्य नसेल तर मग अख्ख्या आयुष्याचा मार्ग स्त्रीने स्वतःहून आखणं आणि पार पाडणं फार लांबच राहिले की!!!

या अशा व्यक्तिस्वातंत्र्याला जर कुणी "बांडगूळ" म्हणून हिणवत असेल तर त्याच्याकडून इतर स्त्रियावर होणारा अन्याय काय डोंबल थांबवला जाईल??

साखरपुड्याच्या दिवशी जावयाला विष्णूस्वरूप मानून सासरे त्याचे पाय धुतात आणि सासूबाई स्वतःच्या शालूच्या शेवाने त्याचे पाय पुसतात आणि मग पावलावर कुंकवाने स्वस्तिकचिन्ह रेखाटतात. मुलाची आई सुनेला लक्ष्मीस्वरुप मानते परातीत पाण्यात तिचे पाय धुते, कुंकवाने स्वस्तिक रेखाटतेच >>
ही माहिती मलाही गुरुजींनी माझ्या साखरपुड्यात सांगितली होती. आणि आजीनेही.
त्यात मला तरी काही चुक वाट्त नाही किंवा स्त्रीविरोधी ही वाटत नाही. हां, ज्यांना या प्रथाच पट्त नसतील, त्यांनी करु नये. as simple as that. Happy

१) साडी, बुरखा, दुपट्टा, किमोनो अश्या हालचाली करण्यास अवघड वस्त्र प्रावरणांना माझा विरोध आहे. त्याची सक्ती नसावी. आवड असल्यास कधीही आपण हून घालावे.
२) साखरपुडा, लग्न या प्रसंगी महाग हिर्‍याची अंगठी मुलाने मुलीला द्यायची या प्रथेला माझा विरोध आहे. यामुळे
हिर्‍यांची किंमत उगीचच एका वाढविलेल्या लेवल वर राहते. हिरा म्हण्जे खरे तर कार्बन. पण त्या प्रमाणात हिरे उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करून खोदून ते हिरे काढ्ले जातात. कॉन्फ्लिक्ट डायमंड
हे प्रकरण फार भयानक आहे. शिवाय ही महाग अंगठी घेउन मुलीला इम्प्रेस करण्याची मुलांवर सक्ती होते ते बरोबर नाही.

छान दिसतं..आवडतं म्हणुन घाला...
आवडत नसेल तर घालायची गरज नाही.. असं आजकाल सगळीच कडे दिसुन येतं..

माझी आई हे सगळं घालायची..तिचा बांगड्यांनी भरलेला हात, पायातले जोडवे, कपाळावरचं कुंकु..सगळं खुप छान दिसायचं..म्हणुन मला लग्नाआधी पासुनच सगळं घालायची इच्छा होत असे..

ज्याचा त्याचा प्रश्न आहे..>>नंदिनी तू जर मागे जाऊन बीबी वाचलास तर तुला लक्शात येईल की हे मी आधीच लिहीलंय..

- भर उन्हात बुरखा घालून वावरणे.. तो सक्तीचा असणे.
- स्त्रिला बाहेर पडुन काम नं करता येणे.
- लहान मुलगी वयात आली असता एक मोठा कार्यक्रम करणे.
- आई बहीण, बायको कोणाच्याही मतांचा अनादर होणे..
- स्त्रिलिंगी भृणहत्या
- गृहीणी असलेल्या स्त्रियांना कमी लेखणे..(हे पुरुषांकडुन आणि स्त्रियांकडुनही होऊ शकते)
- बायकांना पौरोहित्य नं करता येणे
- काही ठराविक दर्ग्यांमध्ये आणि मंदिरात बायकांना प्रवेष नं मिळणे
- बायकांना त्यांचा बेसिक रिस्पेक्ट नं मिळणे
- अजुनही मुलींना शिक्षण नं घेता येणे..

हे आजच्या जमान्यातले जाच आहेत..(असं मला वाटतं)

केवळ काही रिती (आणि त्या ही क्षुल्लक) कश्या जाचक आहेत ह्याची चर्चा करुन काय फायदा? शेवटी पूर्वजांनी ( कारणाशिवाय/ कारणासहीत) सांगितलेल्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..

आणि व्यक्तीपरत्वे सगळं बदलत असतंच..

प्रश्न आहे लोणच्याचा.. मला एकदा अनुभव आला असं मी म्हणाले ...त्यात काय चुकलं..??

फक्तं भांडुन आणि दुसर्यावर वैयक्तिक कमेंट्स करुन काय फायदा?

नंदिनी तू जर मागे जाऊन बीबी वाचलास तर तुला लक्शात येईल की हे मी आधीच लिहीलंय..>> माफ करा. पण मला आपले हे पोस्ट दिसलेले नाही. कदाचित बीबी खूप भरकटल्यामुळे तसे असेल. आपण या पोस्टचा सन्दर्भ मला देऊ शकाल का???

भर उन्हात बुरखा घालून वावरणे.. तो सक्तीचा असणे. -- माफ करा, हा या बीबीचा विषय नाही. जर कुणी त्या धर्माची व्यक्ती इथे येऊन लिहत असेल तर ठिक आहे, अन्यथा दुसर्‍या धर्माविषयी आपण "सहिष्णु हिंदू" चर्चा करत नाही!!

- स्त्रिला बाहेर पडुन काम नं करता येणे. -- हो, कारण स्त्रीने पुरूष मंडळी दिवाणखान्यात असल्यावर घराबाहेर पडाअय्चं कसं?? त्या वडिलधार्‍या पुरूषाचा अपमान नाही का होणार??

- लहान मुलगी वयात आली असता एक मोठा कार्यक्रम करणे. -- हा एक धार्मिक विधी भारतातल्या काही भागात चालू आहे. यामधे जोवर त्या स्त्रीला अपमानास्पद वागणूक मिळत नाही तवर गैर काहीच नाही. किमान या विधीमुळे तिला स्वच्छता आणि इतर काही "लैगिक शिक्षण" दिले जाते जे तथाकथित "सुशिक्षित" पालक देखील आप्ल्या मुलीना अथवा मुलाना द्यायला कचरतात. अर्थात हल्ली कित्येक ठिकाणी हा विधी वाढदिवस साजरा केल्यासारखा भपकेबाज पद्धतीने साजरा करतात.

- आई बहीण, बायको कोणाच्याही मतांचा अनादर होणे.. -- अनादर होण्यापेक्षाही मत मांडण्यासाठी संधी मिळणे जास्त गरजेचे आहे, हो ना??

- स्त्रिलिंगी भृणहत्या--
- गृहीणी असलेल्या स्त्रियांना कमी लेखणे..(हे पुरुषांकडुन आणि स्त्रियांकडुनही होऊ शकते)
- बायकांना पौरोहित्य नं करता येणे
- काही ठराविक दर्ग्यांमध्ये आणि मंदिरात बायकांना प्रवेष नं मिळणे
- बायकांना त्यांचा बेसिक रिस्पेक्ट नं मिळणे
- अजुनही मुलींना शिक्षण नं घेता येणे..
>>> वरील मुद्दे मला आप्ल्या कुठल्याच पोस्टमधे आढळलेले नाहीत. असल्यास कृपया दाखवून द्या, ही विनंती!!!

प्रश्न आहे लोणच्याचा.. मला एकदा अनुभव आला असं मी म्हणाले आणि लोणचं कुठल्या दुसर्याही कारणाने खराब झाल असु शकतं हे डिस्लेमर मी त्यात दिलंय..त्यामुळे त्याचा एवढा प्रॉब्लेम का झालाय हेच कळत नाही..>>>> तुमचे डिस्क्लेमर नंतरच्या पोस्टमधे दिसला होता. आणि पहिल्या पोस्टमधे तुम्ही फक्त "विटाळशी" असल्याचा उल्लेख केला होता

<<हा बीबी फार विचित्र मार्गाने चालला आहे. स्त्रियाना खटकणार्‍या प्रथा फक्त कुंकू लावणे. इतर सौभाग्यचिन्हे वापरणे इतवरच का म्हणून सीमित आहेत?? >> नाही असे नाहीये. केवळ उदा. म्हणुन माझ्या आयुष्याशी संबंधित गोष्टी वर मी लिहिल्या आहेत. या पेक्षा गंभीर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुढे याव्यात म्हणुनच हा बीबी सुरु केला होत.

माफ करा. पण मला आपले हे पोस्ट दिसलेले नाही. कदाचित बीबी खूप भरकटल्यामुळे तसे असेल. आपण या पोस्टचा सन्दर्भ मला देऊ शकाल का???>> सगळ्या पोस्ट्स नं वाचता केवळ अर्ध्या माहीतीवरुन टीका करणे बरोबर आहे का?

भर उन्हात बुरखा घालून वावरणे.. तो सक्तीचा असणे. -- माफ करा, हा या बीबीचा विषय नाही. जर कुणी त्या धर्माची व्यक्ती इथे येऊन लिहत असेल तर ठिक आहे, अन्यथा दुसर्‍या धर्माविषयी आपण "सहिष्णु हिंदू" चर्चा करत नाही!!>> बीबी चा विषय काय आहे काय नाही हे ठरवणार्या तुम्ही कोण? मुस्लिम धर्मातली स्त्री ही स्री नव्हे का?
बीबी च्या विषयात असं कुठे लिहीलंय की हिंदु स्त्रियांबद्दलच चर्चा हवी?

उगाच कुणालातरी टार्गेट करुन आपलं म्हणणं कसं खरं आहे हे पटवुन देण्यात काय अर्थ आहे?

प्रत्येकाची आवड आणि प्रत्येकाच्या मतांचा आदर करणे हीच बेसिक गोष्ट जर इथल्या स्त्रियांना जमत नसेल..तर जाचाबद्दल चर्चा आणि त्यासाठीचा उपाय करणं तर दूरच राहीलं

मुग्धा माफ करा, पण मला तरी असं वाटतंय तुम्ही खूप कोलांट्या उड्या मारताय.
आत्ता जर तुम्ही इतरांच्या मतांचा आदर करणे वगैरे लिहीत असाल, तर मागच्या काही पोस्ट्स मध्ये व्यक्तीस्वातंत्र्य इत्यादी बांडगुळ आहेत वगैरे भाषा का? Uhoh

मंगळसूत्र नं घातल्याने, कुंकुबिंकु नं लावल्याने, जोडवी नं घातल्याने आणि कुठल्याही प्रकारच्या रुढी/ परंपरा नं पाळल्याने जर स्त्रीला असलेला जाच,निरजा म्हणते त्याप्रमाणे इतक्या लो लेवल वर स्त्री च्या मानसिकतेचे होणारे खच्चीकरण कमी होत असेल तर मग सगळ्यांनीच या प्रथांना झुगारुन द्यायला हवे.

सगळ्या प्रथा रुढी पाळुन..वडीलधार्यांसमोर आपली डिग्नीटी मेंटेन करुन आपले मतं वेगळेपणाने मांडणार्या आणि घरातल्या इतर लोकांना पटवुन देणार्या मुली आहेत अजुन...

त्यांना तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्याच्या बांडगुळाची कधीच गरज भासत नसावी..>>

ज्यांना काही खरंच करुन दाखवायचे आहे त्यांच्या साठी The sky is waiting..

तिथे मग मंगळसूत्र नं घालणे वगैरे गोष्टींचा फरक पडत नसावा. एखादी स्त्री हे सगळं घालत असेल..सगळ्या परंपरा पाळत असेल (आवडीने ) आणि ती आपल्या करीअर मध्ये सक्सेसफुल असेल..असं होऊ शकत नाही का?

>>हा बीबी फार विचित्र मार्गाने चालला आहे. स्त्रियाना खटकणार्‍या प्रथा फक्त कुंकू लावणे. इतर सौभाग्यचिन्हे वापरणे इतवरच का म्हणून सीमित आहेत??<<<
नक्कीच नाही नंदे... पण...
तुझ्याच पोस्टमधे
>>पण तरीही या अशा क्षुल्लक मुद्द्यासाठी देखील इथे हिरीरीने बाजू मांडणार्‍या मुगधा सारख्या स्त्रिया पाहिल्यावर "जाचक" या शब्दाची व्याख्या पुन्हा एकदा पडताळून घ्यावीशी वाट्ते. या साध्या सुध्या बाबतीत जर स्वतःला हवे ते करायचे स्वातंत्र्य नसेल तर मग अख्ख्या आयुष्याचा मार्ग स्त्रीने स्वतःहून आखणं आणि पार पाडणं फार लांबच राहिले की!!! <<
इथे उत्तर आहे.

मुग्धाबाई,
आपण ज्याचा त्याचा प्रश्न असं आत्ता म्हणताय.

>>- भर उन्हात बुरखा घालून वावरणे.. तो सक्तीचा असणे<< भर उन्हातच का कधीही बुरख्याची सक्ती जाचकच आहे. अगदी तशीच जशी विवाहचिन्हांची.
>>- स्त्रिला बाहेर पडुन काम नं करता येणे.<<
बाहेरच्या हॉलमधे सून आली तर मर्यादा ओलांडली जाते. बाहेर पडून काम करणं तर दूरचीच गोष्ट.
>>- आई बहीण, बायको कोणाच्याही मतांचा अनादर होणे..<<
विवाहचिन्हे वापरणे- न वापरणे, व्रतवैकल्ये करणे न करणे, मोठ्याने हसणे, मोठ्यांसमोर बोलणे इत्यादी गोष्टींमधे कोणाच्याच मतांचा अनादर होत नाही का?
>>- गृहीणी असलेल्या स्त्रियांना कमी लेखणे..(हे पुरुषांकडुन आणि स्त्रियांकडुनही होऊ शकते)<<
आता बायांना हॉलमधे यायचीही परवानगी नाही तर अजून काय वेगळं कमी लेखायचंय.
>>- बायकांना त्यांचा बेसिक रिस्पेक्ट नं मिळणे<<
परत वरचंच वाचा.
>>- अजुनही मुलींना शिक्षण नं घेता येणे..<<
ज्या ठिकाणी सुनेला हॉलमधे यायची, मोठ्यांसमोर बोलायची, हसायची परवानगी नसते त्या घरांच्यात निश्चितच मुलींच्या शिक्षणाला दुय्यम लेखलं जातं.

Please Call me by my name.."mugdha"

नी..मी हे आधीच लिहीलं आहे

छान दिसतं..आवडतं म्हणुन घाला...
आवडत नसेल तर घालायची गरज नाही.. असं आजकाल सगळीच कडे दिसुन येतं..

माझी आई हे सगळं घालायची..तिचा बांगड्यांनी भरलेला हात, पायातले जोडवे, कपाळावरचं कुंकु..सगळं खुप छान दिसायचं..म्हणुन मला लग्नाआधी पासुनच सगळं घालायची इच्छा होत असे..

ज्याचा त्याचा प्रश्न आहे

पुन्हा तेच लिहीते..

इथे कुणालातरी टारगेट करुन भांडायची जी पध्दत आहे ती काय नवी नाही... तेव्हा चालू द्या तुमचं..

मुग्धा, तुम्ही जो मुद्दा मांडलाय तोच इथे सर्वजणी मांडतायत. ज्याचा त्याचा प्रश्न/इच्छा. आणि ते सर्वांनाच मान्य आहे!
तुमच्या पोस्टमधल्या काही गोष्ती इथे बर्‍याचजणींना नाही पटल्या (लोणचं,खाली बसणे इत्यादी) म्हणून सर्वांनी त्यावरची मतं मांडली (जशी तुम्ही तुमची मांडताय.) तर त्याला टारगेट करून भांडणे असे का म्हणावे?? Uhoh

मला तरी ह्या चर्चा आवडल्या. बरेच मुद्दे व्यवस्थित मांडले जात आहेत..

ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर मग तुमच्या पोस्टसमधे
विवाहचिन्हे न वापरणार्‍या बायांबद्दल तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्याचे बांडगुळ, आम्ही मर्यादा पाळतो अशी आढ्यता हे सगळं का दिसून येतंय?

"थोडंसं वेगळं" वर दिलेली प्रतिक्रिया इथ copy-paste करतेय. कारण इथेही ती relevant आहे.

--केदार,
जर तुम्ही माझ्या पुढच्या पोस्टस वाचल्या असतील तर मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्शात येइल .
जी सर्व उदाहरणे तुम्ही सान्गत आहत त्यामधे असले (कुन्कू वगैरे) प्रॉब्लेम्स कधिच येणार नाहित >>
तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण या सामाजिक आणि आर्थिक स्तरामध्ये स्त्रीयांना येणारे प्रॉब्लेम्स अजुन वाईट आहेत. ते सांगते:
१. ७-८ लाख पगार आणि मुख्य म्हणजे उत्तम करीअर असणारया मुलींशी लग्न करताना proud feel करणे आणि नंतर मुलाबाळांसाठी त्यांना नोकरी सोडायला भाग पाडणे. ऐकले नाही कि divorce ची धमकी.
२. त्यांच्या पगारतून ४०-५० हजारा चे flat चे emi भरणे आणि तेथे त्यांनी सासु-सासरे नकोत म्हट्ले कि बोम्बा मारणे. पुर्वी मुली सासरी जात. त्या घरी त्यांचे सासु-सासरे राहणार यात काही चुक नाही. तेथे मुलींचे आई-वडील कधीच permanant settle होणार नाहीत हे ही बरोबर च. पण ज्या मुलींना भाऊ नाहित, तरी आई-वडिलांनी केवळ मुली आहेत म्हणुन त्यांना कमी शि़क्षण दिले नाही, अशा मुलींनी स्वत:च्या घामाच्या पैशातुन बान्ध्लेल्या घरात सासु-सासरे नेहमीच राहणार आणि मुलींचे आई-वडील मात्र कधी वेळ पड्ली तरी येउ शकणार नाहीत (कारण ८००-९०० sq ft |च्या घरात इतकी जागाच कुठेय?) मला सांगा हे मुलींनी का म्हणून चालवून घ्याय्चे? आणि नाही घेतले की आहेच "आजकालच्या विदुषि/ स्वैराचार/ कुसंस्कारी माहेर्/व्य़क्तिस्वातंत्र्याची बांडगुळे ई. ई."
३. ह्या मुलींनी घरकामासाठी बाई ठेवावी की नाही इथपासून ते किती मुले आणि कधी व्हावी इथपर्यंत ढवळाढवळ करणारे सासरचे लोक. ( its not generalization, it happens whenever the husband is not able to take firm stand in front of his folks).
४. मुलींना त्यांच्या पगारातून किती पैसा आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांना मदत म्हणुन देता येतो? (अगदी loan basis वरही) तेच मुलांना मात्र त्यांचा पगार त्यांच्या भावाच्या शिक्षणात/ बहीणीच्या लग्नात खर्च करायला कोणी अडवते का? उदा. त्यांचे सासू-सासरे?

वर कोणीतरी विचारलंय्-मुली नोकरी नस्लेल्या/कमी पगाराच्या मुलांशी लग्ने का करत नाहीत? त्याचे कारण हे वर विचारलेल्या प्रश्नात दडले आहे. त्यांनी मरमर राबून/ office politics, stress सहन करून जर पैसा कमवला तर त्यावर हे आयत्या बिळावर नागोबा बस्णार त्याचे काय? आणि हो, घरकामात तो नवरा पुर्ण responsibility घेणार नाहीच. मग मुलींनी अशी लग्न का करावीत?

वर मांड्लेले problems हे माझे wild imagination आहे असे क्रुपया कोणी समजू नये. मी व माझ्या अनेक मैत्रिणींनी face केलेले खरेखुरे problems आहेत ते. जिथे समजुतदार नवरे असतात तिथेच हे problems उद्भवत नाहीत. पण असे समजुत्दार, मुलींना ही equal मानणारे मुलगे हे अजुनही rare breed आहेत आपल्या "महान" "संस्क्रुती" मध्ये.

ता.क.: शुद्ध्लेखना च्या चुका आणि विषयांतर झाले असल्यास क्षमस्व. अगदीच राहवले नाही म्हणून लिहिले.

नंदिनी | 27 March, 2010 - 10:59 नवीन
बायका नवर्‍याचे पाय फक्त लग्नाच्याच दिवशी धुतात, म्हणून त्याना नवर्‍यातला विष्णू एकच दिवस दिसतो>>> भयान्क विरोधी वाक्य.

लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी या दोघामधेही लक्ष्मी विष्णुचा अंश आहे असे लोक मानतात. आणि हे फक्त लग्नाच्याच दिवशी नव्हे तर इतर वेळेला देखील "लक्ष्मी नारायणाचा जोडा" असे लोक म्हणतातच!!\

साखरपुड्याला किंवा सीमंतपूजनाच्या वेळेला वरमाय होणार्‍या सुनेचे पाय धुते. तिची ओटी भरते. काहीतरी गिफ्ट देते (साडी अथवा एखादा दागिना) पण बहुतेक हल्ली बहुतेक लग्नामधे फक्त वरप्क्षाचेच पाय धुण्याची विचित्र परंपरा आहे. नवरीने नवर्‍याच्या हातात अंगठी अडकवल्याबरोबर नवरीचे साखर्पुड्यामधले काम संपते \

हा बीबी फार विचित्र मार्गाने चालला आहे. स्त्रियाना खटकणार्‍या प्रथा फक्त कुंकू लावणे. इतर सौभाग्यचिन्हे वापरणे इतवरच का म्हणून सीमित आहेत??

एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर तिला समाजाकडून काय वागणूक मिळते??
हुंडाबळी ही समस्या किती जणानी पाह्यलेली आहे?? (एखादी स्त्री गॅसचा भडका उडाल्याने ४० ते ५० टक्के भाजलेली असते तरी तिला एखाद्या सरकारी इस्पितळात फेकून तिचे सासूसासरे निघून गेले असतात))
मुलगाच पाहिजे या हट्टासाठी चार पाच गर्भपात करवून घेणार्‍या स्त्रियाच्या शरीराची नंतर काय अवस्था होते याचा विचार केला आहे??
जातीबाहेर लग्न करून नातेवाईकात नाक कापणार्या स्त्रियाना नंतर माहेर आणि सासर दोन्हीकडून काय वागणूक मिळते ते अनुभवलय का??
अजून किती घरामधे "पुरूष" मंडळी जेवल्याशिवाय बायकानी जेवायचे नाही ही पद्धत आहे?
दोन पुरूष आपापसांत भांडत असतील तर त्याना एकमेकाच्या आईच्या व बहिणीच्या जननेंदियाच्या अवयवाचा उल्ल्लेख करूनच शिव्या का द्याव्याशा वाटतात??
किती बायकाना स्वतःचा संपूर्ण पगार नवर्‍याच्या अथवा सासरच्याच हातात द्यावा लागतो?? तसा दिला नाहीतर त्याचे तथाकथित नवरे पब्लिक फोरमवर येऊन स्वतःच्या बायकोविषयी किंवा सर्वच स्त्रियाविषयी कितीही हीन मजकूर लिहित राह्तात. हे याच नव्हे तर इतर कित्येक बीबीवर मायबोलीने पाहिलेलेच आहे!!

****************************************************

बायकोने सगळा पगार आपल्याच हातात द्यावा म्हणून भांडणारा नवरा या मायबोलीने पाहिलेला आहे...... कोण बरं हा? नंदिनीबाई, ओपन चॅलेंज स्वीकारा आणि त्याचं नाव डिक्लेअर करा..............

हां, सगळा पगार माहेरीच देणार असे म्हणणार्‍या बायकोला विरोध करणारा एक पुरुष मात्र मला माहीत आहे... आणि तो म्हणजे मी स्वतः आहे............... नवर्‍याचे घर म्हणजे काही लेडीज हॉस्टेल नव्हे, सगळा पगार माहेरीच द्यायचा असेल तर बाईने लेडीज हॉस्टेलवर रहावे, एवढेच तर माझे म्हणणे, आणि या म्हणण्याला मला एकाही वकिलाने विरोध केलेला नाही. शरीर नवर्‍याकडे ठेवायचे आणि सगळे मन , सगळा पैसा मात्र माहेरी... कायद्याला व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने असले स्वातंत्र्य अपेक्षित आहे का? हा माझा प्रश्न योग्य त्या कायदेशीर मार्गाने मी विचारलेलाच आहेच .... त्यामुळे आता बाकी कुणाला काय वाटते, याची चिंता मला करायचे कारणच नाही.... या प्रकरणाचा पुढील भागही इथेच एक दिवस लिहिनच....

बायकोचा सगळा पगार नवर्‍याच्याच हातात दिला जाणे आणि बायकोने तिचा सगळा पगार माहेरीच का द्यायचा म्हणून भांडणारा नवरा... हे दोन्ही एकच नव्हे एवढे तुम्हाला समज्ले तरी पुरेसे आहे....

बायकोचा पगार या विषयावर हा बीबी गेला तेंव्हाच खरं तर मी हे लिहिणार होतो, पण म्हटलं आणखी वाद नकोत, पण आता पुन्हा एकदा विषय आलाच ऐरणीवर तर आता गप्प का बसा? धन्यवाद!! Happy

माझा पगार माझ्या बायकोपेक्षा किती तरी जास्त आहे... त्यामुळे बायकोला आणि तिच्या दोन रिकामटेकड्या , तरुण, धडधाकट, सुशिक्षित आणि विवाहीत बहिणीना माझ्या बायकोचा पगार हा माझ्या घरात अनावश्यक वाटतो!!!! म्हणून त्याना तिचा सगळा पगार हवा आहे!!!! Proud कुठला कायदा घरात जास्त पैसा ठेवायला बंदी घालतो? बरं, पैसा जास्त आहे, हे त्यानी कसे ठरवले, मी तर त्यांची बॅलन्स शीट्स पाहिलेली नाहीत, आणि त्यानीही माझे डॉक्युमेंट्स पाहिलेली नाहीत... बरं, पैसा जास्त आहे, म्हणून द्यायचा म्हणे, मग माझ्या बायकोला त्यानी कमी पगाराचा नवरा का नाही शोधला?

चांगल्या पगाराचा नवरा स्वतः शोधायचा आणि नंतर तुझ्या घरात एवढा पैसा कशाला, म्हणून मी माझा सगळा पगार माहेरी/विवाहीत बहिणीना देणार म्हणून भांडायचे , ही कसली स्त्रीमुक्ती? बायकोला चांगल्या पगाराचा नवरा हवा असतो, मग नवर्‍याने तीच अपेक्षा ( अपेक्षा हा शब्द आहे, सक्ती नव्हे!, पुन्हा नस्त्या वादाच्या कोलांट्या नकोत.. ) बाळगली तर त्यात त्याचा गुन्हा काय?

(जाड ठशात त्या बहिणींचे वर्णन आहे, ते नीट वाचावे..... 'अशा' व्यक्तीला दुसर्‍याकडून पोटगी मागायचा अधिकार नसतो, असे कायदा सांगतो..... सुशिक्षित, धडधाकट, तरुण बायकोला कित्येक केसेसमध्ये नवर्‍याकडून पोटगी घ्यायला कोर्टाने विरोध केलेला आहे... ... )

राहिला प्रश्न या गोष्टी मायबोलीवर लिहिण्याचा.... माझ्याबाबत जे घडले, तसे इतरांबाबत घडू नये, घडत असेल तर यातून काही मार्ग मिळावा , एवढ्याच इच्छेने हे मी लिहित असतो. यात कुणी कुणाला बदनाम करण्याचा प्रश्न येतोच कुठे? व्यक्तीचे नाव, त्यांची आयडेंटिटी हे न लिहिता तांत्रिक मुद्दे आणि घटनाक्रम यावर भर देऊन मी याबाबतचे पोस्ट्स लिहिलेले आहेत. तेंव्हा नवरा बायकोला बदनाम करायला मायबोलीवर येतो, असे कुणी म्हणायचा प्रश्न येतोच कुठे?

दोन पुरूष आपापसांत भांडत असतील तर त्याना एकमेकाच्या आईच्या व बहिणीच्या जननेंदियाच्या अवयवाचा उल्ल्लेख करूनच शिव्या का द्याव्याशा वाटतात??

इथे 'दोन पुरुष' हा मुद्दा अतिशय अनावश्यक आहे...... बायकादेखील बायकांशी, पुरुषांशी भांडताना असेच करतात........ Happy ... मग, 'दोन पुरुष' असा मुद्दाम उल्लेख का बरे केला?

( आता याचा आधार घेऊन, 'तुम्ही पुरुषाना बदनाम करायला मायबोलीवर येता', 'तुम्ही पुरुषद्वेष्ट्या आहात,' असे मी म्हटले तर चालेल का? )

माफ करा. पण मला आपले हे पोस्ट दिसलेले नाही. कदाचित बीबी खूप भरकटल्यामुळे तसे असेल. आपण या पोस्टचा सन्दर्भ मला देऊ शकाल का???>> सगळ्या पोस्ट्स नं वाचता केवळ अर्ध्या माहीतीवरुन टीका करणे बरोबर आहे का? >>> कशावरून आपणाला असे वाटले की मी सर्व पोस्ट्स वाचलेल्या नाहीत?? मला तो स्पेसिफिक संदर्भ आढळला नाही. असे मी म्ह्टलेले आहे. कृपया सन्दर्भ द्याल का?? दिलात तर मी स्वतः ते पोस्ट डिलीट करेन.

भर उन्हात बुरखा घालून वावरणे.. तो सक्तीचा असणे. -- माफ करा, हा या बीबीचा विषय नाही. जर कुणी त्या धर्माची व्यक्ती इथे येऊन लिहत असेल तर ठिक आहे, अन्यथा दुसर्‍या धर्माविषयी आपण "सहिष्णु हिंदू" चर्चा करत नाही!!>> बीबी चा विषय काय आहे काय नाही हे ठरवणार्या तुम्ही कोण? मुस्लिम धर्मातली स्त्री ही स्री नव्हे का?
बीबी च्या विषयात असं कुठे लिहीलंय की हिंदु स्त्रियांबद्दलच चर्चा हवी?>>>> मुग्धा. इथे लिहिणार्‍यापैकी कुणीही मुस्लिम स्त्री नाही (असे आपण मानू, कुणी असल्यास कृपया लक्षात आणून द्या). त्यामुळे "मुस्लिम स्त्रीने" बुरखा घालावा की घालू नये (उन्हात किंवा सावलीत) हे आपण कसे ठरवू शकतो???? तुम्हाला तुमच्याच धर्मातील अत्यंत क्षुल्लक प्रथादेखील योग्य वाटतात तर तुम्ही इतर धर्मातील बायकाबद्दल लिहिणे हेच इथे हास्यास्पद आहे!!!! लक्षात घ्या.. की तुमच्या मुद्द्यामधे हा पहिलाच मुद्दा तुम्ही नमूद केलाय. तुम्हाला "विटाळशी" बाईने लोणच्यात हात घातलेला चालत नाही तर तुम्ही इतर धर्मातील स्त्रियासाठी काय करणार आहात??? बीबीचा विषय "लोणचे टिकवणे" हा नव्हता, मग तुम्ही तरी तो मुद्दा कसा मांडलात बुवा???

मुग्धा, इथे वैयक्तिक टीका करण्याचे वास्तविक कारण काहीच नाही, पण तुमची मते पोस्टगणिक बदलत आहेत, त्यामुळे जर सर्व्जण तुम्हाला उद्देशून लिहत असतील तर त्याला नाईलाज आहे!! तुमची मते क्लीअर करा आणि मगच लिहा, की म्हणजे कुणाचेच कन्फ्युजन होणार नाही!!!!

किती बायकाना स्वतःचा संपूर्ण पगार नवर्‍याच्या अथवा सासरच्याच हातात द्यावा लागतो?? तसा दिला नाहीतर त्याचे तथाकथित नवरे पब्लिक फोरमवर येऊन स्वतःच्या बायकोविषयी किंवा सर्वच स्त्रियाविषयी कितीही हीन मजकूर लिहित राह्तात. हे याच नव्हे तर इतर कित्येक बीबीवर मायबोलीने पाहिलेलेच आहे!!

हे माझ्या पोस्टमधील वाक्य आहे.


बायकोने सगळा पगार आपल्याच हातात द्यावा म्हणून भांडणारा नवरा या मायबोलीने पाहिलेला आहे...... कोण बरं हा? नंदिनीबाई, ओपन चॅलेंज स्वीकारा आणि त्याचं नाव डिक्लेअर करा..............

हे जागोमोहनप्यारे याच्या पोस्टमधील वाक्य आहे!!

वरील दोन वाक्यातला विरोधाभास इतर वाचकानी ध्यानात घ्यावा. बाकी जामोप्या तुमचे उरलेले पोस्ट मी वाचलेले नाही पण त्यात काय लिहिले असेल याचा अन्दाज आलाच.

कोणतरी एक मन्दार जोशी वॉशिन्ग डर्टी लायनेन इन पब्लिक असे या बीबीला म्हणत होता. आता जामोप्या याचे पोस्ट म्हनजे "धोबीतलाव" झाल्यासारखे वाटत नाही का??

ताक. मी येते चार दिवस माबोवर येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. बीबी बंद झालाच तर माझ्यासाठी कुणीतरी स्क्रीन शॉट घेऊन ठेवा, ही विनंती!!!!

Pages