मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"वेंधळी बायको पाहिजे"
अट कशाला ? ते तर इम्प्लिसिट आहे.. Proud कोन्त्याही नवर्‍याला विचारा.. बायको वेंधळीच आहे म्हणेल तो... Wink

माझ्या जिमच्या बिल्डींगच्या जिन्यात खाली शेवटच्या पायरीवर १ कुत्र असतं आणि रोज ते मी घरी जायच्या वेळेला झोपलेलं असतं (संध्या ७ वाजता). परवा मी निघाले घरी जायला आणि नेमके लाईट गेले, बर्‍यापैकी अंधार होता, मी अगदी सावकाश जिना उतरत गेले पण ते कुत्र नेमकं १ पायरी अलीकडे येउन झोपलं होतं आणि मी त्याच्या पायावर पाय दिला Sad मी प्रचंड घाबरले आणि पटकन त्या कुत्र्याला सॉरी सॉरी (खरचं २ वेळा) म्हणाले Proud

मंजे Rofl
बरं केलस सॉरी म्हणालीस ते,तसंही कुत्र्यांना ईंग्लीशच समजतं. Proud
बादवे,कुत्रा होता ना जिवंत तुझं सॉरी सॉरी ऐकायला Lol

म्हंजे... Lol तु सॉरी म्हंटलं की आता कुत्रा आठवनार... Lol

हो होता ना जिवंत.. लगेच निघुन गेला बिचारा
मग काय तु दुसरा पाय ठेवायची वाट पहायला हवं होतं का त्याने.. Proud

मंजे.. Rofl Rofl
Its alright !! असे म्हणाले नाही ना ते

मंजे Lol

एक किस्सा माझा पण आज दुपारचाच... boss बरोबर असेच काहितरि drawing discuss करत होतो त्याच्या desk वर आणि माझ्या desk वरचा माझा mobile वाजला, boss ने त्याच्या landline वरुन call pull केला आणि receiver माझ्या हातात देत म्हणाला - Speak here...

मंजे अगदी अगदी. मीपण कुत्र्यांना कायम मराठीत काहीही समजावून सांगते व ते ही काय बाइ आहे असे बघतात.

आज मोबाइल चा अलार्म लावला व तो बंद केला तरी १० मिनिटाने परत वाजत होता. मुलीला तसे म्हण्ल्यावर ती म्हणे अग वाजेलच तू स्नूझ वर ठेवलायस ना येडे! Happy

आताच एटीम मधे जाऊन आले...४०० चा आकडा टाकुन ओके करणार तेवढ्यात सिक्युरिटी वाल्याने सांगितलं की १०० च्या नोटा नाहीयेत. तो आतल्या रुम मधुन बाहेर पडत होता. त्याल ओके म्हटलं ४०० चे ५०० केले..नोट बाहेर आली ती घेउन बाहेर पडले. ७-८ पाऊलं चालुन गेल्यावर एक ग्रुहस्थ मागुन हाका मारीत आले...आम्ही दंग गप्पांमधे...ते काय बोलले ते थोडावेळ पोहोचलेच नाही डोक्यापर्यंत. फक्त एटीम मधे काही तरी राहीले म्हणून जाऊन बघितले तर लॉगीन सकट कार्डं तसेच आतमधे. नशिब ते ग्रुहस्थ खरोखर चान्गले होते. त्यांचे आभार मानुन आजुबाजुला न बघता छू: कारण तो पर्यंत तिकडे असणार्या सगळ्यांना कळंला होता माझा वेंधळेपणा...अजून मनाला चुटपूट लागून राहिलीय कि दुसरा कोणी गइरफायदा घेणारा असता तर...

माझ्या नवर्‍याच नाव सुमीत. तर त्याच्या ग्रुप मधल्या एकाच लग्न होत. तो बाहेर गेला असल्यामुळे लग्न अटेंड करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. लग्नाच्या हॉल मध्ये त्याच्या मित्र - मैत्रिणींबरोबर मी गप्पा करता करता आमच्या लग्नाचा विषय सुरु झाला. मि पटकन म्हणाले "आरे तुम्ही तर आला होता ना सुमीतच्या लग्नाला??". सगळे नुसते पोट धरुन हसायला लागले. आता जेव्हा केव्हा आम्हि भेटतो तेव्हा मि परमनंट बकरा मिळालेली आहे सगळ्यांना.

माझे वडील कुत्र्यांना जाम घाबरतात,आणि ती अंगावर येऊ लागली की काकुळतीने त्यांना 'का रं बाबा, का असं करतोया' असं म्हणतात.कुत्र्यांशी मराठीत प्रेमाने बोलले तर ती मवाळ होतात अशी त्यांची थिअरी आहे.

पटकन त्या कुत्र्याला सॉरी सॉरी (खरचं २ वेळा) म्हणाले >>> सॉरी म्हणायची काय गरज होती , उलट त्याने तुला सॉरी म्हंटलं पाहीजे , चुक त्याची होती ना Lol

एकदा माझे पुण्याच्या शिक्षण उपसंचालकांच्याकडे (डी.ई.)काम होते. त्यांच्या ऑफिसला जाताना सोबत माझ्या सर्व सर्टिफिकेट्सची फाईलही होती. अपॉईन्टमेन्टला बराच वेळ होता. पोटपूजेसाठी म्हणून वाटेतील लक्ष्मीरोडच्या अगत्य रेस्टॉरन्टमध्ये गेले. जाडजूड मेन्यूकार्ड चाळून काय मागवायचे ते ठरविले. अचानक एक सर्टिफिकेट बरोबर घेतले की नाही ते आठवेना, म्हणून पुन्हा कॅरी बॅगमधून फाईल काढली व तपासले. सर्टिफिकेट जागेवरच होते. हुश्श करून फाईल बंद करते तोच माझी खाण्याची ऑर्डर आली. घाईघाईत फाईल, पिशवी, पर्स, मेन्यूकार्ड टेबलाच्या एका बाजूला दिले ढकलून आणि खादडन्तीला सुरुवात केली.
खाणे संपेपर्यंत आपल्याला उशीर होतोय हे ध्यानी आल्याने टेबलवरच बिलाचे पैसे ठेवले, वेटरला ते घेऊन जायची खूण केली आणि सर्व सामानसुमान उचलून मी डी. ई. च्या ऑफिसच्या रोखाने....
वाटेत ट्रॅफिक जॅम, चुकलेली लेन वगैरे घोळ घालत ऑफिसमध्ये पोचले तेव्हा माझ्या अपॉईन्टमेन्टला कशीबशी दोन-तीन मिनिटे शिल्लक होती. नशीबाने त्या दिवशी तिथे गर्दी नव्हती. शिपायाने लगेच डी.ई. साहेबांकडे पाठवले.
साहेबांनी बसायची खूण केली व माझी फाईल बघायला मागितली. मोठ्या ऐटीत मी त्यांना फाईल काढून दिली. त्यांनी फाईल उघडली तर आत अगत्य रेस्टॉरन्टचे मेन्यूकार्ड आरामात विसावले होते. क्षणभर मला काही सुचेचना, मग 'ओह्ह...सॉरी सर...." करत मोठ्या ओशाळ्या चेहर्‍याने मी ते पटकन त्यांच्यासमोरून उचलले व माझ्याकडच्या कॅरीबॅगेत टाकले!! माझा चेहरा नक्की बघण्यासारखा झाला असणार! Sad
पुढची काही मिनिटे मला अक्षरशः लाजेने मेल्यासारखे झाले होते!
काम आटोपून घरी परत येताना मुकाट्याने अगत्यपाशी रिक्षा थांबवली आणि तिथल्या काऊंटरवरच्या माणसाला "हे घ्या तुमचं मेन्यूकार्ड" म्हणून माझ्या बॅगमधील ते दुष्ट कार्ड काढून दिले.
तो अवाक होऊन पहातच राहिला. मोठ्या शरमलेल्या चेहर्‍याने मी गर्रकन माघारी वळले आणि इकडेतिकडे न बघता घरी परत आले....
अजूनही मला कधीकधी डी.ई. साहेबांचा गोंधळलेला चेहरा नजरेसमोर दिसतो... आणि मी निघताना त्यांच्या चेहर्‍यावरचे ते सूक्ष्म हास्य! Wink

एकदा एक शेअर होल्डर काही कामासाठी माझ्याकडे आली. ती काही पेपर्स दाखवत होती. मी तिला आणखी काही अ‍ॅप्लिकेशन लिहायला सांगितले. तितक्यात माझे लक्ष गेले की माझा मोबाईल टेबलवर होता. नेहमी मी तो ड्रॉव्हर्मध्ये ठेवते. आत ठेवाय्ला उचलला तर त्याचा मेसेज बॉक्स ओपन दिसला. त्यात मला अगम्य मेसेजेस दिसले 'तुझा व्हिजा आलाय', 'अमुक तमुक येऊन गेला का?' 'माझी वाट पाहू नको'. मी प्रचंड गोंधळले.... पाच मिनिटापुर्वी असे काहीच नव्हते... अचानक हे इतके सगळे मेसेज कुठून आले, हे कोणाचे नंबर्स मी सेव्ह केले आहेत..... तितक्यात ति शेअर होल्डर म्हणाली की माझा मोबाईल आहे. तेव्हा ट्यूब पेटली की तिचा माझा मोबाईल सेम होता. ती इतका वेळ माझ्याकडे रागारागाने बघत होती Happy

मग मी तिला माझा मोबाईले दाखवून खुलासा केला Happy

अमि Lol

Rofl

त्यांनी फाईल उघडली तर आत अगत्य रेस्टॉरन्टचे मेन्यूकार्ड आरामात विसावले होते >>> Happy Happy

अरुंधती Rofl

सध्या हापिसात खुप काम आहे, त्यामुळे घरी निघायला रोज उशिर होतो. काल असच उशिर होत होता म्हणुन कॉम्पुटरवरची एकेक अ‍ॅप्लिकेशन्स बंद करत होते. माझ्या डेस्क्वर दोन स्क्रिन्स आहेत. त्यातला दुसरा स्क्रिन पण मी कर्सरनेच बंद करायचा प्रयत्न केला.... Proud

काल घरी कधी नव्हे ते हापिसच काम घेऊन गेले होते. रात्री बसुन लॅपटॉपवर काम पुर केल. सकाळी हापिसात आले डब्बा ऑन केला आणि लॉग इन होण्यासाठी कर्सर शोधायला कीबोर्डवर तर्जनी फिरवायला लागले मग लक्षात आले इथे माऊस वापरायला लागतो Happy

<<तसंही कुत्र्यांना ईंग्लीशच समजतं >> आशु Lol Rofl
मला एकदम पाळिव प्राणी मधला संवाद आठवला...
आय अ‍ॅम गोईंग आऊट बरं का रे मॅकमिलन.... अरे काय हे लिव्ह माय पदर, लिव्ह माय पदर.. Rofl

Rofl Rofl

आय अ‍ॅम गोईंग आऊट बरं का रे मॅकमिलन.... अरे काय हे लिव्ह माय पदर, लिव्ह माय पदर.. >>>>>>>>>दक्षे, नशिब ब्रिटीश आता नाहित नाहीतर सगळ्यांनी आत्महत्या केल्या असत्या Lol
(आय अ‍ॅम गोईंग आऊट बरं का रे मॅकमिलन.... .>>>> स्व. सुधीर जोशींच्या ढंगातलं वाक्य वाटल हे)

वैभव, तुम्ही पु ल देशपांडे यांचे पाळीव प्राणी हे कथाकथन ऐकले नाही का ? त्यातले संवाद आहे ते.

स्व. सुधीर जोशींच्या ढंगातलं वाक्य वाटल >>>>>>>>हे म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की 'चोरीचा मामला' मध्ये सचिन पिळगावकरला ते "मी जरा बाहेर जाउन येतो बरं का रे गौतम " म्हणायचे ते आठवलं आणि वरिल वाक्य वाचल्यावर डोळ्यासमोर तरळले एवढ्च बाकी काही नाही. (विषय थोडासा बाजुला नेल्या बद्दल क्षमा करा) चला कंटुनी की कंटीनु Uhoh ......अरे काय म्हणतात ते करा

Pages