Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देवा, मला पाव!!!!!!!
देवा, मला पाव!!!!!!!
कवे मल्ली
कवे

मल्ली
कवे पण तु प्रयत्न चांगला
कवे
पण तु प्रयत्न चांगला केलास चित्र काढण्याचा 
चित्र??? कोलाज म्हण लाजो
चित्र??? कोलाज म्हण लाजो
कोलाज
कोलाज
काल पहिला पाडवा म्हणुन सासरी
काल पहिला पाडवा म्हणुन सासरी गेलेलो. सगळेच चेहरे नविन होते (काही अपवाद वगळता
). शांत बसायचं माहीत(च) नाही त्याचा हा परीणाम. इकडे तिकडे पाहीले तर समोरच्या सोप्यावर एक माणुस एका लहान मुलीला घेउन बसलेला. गुड्डी असे काहीतरी बडबडताना मगाशी ऐकलेले म्हणुन तिला मी हाक मारले "ये गुड्डी इकडे ये..." पन काही केल्या ति रियाक्षन देइना..
मग तिकडून मेहुणुआने ओरडुन सांगितलं.... भावजी, तिच्या मम्मीचे नाव गुड्डी आहे...
आणि ती 'ती' नसुन 'तो' आहे.. 
नंतर कळ्ळे की तो माणुस त्या बाळाचे आजोबा नि 'गुड्डी' चे सासरे होत
मनातल्या मनात त्या माणसाला शिव्या घात्ल्या....
मल्ल्या लेका असा वेंधळापणा
मल्ल्या

लेका असा वेंधळापणा इथेच बर्याच लोकानी केलेला आहे.. जरा वाचत जा ..
मल्ल्या तु काय 'रोज एक
मल्ल्या
तु काय 'रोज एक वेंधळेपणा करायचाच' असा नविन वर्षाचा नेम केलायस का? तुझ नाव बदलुन 'वेंधळेबापु' ठेवल पाहिजे 
मल्ल्या , लाजो
मल्ल्या , लाजो
तु काय 'रोज एक वेंधळेपणा
तु काय 'रोज एक वेंधळेपणा करायचाच' असा नविन वर्षाचा नेम केलायस का?
अन तेही नंतर कळतं की आपण काहीतरी वेगळं/चुकीचं केलं म्हणुन.. 
हटे... उलट आज कसला वेधळेपणा करायचं नाही म्हंटलं की काहीतरी झालेलं अस्तंच...
मल्ली नशीब गुड्डीला गोड गोड
मल्ली नशीब गुड्डीला गोड गोड पापा नाही मागितलास
मल्ल्या, श्री
मल्ल्या, श्री
श्री...
श्री...

(No subject)
मल्ली, लाजो, श्री
मल्ली, लाजो, श्री

मल्ल्या बोर झाला तुझा
मल्ल्या बोर झाला तुझा वेंधळेपणा नविन काहीतरी (माकडचेष्टा) कर आता..
मल्ल्या बोर झाला तुझा
मल्ल्या बोर झाला तुझा वेंधळेपणा >> अगदी अगदी दक्षे.. , मल्ल्या आता काहीतरी हटके कर
मल्ल्या आता काहीतरी हटके कर
मल्ल्या आता काहीतरी हटके कर

काल घरी कॉन्फरंसला मिळालेले
काल घरी कॉन्फरंसला मिळालेले भिंतीवरचे घड्याळ उघडले. डिजायनर की काय म्हणतात तसे होते. उघडत असताना मी म्हणाले... "व्वा.. भारिच आहे की.. काटा पण थर्माकोलचा आहे".. लेक माझ्याकडे पहायला लागला
काट्यावरचे पॅकींग होते ते थर्माकोलचे
व्वा.. भारिच आहे की.. काटा पण
व्वा.. भारिच आहे की.. काटा पण थर्माकोलचा आहे >>>
वर्षे लेकाला विचारून बोलत जा.
वर्षे लेकाला विचारून बोलत जा. याच स्वभावामुळे तुला कुठे नेत नाही तो
सात-आठ वर्षांपुर्वीची गोष्ट
सात-आठ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. आम्ही तेव्हा फिरोजपूरला होतो. आमचा एक मित्र, जो एअरफोर्समध्ये आहे, आग्र्याला होता. तो व त्याची बायको आम्हांला नेहमी आग्र्याला बोलावत असत. तेव्हा एका मार्च महिन्यात आम्ही चार दिवसांसाठी त्यांच्याकडे गेलो. जातानाही पंजाबमेलनी गेलो आणि येतानाचेही पंजाब मेलचे आरक्षण केले होते.
चार दिवस मजा करून आम्ही परत निघालो. सगळं सामान घेऊन स्टेशनवर पोहचलो. पंजाब मेल कोणत्या प्लॅट्फॉर्मवर येते ते विचारायला मी चौकशी खिडकीवर गेले. तर तो म्हणाला," गाडी चार नं.वर आहे." तेव्हा ४.२५ वाजत होते. गाडीची वेळ ४.५५ होती. म्हणून मी म्हणाले," आज गाडी लवकर आलेय का?" तर तो म्हणाला," नाही. उलट लेट झाली आहे. ती बघा निघाली." मी गाडी समोरून जाताना बघितली. मला काही कळेना. मी पटकन येऊन नवर्याकडून तिकीट घेऊन चेक केले तर त्यावर गाडीची वेळ ४.१५ होती. मला कळेना असं कसं झालं. नीट बघितलं तर तिकीटावर तिकीट काढल्याची जी वेळ होती ती होती ४.५५.
माझ्या वेंधळेपणामुळे आमची गाडी चुकली होती.
वर्षा, प्राची भारीच आहेत
वर्षा, प्राची भारीच आहेत किस्से!
प्राची, माझा एकदा असाच घोटाळा झालेला! तिकिटावर जी तारीख होती त्याबरोबर जी वेळ होती ती १२.३० PM.
आणि मी ते त्याच्या दुसर्या दिवसाचे तिकिट समजून त्या रात्री प्रवासास निघाले. एकाच बर्थवर दोन-दोन माणसे कशी ह्याचा छडा लावताना झालेल्या घोळाचा पत्ता लागला! बरं, रात्री-बेरात्री मधेच कुठे उतरताही येईना! मग काय! भरला दंड, दिले टीसी ला जास्त पैसे आणि मिळवला एक बर्थ कसाबसा!!
काटा पण थर्माकोलचा आहे...
काटा पण थर्माकोलचा आहे...

एकदा आम्ही मुंबई हून बँकॉक ला निघालो होतो. तिकिटात रात्री १२.०५ अशी फ्लाईट ची वेळ असल्यामुळे तारीख बदललेली होती..आम्ही दुसर्या दिवशी निघायचे म्हणत आरामात घरी बसलो होतो. आठेकवाजता पुन्हा एकदा सहज तिकिटावर नजर टाकली आणी अक्षरशः दणाणली..कारण तारीख जरी उद्याची असली तरी एअरपोर्टवर मात्र आज रात्रीच ९ पर्यन्त पोचायचे होते..मग काय जी धावपळ उडाली एकदम..धडपडत (आणी आपल्याच वेंधळेपणा चा राग करत!!) पोचलो एकदाचे वेळेवर..
अरे..मी माझा किस्सा
अरे..मी माझा किस्सा टायपेपर्यन्त अरुंधती चा सिमिलर किस्सा आला... व्हॉट अ कोइन्सीडंस
थर्माकोलचा काटा..
थर्माकोलचा काटा..
आज सकाळ्च्याला च्या बनवली.
आज सकाळ्च्याला च्या बनवली. तोंडात टाकताच थुंकली. मला वाटलं दूध खराब झालं कि काय. कॅनवरची डेट बघितली तर अजून आठवडा होता एक्स्पायर व्हाय्ला. म्हणून नवीन भांड्यात परत चहा बनवला, परत तेच, परत थू थू... मग डिटेल अॅनालिसिस केली तेव्हा लक्षात आल कि साखर म्हणून मीठ टाकलं चहात. काय करणार, साखर आणि मीठ यात visible difference नाहीयं ना इकडे
अरे..मी माझा किस्सा
अरे..मी माझा किस्सा टायपेपर्यन्त अरुंधती चा सिमिलर किस्सा आला... व्हॉट अ कोइन्सीडंस
ग्रेट पीपल आल्वेज थिन्क अलाईक ! हाकानाका?
एक मात्र खरे . त्या रेल्वे प्रवासाचे तंत्र मलाही काही कळत नाही बुवा. बस आणि रेल्वे असा पर्याय असेल तर मी नेहमी बसने जातो . कितीही अन्तर असले तरी. एक तर पहिल्यान्दा त्या रेलवेचा विषिष्ट वास डोक्यात घुसला की आठ दिवस त्याची 'धुन्दी' उतरत नाही.पुनन्हा ते वेटिंग अन अगेन्स्त कन्फर्मेशन वगैरे वगैरे . मला सारखे वाटत असते की माझे अधिकृत तिकीट देखील टेक्निकली काहीतरीच्झूक आहे असे दाखवून टीसी मला दन्ड करणार, उतरवून देणारवगैरे. ते वेटिंग लिस्ट्वरचे रिझर्वेशन म्हनजे जीव टांगणीला . मला कोणी धीर देईल का?
मला कोणी धीर देईल का? >>>
मला कोणी धीर देईल का? >>> टोणगा एवढी भिती वाटत असेल तर खरचं रेल्वेने प्रवास करु नकोस , बघ दिला की नाही धीर .
मी आप्ला आब्रूदार माणूस त्या
मी आप्ला आब्रूदार माणूस त्या टीसीने तिकीट पाह्यला मागितले तर तो ओके करीपर्यन्त माझ्या जीवात जीव नस्तो. मागे दिल्लीला जाताना मध्यप्रदेशात डाकू सारखे दिसणारे पोलीस डब्यात आले. इकडे तिकडे संशयाने पहात डब्याच्या ह्या कडेपासून त्या कडेपर्यन्त ते गेले . ते तर मलाच शोधीत असल्यासारखा फील मला आला. (दुसर्या डब्यात काही मंडली दारू पीत बसली होती. त्यांच्याकडून त्यानी ती दारू जप्त केली आणि स्वतः तिसर्या डब्यात जाऊन पीत बसले ! (म्हणे !))
Pages