मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरूणा, कामं जरा कमी करत जा हापिसात...
चष्मेवालीपासून दूर बसत जा बरं... तिचा वाण आणि गुण दोन्ही घेण्यासारखं नाही Proud

मल्ल्या Rofl

आत्ताच केलेला वेंधळेपणा -- घरुन डबे घेऊन येणार्‍यांसाठी ऑफिस कँटिनमध्ये रिकाम्या डिश असतात. ती घेऊन जेवण झाल्यानंतर हातातील डिश ठेवण्यासाठी dish disposal counter ऐवजी dish serving counter वर परत घेऊन गेलो. मित्राने अरे हे काय करतोस असे विचारताच भानावर येऊन परत डिश नेऊन ठेवली. हा प्रकार कुणि कुणी पाहीला ते आता थोडया वेळातच कळेल. Sad

काल माझा बॉस भोसरी ऑफीसला कधी नाही ते कार घेऊन आला. दिवसभरच्या मिटिंगा, काम आवरुन ५.३० ला कंपनीच्या गाडीत बसून घरी ! घरी गेल्यावर बायको म्हणाली बाहेर जायचय तर हा पठ्ठ्या पार्कींगमधे कार शोधतोय !! Lol

दीपूर्झा यात तुमचा वेन्धळेपणा काय्?बीबी चे नाव मी केलेला वें.प. आहे . बॉसने अथवा बायकोने , मित्राने केलेला नाही. थोदक्यात इथे कबुली अपेक्षित आहे. तुम्ही तर इतराना बावळट ठरवताहेत. Proud

साडी डे चे फोटो डेस्कटॉप वर सेव्ह केलेले. ते पहात होते. मधे मधे पण काम पण चालूच. एक इश्शू रिपोर्ट करताना स्क्रीन शॉट ऐवजी सरळ फोटो अपलोड केला. वर नोट पण टाकली screen shot attached. Sad

पने... Rofl

पने.. Lol
काही इश्श्युज इथे सुद्धा टाक.. आम्हीही डेव्हलपर आहोत हाडाचे.. Proud इश्श्युचं होत्याचं नव्हतं करायला वेळ लागत नाय काय..... केद्या बरोबर ना रे ? Wink

<<< वर नोट पण टाकली screen shot attached
Lol Lol

आयला पने, बॉस म्हणाला नै की आता 'जिन्स डे' साजरा करुया.. Uhoh

. केद्या बरोबर ना रे >> आयुष्यात पहिल्यांदा डेव्हलपर म्हणाला असेल... अजून issues असतील पाठव पटकन Proud

पने Rofl

ग्रूप फोटो होता लाजो Proud
केद्या Proud दुर्दैवाने माझ्या नशीबी डेव्हलपरीण आलीय रे. होळी च्या XX मारत आली दोन्ही हातानी.
आधीच आडवा विस्तू जात नाही आमच्यातून.

आयुष्यात पहिल्यांदा डेव्हलपर म्हणाला असेल... अजून issues असतील पाठव पटकन
केद्या.. असले इश्श्य्ज नकोय्त का तुला ? Proud

Proud अशक्यच!

बीबी चे नाव मी केलेला वें.प. आहे .. बॉसने अथवा बायकोने , मित्राने केलेला नाही. >>
हुड साहेब, तुम्हीच या बाफ वर तुमच्या अतिवरिष्ठ अधिकार्‍यांचा किस्सा टाकला होता मागे.. Proud
http://www.maayboli.com/node/7293?page=20

आता वरच्या पोस्ट ला तुमचा वेंधळेपणा म्हणावे की काय ? Proud Light 1

अहो केदारनाथ ते पोस्ट केल्यानन्तर माझ्या लक्शात आले की इथे स्वतःचा वेंधळेपना टाकायचा आहे.

झक्कीबोवा कॉलेजात असताना त्यांच्या कॉलेजात 'बनियन डे' 'लंगोटी डे ' वगैरे साजरे होत असत....'

एक से एक किस्से आहेत सगळे.

एक माझा किस्सा. सात वर्षापुर्वी ईथे आले तेव्हा नवीन देशाची नवलाई, नवीन लग्न वगैरे मध्ये मग्न होते. एकदा मी आणि नवरा बाहेरुन घरात येऊन पाच सात मिनीटे झाली असतील तोच फोन वाजला. नवर्‍याने घेतला. तिकडुन पोलिस ऑफिसर बोलत होता. आमची गाडी ठीकठाक आहे ना विचारत होता. नवरा म्हणाला हो, आम्ही आत्ताच बाहेरुन आलो, गाडी ऑफ स्ट्रीट पार्क केली आहे. तो म्हणाला एकदा गाडी बघुन या. नवरा मला म्हणाला गाडी ठीक आहे ना ते बघ आणि मला गेट वरच्या इंटरकॉम वरुन सांग. मी घाबरले त्याला म्हणाले नको आपण दोघे जाऊन बघु, मला वाटतय पोलिसाचा फोन आहे म्हणजे नक्कीच काहीतरी झाले आहे गाडीला (बाँब ठेवल की काय कुणी गाडीत? असे वाटते आहे) नवर्‍याने पोलिसाला सांगितले की बघुन येतो, तु परत फोन कर प्लीज. मग आम्ही दोघे रस्त्यावर आलो. या बाजुने तर गाडी ठीक वाटत होती. मग नवर्‍याने गाडीभोवती चक्कर मारली आणी हसत सुटला. मग माझ्या लक्षात आले की मी उतरल्यानंतर माझ्या बाजुचा दरवाजा उघडाच ठेवुन आले होते आणी कोणीतरी गाडी उघडी असल्याचे रीपोर्ट केले आणी पोलिसाने गाडीच्या नंबरवरुन आमचा फोन शोधुन आम्हाला फोन केला होता!

आज सकाळी हाटेलात एका बोरिन्ग हॉल मध्ये एकट्याने बसून नाष्टा करायचा कंटाळा आला म्हणून हॉटेलच्या पायातच अर्चना रेस्टॉ. आहे तिथे जावे असे ठरविले. छोटी पर्स मोबाइल व पेपर घेउन तंद्रीतच चालत गेले. वाटेत मोठ्या पिश्व्यात ब्रेड भरून ठेवले होते ते बघून काय सकाळी सकाळी कामे करतात मुंबैकर असा काहीतरी विचार करत पायर्‍या चढून गेले तर ठ्णण्ण! कपाळ मोक्षच झाला. हाटेलाचे शटर अर्धेच उघड्ले होते. मग कपाळ चोळत चोळत आता इथे नाष्टा मिळेल का असे विचारले. त्यांनी दया येवू न बसविले एकाठिकाणी.
मला दक्षिणेतील हाटेलाची सवय. पहाटे सहा पासून मस्त पोंगल वडा, इड्ली अन काय काय मिळते.
तो मुम्बैकर वेटर म्हणतो कसा!
उपमा? नाही. सेट दोसा ? नाही. मग काय निमुट पणे इड्ली मागवली व गिळली.
तोपरेन्त त्यांनी शटर पूर्ण उघड्ले. परत जाताना वर बघत बघत उतरताना पायरी चुकतच होती आल्मोस्ट.
वेटर मागे फिदी फिदी हसत असणार.

मामी Lol

काल मी आणि लली निघालो शिवडीला "bnhs च्या फेल्मिंगो वॉच प्रोग्रॅमला" कुर्ल्याला भेटुन हार्बरची ट्रेन पकडली. वडाला नंतर शिवडी अस म्हणत गप्पा मारत होतो. मधेच दोघींना साक्षात्कार झाला हे येणार स्तेशन तर शिवडी नव्हे तोपर्यंत गाडी स्टेशनात शिरली, आणि आम्ही तिघी (मी, सानु आणि लली) लगबगीने खाली उतरलो. इकडे तिकडे पाटी शोधतोय पण आमच्या नजरेच्या टप्प्यात पाटिच नव्हती. आम्ही उतरलो ती गाडी समोरुन हलली तेव्हा सओरच्या प्लॅटफॉर्मवर पाटी दिसली "वडाला" Proud आम्ही एकमेकिंकडे बघितल आणि हसतच सुटलो. विश्वेश मागच्या गाडीने येणार होता, तो नेमका मोबाईल घरी विसरला होता. पब्लिक बुथ वरुन त्याने मला फोन करुन विचारल कुठे आहात. पुढे न जाता शिवडी स्टेशनलाच थांबा माझ्यासाठी. मला काही एक बोलता येत नव्हत आम्ही हसतच बसलेलो. म्हंटल ये तू आम्ही शिवडीलाच वाट बघु तुझी. (नंतरच्या बांद्रा गाडीला खरतर कोणालाही विचारायची गरज नसताना दोन दोन वेळा कन्फर्म करुन चढलो) आणी एकदाचे शिवडीला दाखल झालो

रच्याकने हे पक्षी (फ्लेमिंगोज) ग्रूपने (पाट्याही न वाचता) कच्छ पासुन इतपर्यंतचा प्रवास न चुकता कसा करतात काय कळत नाही बॉ Happy

कवे Lol

तु आणि ललि एकत्र प्रवास म्हणजे ही अपेक्षितच आहे Proud सानु मोठी झाली की तिच नेइल तुम्हाला सुखरुप.

सानु मोठी झाली की तिच नेइल तुम्हाला सुखरुप.
आता कोण नेलंय असं वाटतंय.. Proud
आणि हा किस्सा मी फोन केला तेव्हा संपुष्टात आला होता का कवे ?

Pages