मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल नवरोबांनी पेपरात काहीतरी सेल वगैरेची ऑफर वाचून मला विचारले,
" आपला कूकर प्रेस्टिजचा आहे की 'हॉर्लिक्स्'चा?" Happy
मला एक मिनिट कळलेच नाही.
लक्षाट आल्यावर त्यांना म्हटले
"दुधात 'हॉकिन्स' घालून प्या... मग लक्षात येईल" Happy

माझ्यासुद्धा पुढचं वाचेपर्यन्त लक्शात आलं नव्हतं. आता घ्या!! Proud

" आपला कूकर प्रेस्टिजचा आहे की 'हॉर्लिक्स्'चा?"
क्षणभर मलाही हे वाक्य झेपले नाही.... यात काय चुकीचं आहे... सगळं बरोबर तर आहे वाटलं.. Lol

काही महिन्याखाली महाराष्ट्रात परतल्यावर नविन मोबाईल नंबर घेतला,आणि तोच वापरुन 'हा माझा नविन नंबर,सेव्ह करा, हरवलात तर खबरदार इ.इ.' आशयाचा मेसेज सगळ्या ओळखीच्यांना पाठवला,
फक्त खाली माझे नाव लिहायचे राहिले होते Happy
अर्थात जे मला खरचं 'ओळखून' आहेत त्यांनी 'गाढवा, नाव कोण टाकणार रे *****' वगैरे रिप्लाय केलाच Happy

एकन्दर मायबोलीवर हॉकिन्सला प्रचन्ड खप आहे . मार्केटिंगवाले इकडे लक्श देतील काय?>>>>
================================================
दुधाचा पण ... ("दुधात 'हॉकिन्स' घालून प्या... मग लक्षात येईल") मी दुधाची एजंसी घेतोच कसें ... Happy Happy Happy Happy

अवांतरः
=====

हॉकिंस की सीटी बजी............. खुशबू ही खुशबू उडी...........
मजेदार लज्जतदार, खाना है तैयार, हां जी खाना है तैयार ...

जो बीवी से सचमुच करें प्यार, वो प्रेस्टीज से कैसे करें इनकार ...

आज एकाच वेळी २ लॅप्टॉप वर काम करत होतो. एका ctrl-c केलं आणि दुसर्‍या लॅप्टॉप वर ctrl - v करुन पेस्ट करायचा प्रयन्त केला Happy
असचं एकदा मी माझ्या ऑफिस च्या मॉनिटरवर गणपतीची मूर्ती ठेवली होती आणि मित्राला स्क्रीन शेअर करून ती दाखवायचा प्रयन्त करत होतो Happy

१९९१ ची गोष्ट... पहिल्यांदाच धुळ्याहुन आत्याकडे विमाननगरला सुट्टीत आलेलो! आतेबहीणी-भाऊ सगळे बरोबरीचे...त्यामुळे धम्माल करायचो! एकदा मोठा आतेभाऊ आम्हा सर्वांना बसने पुण्यात आणत असतांना येरवड्याचा पुल क्रॉस केला की उजवीकडे ( मला वाटते रुबी हॉलच्या पुढे) Kailas Lodge नावाची बिल्डींग आहे (अजुनही असावी). तिथुन जातांना आमच्यातल्या एकाचे डोके चालले.. "यार हे कैलास लोडगे काय असेल? मालकाच नाव अस बिल्डींगला कस देतील?" त्यावर बराच खल झाला, अनेक विचारांची देवाण-घेवाण झाली अन मग एकाच्या डोक्यात ट्युब पेटली ,अरे, ते लॉज आहे!!!!

हूडा, शिवाजीनगर अख्खं खोदून ठेवलय. समाध्या सापडल्या नाहीत बहुतेक!! पण अपार्टमेंट्स उठनार वीस पंचवीस. थिबा राजाची एक नात होती टूटू म्हणून. तिला मात्र आम्ही लहानपणी पाह्यलय.
(तू रत्नागिरीत हे संशिधन करायला आला होतास का?)

काल घराला कुलुप आहे माहीत असुनहि मी घराचि बेल वाजवत बसले. मग लक्शात आले कुलुप आहे ते

आत्ताच सा.बां.शी फोनवर बोलत होते. त्यांचे पाय खूप दुखतात. त्या म्हणाल्या "बाटांनी डॉक्टरच्या चपला घ्यायला लावल्या दिड हजारांच्या".

मी आता ऑफिसातुन येताना काय काय सामान आणायचय याची यादी नवर्‍याला मेल करत होते, त्यापुर्वी परेशशी बोलत होते आणि लगेच मेल करायला घेतली. त्याच वेळी मेधाचा फोन आला. परेशबद्दलच बोलण झालं आणि मी मेल सेंडणार तेवढ्यात लक्षात आलं की मेल करायची आहे ते हे लिमये नव्हेत.
चुकुन ती मेल परेशला जाणार होती. Sad

वाचला परेश
नाहीतर कोथिंबीर ,आलं आणि असं बरच काय काय किराणा सामान घेऊन यायला लागलं असतं त्याला Proud

तो पण वेंधळेपणाने हे सगळं घेउन स्वतःच्या घरी गेला असता आणि बायकोची बोलणी खात बसला असता.

ऑफीसमध्ये onsite ला गोर्‍यांना आमची team कशी दिसते ते पहायचे होते.

आमच्या ग्रुप मधल्या एकाला desktop sharing चे application नव्यानेच माहित झालेले. तो म्हणला काय सोपा आहे की, आपले प्रतिबिंब मॉनिटवर, तो बंद केला कि दिसते.

म्हणुन त्याने हि पध्दत सांगितली
१ - desktop sharing चालु करायचे.
२ - मॉनिटर बंद करायचा
३ - एवढे केले की आपण तिकडे दिसु shared screen वर.

आज सकाळी ऑफिसला आवरताना हाताला लावण्यसाठी कोल्ड क्रीम घेतले.
गडबडीत थोडं हाताला लावलं आणी उरलेलं डोक्याला चोळलं... Uhoh अजुन वास येतोय डोक्याला त्याचा.. Sad

मल्ल्या तू बरा रे, मी बरेचदा गडबडीत खो.तेल लावलय तोंडाला. Sad

स्लीप ऑफ टंग का काय म्हणातात तो तर पाचवीला पुजलेला.
तिखट कांडायला गेल्यावर म्हणाले " कसे कुलो किटता तिखट?"
आज घरी "टंघोळीला अंगळ मंगळ करू नकोस".
कोल्ड्रिंक घेताना " मी स्पिरिट घेणार आहे".
सगळ्याना हसायला कारण. परमनंट बकरा Sad

पनू याला स्पूनरिजम का कायसेसे म्हणतात. तू वाक्ये जमव मग आपण एक विनोदी सिनेमाचे स्क्रिप्ट लिवू.

Lol पने....

पनु, Biggrin भाग्या.. कुठल्याश्या हिन्दी सिनेमात मेहमूद पूर्ण सिनेमाभर प्राईस टॅग लटकत असलेला गॉगल लावून हिंडत होता,तुझा किस्सा वाचून तू तश्शीच डोळ्यासमोर आलीस Proud

Pages