मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय अ‍ॅम गोईंग आऊट बरं का रे मॅकमिलन.... अरे काय हे लिव्ह माय पदर, लिव्ह माय पदर.. > Lol दक्शे.... मी तुला इमॅजिनलं असं म्हणताना.,...

Rofl

Rofl Rofl

आज मी सकाळी सानुची शाळेची बसची वगैरे घाईत एका कानात एका रंगाचा खडा नी दुसर्‍यात दुसर्‍या रंगाच्या खड्याच कानातल घातल. साडेसातला घर सोडल तेव्हा पासुन सव्वा दहा पर्यंत कोणीच बोलल नाही Sad ऑफिसमधे मैत्रिणीच्या डेस्क वर गेले तेव्हा तिच्या लक्षात आलं Sad

पुण्यात शिकत असतानाचा एक किस्सा,माझे काही रुमपार्टनर्स स्वत:चे इंग्रजी सुधरायच्या मागे लागले होते त्यामुळे प्रथेप्रमाणे टाईम्स आणून वाचणे आणि डिक्शनरीत अर्थ पाहणे जोरात चालले होते,मी त्यातल्या त्यात जरा बरा म्हणून मला एखादा शब्द माहिती नसला की ह्यांना कोण आनंद. एके दिवशी रुमवर आल्याआल्या त्यांनी मला, 'आज आम्ही दोन शब्द वाचले ज्याचा अर्थ डिक्शनरीतपण नाही,आणि तुला पण माहित नसणार' असं सुनावलं आणि पेपर दाखवला. ती दोन वाक्य अशी होती; 'Indian team has come to Vizag' आणि 'Pullela Gopichand in superb form' आणि हे वीर विचारतायत,'माहिती आहे तुला विझाग आणि पुल्लेला चा अर्थ?'
ह.ह.पु.वा झालं मला. Proud

आज मी सकाळी सानुची शाळेची बसची वगैरे घाईत एका कानात एका रंगाचा खडा नी दुसर्‍यात दुसर्‍या रंगाच्या खड्याच कानातल घातल.<<< नो प्रॉब्लेम कविता इथे अमेरिकेत आजकाल फॅशन आहे तशी तु चुकुन केलेस इथे मुद्दाम करतात्..मोजे सुध्दा वेगवेगळे घालतात,

साडेसातला घर सोडल तेव्हा पासुन सव्वा दहा पर्यंत कोणीच बोलल नाही

>>
अहो तुमच्याकडे कोण लक्ष देतय. बायकाना उगीच वाटतं लोकांचं आपल्याकडं लक्ष असतं म्हणून.

ऑफिसमधे मैत्रिणीच्या डेस्क वर गेले तेव्हा तिच्या लक्षात आलं

अखेर **का त्या **काच ! Proud

आजचा किस्सा :
दोन दिवसा पूर्वि आमचा ऑफिस चा बस चा छोटा अपघात झाला. त्यात मला गुडघ्या ला लागल.
आज ऑफिस ला आले तर एका मुलिने विचारले : "How is your knee now?"
अस्मादिक उत्तरले : "Repair(?) हो गया है", जस काही कुठला spare part आहे.

माझा नित्य सवयीचा वेंधळेपणा :
डोळ्याला चष्मा आहे हे विसरून तसेच तोंडावर पाण्याचे हबके मारणे (फायदा असा की चष्माही आपोआप धुवून निघतो!), आणि चष्मा काढून ठेवला तरी तो घातला आहे असे समजून नाकावर सावरायला जाणे....बरेचदा ह्या प्रक्रियेत मी स्वतःच्याच डोळ्यात बोट खुपसलेले आहे! Happy

आत्ताचा किस्स.... Sad
साबांना संध्याकाळी ६ वा. पुणे स्टेशन वरुन आणायचंय म्हणुन सकाळीच दापोडी स्टेशनला जाउन लोकल्सचे टाईमिंग्स पाहुन आलेलो.. ५.४६ ची पकडून जाता येईल म्हणुन ऑफिस मधुन डायरेक्ट ५.३० ला दापोडी स्टेशन ला गेलो तर सवारी जाताना दिसली Sad मनात विचार केला, ही पॅसेंजर वेगळी असेल. आणी गाडी पार्क करुन वेळापत्रक परत पाहीले, ५.४६ ची लोकल कन्फर्म केली नि तिकिट काढले. तिकिट दिल्यावर त्यांनि सांगीतलं की लोकाल एक तासाने आहे. Uhoh मी म्हणालो आहो ते ५.४६ ची कॅन्सल झाली का ?
ते: नाही, येणारेय ती.
मी. मग तुम्हीच तर म्हणालात ना एक तासाने आहे.. मग ?
ते: अहो, ५.४६ ची पुणे-लोनावळा आहे, तुम्हाला स्टेशनला जायचंय ना... Angry

मग जाउन निट परत वेळापत्रक पाहीलं.. मी वेळापत्रक चुकीचंपाहीलं होतं सकाळी... आणी आत्ता सुद्धा Sad
लोनावळा-पुणे कॉलम सोडुन, पुणे-लोनावळा कॉलम पाहीलेला...
मग काय, लोकलचं तिकिट घेउन (आणी पार्किंगची भुर्दंड भरुन) माझ्यच गाडीने स्टेशनला गेलो...
रागा रागने प्लॅट्फोर्म तिकिट न काढताच घुस्लो.. आणी येताना टिश्याने का पकडु नये... Sad
तेवढ्यात (नशिब) मला काढलेल्या तिकिटाची आठवण झाली... मग निभवुन गेलं.. Proud

मल्ल्या, अरे साबांवर एवढी का खुन्नस? साबांची ब्याद नको म्हणून तुझ्या वेंधळेपणाचे कितीही पुरावे केलेस तरी बायकोला तुझे कावे बरोब्बर कळतील. Wink

साबांची ब्याद नको म्हणून तुझ्या वेंधळेपणाचे कितीही पुरावे केलेस तरी बायकोला तुझे कावे बरोब्बर कळतील.
कळतील ? आता घरी गेल्यावर आहेच तु-तु मै मै.. साबांना गेटवरच सोडुन आलोय, ऑफिसला यायचं होतं लगेच म्हणुन... बायकोला कळ्ळं असेल तिकीट पाहुन आता पर्यंत... Proud

आता घरी गेल्यावर आहेच तु-तु मै मै >>> मल्ली फक्त १ वे असेल ना , मै मै Proud तु तु ला काही चान्सच नसेल .

आत्ताचा किस्स.... >> Rofl मल्ल्याचा लेटेस्ट वेंधळेपणा

मल्ली Proud

Lol

Rofl

मल्लि, तुमच्यामुळे इथे बाकीच्यांना संधी मिळत नाहिये वेंधळेपणा करायला.
माझा किस्सा सांगते.
परवा ऑफिसच्या लिफ्टसमोर उभी राहुन अस्मादिक अ‍ॅक्सेस कार्ड दाखवत बसल्या होत्या लिफ्टच्या बटणाला. :अओ:, २-३ सेकंदानी लक्षात आल्यावर अगदी Blush झाल. नशीब त्या वेळेस तिथे कोणी नव्हत, सिक्युरिटी गार्डपण नेमका कुठेतरी गेला होता त्या वेळेस (हुश्श!!!)

माझा लेटेस्ट, ताजा ताजा, खुसखुशीत वेंधळेपणा!!!!!!!!! ऐका$$$$$$$$$$

ऑफिसमध्ये ४थ्या मजल्यावर काही कामानिमित्त गेले होते. लिफ्टमधुन येताना मी ९व्या मजल्याच बटण दाबल आणि मोबाइलशी खेळत होते. लिफ्ट थांबली आणि मी बाहेर आले, बाहेर येउन बघते तर काहीच ओळखीच वाटत नव्हत. मग लक्षात आल की मी ९ ऐवजी ८व्या मजल्यावरच आले होते. मग चेहर्‍यावर असे भाव आणले की मी इथे कोणाची तरी वाट बघत आहे आणि कोणाच लक्ष नाही अस बघुन पटकन जिन्याने वरती आले.

गेल्या आठवड्यातील गोष्ट.

बायको गावावरुन परत घरी परत आली. (हा वेंधळेपणा नव्हे... तो पुढे आहे .......... Lol )
घरात ४-५ दिवस मी एकटाच असल्याने दुधवाला, केरवाला, भांडीवाली सगळ्यांना सुट्टी होती.
कॉफी करायची म्हणून बायकोने मला बाहेरच्या किराणावाल्याकडुन दुध घेऊन यायला सांगितलं.
अस्मादिक कधी नव्हे ते हो म्हणाले आणि दुकानात गेले. (न जाउन सांगतो कोणाला???? मला पण कॉफी प्यायची होती............ Happy )
किराणावाल्याकडे गेल्यावर मी सांगितलं " १ लिटर दुधाची पिशवी दे".
किराणावाल्याने विचारलं "म्हशीचं ना ??????????? "
"नाही नाही, चितळ्यांचं" इति अस्मादिक
किराणावाला माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघु लागला ................. Rofl

Pages