मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल दुपारि नवरा फिश टॅक साफ करत होता , मी जेवण करत होते , भाजी झालिच होति गॅस विझवणार इतक्यात नवर्‍याने हाक मारलि थोड मिठ घेवुन ये , चांगल मुठ भर मिठ घेतल उजव्या हातात आणि डाव्या हातने गॅस बंद करणार होते तोवर सगळ ठिक होत क्षणात काय झाल कुणास ठाउक डाव्या हाताने गॅस बंद करण्याएवजी भाजि च्या भांड्यावरच झाकण काढ्ल आणि मुठ भर मिठ टाकल, टाकल आणि त्याक्षणि लक्षात आल अरे हे काय केल , पण तोपर्यत मिठ भाजीत !

कवे लली, मग पक्षी दिसले का?

खारट्ट भाजी थंड?......... आता मासे म्हणतील सरकार मैने आपका नमक खाया है!
परवा आठवणीने रात्री सामानात चश्मा ठेवला. सकाळी शोधाशोध. तो कसला सापड्तोय. मग दुसरा एक धुरकट जुना चश्मा आहे तो घालूनच मुम्बैची ट्रिप पार पडली. आता चश्मा हरवला म्हणून वाईट तोंडाने काल सामान आवरत होते तर तो सापड्ला नीट कोपर्‍यात ठेवलेला. चश्मे भुंकत का नाहीत बरे? म्या तरी काय काय विसरायचे!

अग अश्वे लक्षात आल्या बरोबर मि च मट्कन खालि बसले म्हट्ल आता परत काय भाजि करु , मस्त मासे केले होते ग, तोपर्यंत मिठ गेले विरघळुन!

हो ग मासे वाया गेले की फार्फार वैट वाट्ते. अनुमोदन. अहो रागवले का? तूच उखडायचेस नाहीतर हे काय मी स्वैपाक करताना तु अस्ली कामे करतोस म्हनून.

मंजे कहि नाहि निमुट पणे नवरा काहि बोलायच्या आत दुसरि भाजि करायला घेतली , हि मिठ का घेवुन येत नाहि म्हणुन बोंबलत किचन मध्ये आल्यावर त्याला प्रकार कळ्ला आणि नेहमि प्रमाणे ' पंधरा वर्शे झाली लग्नाला पण ह्या बाईचा वेंधळे पणा काहि जात नाहि " हे प्रेमळ बोल एकुन घेतले

चश्मे भुंकत का नाहीत बरे?

>>
मामी भयानक हसलो. किमान चष्म्याना मिस कॉलची रिंग देण्याची तरी व्यवस्था पाहिजेच..

लाजो Biggrin

तूच उखडायचेस नाहीतर हे काय मी स्वैपाक करताना तु अस्ली कामे करतोस म्हनून.

त्याला अटक पूर्व जामीन म्हणतात... Happy

नाहीतर म्हणायचंस की तूच का नाही मीठ घेवूनच काय ते करायला बसलास? एक काम धड करत नाहीस Proud

हूड, महिला दिन स्पेशल.

ते पर्तूनी येतो बीबीवर एक इंडिगोचा किस्सा टाकलावताना तिथेही मला लिहायचे होते.
महिला प्रवासीने क्लच पर्स पैसे व डेबिट कार्ड चेकिन सामानात ठेवले. कारन बायका व लॉजिक/ कॉमन सेन्स म्हणजे दूरान्वयाने ही संबंध येत नाही पण सगळे उखड्तील म्हणून नाही लिहिले.

वाचक दिवे घ्या हो. रागवू नका महिला मंड्ळी.
फेमिनाइन लॉजिक ला ऑक्सीमोरॉन म्हणतात. वदतो व्याघात!

थंड, मामी Rofl

काल काही दिवसानंतर गाडी बाहेर काढली ...२-३ वेळा वाटलं चाकात हवा कमी आहे, म्हणुन गेलो ,त्या दुकानातल्या पोरानं हवा कमी केली ...कारण मुळातच ज्यास्त होती ...

<<< काल दुपारि नवरा फिश टॅक साफ करत होता >>> <<< मस्त मासे केले होते >>> फिशटँकमधले मासे केले होते की काय ? Proud Light 1

अनील Happy

आजचा दिवस नुस्ता गडबडीत चाल्लाय...
आज सकाळी आंघोळ करताना डोक्याला शँपु च्या ऐवजी फेस वॉश लावला Uhoh
मघाशी ऑफिस मध्यल्या विशाल नावाच्या मित्राला फोन लावायचा होता...
फोन लावल्यावर त्याने कट केले.
मग थोड्यावेळाने त्याचा कॉल आला. तो माझ्या कडुन एक वस्तु घ्यायला येणार होता म्हणुन केव्हा येतो विचारलं. तो म्हणाला लवकुश बरोबर बोलणे झालंय, माझं यायचं कॅन्सल झालं. Sad
अरे पण सर तर म्हणाले होते तु लगेच येनारेस, त्यान्चा दोन्दा फोन येउन गेला...
हो, सरान्चेच काम आहे, त्यान्चे सिमकार्ड मी उद्या आनुन देणारे....... विशाल..
सरान्चे काम ? अरे काम माझं आहे. आणि सिम चा का संबंध ?.. मी.

एक्द्दम क्लिक झाले, मी चुकुन एअरटेल मधल्या विशाल ला फोन लावलेला कीकॉय म्हणुन.... Uhoh तो मोस्टली आमच्या कंपनीतील एअरटेल ची सर्वीस हँडल करतो...
मग सगळा गोधंळ लक्शाअत आला... :फिदि:

वर्षे घे टाकतेय बाई माझा वेंधळेपणा Wink Proud

वर्षाची मला विपु
12 March, 2010 - 12:44
रेसिपी पाहिली मंजुच्या विपुत.. तु सांगितल्या प्रमाणे .. आता ब्ल्यु/ ग्रिन कोरॅको पाव म्हंजे काय ते ही सांग
------------------------
माझा तिला रि.

तू गंमत करत्येस ना वर्षु Proud
पाव ग्लास म्हणजे १/४ भाग १ ग्लासच्या.
फोटो टाकतेय कट्ट्यावर बघ आता
------------------
तिचा पुन्हा रि.

कवे Rofl

मला ब्ल्यु/ ग्रिन कोरॅको म्हणजे काय ते हवे होते .. मंजुने सांगितले Proud
-------------------------------
पुन्हा मी

तरिही इमेल चेकच आता. मी किती मेहनत घेतलेय Wink Proud

आणि ही मी घेतलेली मेहनत

mocktail.jpg

कवे Proud

काल संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना, गाडी सुरू केली, चालवत ऑफिसच्या गेटाबाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर बॉनेटपुढे नीट पाहिल अन् वाटलं "आज बॉनेटपुढे खूपच अंधार आहे नै?". थोडं पुढे गेल्यावर हेडात (डोक्यात) लाईट पडला - आपण हेडलाईटच लावलेले नाहीत.

Pages