मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडसं खोकल्याचं औषध घेतलं<<<<<<<<नक्की कोणतं औषध घेतलंस खोकल्याचं समजून लब्बाड Proud

>>>>>>>>बिच्चारे 'अहो' (हे खर म्हणजे पिवळा पितांबर सारखे )
हिहिहिहिहि!!!!!!!!!!!!

>>>>>ती तसली औषधं नसतात आमच्याकडे..
ती औषधं आम्ही शेजार्‍यांकडून घेतो.. असच ना योडे? Wink

<< ती तसली औषधं नसतात आमच्याकडे.. >>
म्हंजे काय योडे ? आणताआणता वाटेतच संपवून टाकत्येस का काय ? Light 1

काय बायका आहेत , नवर्‍याला झोडपायला कसलं अफलातुन डोकं लढवतात . पनु आता तुझ्या नवर्‍याला बहुतेक ,भिंतींना कोळ्याचं जाळं लागलय असं स्वप्न पडेल . Lol

<<<ती तसली औषधं नसतात आमच्याकडे >>> म्हणजे बाटली वेगळी अन आतलं औषधं वेगळं होतं का ? Lol

हे खर म्हणजे पिवळा पितांबर सारखे होइल
>> माझ्या एका मैत्रिणीनं माझ्याशी 'आमच्या घरी जांभळा पिंताबर आहे' असं म्हणून खूप वाद घातले.. पैज वगैरे लावलेली! आता बोल!

यो, पनू Lol

यो, तोषालाच विचार त्यादिवशी चाकलेटांमधून त्यानं आपल्याला काय खाऊ घातलं ते... Proud की तोषाच्या गिफ्ट-परफ्यूमचे हे प्रताप?? Lol

>>>माझ्या एका मैत्रिणीनं माझ्याशी 'आमच्या घरी जांभळा पिंताबर आहे' असं म्हणून खूप वाद घातले.. पैज वगैरे लावलेली! आता बोल!

नानबा :फिदी:.. तिला सोवळं म्हणायचं असेल.. Happy

माझा पोरगा दोन वर्षाचा आहे. त्याला घेउन फिरायला जाताना वाटेत भूभू, माऊ, चिऊ, काऊ असे दाखवत जायची सवय. एकदा बायकोबरोबर चाललो होतो तेवढ्यात दोन कुत्री दिसली. मी पटकन बायकोला म्हणलो, "ते बघ दोन दोन भूभू चाललीयेत."
बायको: ?????

majya kakune ekda gul navta manun aamtimadhye sakhar tkli ani savayee pramane chaha pan takla kakane vicharle aamti kali ka disate ti manali masala jast jala

माझ्या मुलीला असेच मी भुभु दाखवायला गेले तर दुसर्‍याच मिनिटाला मला समजले की त्यातला एक भुभा आणि दुसरे भुभी होते आणि ,,, मग तेच ,,,,, धरणीमाते वगैरे वगैरे,,,,,, श्रावणीला समजेचना आता आई म्हणत ह्ोती बघ आणि आता म्हणते नको बघु!
माझ्या नवरा बाहेर पडताना कचर्‍याची पिशवी आणि पाण्याचा स्टीलचा व्हॅक्युम फलास्क घेउन बाहेर पडतो, एकदा घाइत त्यानं कचर्‍याची बॅग गाडीत ठेवली आणि व्हॅक्युम फलास्क कचराकुंडीत फेकला , गाडीत जाउन बसलयावर कचर्‍याचा वास आलयावर त्याच्या लक्षात आलं आणि मग वाकुन वाकुन व्हॅक्युम फलास्क कचर्‍यातुन बाहेर काढला , येणारे जाणारे भयानक कौतुकाने बघत ह्ोते, मी मागेच उभी ह्ोते आणि मग संधी साधुन असा कसा रे तु मंद वगैरे वगैरे,,,,,,,,,,,,,,
काल महाराष्ट्र मंडळं, बहारीन ची वार्षिक सभा झाली, तिथे माझा एक चांगला मित्र त्याच्या ५ महिन्याच्या बाळंाला घेउन आला, मी चुकुन पटकन विचारलं हे कुणाचे कॅलेंडर? तो म्हणाला 'माझेच आहे, तु पाह्यलयस आधी' मी सावरुन घेत म्हंटलं, अरे, तसं नव्हे, कुणाचे म्हणजे तुझ्यासारखे की तुझ्या बायकोसारखे,,,,,,,' तोही शांतपणे हसत हसत म्हणाला , ' पल्ली, मी काय अोळंखत नाही का तुला,,,,,,,,!

masala jast jala >>> Happy Happy

मी एकदा एका गॅसवर एक लिटर दुध तापायला ठेवले, बाजुच्या गॅसवर चहासाठी पाणी उकळत ठेवले आणि इतर सटरफटर कामे उरकता उरकता सरळ दोन मोठे चमचे चहापावडर दुधात टाकली. टाकताच कळले काय केलेय ते.... पुढची तिनचार मिनिटे मी दुधाच्या टोपाकडे धक्का बसुन मेस्मराईज्ड झाल्यासारखी पाहात होते असे मला घरच्यांनी सांगितले..

आणकी एक, दिप्याला एकदा विचारलं की 'अंजु कशी आहे म्हणुन!'
मला मधुराची चौकशी करायची होती पण मी घाइत नाव गडबडले , दिप्या म्हणला, 'अंजु कोण ? तुला दुसर्‍या कोणाला टाकायचा होता का हा मेसेज ?'
दिप्या Proud
दक्षे, तुझा सांग की डुचके, मी दक्षीला जेवायला बोलावलं तर ही विसरली आणि मग,,,,,,,,,,, Angry

दुधा वरुन आठवलं... मी दुध गरम केलं कि त्याचं रुपांतर एकतर 'क्षीरसागर' किंवा 'दुधखीर' या दोन्ही पैकी एकात हमखास झालेलं असतं.. Uhoh क्षीरसागर झालं तर ठिक, पण दुध़खीर झालं तर संध्याकाळी त्याच्या सोबत खुप काही (e.g. बोलणी त्या खाद्यांपैकी एक) खावं लागतं....!!! Sad

नन्दे थिबा राज्याच्या नातेवाईकांच्या समाध्याचा शोध लागला का? शिवाजीनगर मध्ये आहेत म्हनतात कुठे.....

समद्या येंदळ्या मायबोलीकरास्नी आमचा _/\_
लय हशिवलसा , हसुन हसुन पार मुर कुंडी ( कानडी शब्द न्हवं) वळायची पाळी आलीया Rofl

काल नवीन कपडे घालून झोकात मॉलला गेले- जीन्स आणि टॉपचा 'सेल प्राइस टॅग' तसाच बाहेर लोंबत ठेवून!
इथले सगळे वेंधळ्यांचे किस्से वाचूनच हे असं झालं Angry

Pages