युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

एक्झॉस्ट लावणे, दारं खिडक्या उघडणे, ओल्या फडक्याने वाजणार्‍या अलार्मला वारा घालणे, जुन्या अलार्मची बॅटरी काढता यायची,>>> तळण मनासारख करता याव म्हणून अलार्मला फॉइल पेपरने झाकणारे महाभाग पण बघितलेत.
सेफ्टी प्रोटोकॉलशी अजिबात खेळ करु नये !!

जनहितार्थ!
फायर अलार्म प्लास्टिक कव्हर अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे त्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा.
अपार्टमेंट मध्ये फायर अलार्म इतक्या भन्नाट जागी लावलेला असतो की तेल सोडा पोळ्या करताना माझा कायम वाजलेला आहे. हॉट प्लेटची शेगडी म्हणजे सीओ वगैरे ही शक्य नाही. त्यामुळे सेफ्टी प्रोटोकॉल खेळ नाही तर पेट का सवाल प्रकार आहे. आमची पोरं अलार्म वाजला की हातात मिळेत तो टॉवेल घेऊन अलार्मला वारा घालत असत.
आता घरात नॅचरल गॅसची शेगडी असुन आणि प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी दोन तीन अलार्म असुन एकदाही वाजलेला नाही त्यामुळे तो त्या विचित्र अलार्म प्लेसमेंटचा दोष होता. उगा भारतीय लोकांना नावे ठेवू नका! Lol

हे भलतंच! म्हणजे विषयाला धरून बोलायचं की काय आता?! देअर यु गो Lol

त्या साठी असंबद्ध गप्पा धागा आहे, तिथे बोला सुसंगत. Proud >>>>>>> सुपर लोल.

अंजूताई होऊ पण शकेल काही भरोसा नाही Proud

रेल्वेमध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी दिलेल्या पॉईंट वरती छोटा हिटर लावून चहा कॉफी करणारे लोक ही दिसतात. सांगायला गेलं की आपल्यावरच डोळे वटारतात.

चहा कॉफी काहीच नाही. बाकायदा इलेक्ट्रिक केटल वापरून त्यात मॅगी करतानाचा व्हिडीओ मध्यन्तरी व्हायरल झाला होता. त्यांचा PNR नंबर शोधून रेल्वेने फाईन केले होते त्यांना.
भारतीय कुठल्याही व्यवस्थेचा गैरफायदा घेण्यात अत्यंत आघाडीवर असतात.

हुशार, तज्ञ मायबोलीकर कृपया मदत करा.
मी रोजची साय साठवून अधेमधे विरजण घालून, भांडे भरले की २५-३० दिवसांनी लोणी काढून तूप कढवते.
पण पण ह्या वेळी काय झाले कळत नाही. लोणी करताना हँड मिक्सरने फिरवल्यावर सर्व मिश्रण क्रिमसारखे एकसारखे पातळ झाले आहे. काही केल्या लोणी येत नाहिये. कालपासून करतेय. बर्फाचे खडे , गरम पाणी घालून बघितले पण नाही. मग रात्री फ्रिजरमधे ते रबडीचे भांडे ठेवले आणि आज संध्याकाळी बघितले तरी ते जैसे थेच आहे. कितीही हँड मिक्सरने फिरवले तरी लोणी काही येत नाही .
काय करू प्लिज सांगा.
धन्यवाद.

कदाचित विरजण लागलं नसेल. दोन-तीन चमचे दही किंवा ताक घालून ढवळून ते भांडं रात्रभर बाहेरच ठेवा. सकाळी त्यातलं थोडंच घेऊन घुसळून बघा. घुसळताना फ्रीजमधलं गार पाणी घाला. लोणी आलं तर चांगलंच, नाही आलं तर परत दिवसभर बाहेर ठेवून, रात्री फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी घुसळून पहा.

हो वावे, रात्री दोन चमचे दही घालून भांडे बाहेरच ठेवले होते. आत्ता सकाळीही आणखी दही घालून ठेवलेय. अजून काही टेक्चरमधे फरक दिसत नाही. बघू आता संध्याकाळी काय होतेय.
धन्यवाद.

ढोकळा खराब होणे एक मान्यता आहे ! कारण आपण ढोकळ्याचा एक फिक्स आकार अन् texture इमॅजिन करतो.

एक salvage हॅक सांगतो, ढोकळा न बांधल्या जाता सैल होतो असे वाटले तरी दणकून पूर्ण शिजवून घ्या, कच्चा राहायला नको. शिजला की अर्धमुर्धा जसा shape धरला असेल तसा एक भांड्यात काढून घ्या आणि सुका असल्यास हाताने रवाळ मळून घ्या, त्यात पेलाभर पाणी + त्यात ५ चमचे साखर विरघळवून मिसळून घ्या. प्लेट मध्ये ते सरसरीत (पण शिजलेले) मिश्रण घ्या, त्यावर मूठभर ३ का दोन नंबर शेव पसरा, डाळिंबाचे दाणे टाका आणि तुमची सुरती शेव खमणी रेडी.

Pages