युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

काल भाचीकडे गेले होते तिच्याकडे रेघांचं लाटणं पाहून उडदाचे पापड आठवले.. कोहळा घालून सांडगे/ बडी

थँक्यू अंजू, मंजूताई, आणि सोनाली. भाजाणी, पापड एवढा पेशंस नाही. सोनाली आमटी, घुटं ची रेसिपी लिहिशील का?

अरे, माझ्या कडे पाठवून द्या. आम्ही उडीदाच्या पिठाचे "डांगर" करतो. भाजलेले किंवा कच्चे. किंचित जाडसर पीठ करायचे, मग चिरलेला कांदा, चवीपुरती भस्कापुरी आणि मीठ घालून दह्यात कालवायचे. पोळी भाकरीबरोबर मग भाजीची सुद्धा गरज नाही. वर पौष्टिक पण.

डाळ कूकरला शिजवून घ्यावी. फोडणीत मोहरी, जीरे, हिंग, लसूण-मिर्च-खोबऱ्याचे वाटण, हळद, मीठ घालून वरून ही डाळ घालावी. उकळी आल्यावर बा.चि. कोथिंबीर घालावी.

डांगर छान लागते. कांदा, दही घालूनही किंवा तसं न करता तिखट मीठ हिंग मिरपूड घालून पाण्यात कालवून लाट्याही मस्त.

उडदाच्या डाळीची आमटी मला एका गुजराथी शेजाऱ्यांनी दिलेली पूर्वी पण मला आवडली नव्हती, फार चिकटपणा होता.

आर्च
मी इथेच पुण्यात रहातो.
भस्कापुरी म्हणजे लाल तिखट. मिरची पावडर,

अच्छा, करून बघायला हवं. तसं मी पाच डाळी एकत्र मिळतात ती आमटी करते, ती नाही होत चिकट पण नुसत्या उडदाची करायचं डेरिंग नाही.

उडदाची डाळ गुलाबीसर भाजायची. मग धूवून पाणी घालून कुकरमधे शिजवायची.
नंतर काढून घोटून आलं मिरची वाटून लावायची. वरून तूप जिऱ्याची फोडणी अन कोथिंबीर मीठ. ्जिबात चिकट होत नाही. चपाती भाकरी भात कशासोबतही छान लागते

साला सकट असलेल्या उडीदाच्या डाळीचे वरण >> उडीद सालासकट भाजून घेतले तर हे वरण सुद्धा अचिकट होईल का?

डाळीचे भाजुन नक्की करण्यात येईल.

अचिकट Lol
पण खरेच, अचिकट वरणाला काय म्हणावे बरं?
मोकळे मोकळे तर म्हणता येणार नाही...!!

गुजरात्यांमध्ये अडदिया पाक हा लाडू बर्फी टाइप पौष्टिक प्रकार करतात. हिवाळ्यात करायचा पदार्थ आहे. तुमच्याकडे अजूनही थंडी असेल तर बघा.

काल बाजारात कोवळा फणस मिळाला आहे.
तो चिरायची / उकडायची सोपी पद्धत हवी आहे.
एके ठिकाणी फणसाचे चार तुकडे करुन थेट उकडायचे असं लिहिलेलं वाचलं.. हा प्रकार कोणी करुन पाहिला आहे का ?
एखादी युक्ती सुचवा.
धन्यवाद

फणसाचे चार तुकडे करुन थेट उकडायचे असं लिहिलेलं वाचलं......मागे अभिनेत्री सुहास जोशी यांनी अशा प्रकारे फणस उकडून भाजी करतात हे दाखवले होते.मी तशी एकदा करून पाहिली होती.मला आवडली नव्हती.कदाचित जमली नसेलही.पण परत कधी केली नाही.

कोवळा (गरे न बनलेला) फणस चिरणे तुलनेने सोपे आहे

१. सुरीला तेल लाऊन घ्या.
२. फणसाची साल काढा,
३. देढाकडचा भाग ( जरा जास्तच ) काढून टाका
४. उरलेल्या फणसाचे ४ भाग करा
५. आता प्रत्येक तुकड्यात गरे होत असलेला भाग ओळखू येइल, उरलेला भाग - चाकट - (मध्यभागी येणारा आणि सालाकडे येणारा) काढून टाका. थोडा चांगला भाग गेला तरी चालेल पण चाकट जराही रहाता कामा नये.

स्टेप -५ शिजवण्याआधी वा नंतर करता येते. आधी केली तर चिकाचा त्रास होतो, नंतर केली तर मऊ झालेले चाकट काढणे थोडे सोपे होते पण यात चांगला भाग जास्त फुकट जातो.

टीपः ही कृती फक्त कोवळ्या फणसाकरताच आहे. गरे झालेला फणस वेगळ्या प्रकारे चिरतात, तो कसा ते मला माहीत नाही. मला फक्त गर्‍यांची भाजी कशी खातात ते माहित आहे Wink

कोवळा फणस आम्ही विळीवर चिरतो, जास्त मोठा असेल तर कोयत्याने कापून घेतो, तेल लावणे मस्ट. कोयत्याने मधोमध कापून मग चार भाग करून विळीवर चिरतो, वेळ खूप जातो पण नवरा आणि मी आलटून पालटून करतो. विळीला, हाताला, कोयता, सुरी सर्वांना तेल लावायला हवं. जास्त मोठा नसेल, लहान कुयरी असेल तर कोयता नको. सुरी किंवा विळी बास, ते सोपं पडतं. आकाराने मोठ्यासाठी काही युक्ती नाही माझ्याकडे, नवऱ्याला काम देणं हाच मार्ग Lol

उकडून सोपं होतं पण मला आवडेल की नाही शंका आहे म्हणून मी तसं केलं नाही.

फणसाचे ४ तुकडे करुन थेट कुकर मधे शिजवले...
नंतर साल काढणे आणि तुकडे करणे सोपं गेलं..मधला भाग पण नीट काढता आला...
अगदीच कोवळा फणस होता.
इथल्या सुचनांसाठी सर्वांना धन्यवाद.

Pages