युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

ग्राऊंड(फिल्टर) कॉफी जास्त दिवस टिकवण्याचे काय पैंत्रे आहेत? ताज्या कॉफीचा फ्लेवर दोन आठवड्यांत उतरून जातो. एवढ्या काळात एक चतुर्थांश डबा देखील संपलेला नसतो

ग्राऊंड(फिल्टर) कॉफी जास्त दिवस टिकवण्याचे काय पैंत्रे आहेत? >>>

(भारतात) फ्रीजमध्ये ठेवणे, हा एकच उपाय माहिती आहे.

मोठ्या डब्यात (कॉस्कोचा मोठा डबा मी आणतो) असेल तर त्यातून दरवेळी न घेता आठवड्या-दोन आठवड्यांना लागेल इतकी लहान डब्यात काढून मोठा डबा सारखा न उघडणे.
मोठ्या डब्याला अल्युमिनिअम रॅपर असतं ते परत बंद करुन हवेचा संपर्क कमित कमी करणे.
कॉफी बीन्स आणून घरात लागतील तसे लहान बॅच मध्ये ग्राईंड करणे. किंवा बीन्स मोठ्या प्रमाणात आणून दुकानातून हव्या त्या आकाराची भुकटी एकदम न करता लहान बॅचेस मध्ये करणे.

ग्राऊंड(फिल्टर) कॉफी जास्त दिवस टिकवण्याचे काय पैंत्रे आहेत?>>>> भरपूर कॉफी पिणे जेणेकरून दोन आठवड्यात संपेल.
कृ ह घे.
बाकी अमितवला मोदक.

एक खरबूज आणलं होतं. त्याचा कलर अगदी परफेक्ट होता म्हणून मदतनीस मुलीने ते कापलं. तर ते चक्क करकरीत निघालं. गोडवाही नाही. नुसतं खाता येणार नाही. भरमसाट साखर न घालता त्याचं काय करता येईल?

स्प्रिंग मिक्स, पालक, कोबी, भाजलेले कणीस, कांदा, काकडी, अवकाडो यातले जे जे मिळेल ते एकत्र करून त्या सॅलड वर घालून खा. ड्रेसिंग, लिंबू, मीठ, पुदिना आणि इतर चवीत चालून जाईल. अशा सॅलड वर कलिंगड फार भारी लागतं. चमचा भर मध घातला की एकदम तोंडाला पाणी सुटेल असं होतं.

माझेमन,
नुकतंच असं खरबूज कच्चं निघालं. त्याच्या मोठ्या फोडी करून घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिजमध्ये ठेवल्या. आणि रोज एक-एक फोड सॅलडमध्ये घालून ते संपवलं.

सॅलड अमितवने लिहिलंय त्याच टाइपचं - लेट्युस, काकडी, पांढरा कांदा, सिमला मिरची, कच्चा टोमॅटो, उकडलेला राजमा, मीठ, मिरपूड, लिंबू

नाही जमणार परत अमऊ Happy करायला . पाकीट उघडलं आणि संपलं नाही की ते मऊ पडतातच.
मी दुधात तो लाडू, केळं सुका मेवा असं घालून खाते, छानच लागतं

तापमान न वाढवता आर्द्रता कमी करण्याची काही सोय असेल तर जमेल वाटतं.
बेस्ट म्हणजे इकडे या लाडू घेऊन! हवेत आर्द्रता कमी असल्याने राजगिर्‍याचे लाडू एकदम कडक (आणि फस्त) करुन मिळतील. Happy

एक लाडू मावेमध्ये ३० सेकंड ठेवून बाहेर काढून परत वळून ठेवा. कदाचित कडक होईल.
आम्ही मऊ पडलेले आईसक्रीमचे कोनही असेच कडक करतो.

मावेत गुळ वितळेल. गुळाचा पाक असल्याने त्यात पाणी कमी असेल त्यामुळे तो चटकन काढला नाही तर कोळसा होऊ लागेल कदाचित.

अच्छा, धन्यवाद ममो, साधना.
अमितव, व्हॅक्युम चेंबरमध्ये ठेवुन करता येईल तसे.
माझेमन तसे करून पाहिले. मरगळुन गेला लाडु आणि गार होऊनही कडक झाला नाही.

ठेवलेय मनिम्याउ मगाशीच. बघतो काय होते.
----
जवळपास पाऊण तास चार लाडु हवाबंद डब्यात फ्रिजरमध्ये ठेवले.
एक खाऊन बघितला छान कुरकुरीत झाला.
संपेपर्यंत किंचित मऊ झाला. थोडक्यात फ्रिजर मध्ये ठेवून काढुन लगेच संपवला तर छान कुरकुरीत लागतो.

गोड खात असाल तर सगळ्यात सोपे म्हणजे ते वापरून मिल्कशेक बनवा कुठलाही.

किंवा खीर पण यात बदाम मिल्क मंद आचेवर हळुहळु तापवत करावी लागते नाही तर दूध फाटते. (मी नाही केली कधी.)

गोड खात नसाल तर विरजण लावून दही करून भाता सोबत खाता येईल.

मुगाच्या डाळीची खिचडी करताना मी नेहेमी अर्ध दूध आणि अर्ध पाणी घालते. मस्त खिचडी होते. नेहेमीच्या दूधाऐवजी अल्मंड मिल्क वापरता येईल. किंवा कुठच्याही रस्याच्या भाजीत घालता येईल.

Pages