Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मुगाच्या डाळीची खिचडी करताना
मुगाच्या डाळीची खिचडी करताना मी नेहेमी अर्ध दूध आणि अर्ध पाणी घालते. मस्त खिचडी होते
>>> प्लेन खिचडी की मसाला खिचडी? मीठ घातल्यावर दूध फाटत नाही का? मला आवडेल करायला.
आल्मंड बरोबर की आ'मंड?
आल्मंड बरोबर की आ'मंड?
Almond milk ची cold coffee
Almond milk ची cold coffee छान लागते
बदामाचे दूध वापरून आईसक्रीम
बदामाचे दूध वापरून आईसक्रीम करायची, नाहितर मँगो मिल्कशेक.
नाहितर कोल्ड कॉफी दाल्गोना. नाहितर खीर, नाहितत केक मध्ये ढकलून द्यायचे.
खिचडीत, कुठच्याही खिचडीत.
माझेमन, मी नेहेमी घरचा काळा मसाला घालून खिचडी करते.
बदामाच्या दुधाला जो वास येतो
बदामाच्या दुधाला जो वास येतो तो आवडत असेल तर आणखी पदार्थांत घाला. त्यापेक्षा त्यात साखर नसेल तर थोडी घालुन घटाघटा पिणे सोपं आणि चटकन होणारं, आणखी पसारा न वाढवणारं आहे.
धन्यवाद मंडळी... बर्याच
धन्यवाद मंडळी... बर्याच युक्त्या मिळाल्या बदाम दुध संपवायला... खीर आणि कॉफी करुन बघते..
Avocado toast बनवायला
Avocado toast बनवायला पहिल्यांदाच avacado आणले. कच्चे/कडक आहेत. आता कसे संपवू ???
घरात पिकतील. कापू नका. फ्रीज
घरात पिकतील. कापू नका. फ्रीज बाहेर ठेवा, दोन तीन दिवसात होतील तयार.
कापले असतील तर कापलेल्या भागावर लिंबू चोळून झाकून/ क्लिंज रॅप मध्ये गुंडाळून ठेवा. एक दिवसात तो तयार होईल.
मला ते थोडे कच्चे ही आवडतात. कोवळ्या शहाळ्यासारखे लागतात. साल काढून नुसत्या चकत्या करा आणि खाऊन टाका. राप आला/ काळा पडला तरी चवीत फार फरक पडत नाही.
धन्यवाद अमित . एक अगोदरचं
धन्यवाद अमित . एक अगोदरचं कापलेलं . ते लेकाने थोडसं खाल्लं.
दूसरं तसच ठेवलयं बाहेर . त्याची सालं काळी/चॉकलेटी पडलीय पण बोटाने दाबून बघितलं तर अजूनही थोडं कडकच लागतय . आणखी एखादा दिवस ठेउन मग कापेन .
त्याची सालं काळी/चॉकलेटी
त्याची सालं काळी/चॉकलेटी पडलीय >>> मग झाले असणार ते. थोडं लिबलिबीत लागत असलं तर कापा.
बदाम दुध कसं संपवु असा प्रश्ण
बदाम दुध कसं संपवु असा प्रश्ण इथे विचारला होता..कॉफी आणि खिर असे दोन पर्याय आवडले होते.
.. नवर्याला दुध आणि दुग्धजन्य पदार्थाला पर्याय हवा होता तो सापडला आहे. धन्यवाद मंडळी.
त्यापैकी कॉफी बेस्ट लागली.. आधिचं दुध संपवुन आता नवीन आणले आहे
अजुन एक चुकुन सापडलेला पदार्थ.. मुलीसाठी स्क्रँब्ल्ड एग्ग करायचे होते आणि नेमके घरात दुध अजिबात संपले होते.
२-३ चमचे बदाम दुध त्यात ढकलुन स्क्रँब्ल्ड एग्ग बनवले.. ते एकदम हिट झाले आहे.. आता नॉर्मल दुध घालुन केलेल्यापेक्षा हेच छान लागतंय असा रीपोर्ट आलाय...
रवा सांजोरी /करंजी सारण ओलसर
रवा सांजोरी /करंजी सारण ओलसर झालंय कोरड होण्यासाठी काय करावे.
थोडे बेसन भाजून घालता येईल.
थोडे बेसन भाजून घालता येईल.
त्यात नारळ असेल तर, ओल्या
त्यात नारळ असेल तर, ओल्या नारळाच्या करंज्या आहेत जाहिर करुन करंज्या करू शकता.
रवा सांजोरी /करंजी सारण ओलसर
रवा सांजोरी /करंजी सारण ओलसर झालंय कोरड होण्यासाठी काय करावे.>>> आणखी थोडा बारिक/झिरो नबर रवा कोरडाच भाजुन मिसळून घे, मुरवत ठेव.
रवा सांजोरी /करंजी सारण ओलसर
रवा सांजोरी /करंजी सारण ओलसर झालंय कोरड होण्यासाठी काय करावे. >>> त्यात थोडं तांदूळाचं पीठ मिसळा.
प्रवासात २ दिवस टिकतिल असे
प्रवासात २ दिवस टिकतिल असे पदार्थ सुचवा, हा प्रश्न इथे आधी येवुन गेला असेल पण मला आत्ता त्याच पेज काहि सापडत नाहीये.
थेपले, सॅन्डविच, खाकरा, पराठे लिस्ट वर आहेत.
रेडी मिक्स गणेश भेळेची पाकिटं
रेडी मिक्स गणेश भेळेची पाकिटं + जमणार असेल तर कांदा, टमेटो, सुरी, चमचे.
कलिंगड (एका बैठकीत संपत नाही, त्यामुळे फ्रीज मिळणार असेल रात्रीसाठी तर बरं)
आयपी घेऊन जाऊन इलेक्ट्रिक कनेक्शन मिळणार असेल तर मिसळ फार भारी लागते बाहेर जाऊन खायला.
ग्रिल मिळणार असेल तर आणखी बरेच पदार्थ करता येतील.
टी बॅग्ज, गिरनारचा रेडीमिक्स चहा, एअरबीएनबी असेल तर त्याप्रमाणे.
पीबीजे ची सोय करुन ठेवली तर सानथोर सगळ्यांना चालतंच.
थॅन्क्स अमित, अरे !
थॅन्क्स अमित, अरे ! योसेमिटीला चाललो आहोत पण गर्दी आणी आतल्या रान्गाची इतकी वर्णन वाचली आणी बघितली आहेत की आत कितपत काही घ्यायला वेळ होइल अस वाटतय.
आतले २-३ फुड जॉइन्ट ठिकाण बघुन ठेवलेत पण ते पोराना होतिल मी नॉनव्हेज खात नाही, नवरा आणी मुलगी पिझा खात नाहीत.हे म्हणजे रान्गेत अडकलो आणी शन्कर मन्डळी साठी प्लॅनिग आहे.
गणेश भेळ मिळत नाही पण मिर्च मसाला भेळ मिक्स घेतल आहे, बाकी चिवडा, सिरियल बार, मफिन, फळ, नारळपाणी असे प्रकार असतिलच.
मिसळीची आयडीया भारी आहे, बघते तिकडे कनेक्शन आहे का ते..
आत ग्रिल वैगरे करनार नाही कारण आतल काही बुकिन्ग मिळाल नाहिये, पार्कच्या बाहेरच पण जरा जवळ राहु.
योसेमिटीमध्ये व्हेज लोकांचे
योसेमिटीमध्ये व्हेज लोकांचे हाल होतात फार, काही विशेष मिळत नाही. पिझ्झा ही बाद असेल तर बरोबर कोरडा खाऊ ठेवच. काकडी, चेरी, स्टॉबेरी, फाफडा, खाकरा असं गाडीत बसलं की खात राहिलं की भुकेने जीव कासाविस आणि चिडचिड होत नाही. स्वानुभव. पोरांना चिकन नगीज, बर्गर, विंग्ज्स हे आरामत मिळेल. ती खुष.
अरे गणेश भेळ कसं मिळत नाही? हल्ली आमच्याकडे अगदी सर्रास मिळू लागलंय.
इतकी गर्दी असते का हल्ली? आणखीन ग्रँड कॅनियन वगैरे आजुबाजूच्या कॅनियन पार्क्सला वर्षभरात जाणार असाल तर नॅशनल पार्क्सचा पास काढू शकतेस की एंट्रीची गर्दी वाचू शकेल. तो पास असा ऑनलाईन मिळतो का पार्क्स मध्येच मिळतो माहित नाही, आम्ही पार्क मध्येच काढलेला. तसं असेल तर जाताना कुठलं कमी गर्दीचं पार्क लागणार असेल तर तिकडे घेऊ शकता.
पास असेल तर उजवी कडची रांग चालते, ज्यात गर्दी नसते.
अरे गणेश भेळ कसं मिळत नाही?
अरे गणेश भेळ कसं मिळत नाही? हल्ली आमच्याकडे अगदी सर्रास मिळू लागलंय.>>> बघ ना! मुलगी म्हणते आपण चुकिच्या कॅलिफोर्नियात राहतो.
इतकी गर्दी असते का हल्ली? >>> अरे खुप गर्दी असते, आता तर या वर्शिपासुन पिक अवर एन्ट्रन्सच पण बुकिन्ग कराव लागत आधिच म्हणजे सकाळी ६ ते दुपारी २ या वेळात पार्क मधे एन्टर करायला परमिट लागत..बुकिन्गचे फक्त २ डॉलर आहेत पण बुकिन्ग पटापट सपतात.
आम्ही २०१९ ला गेलो तेव्हा सुद्धा भर्पुर गर्दी होती, गेलो तेही ४ जुलैचा लॉन्ग विकेन्डला...देवा!! २ तास फक्त पार्कात शिरायला लागले, पार्किन्ग मिळायला पुढचा तासभर गेला..मग शटल घेवुन फिरलो..मजा आलिच पण गर्दीला पर्याय नाही..तसही आपणच जावुन गर्दीला नाव ठेवण्यात काय पोईन्ट?? बहुतेकाच म्हणण २०२० नतर पॉडकास्टर, रिळा करणारी मन्डळी यामुळे सगळीकडेच टुरिझम प्रमाण वाढलय.
पास असेल तर उजवी कडची रांग चालते, ज्यात गर्दी नसते.>>> नाही आता तस काही नाही! सगळ्याना सेमच रान्ग आहे..
बाकी पार्क ओके आहेत रे गर्दीला , पण योसेमिटी क्राउडेडच असत.
पास काढुन बरेच पार्क बघुन झालेत, ते सोयिच होत..
लासेन व्होलकॅनिक, शास्ता वैगरे एकदम नॉर्थ कडचे सोडले तर कॅलितले बहुतेक सगळे बघुन झालेत.
ग्रॅड कॅनियन २दा केलय..
बघुया आता काय काय अॅचिव्ह होतय.
धन्यवाद सजेशनसाठी
शंकरपाळी, चकली स्टिक, बाकरवडी
शंकरपाळी, चकली स्टिक, बाकरवडी, रेडी टू इट पोहे, उपमा. ते कप्पा नूडल्स सारखे नुसते गरम पाणी घालून खाता येतात. गरम पाणी जनरली कॉफी शॉप मध्ये पण मिळू शकते.
नेचर व्हॅली चे ट्रेल मिक्स किंवा इतर बार, kind बार , असे काही प्रोटीन बार बरे पडतात हाईक मध्ये खायला.
इथे मध्यंतरी मला apple chips मिळाल्या होत्या. थोडी साखर आणि दालचिनी लावलेल्या. नेहमीच्या बटाटा वेफर्स ऐवजी त्या चांगल्या वाटल्या. काही तरी बदल म्हणून.
धन्यवाद धनी! यातले बहुतेक
धन्यवाद धनी! यातले बहुतेक गोस्टी आहेत म्हणजे असाव्यात एकदा पॅन्ट्रि डोकावुन खात्री करुन घेते
चिप्स, बार्स, चकल्या हातोहात सपलेल्या असतात आमच्याकडे " एकदम तु भ्रमात आहेसी वाया" टाइप सिच्युएशन.
नॅशनल पार्क वगैरे ठिकाणी
नॅशनल पार्क वगैरे ठिकाणी जाणार असाल तर एक कोलॅप्सिबल / सॉफ्टसाइडेड कूलर नेऊ शकता. होटेलात / एअर बी एन्ड बी मधे राहिलात तर बर्फ भरून घ्यायचा त्यात रोज सकाळी. योगर्ट / छोटे ज्युस पॅक, स्ट्रॉबेरी , कलिंगड, संत्री , काकडी -गाजर- हमस इत्यादी त्यात ठेवायचे. पाण्याच्या बाटल्या, कोक कॅन्स, बीअर कॅन्स पण ठेवू शकता :-). मेथी पराठे, तिखटमिठाच्या पुर्या, हांडवो, टमरिंड राईस असे सगळे पण दिवसा त्या कूलरमधे आणि एरवी हॉटेल /अपार्टमेंटच्या फ्रिजमधे ठेवू शकता.
धन्यवाद मेधा! सॉफ्ट साइडेड
धन्यवाद मेधा! सॉफ्ट साइडेड कुलर दोन आहेत ते घेइल.
> त्यात थोडं तांदूळाचं पीठ
> त्यात थोडं तांदूळाचं पीठ मिसळा.
<<
हे पीठ भाजून घेणं अध्यहृत असते का? कारण कच्ची पिठी घातली की चव बेकार लागते असा अनुभव आहे.
हे पीठ भाजून घेणं अध्यहृत
हे पीठ भाजून घेणं अध्यहृत असते का? कारण कच्ची पिठी घातली की चव बेकार लागते असा अनुभव आहे.
>>>
भाजून घ्यायचं नाही. कच्चंच घालायचं.
चव बदलेल इतकं घालावं लागत नाही. सारण तयार झालं की ताटात पसरून गार करायचं. एक वाटी सारणाला एक चमचा पिठी हे साधारण प्रमाण आहे.
आज साटोर्या/मोदक करायचे असतील तर आदल्या संध्याकाळी असं सारण करून तयार ठेवणे - ही यातली आणखी एक 'टिप' आहे.
सारणात नारळ असेल तर याचा हमखास उपयोग होतो.
जे लोक मोदकांची पिठी घरी
जे लोक मोदकांची पिठी घरी करतात त्यांच्यासाठी प्रश्नः
माझ्याकडे कॉफी बीन्स ग्राईंडर आहे. इतर कुठलाही भारतीय ब्रँडचा मिक्सर नाहीये. तर या कॉफी ग्राईंडरमध्ये बासमती तांदळाची पीठी केली तर ती मोदकांना लागते त्या लेवलची बारीक होईल का? तुम्ही घरी पिठी करत असाल तर कशात करता?
माझ्याकडे हा ग्राईंडर आहे: https://www.amazon.com/dp/B08C9RBNXN?ref_=ppx_hzsearch_conn_dt_b_fed_asi...
वर्षा, पिठीचं माहिती नाही. पण
वर्षा, पिठीचं माहिती नाही. पण मनीमोहोर यांची मोदकांच्या उकडीची नो टेन्शन पाककृती आहे. तांदूळ भिजवून वाटून मग शिजवून ही उकड करतात. ती हमखास पाकृ आहे उकडीसाठी. प्रमाण बरोबर घेतलं आणि तांदूळ गंधासारखे वाटले की उकड फसण्याची भीती जवळजवळ नाहीच.
Pages