Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आधीच भात त्यात तळला बापरे!!
आधीच भात त्यात तळला बापरे!! भलतेच हेल्दी फूड
हा पंचवीस माणसांचा भात काय
हा पंचवीस माणसांचा भात काय प्रमाणात उरलाय म्हणजे आपण शेवटी थोडा खातो त्या प्रमाणात की पोटभर भातच ह्या स्केलने ? तसेच तो संपवण्यासाठी आता किती जण घरात आहेत ? भात खूप आणि माणसं घरात कमी असे प्रमाण असेल तर संपवणे कठीण आहे . पण तरी एक दोन दिवस जमत असेल तर पोळ्या न खाता दिवस फोडणीचा भात, दही भात वगैरे खाऊन जेवढा संपेल तेवढा संपवा आणि उरलेला सरळ अंदाज चुकला म्हणून टाकून द्या.
संपवण्यासाठी आणखी त्यात तेल तूप अश्या नको असणाऱ्या गोष्टी घालून quantity ही आणखी वाढवणे, त्यावर अधिक कष्ट घेणे आणि मग पुन्हा ती नवीन गोष्ट संपवत बसणे ह्या पेक्षा ते टाकून देणे आजकालच्या जमान्यात अधिक इष्ट असे मला वाटते. उरलाय म्हणून खाणे अजिबात नको वाटते.
कोणी खरच न्यायला तयार असेल तर चांगलच पण तशी योग्य व्यक्ती मिळाली नाही तर मोह न ठेवता लवकरात लवकर टाकून द्यायचं . मुद्दामहून कोणी उरवत नाही आणि टाकून देत नाही पण पार्टी वगैरे असेल तर जास्त होऊ शकत अंदाज न आल्याने . अश्या वेळी टाकून देणे सर्वात बेस्ट. पुर्वी अन्नाचा माज येणे , अन्न टाकायचं नाही वगैरे वाटत असे. हल्ली मला तसे वाटत नाही. असो.
फ्रीजरमधे जागा असेल तर पोर्शन
फ्रीजरमधे जागा असेल तर पोर्शन करुन फ्रीझरला टाका. लागेल तसा वापरता येतो.
उत्साह असेल तर राईस क्रॅकर करा .
स्वाती२ +१
स्वाती२ +१
ममो +१
फेकून देण्यात गिल्ट येणार असेल तर तो कमी करण्याचे उपाय मी सांगतो. तो भात आधी फ्रीज मध्ये ठेवून द्या. पहिले दोन दिवस घरातील माणसांत घेऊन थोडा संपेल. मग तो मागे पडेल. आऊट ऑफ साईट आउट ऑफ माईंड. जाऊद्या दोन आठवडे. मग तो भात ठेवलेल्या डब्याची कोणाला आठवण येईल, किंवा या दोन आठवड्यात असच सामान सरकवल्याने फ्रीज मध्ये आता जागा नाही तो रिकामा करायला हवाय असा कोणी टाहो फोडेल. जे काही नंतर होईल ते झाल्यावर लगेच काही कृती करू नका. पुढच्या कंपोस्ट डे ची वाट बघा. त्या दिवशी मात्र ब्राह्म मुहूर्त गाठलाच पाहिजे. त्यात हयगय नाही. तर पहाटे गारबेज ट्रक यायच्या आत तो भात बायोडिग्रडेबल पिशवीत घालून घरासमोर ठेवा.
यात आता भात खराबच झाला होता. आणि मी फ्रीज स्वच्छ केला ह्या दोन गोष्टींमुळे मनाला उभारी येते.
यात आता भात खराबच झाला होता.
यात आता भात खराबच झाला होता. आणि मी फ्रीज स्वच्छ केला ह्या दोन गोष्टींमुळे मनाला उभारी येते......
मनीमोहोर +१
मनीमोहोर +१
अगदी बरोबर लिहिले आहे.
मनीमोहोर ब अमितव यांचे पटतेय
मनीमोहोर ब अमितव यांचे पटतेय, इथे अमेरिकेत हिवाळा आहे, त्यामुळे भात लवकर वाळणार नाही , शिवाय पंखा, हीटर वगैरे लावले तर जिज्ञासा छडी घेऊन येइल. भात कमी खा असे डॉक्टरच कानी कपाळी ओरडत असताना हाच उपाय बरा वाटतो
अमितव करेक्ट आहे. कोणी खाणार
अमितव करेक्ट आहे. कोणी खाणार नाहीये हे माहित असून ही मी पण बरेच वेळा फ्रीजमध्ये ठेवून देते. " एक्सपायरी डेट होऊन जाऊ दे मग टाकू या " ही माझी त्यासाठीची फ्रेझ आहे.
यात आता भात खराबच झाला होता. आणि मी फ्रीज स्वच्छ केला ह्या दोन गोष्टींमुळे मनाला उभारी येते. >> असा मोकळा रिकामा फ्रीज बघताना काय निर्मळ वाटत.
भात कमी खा असे डॉक्टरच कानी कपाळी ओरडत असताना हाच उपाय बरा वाटतो >> Good.
विकु. वाळवायचा असेल तर
विकु. वाळवायचा असेल तर हिवाळ्यात भात चटकन वाळेल. कारण ह्युमिडिटी कमी. त्यात आता, तुमच्याकडे माहित नाही, पण इथे हीटर चालू केले आहेत त्यामुळे चार तास हिटर व्हेंट वर ताट ठेवून त्यात पसरुन ठेवलात तर वाळून जाईल. हिटर चालू नसेल तरी पसरुन ठेवलात तर लगेच वाळेल. वाळवा असं सुचवत नाहीये. फक्त सायन्स चुकायला नको
>>> फ्रीजरमधे जागा असेल तर
>>> फ्रीजरमधे जागा असेल तर पोर्शन करुन फ्रीझरला टाका. लागेल तसा वापरता येतो.
+१
मिल गया कोडा, अब चाहिये जीन,
मिल गया कोडा, अब चाहिये जीन, लगाम और घोडा नावाच्या पुस्तकातून
देशी रेस्टॉमधून तुमच्या आवडीची चिकन करी मागवा ४-६ पोर्शन, ४-६ मोठे कांदे उभे चिरुन ब्राउन करून घ्या, थोडे काजू तुपात तळून घ्या, केशर दुधात खलून घ्या. आणि चिकन बिर्यानी बनवा. शुक्रवार संध्याकाळी मित्र मैत्रिणींना बोलवा ! सहज फस्त होईल सर्व भात
मी दोन्ही स्वातीशी सहमत. भात
मी दोन्ही स्वातीशी सहमत. भात लागतोच तसा. २ किंवा ३ सर्विंग्ज च्या पोर्शन साइज मधे झिपलॉक मधे डिवाइड करून फ्रीज केला वापरता येईल नक्की. अर्थात ही कालची पोस्ट होती म्हटल्यावर आता इतका वेळ बाहेरच राहिला असेल तर आता नका वापरू !
Pages