युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

ढोकळा बनवण्यासाठी छोटीशी टीप. ढोकळ्याचे पीठ भिजवून दहा मिनिटे तसेच ठेवावे. नंतर चांगले फेटून त्यात सोडा/इनो घालून चांगले फेटावे. त्यामुळे कमी पाण्यात पिठाच्या गुठळ्या भिजून जातात. कुकर मधे पाणी घालावे व ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्याला तेल लावून ते भांडे कुकर मध्ये गरम करायला ठेवावे. चांगले गरम झाले की मगच पिठात सोडा घालून फेटावे व कुकरमधील भांडे बाहेर काढून त्यात ओतावे. लगेच कुकरचे झाकण बंद करावे
ढोकळा गार झाल्यावर कापून फोडणी टाकून त्यावर थोडे थोडे पाणी शिंपडत राहावे. एक कुकरच्या डब्यातला ढोकळा पाऊण ते एक छोटी वाटी पाणी शोषून घेतो आणि हलका होतो. पाणी शिंपडताना उलट सुलट करणे

आणि तलोदचे nylon ढोकळा मिक्स पण छान आहे

ढोकळ्याचे पीठाची consistency श्रीखंडासारखी ठेवावी आणि २० मिनिटे मोठ्या आचेवर कुकरची शिट्टी काढून वाफ घ्यावी

कुकर, मावे आणि कढईत पाणी घालून वर ताट झाकून एकाचवेळी ढोकळा केला. चितळेचे 400 ग्रॅमचे pkt आणले की अशी धांदल उडते. मावेतला नीट झाला नाही. जरा कोरडा झाला. बाकी व्यवस्थित झाले.

मीही इथेच काही महिन्यापूर्वी असंख्य प्रयोग करून थकल्यावर ढोकळा मऊसूत जाळीदार होण्यासाठी पाककृती tips वगैरे विचारले होते. खूप चांगल्या सूचना आल्या होत्या. माझे प्रयोग अजूनही चालूच आहेत. अमेरिका स्थित मैत्रिणीनं एक YouTube video दिला होता त्याप्रमाणे केल्यावर तिचा ढोकळा फरसाण दुकानाच्या तोडत मारेल इतका जाळीदार होतो पण त्याच कृतीने (त्यात मिश्रणात आणि फोडणीत पाणी जास्त वापरलाय आणि वाफेच पाणी पुसायची टीप आहे) माझा ढोकळा थोडासा ( नेहमीपेक्षा अधिक) जाळीदार होतो त्यामुळे आणखी नक्की काय करावं हे अजूनही समजत नाहीय. खाणारे मस्त आहे असं म्हणून खातात पण मलाच आवडत नाही. इकडे आशीर्वाद चे बेसन मिळू लागलंय , त्यावर ढोकल्याचे चित्र बघून ते पीठ पण वापरून बघितले. आता फक्त steamer बदलायच राहिले आहे.
त्यामुळे काही महिन्यांनी मी मला पिवळा खमण ढोकळा जमत नाही असा निष्कर्ष काढणार आहे .

तसंच पाणीपुरीच्या पुऱ्या ( रव्याच्या) जमत नाहीत हे पण जाहीर करायच्या आधी इथे कोणी खात्रीशीर पाककृती देईल का?

थँक्यु सायो, ssj
साधारण ह्याच पद्धतीने करते मी, आपटून बबल पण काढते. गिट्सचं नायलॉन ढोकळा मिक्स आणुन बघेन.
अमितव, नाही, पण नॉन इन्स्टंट मधे ईनो असतोच.
अमेरिका स्थित मैत्रिणीनं एक YouTube video दिला होता त्याप्रमाणे केल्यावर तिचा ढोकळा फरसाण दुकानाच्या तोडत मारेल इतका जाळीदार होतो>>> मेधा तो व्हिडीओ मला दे. ट्राय करते. Wink

ढोकळ्याच्या रेडिमिक्सच्या पाकिटातले अर्धे पीठ वापरून ते पुन्हा बंद करून ठेवून नंतर वापरले आहे मी.

टेस्ट फॉर लाइफवाल्यांचं ढोकळा मिक्स वापरल्यापासून दुसरं कोणतं वापरलं नाही.

@Aashu 29
https://youtu.be/wfy6vJhbHII?is=63Fy6AOy8VAhksvG

ही माझ्या मैत्रिणीने दिलेल्या ढोकळ्याची लिंक आहे. गुजराती पदार्थाचा साऊथ इंडियन accent मधला ऑडिओ ऐकून मी बरेच दिवस चालढकल केली होती ,पण मैत्रिणीच्या आग्रहास्तव आणि तिने स्वतः केलेल्या ढोकल्याचे वर्णन ऐकून व चित्र बघून मी सध्यातरी याच कृतीने करते. फक्त सरळसरळ कोणाच ऐकायची सवय नसल्याने बेसन चाळून घेणे, फोडणीत तीळ घालणं , साखर एकदोन चमचा कमी घालणं हे सवयीने करते. ढोकल्याच पीठ भिजवून अर्धा तास तरी बाजूला झाकून ठेवते, सगळा जामानिमा करेपर्यंत तेवढा वेळ लागतोच. पुढच्या वेळी हेच मिश्रण सरळ रात्रभर आंबवून सकाळी वाफवून करून बघेन. आता इथे समर आहे तर चांगले आंबेल असे वाटतेय.

तुमचा ढोकळा जाळीदार जमला तर सांगा.

आणि कृपया ते पाणीपुरीच्या पुरीच मनावर घ्या कोणीतरी.

पाणीपुरीच्या पुर्‍या मी मिपावरच्या पेठकर काकांच्या कृतीने केल्या होत्या आणि मस्त जमल्या होत्या. त्याला बरीच वर्षे झाली. खाली लिंक देत आहे.
https://www.misalpav.com/cooking/947

एरवी माझा ढोकळा कधी मस्त तर कधी कामचलावू होतो मात्र जेव्हा चक्क्याचे पाणी वापरुन करते तेव्हा हमखास मनासारखा होतो. मी नेहमी बेसन पिठात एका कपाला १ टे स्पून रवा वापरते.

मला कौतुक वाटले की कुणी पापुच्या पुऱ्या घरी करतं. मी या जन्मात एकदा केल्या होत्या त्या पण नीट फुगल्या नाहीत. मला भलताच कुटाणा वाटला. नंतर त्या चपट्या प्लास्टिकच्या पोकर चिप्स टाईप आणूनच तळल्या बरीच वर्षे. क्वचित तयार पुऱ्या आणल्या. पोकर चिप्स जरा मुरकुल टाईप स्टार्ची आहेत, रव्यासारख्या नाही लागत पण बाकी मालमसाला इतका असतो की खपून जातात.

अस्मिता सेम पिंच.. मलाही कुणी घरी पापुच्या पुर्‍या वगैरे करतात म्हटलं की जाम आदरयुक्त भिती वाटते Lol
पोकर चिप्स >> Lol मला बिलकुल नाही आवडल्या त्याचं टेक्शर काहीतरीच आहे आणि इतक्या चेंडूसारख्या गरगरीत गोल.

विडीओतला अ‍ॅक्सेंट - मजेशीर आहे.

इथे कुणी शुगर कुकीज करताना अंड्याऐवजी आळशी पूड+ पाणी असे वापरले आहे का? मी फमिन्स आणि क्विक ब्रेड्साठी नेहमी वापरते पण कुकीजसाठी कधी केले नाहीये म्हणून इथे विचारणा.

आमच्याकडे एकेकाळी लेकाला फार हौस होती स्वैपाकाच्या प्रयोगांची. तेव्हा त्याच्यासाठी स्वयंपाक म्हणजे विकेंडला गंमत इतपतच होते, त्या फेजमधे हे पाणीपुरीच्या पुर्‍या प्रकरण घरी केले होते. हळू हळू त्याच्याही आयुष्यात वेळेशी झटापट-मीलप्रेप वगैरे आले आणि हे असले प्रयोग करणे थांबलेच.

तसेच टॉर्टीया, सामोशाच्या पार्‍या बनवणारे पण आ भि कॅटेगरी त >>> फार पुर्वी आम्ही बॉस्टनला असताना एका नॉर्थ इन्डियन मैत्रीणीने मुलाच्या वाढदिवसाला समोसा चाट आणी गुलाबजाम ठेवले होते...आणी ५० लोकासाठी तिने १०० समोसे आणी १०० गुलाबजाम, चाटसाठीचे छोले, चटण्या सगळ घरी केले होते...एकदम दन्डवत नाहितर अष्टान्ग दन्डवत प्रकरण...तीला कुकिन्गची खुप हौस होती आणी हाताला चव पण होती..तरी एकदरित अपार्टमेन्ट मधे छोट्या किचन मधे एवढा घाट घालण खुप होत.
बॉस्टनच्या सगळीकडून बन्दिस्त इमारतीत... आक्खा कॉरिडोअर समोस्याच्या वासाने घमघमत होता.

ग्रेट आहे ती.

अमेरिकेत तळण करताना धूर झाला तर फायर अलार्म वाजतो ना, मग तो वाजू नये म्हणून काय आयडिया करता. विशेषतः अपार्टमेंटसमध्ये. अवांतर प्रश्न पण सामोसे तळणे यावरून आठवलं.

त्याच्यावर नॅपकीन टाकून पांघरूण घालून झोपवतात अन्जूताई. Happy

कॅलगरीत गणेशोत्सवात आरतीच्या दिव्यानेच सुरू झाला व मधेच थांबवून फायर ब्रिगेड वगैरे सगळे येऊन सोपस्कार झाले होते, असे दोनदा झाल्यावर त्यांनी आम्हाला हाकलून दिले कायमचे. Proud जास्त ढणाढण आरतीचा दिवा कशाला हवा आहे, शांत ज्योत चालते की.

एक्झॉस्ट लावणे, दारं खिडक्या उघडणे, ओल्या फडक्याने वाजणार्‍या अलार्मला वारा घालणे, जुन्या अलार्मची बॅटरी काढता यायची, अपार्टमेंट जुनी असेल आणि अलार्म बदलला नसेल (अलार्म दर दहा वर्षांनी बदलणे फायरकोड मध्ये असते) तर अलार्म तात्पुरता डिसकनेक्ट करता येत असे Wink Lol हल्ली अलार्म देसी प्रूफ झालेत छेडखानी केली की दर पाच मिनिटांनी बोंबलत बसतात.
फीबीचा प्रसिद्द एपिसोड आहे ना! Lol

स्वाती धन्यवाद लिंक साठी. या वीकएंड la करून बघते पुऱ्या. कुटा ना होतो खरा पण इथे पाणीपुरीच्या डिस्क मिळतात, खूप स्टारची असतात . पोकर वाचून हसू आले. गेल्या खेपेस आणल्या तर पोरांनी फक्त पुऱ्या खाल्ल्या आता पाणी उरले आहे. त्या पुऱ्या ची एकच गोष्ट बरी आहे ते म्हणजे त्या मायक्रोवेव्ह मध्ये करता येतात. पण चेंडूसारख्या फुलतात आणि खाताना त्रासाचे होते. मुंबईत असेपर्यंत कधी पुऱ्या घरी करतात असे विचारही केला नव्हता. पाणी पुरी ही चाट भंडार मध्येच बरी लागते असा पक्का समज होता.

मीही एकदा पोरांच्या वाढदिवसाला ५०+ समोसे केले होते. कमीच पडले. मला आवड आणि सवय नाही एवढा स्वयंपाक करण्याची. तसाही तळण आवडत नसल्याने ते काम मुलांच्या बाबाने स्वीकारले, त्यामुळे घाट घातला. घरात, common passage मध्ये तळण वास भरून राहतो हे खरे आहे.
आमचा fire alarm साग्रसंगीत पूजा केली ( कaपूर आणि उदबत्ती) तरच वाजतो, १० मिनिटात disable केला तर कोणी येत नाही असा अनुभव आहे.

स्टँड मिक्सर आणि पास्ता मेकर मध्ये समोसे पारी कमी कष्टात तरीही खस्ता होते असा अनुभव आहे . तळण करण्यास तयार असलेला माणूस त्याची आठवण करून देतो, पण मी वर्षातून एकदा किंवा फारतर दोनदा करते. मी राहते त्या ठिकाणी मिळणारे समोसे कळकट तेलाने ओथंबून वाहतात . पाहूनच कसेतरी होते. शिवाय एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये काम करणारी ने आतली बातमी दिली की ते एकच तेल अगणित वेळा वापरतात तेव्हापासून परदेशी जिथे जास्त खप नसतो तिथे असले पदार्थ खात नाही.

धन्यवाद सर्वांना. फायर अलार्मची छान माहिती दिलीत, कसं गुंगवता तुम्ही Lol

अस्मिता खरोखरच एक शांतपणे तेवणारा दिवा पुरतो देवाला.

रोहन इन यु एस ए च्या vlog मध्ये त्याने एकदा तळताना काय काय जुगाड केला ते दाखवलेलं पण मला फार समजलं नव्हतं.

पण स्मोक/फायर अलार्मशी का खेळ करायचा? खरंच जेन्युइन प्रश्न आहे. अगदीच राहावत नाही म्हणून विचारते आहे.
इथे लाकडी बांधकामं असतात. एका छोट्या चुकीने अनेकांना त्रास होऊ शकतो. मी पूर्वी राहात असलेल्या एका टाऊनहाऊस कॉम्प्लेक्समध्ये कोणीतरी देवापासचा दिवा तेवता ठेवून बाहेर गेलं आणि देव्हार्‍याच्या डेकोरेशनमधलं काहीतरी पेटून आग लागली होती ज्यात शेजारच्या घरांचंही नुकसान झालं. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही.
कापूर नाही लावला तर देव प्रसन्न होत नाही का?

आपले भारतीय लोक अनेकदा असले 'जुगाड' करतात आणि त्याचा अभिमान बाळगून असतात. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीची बातमी वाचली असेल तुम्ही. पोलिसांनी अडवलं तर ही लोकं पुढच्या गल्लीत जाऊन फटाके वाजवू लागली. का?!

आत्ता मी जिथे राहते तिथे दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे गवत वाळलं होतं. एअर क्वालिटी आणि वार्‍याच्या प्रेडिक्शनमुळे बाहेर फटाके लावू नका अशा विनवण्या सिटी ऑफिशियल्स करत होते. तरी 'आम्ही अगदी फुलबाज्याच लावू, नीट लक्ष देऊ' म्हणत लावणारे महाभाग निघाले. शिकले सवरलेले आयटी प्रोफेशनल्स! फुलबाज्यांच्या ठिणग्यांकडे 'लक्ष' कसं देणार होते?
असो.

हो, हो ते अजिबात सेफ नाही, जेथे आहोत तिथले सेफ्टी प्रोटोकॉल पाळायलाच हवेत. काही तरी विचार करूनच ठेवलेले असतात. मी माझ्या घरात कसलेही उपद्व्याप करत नाही. दर होळी दिवाळीला बॅटरी बदलतो आठवणीने. पण हे पाहिलेलं आहे. ग्रूपमधे तुमचा काहीही कंट्रोल नसतो अशा वेळी. सेफ्टी पेक्षा देवधर्म किंवा काहीही मोठं नाही.

अजिबात खेळ करायचा नाही.
चॅट जीपीटी सारखं प्रश्न विचारल्यावर उत्तरात 'कसा खेळ करता येतो' ते सांगितलं. Happy ते माहित हवंच.
घरात फायर अलार्म वाजू लागला आणि फायर लागलेली नाही माहित असेल तर तो बंद करता आला पाहिजे. फायर अलार्म चालू स्थितीत आहे ना, एक्सपायर झाला नाही ना ते टेस्ट करता आलं पाहिजे. फक्त फायर नाही तर कार्बन मोनॉक्साईड अलार्म लावावा, मल्टीफ्लोअरी घरात ते अलार्म लिंक असावे की एक अलार्म वाजू लागला की घर गर्जू लागलं पाहिजे.
बाकी फायर अलार्म वाजुन आटोमॅटिक फायर ब्रिगेड येत नाही. तो फक्त आपल्याला जागं करायला असतो. फायर ब्रिगेडच्या हापिसात तिरंगासारखं फ्युज कंडक्टरचे पॅनल नसते. Lol अनलेस तुम्ही कुठल्या थर्ड पार्टी सिक्युरिटी सिस्टिमची संलग्न असाल आणि ते तुमच्या तर्फे इमर्जंसी सर्विसेसला कॉल करत असतील.

मी तर भारतात ही निरांजन उदबत्ती वगैरे बाबत फार आग्रही नाही. कुलूप लावून बाहेर जाताना (अगदी इथल्या इथे असेल तरी )निरांजन लावलेलं असेल तर सरळ शांतवून जाते.
औक्षण करताना ही लहान मुलं असतील आजू बाजूला तर निरां जनात टी लाईट ठेवते आणि त्याने ओवाळते. पेटती ज्योत ठेवतच नाही.
काही होत नाही म्हणून आपण अनेक रिस्की गोष्टी अगदी सहज करतो. आणि जो हे पाळतो त्याला मूर्खात ही अगदी सहज काढतो. असो.

Pages