Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> आपण पोलिस आणि न्यायालय यांच्यावर वर्षाला कित्येक हजार करोड खर्च करतो. पण गुन्हे तरीही होत आहेतच. ते बंद झाले नाहीत. तर मग हा खर्च नक्की कश्याला आहे हे मला कोणी सांगेल का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 July, 2026 - 09:2
=====

अरे बापरे, कधीपासून करतो आपण हा खर्च?

समजा मंत्र्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना हायकमांडने द्यायला लावला तर एक संदेश लोकांमध्ये जाईल की ह्यांच्यात नीतीमत्ता शिल्लक आहे. तरीही, समस्या तशीच राहू शकेल, पेपर फुटत राहू शकतील.>>>>
हे तर अगदीच पटलं. राजीनामा दिला किंवा मोदींनी द्यायला लावला तर नसलेली नीतिमत्ता शिल्लक आहे असे चित्र उभे राहील आणि Corrupt सरकार, पंतप्रधान आणि मंत्री हे पेपर फुटी करत राहतील.
८९ वेगवेगळे पेपर फुटलेत, ९०००० शाळा बंद केल्या ह्यातच लक्षात यायला हवे की नीतिमत्ता शून्य आहे ह्या सरकार मध्ये.
अर्थात आम्ही राजीनामा मागत राहू कारण आमच्या मध्ये नीतिमत्ता शिल्लक आहे.

राजीनामा, कोर्ट, कचेरी, पोलिस काही नको.>> विलेक्षन पण नको.
आता तेच नाही म्हंटल्यावर फोडा फोडी पण होणार नाही.

हो एक राजा, एक प्रधान, त्यांचे मंत्रिमंडळ आणि सैन्य!
सिस्टीमला उगाच लोकशाहीचा टॅग कश्याला.. जर त्यानुसार काहीही अपेक्षा करणे गैरच ठरत असेल तर

>>> उद्या सकाळी संयुक्त किसान मोर्चाचे शिष्ट मंडळ आंदोलनाच्या जागी येणार आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिनंदन!

NEET - किसान : आंदोलनाला चांगले वळण.

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिनंदन! >>> आभार
आज तीन निवृत्त सैनिक आले होते. त्यांनी मोदीची इतकी "स्तुती " केली कि माझी छाती भरून आली. आता कुठे त्यांची "महत्ता " लोकांना कळायला लागली आहे!
असो.
आज पुन्हा राममंदिर मोहन यादव ह्याची आठवण काढून झाली. लोकांचे प्रेम आहे ना! त्यामुळे सारखी आठवण काढतात.

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिनंदन! >>> आभार
आज तीन निवृत्त सैनिक आले होते. त्यांनी मोदीची इतकी "स्तुती " केली कि माझी छाती भरून आली. आता कुठे त्यांची "महत्ता " लोकांना कळायला लागली आहे!
असो.
आज पुन्हा राममंदिर मोहन यादव ह्याची आठवण काढून झाली. लोकांचे प्रेम आहे ना! त्यामुळे सारखी आठवण काढतात.

NEET - किसान : आंदोलनाला चांगले वळण.>>>

खरं तर विरोधकांना इतके मुद्दे आहेत उचलायला की बिचारे भांबावले आहेत, हाच मास्टर स्ट्रोक असावा।
इतके घोळ घाला की विरोधकाना कळता कामा नये की कुठला मुद्दा घेऊन विरोध करावा

आयुष्यात एखादी गाय रस्ता नीट ओलांडेल पण शेंणभक्त कधी आरती गायचे थांबणार नाहीत

आज उद्धव ठाकरे ह्यांनी अभिजित दिपके व वांगचुक ह्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. असे समजते की अभिजित दिपके गेले काही दिवस व्यवस्थित पोटभर जेवत आहेत व वांगचुक ह्यांची प्रकृती खालावली आहे. नीट परीक्षा (दुसऱ्या वेळेस) नीट पार पडली असेही समजते. आधीच्या नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर हे आत्महत्या करण्याइतके मोठे कारणही ठरू नये. मात्र तत्कालीन अति-भावनिक निर्णय घेतले जातात काहीवेळा. दबाव असतात, नैराश्य असू शकते. ऐन उमेदीच्या काळात तरुणांना असे निर्णय घ्यावेसे वाटणे हे फार वाईट आहे.

आता आंदोलन का सुरू आहे आणि आता दिपके काय करत आहेत व वांगचुक का जेवत नाहीत ह्याची कल्पना नाही. ठाकरेंनी कोणत्या कारणास्तव पाठिंबा दिला आहे ह्याची कल्पना नाही.

आता आंदोलन का सुरू आहे आणि आता दिपके काय करत आहेत व वांगचुक का जेवत नाहीत ह्याची कल्पना नाही. ठाकरेंनी कोणत्या कारणास्तव पाठिंबा दिला आहे ह्याची कल्पना नाही>>>>

कारण त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही.
आंदोलन हे re-NEET व्हावी म्हणून सुरू झाले नव्हते.

ओमी वैद्य आणि झीनत अमान ह्यांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे आणि वांगचुक ह्यांनी उपोषण मागे घावे अशी विनंती केली आहे.

उपोषण मागे घेतील तर बरे..
जीव गेला तरी कोणाला फरक पडणार नाही की कोणाचे रक्त उसळणार नाही.

सेलिब्रिटी पुढे येत नाहीत म्हणून बरेच जण ओरडा करत आहेत. पण सरकार सध्या ज्या पॉवर मध्ये आहे आणि त्यांची जशी मानसिकता आहे ते पाहता कुठल्याही सेलिब्रिटीसाठी हे सोपे नाही.

एकूणच सर्वच क्षेत्रात जे चालू आहे ते पाहता कधीतरी एक असे काहीतरी तात्कालिक कारण घडेल की देशभर जन आंदोलन उसळेल तेव्हाच चित्र बदलेल. आणि या किंवा येणाऱ्या प्रत्येक सरकारवर जनतेचा वचक राहील.

जीव गेला तरी कोणाला फरक पडणार नाही की कोणाचे रक्त उसळणार नाही. >> तो काय महात्मा गांधींचा जीव आहे का की फरक पडावा? उद्या मग उठसूट जो तो उपोषणाला बसेल.

उबो
कदाचित तुम्हाला वांगचूक ह्यांच्या विषयी विशेष माहिती नसणार.
आणि गांधीहत्यानेही काय फरक पडला? त्यांनीही उपोषण "आमरण" असे केव्हा केले.
उद्या मग उठसूट जो तो उपोषणाला बसेल.>>> असे झाले तर काय प्रोब्लेम आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या ते सुद्धा बहुधा महात्मे नसावेत म्हणून कोणाला काही फरक पडत नाहीये.

In March 2023, the climate activist and educator publicly thanked Mr. Pradhan on social media. Following a meeting, Wangchuk praised the Education Minister for being open to innovative, experiential learning ideas and expressed commitment to making the National Education Policy (NEP) a reality.

Fast forward to mid-2026, the situation has dramatically reversed. Wangchuk launched an indefinite hunger strike at Jantar Mantar in New Delhi alongside the Cockroach Janta Party (CJP). The primary demands of this protest include
:Resignation: Demanding Education Minister Dharmendra Pradhan step down.

Accountability: Protesting against alleged paper leaks and systemic irregularities in competitive examinations, particularly the NEET-UG controversy.

Statehood: Pushing for the Sixth Schedule status and full statehood for Ladakh.

कौन रोता है किसी और की ख़ातिर ऐ दोस्त
सबको अपनी ही किसी बात पे रोना आया

ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या ते सुद्धा बहुधा महात्मे नसावेत >>

पेपर फुटले म्हणून आत्महत्या करायच्या? इतर विद्यार्थी देणार तशी पुढच्या वेळी परीक्षा द्यायची ना. (आत्महत्या केलेल्यांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, गैरसमज नसावा.) मी शाळेत असताना दहावीचे पेपर सर्रास फुटत असत, माझ्या ऐकण्यात तरी आत्महत्या प्रकरण आले न्हवते तेव्हा कधी. उलट संपूर्ण परीक्षा परत घेतली हे चांगलेच झाले. नाहीतर ज्यांना पेपर मिळाला नाही त्यांचे जास्त नुकसान झाले असते.

पेपर फुटले म्हणून आत्महत्या करायच्या? इतर विद्यार्थी देणार तशी पुढच्या वेळी परीक्षा द्यायची ना>>>. हे सर्कास्टिक आहे का?

आणि पुढच्या वर्षी पेपर फुटणार नाही याची खात्री कोण देणार?
मग त्यांनी पुन्हा पुढच्या च्या पुढच्या वर्षी परिक्षा द्यायची.
सीलसिला चालता रहेगा.

Pages