Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> आता दिपकेला सरकारने
>>> आता दिपकेला सरकारने अजिबात उचलू नये. त्याला शेवटपर्यंत उपोषण करू द्यावे.
त्याला उचलणार, बोकलत! ते भाजपला विशेष मदत करत आहेत.
=====
>>> दीपके उपोषणाला बसला आहे का आता?
असे म्हणत होते टीव्हीवर काल. २० जुलैला मोठा मोर्चा आहे. क्रांती फार दूर नाही हे तुमचे मूळ धाग्यातील विधान सत्यात उतरणार आहे उद्या परवा. (तुम्ही व दिपकेचे समर्थक तिकडे असल्याने हा प्रतिसाद बहुधा नंतर वाचाल)
<<<तुम्ही व दिपकेचे समर्थक
<<<तुम्ही व दिपकेचे समर्थक तिकडे असल्याने हा प्रतिसाद बहुधा नंतर वाचाल
>>>
मी देव आहे.
मी ईत्र तित्र सर्वत्र असतो
इवीएम मॅनेज असल्याने मोदी
इवीएम मॅनेज असल्याने मोदी सरकार ला मतदारांची काळजी दिसत नाही. पण लोक रस्त्यावर उतरले तर सत्ता धोक्यात येऊ शकते हीच एक भीती त्यांच्या वागण्यात ठळक दिसून येतेय.
माझा अभिजीत दिपके या
माझा अभिजीत दिपके या व्यक्तीला तसा बिलकुल सपोर्ट नाही. किंवा असे म्हणू शकतो की उद्या जाऊन तो फ्रॉड निघाला तर ते सुद्धा पचवायची मनाची तयारी म्हणून मी आता असे एखाद्या व्यक्तीवर आशा लाऊन बसत नाही. पण तो जे करत आहे त्यामुळे जर असंतोष असलेली जनता संघटित होऊन सरकारला जाब विचारत असेल तर ते आजच्या काळात हवेच आहे. फक्त अशांनी पुढे जाऊन फसवले तर जनतेचा उत्साह कमी होतो. आणि पुढे जो जेन्यूइन असतो त्यालाही सपोर्ट मिळत नाही. म्हणून यांनी असे करू नये इतकीच मनापासून इच्छा आहे.>>>
अगदी सेम रुन्मेष
सरकार चूक करत असेल तर जाब विचारायलाच हवा
आणि प्रत्येक वेळी प्रश्न विचारणारा देशद्रोही तुकडे गॅंग सदस्य नसतो हे कधीतरी अंधभक्तांच्या मेंदूत शिरायला हवं अशीही एक भाबडी अशा आहे
लाइफ जास्त कॉम्प्लिकेटेड करू
लाइफ जास्त कॉम्प्लिकेटेड करू नये. १२ वी करून इंजीनियरिंग करावी जास्त हाव करून जेट नेट परीक्षेच्या फंदात पडू नये. पण दिपकेवर अवलंबून राहणे सरसरी चूक आहे. तो फ्रॉड निघू शकतो म्हणून मी स्वतः दादर स्टेशनबाहेर उद्यापासून उपोषण सुरू करणार आहे. सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. वडापाव समोसे खायला मिळतील या हावरेपणाने कोणीही तिथे येऊ नये तिथे फक्त पाणी असेल.
बोकलत
बोकलत
उपासाला वडापाव चालतो.
तुम्ही नाही दिला तरी आम्ही तुमचे सहसंवेदक उपासी तुम्हाला टुक टुक करून सामोसा भजी संयुक्त वडा चहा सह खाणार पिणार, आपल्या पैशाने.
उपोषण सुरू
उपोषण सुरू

https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbAMDT-si58/?igsh=MWpkeWJlMHA4MnVxeA==
जंतर-मंतर पेटले आहे
मुलांना लाठीचार्ज होत आहे
https://www.instagram.com/reel/DbAc_5ZNXuV/?igsh=ejNleXh4ZGJ2ZXE2
टीआर गॅस सुरू झाला आहे
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Da_9MDABTh9/?igsh=MWt1d2ZkMzBkOXJseA==
सरकारने तिथे जाण्याचे सारे मार्ग बंद केले आहेत.
फक्त शंभर दोनशे आंदोलक असे चिडवणारे सरकार आज निरुत्तर झाले.
https://www.instagram.com/reel/Da-o5YFKh21/?igsh=MXNoaDVxYjBoYmp2OA==
जबरदस्त क्राउड आहे जबरदस्त उत्साह आहे ❤️
इंडियन जेन झी ऑन फायर
सगळ्यांनी दादरला या.
सगळ्यांनी दादरला या.
पोलीस बंदोबस्त फार छान
पोलीस बंदोबस्त फार छान असल्याने कोणीही संसदे मध्ये घुसू शकले नाही. आंदोलन एकदम फेल गेले आहे. हॅट्स ऑफ टू अमित शाह
५६ इंची संसदेतून पळून गेला
५६ इंची संसदेतून पळून गेला
आंदोलन एकदम फेल गेले आहे.
आंदोलन एकदम फेल गेले आहे. हॅट्स ऑफ टू अमित शाह>>>>
खरंतर आंदोलन करायची गरजच नाही. सगळ्यांनी भाजप ला मत देवून सातत्याने निवडून आणावे.
तुमच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही. नोकऱ्यांचीही गरज नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पेपर विकत घेतील, शिक्षण आणि नोकऱ्या मिळवतील.
बाकीच्यांना ५ किलो धान्य. आता ८० कोटी प्रजेला दिला जात आहे. १५० कोटी प्रजेला पण देता येईल.
खरंतर आंदोलन करायची गरजच नाही
खरंतर आंदोलन करायची गरजच नाही. सगळ्यांनी भाजप ला मत देवून सातत्याने निवडून आणावे.
तुमच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही. नोकऱ्यांचीही गरज नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पेपर विकत घेतील, शिक्षण आणि नोकऱ्या मिळवतील.
बाकीच्यांना ५ किलो धान्य. आता ८० कोटी प्रजेला दिला जात आहे. १५० कोटी प्रजेला पण देता येईल.>> +१०००
मी त्या पोरांची मजा उडवत होतो
मी त्या पोरांची मजा उडवत होतो पण आता एकेक व्हिडिओ समोर येत आहेत कोण रक्तबंबाळ झालाय, कोणाला चक्कर आले, कोणाला विनाकारण लाठी मारताहेत. अति झालं हे मनमानी कारभार आहे सरकारचा. आता ती पोरं किती बरोबर किती चूक माहीत नाही पण सरकार १००% चुकीचं वागलंय. दडपशाहीचा निषेध. मी भक्त पण नाही आणि गुलाम पण नाही म्हणून जे चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर बोलायची हिम्मत ठेवतो. तुम्ही पण सगळे भक्त आणि गुलाम बनू नका.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbA4nZQtydJ/?igsh=MWNseHloZTFtdGFqdA==
लाठीमार नंतर दगडफेक झाली आंदोलकांवर
https://www.instagram.com/reel/DbAgWFmNlYS/?igsh=dHUycHEyeDR3cmZ5
गोळीबार करायला सुद्धा पोझिशन घेऊन तयार होते.
कुठली अप्रिय घटना घडू नये. कुठले चुकीचे वळण लागू नये.
माझे राजकीय ज्ञान फार तोकडे आहे. हा संघर्ष पुढे कुठे जाऊन थांबणार किंवा आता हा तिढा कुठे सुटणार? यात न्यायालयाची भूमिका काय राहणार, मुळात ते हस्तक्षेप करतील का वगैरे बरेच प्रश्न पडले आहेत.. कोणी जाणकारांचे काही अंदाज
जे अमानुषपणे मारताहेत
जे अमानुषपणे मारताहेत त्यांच्याकडे नावाची प्लेट पण नाही. नक्की पोलिसच आहेत का ते? आणि दुसरी गोष्ट ही सगळी माहिती लोकांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून समजते. एकही न्यूज़ चॅनल ही बातमी दाखवत नाहीये.
आज लेक आणि त्याचा मित्र गेले
आज लेक आणि त्याचा मित्र गेले होते मोर्च्यात सामिल व्हायला ९-९.३० ला. त्यांना आधी बराच वेळ जंतर मंतर च्या दुसऱ्या बाजूला स्टेज च्या मागे अडवून ठेवलं होतं. त्यामुळे मोर्चा सुरू झाल्याचे आधी कळले नाही. त्यात तिथे इंटरनेट बंद केले होते. माझ्याशी ,११ च्या सुमारास sms वर संपर्क झाल्यावर मी त्याला मोर्चा सुरू झाल्याचे सांगितलं. पण तोपर्यंत लाठीचार्ज च्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे मी त्याला संसदेच्या बाजूला न जाता दुसऱ्या बाजूला थांबलेल्या लोकांबरोबर शांततापूर्ण प्रोटेस्ट करायला सांगितलं. बऱ्याच ठिकाणी रस्ता अडवलेला होता, घरी परत जावं की काय या विचारात असताना त्यांना संसदेकडे चाललेले लोक दिसले त्यामुळे ते दोघं त्या मोर्च्यासोबत गेले. ली मेरिडियन हॉटेल जवळ पोचलेले असताना त्यांना समोर मुलांवर लाठीचार्ज होताना दिसल्याने ते पुढे गेले नाहीत. आता कुठे जावे विचारात असताना त्यांच्या बाजूला अश्रुधुराचे नळकांडे फोडलं. तिथे बाजूला असलेल्या काही मुली घाबरून पॅनिक झाल्या. यांनी त्यांच्या जवळचे पाणी देवून त्यांना शांत केले आणि सगळे जवळच्या युथ काँग्रेसच्या ऑफिसच्या आवारात शेल्टर घ्यायला गेले. तिथे आत आता आपण सुरक्षित आहोत असं वाटत होतं. त्याचवेळी पोलिसांनी आतमध्ये तीन अश्रुधुराची नळकांडे फोडली. त्यातले एक तर राजीव गांधीच्या पुतळ्यावर फेकलं होते. तिथे त्या गॅस जवळ अडकून पडू असं लक्षात आल्यावर हे त्या आवाराच्या मागच्या दाराने बाहेर पडले. कमीत कमी गर्दी असलेल्या भागात थांबले होते. पाऊस पडत असल्याने अश्रुधुराचा तितकासा त्रास झाला नाही. त्या मुलींना भेटायला आलेल्या एका थोड्या मोठ्या मुलाने यांना गल्ली बोळातून मंडी हाऊस मेट्रो स्टेशनवर पोचवलं. ( योगायोगाने त्या तीन मुली यांच्याच शाळेतल्या २०२३ च्या बॅच च्या नीट साठी ड्रॉप घेतलेल्या मुली होत्या)
सव्वाचार वाजता ही दोन्ही मुलं घरी पोचल्यावर मग त्यांचे इंटरनेट सुरू झालं. मधल्या काळात मी एका पत्रकार मित्राला फोन केला होता, सुरक्षित रस्ता कोणता आहे हे कळावं म्हणून तर कळलं तिथल्या मराठी पत्रकाराला मारहाण झाली पोलिसांकडून.
इथले "जय श्री राम" वाले
इथले "जय श्री राम" वाले हरामखोर कुठे आहेत?
अल्पना या अपडेट पोस्टसाठी
अल्पना या अपडेट पोस्टसाठी धन्यवाद.
कारण इन्स्टारील मध्ये सुद्धा जे दिसते त्यावर पटकन विश्वास ठेवून एकाच बाजूने विचार करावा असे वाटत नाही.
तुमचा लेक तिथे प्रत्यक्ष जातो हे ग्रेट आहे!
बोकलत, मीडिया बद्दल न बोललेलेच बरे. ते काही दाखवणार नाही याची कल्पना सरकार समर्थक आणि विरोधक दोघांना असेल.
असो,
हे सरकार जनतेला फारच गृहीत धरू लागले आहेत. काही झाले तरी आपली सत्ता कुठे जात नाही या विश्वासातून हा एटीट्यूड तयार झाला आहे असे वाटते. केवळ हेच प्रकरण नाही तर देशातील सर्वच समस्या आणि धोरणांबाबत हेच चित्र आहे.
इथे आणि एकूण सोशल मिडियावर
इथे आणि एकूण सोशल मिडियावर विद्यार्थी कुठे आहेत असं विचारलं जात होतं. तर प्रचंड संख्येने विद्यार्थी उपस्थित होते, काही शिक्षक पण होते. लेक जिच्याकडे पूर्वी ट्युशन ला जायचा ( ९ वी पर्यंत) ती मुलगी तिच्या मैत्रिणींबरोबर तिथे गेली होती ( २६-२७ वय असेल तिचे जास्तीत जास्त. नीट साठी सुद्धा काही विषय शिकवते ती) तिच्या मैत्रिणीच्या पायाला गर्दीतून पळताना दुखापत झाली. लेकाची सनातन धर्म पाळणारी आणि डाव्यांना , काँग्रेस - आप ना न मानणारी मैत्रिण तिथे आज जाणार होती. पण तिला उशीर झाला निघायला आणि यांच्याशी संपर्क झाला नाही म्हणून गेली नाही, एकटे जाणे सुरक्षित नाही म्हणून. दुसरे दोन कट्टर भाजपा सपोर्ट घरातले आणि अभाविप साठी काम करायला जाणारे दोन मित्र आज नाही जावू शकलो, पण उद्या तिथे पाठिंबा द्यायला जावू असं म्हणत होते.
तिथे मुलं, दिपकेला किंवा cjp ला पाठिंबा देण्यापेक्षा जास्त मुद्द्याला पाठिंबा देत आहेत. पक्ष कोणताही असला तरी मुद्दा जास्त महत्वाचा आहे त्यांच्यासाठी.
अल्पना, धन्यवाद या पोस्टसाठी.
अल्पना, धन्यवाद या पोस्टसाठी.
इतकी दडपशाही, कठीण आहे यापुढचा काळ.
अल्पना!
अल्पना!
अपडेट जमतील तसे देत रहा!
तुझ्या मुलाचा अभिमान वाटला! सुरक्षा पाळुन ज्या मुद्द्यांना पाठिंबा आहे त्या कारणासाठी प्रत्यक्ष सामिल होतो आहे!
व्हिडीओमध्ये दिसणारे हे जर
व्हिडीओमध्ये दिसणारे हे जर सिक्युरिटी फोर्सेस मधले नसतिल तर यांना आताच्या आता शोधून काढायला हवे आणि याबद्दल गृहमंत्र्यांचा राजिनामा घ्यायला हवा.....हे काय चाललंय काय??
https://x.com/PMFNEWS/status/2079213343618011257?s=20
व्हिडीओमध्ये दिसणारे हे जर
व्हिडीओमध्ये दिसणारे हे जर सिक्युरिटी फोर्सेस मधले नसतिल तर यांना आताच्या आता शोधून काढायला हवे आणि याबद्दल गृहमंत्र्यांचा राजिनामा घ्यायला हवा.....हे काय चाललंय काय?? आज हे लाठीमार करतायत, उद्या गोळ्या देखील घालतील.
https://x.com/PMFNEWS/status/2079213343618011257?s=20
दोन्ही बाजूंचे आपापल्या
दोन्ही बाजूंचे आपापल्या भूमिकांचे समर्थन करणारे अथवा दुसऱ्या बाजूचा खोटेपणा दाखवणारे असंख्य व्हिडीओ सोमीवर आले आहेत. वाहिन्यांनीही भरपूर दखल घेतली आहे. आंदोलनाला नेमके यश मिळाले नसेल, पण आवाज जगभरात पोचला आहे. काही पोलिसांनीही मार खाल्ला आहे बहुधा. मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली आहे. पोलिसांची वाहने फोडली आहेत. मुलाखत देणाऱ्यांना आंदोलन कशासाठी आहे, शिक्षण मंत्री कोण आहे, अश्या काही बेसिक गोष्टी माहीत नसलेल्या दिसत आहेत. येथे नेपाळ करू असे एकजण म्हणत होता. अल्पनाताई ह्यांचे चिरंजीव तेथे गेले होते हे स्तुत्य असून त्यांच्या समूहाने काही भयभीत मुलींना सुरक्षित ठेवले हेही त्याहून स्तुत्य आहे. कित्येक जेन्यूईन विद्यार्थी आंदोलनाच्या केंद्रस्थानापासून परिघापर्यंत सक्रिय असतील. कित्येक निव्वळ उपद्रवमूल्य असलेले बरेच काही करत असतील.
गेल्या काही दिवसांत तेथे आलेले नेते / लोकप्रिय व्यक्तिमत्वे, त्यांनी केलेली वक्तव्ये हे सिद्ध करतात की आंदोलन NEET ह्या विषयापलीकडे जाऊन राजकीय आंदोलन झालेले आहे. सोनम वांगचुक वीस दिवसांचे भुकेले असताना त्यांच्यासमोर समोसे व कचोऱ्या खाणारा व पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकाधिक वेळ व्यतीत करणारा अभिजीत हा स्वतःच्या उपोषणाबाबत सोनम वांगचुक ह्यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषण सोडण्याची विनंती करताच उपोषण सोडतो.
ज्या दुर्दैवी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून त्यांचे दुःख कमी होणार नाही. आर्थिक मदत केली पाहिजेच. मात्र, ही अशी कशी पिढी आहे जी एक पेपर फुटला म्हणून आत्महत्या करते? नापास झालो, cut off level पेक्षा कमी गुण मिळवले म्हणून आत्महत्या केली हेसुद्धा खरे तर अकल्पित व चिंताजनक आहे. पण त्यात निदान स्वतःचे अपयश हे तीव्र दुःख तरी असते. भारतभरात पेपर फुटले म्हणून स्वतःला मारून टाकणे हे आकलनापलीकडील आहे.
जे झाले ते झाले. मंत्र्यांचा राजीनामा हा फक्त एक संदेश देणारा उपाय म्हंटला जाईल, एवढेच आहे. त्या जागेवर कोणीही आले तरी ह्या गोष्टी होऊ शकतात.
निव्वळ विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आंदोलन आहे ह्या मूळ विचाराचे केव्हाच पानिपत झालेले असून हे आंदोलन फक्त 'भाजप हटाव' आंदोलन झालेले आहे.
मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली
मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली आहे. >>> पोलिस दगडफेक करत आहेत असे व्हिडिओ आले आहेत. एका ठिकाणी एक पोलिस ऑफिस एक गाडी फोडत असतानाचा व्हिडिओ आला आहे.
तसेच पोलिसांनी रात्रीच दगड भरलेले ट्रक जंतरमंतर येथे आणले होते. ते का आणले असावेत.
निव्वळ विद्यार्थ्यांच्या
निव्वळ विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आंदोलन आहे ह्या मूळ विचाराचे केव्हाच पानिपत झालेले असून हे आंदोलन फक्त 'भाजप हटाव' आंदोलन झालेले आहे.>>>
खरंतर, सगळ्यांनी भाजप ला मत देवून सातत्याने निवडून आणायला हवे.
कारण तुमच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही. नोकऱ्यांचीही गरज नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पेपर विकत घेतील, शिक्षण आणि नोकऱ्या मिळवतील. बाकीच्यांना ५ किलो धान्य.
आता ८० कोटी प्रजेला दिल जात आहे. पुढे १५० कोटी प्रजेला पण देता येईल.
दोन्ही बाजूंचे असंख्य व्हिडीओ
दोन्ही बाजूंचे असंख्य व्हिडीओ सोमीवर आहेत असे वर लिहिले मी
काही पोलिसांनीही मार खाल्ला
काही पोलिसांनीही मार खाल्ला आहे बहुधा. मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली आहे. पोलिसांची वाहने फोडली आहेत.>>>> प्रोटेस्टर्स आणि सिक्युरिटी फोर्सेस यांच्यात जे होईल ते मान्य....या आधिही बऱ्याच आंदोलनात ते झालेले आहे...पण फेक सिक्युरिटी पर्सनल?? म्हणजे कायदा सुव्यवस्था राखायच्या पडद्याआड राजनैतिक उट्टे काढण्याचा राजमार्गच उपलब्ध करुन देण्यात आल्यासारखा झाला...हे ज्याला कुणाला मान्य असेल त्याने तसं स्पष्ट सांगावे ना, उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये...निदान आहे मानसिकता आमची तशी हे सांगण्याचे धारिष्ट्य तरी दाखवा.
Pages