Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही मुलं लढा देताहेत.

आंदोलनाच्या ठिकाणी मुलं नाहीतच.

नीट ची परीक्षा परत झाली सुद्धा ती मुले आता घरी आहेत.

इथे आहेत ते सगळे आपली पोळी भाजून घेण्यासाठी जमले आहेत.

उगाच मुरली वाल्यासारखे एखादयाच्या मागे लागून आपल्या आयुष्याची वाताहत झालेली पाहणे या तरुणांच्या नशिबी येऊ नये एवढीच परमेश्वर चरणी इच्छा.

हे मी यासाठीच लिहिलेले आहे.

ते राहू द्या
चंदा चोरी कुणी केली?
अयोध्येत BJP का हरली?
बोलो बोलो कुछ तो बोलो.

चंदा चोरी कुणी केली?
अयोध्येत BJP का हरली?
बोलो बोलो कुछ तो बोलो.

हिरव्या टाळक्यांकडून उत्तराची फारच अपेक्षा करता बॉ.

तर अंधभक्तांच्या मते-
सर्वप्रथम डिफेन्स:
1. नीट पेपर लीक झालेच नाहीत.
मग एकेक करून:
2. झाले असतील तर- होऊ दे, नेहमीच होतात. त्यासाठी आत्महत्या कशाला?
3. तरूणांनी आत्महत्या केल्याच असतील तर- जेनझी मुले वीक आहेत.
4 मग वीक जेनझी मुले आंदोलन कसं काय करतात हा प्रश्न आला की- आंदोलन करू नये , अभ्यासावर लक्ष द्यावे.
5. बरं आंदोलन करतच आहेत तर - आंदोलनाने काय होणार? आणि मुळात आंदोलनाला कोणी गर्दी करतच नाहीये.
6. मग गर्दी दिसली की- प्रधानचा राजीनामा घेऊन काय होणार?
7. सरकारने का जबाबदारी घ्यायची?
8. आंदोलनाचा नेता दिपके कसा वाईट आहे.
9. आमरण उपोषणाने काय होणार?
10. आमरण उपोषण करणारे रात्री नीट जेवतखात आहेत.
11. वांगचुक मरायला टेकलेत म्हटलं की- वांगचुक श्रीमंत राजकारणी आहेत व मुलांना भरकटवत आहेत.
12. ते सायन्टिस्ट नाहीत कारण पेटंट नाही.
13. पेटंट का नाही ते सांगितलं की मग पर्सनल अटॅक.
14. जेव्हा कुठलेच प्रतिवाद लागू पडत नाहीत असं दिसलं की मग नेहमीचे चीप टॅक्टिक्स- तिथे कसे condom सापडले वगैरे.. हे फेबुवर ऑलरेडी चालु झाले आहे.
आपल्याच मुली व मुले आहेत, बहुतांश हिंदुच आहेत वगैरे सर्व असे घाणेरडे प्रतिवाद करताना विसरून जायचे.

आता 14 नंबर इथे कोण, कधी आणतोय ह्याची वाट बघायची.

एकुण काय, आमच्या आवडत्या सरकारविरोधात आवाज उठवू नका.

एकाही भाजपा मतदाराला ह्यात काहीही चुक वाटत नसेल, तर त्यांनी स्वतःला अंधभक्त म्हणून घ्यायला लाजू नये. डंके की चोट पर बोलो, हा हम अंधभक्त हय.

>>> डंके की चोट पर बोलो, हा हम अंधभक्त हय.

हे म्हणून तरी काय होणार आहे? येथील स्वयंघोषित सजग, डोळसपणे समाजाकडे बघणारे तिथे जाऊन उपोषण करणार आहेत का? की इथे प्रतिसाद डकवून आपली नेहमीची जीवनशैली सांभाळणार आहेत?

चुकीचे काय आहे? - पेपर फुटला. पहिल्यांदा फुटला?

कोणी पेपर फोडला? - ज्यांना अटक केली आहे त्यांनी

मग पुढे काय झाले? - परीक्षा पुन्हा घेतली व सुरळीत पार पडली

वाईट काय झाले? - अकरा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

त्यांच्याबद्दल अतीव वाईट वाटले तर आता काय करता येईल - फक्त आर्थिक नुकसान भरपाई, प्रत्येकी एक कोटीची मागणी आहे असे म्हणतात

ज्यांनी आत्महत्या नाही केली त्यांनी काय केले? - पुन्हा परीक्षा दिली

दिपके ह्यांची झुरळ पार्टी कशी निर्माण झाली? - न्यायाधीशांनी अपमानास्पद उल्लेख केला म्हणून

दिपके ह्यांनी आभासी जगतात लाभलेले लाखो अनुयायी कोठे आहेत? - आपापल्या घरी

दिपके ह्यांची आता लेटेस्ट मागणी काय? - (हे काही मला माहित नाही म्हणून येथेच विचारत आहे मी)

वांगचुक ह्यांची मागणी काय? - मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नुकसानभरपाई त्वरित द्या आणि बाकी सगळे लदाखबद्दल!

दिपकेचा लडाखशी संबंध - शून्य

आंदोलनाची दिशा काय? - जी परीक्षा नंतर सुरळीत पार पडली ती आधी सुरळीत पार पडली नाही म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घ्या व दुर्दैवी जीवांच्या घरच्यांना प्रत्येकी एक कोटी द्या. बाकी, लडाखचे भले करा.

पार्टी काढली कोणी, तो स्वतः काय करतोय, उपोषण कोण करतंय, अनुयायी कुठे आहेत, कशाचा कशाशी ताळमेळ नाही.

आणि इथले सदस्य वांगचुकच्या आंदोलनावरून एकमेकांशी वाद घालत आहेत.

पेपर फुटला म्हणून आत्महत्या? दुसरे काही करण्यासारखे नसतेच आयुष्याचे?

शेतकरी आत्महत्या - अत्यंत दुर्दैवी बाब!
बलात्कारितेची आत्महत्या - अत्यंत दुर्दैवी बाब

ह्या दोन्ही गोष्टींसाठी समाजाने एकजूट करून उभे राहायला हवे.

(कोणी असे विचारणार असेल, की लेक्चर देतोस, स्वतः काय करतोस! तर - मी करत असतो कार्य गेली चौदा वर्षे! जे जमेल ते करतो, येथे नाही प्रकाशित करत).

मी आधी डिप्लोमा घेतला व नंतर इंजिनिअरिंग ची डिग्री घेतली. डिप्लोमाला पहिल्या दोनात आलो असतो तर COEP ला प्रवेश मिळाला असता. मी पाचवा आलो. आयुष्यात मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा करिअरमध्ये उपयोग झाला नाही कारण मार्केटिंग मध्ये होतो. मला COEP ला प्रवेश मिळाला नाही म्हणून ना कोणी मला घालून पाडून बोलले ना मला आत्महत्या करण्याइतके नैराश्य आले. अर्थात, NEET व इंजिनिअरिंग ह्यांची तुलनाच होऊ शकत नसेल. NEET साठी खूपच अधिक प्रयत्न व पैसे आवश्यक असतील. मात्र, आत्महत्या? म्हणजे NEET चा पेपर फुटला म्हणून स्वतःलाच मारून टाकायचे? पुन्हा आयुष्यात ती परीक्षा होणार नाही?

हायला वांगचुक फेक आहेत होय
त्यांना उगाच मॅगसेसे पुरस्कार दिला मग
तो मागे घ्यावा म्हणून खरे काकांनी उपोषणाला बसायला हवं खर तर
जर त्यांना व्हाट्सएपमधून वेळ मिळाला तर

बाकी संबंध धागाभर हे आंदोलन किती फालतू आहे असे गळे काढणारे सन्मानिय सदस्य अगदी हिरीरीने पोस्ट मागून पोस्ट टाकत आहेत हे पाहून गंमत वाटते आहे

मरेना का तिकडे
एकदा फालतू आहे ठरवलं आहे ना
मग आता कशाला काळजी करत आहेत
जी मुले त्यांच्या नदी लागली आहेत ती त्याच लायकीचे आहेत आयुष्य बरबाद करून घेणारे
त्यांचीही काळजी करू नका बरे

Happy

https://www.facebook.com/share/v/194sE7RpSe/
सोनाक्षी सिन्हा बोलली वांगचुक समर्थनार्थ.

काल पासून बरेच जणांचे व्हॉट्सॲप स्टेटस सुद्धा दिसू लागले आहेत.

लोकांची भीती कमी होऊन सरकारविरोधात बोलायची हिंमत करणे नॉर्मल होईल तसे चित्र बदलत जाईल असे वाटते.

लोकांचा सरकार वरचा अंकुश हरवला आहे त्यामुळे सरकार कशाचीही जबाबदारी घेत नाहीये.

Wangchuk admitted to emergency ward, vitals stable.
Delhi police begins removing protestors at Jantar Mantar.

नीट चा निकालही नीट नाही

522 स्कोर असलेल्या मुलाला 95 मिळालेत तर 702 च्या मुलीला चुकिची ओमार शीट आलीये असा दावा केलाय तिला तर 87 मिळालेत

यासाठी कोणाला जबाबदार धरणे अपेक्षित आहे माननीय सदस्य सांगतीलच

वांगचुक ला उचलून नेला Rofl
वांगचुक जाताना खुश होता. हात हलवून हसत होता. कारण तिथे तो एकटाच उपाशी होता बाकी सगळे पार्टी करत होते खेळत होते मजा मजा चालली होती.
वांगचुक पण बोलला असेल बरं झालं पोलिस आले नाहीतर या अर्धवट डोक्यांच्यानी मला पोचवलाच होता जवळ जवळ. दिपके आता फक्त तिरडी बांधायचा बाकी होता. जाऊ दे बरं झालं वांगचुकसाठी. आता वांगचुकने यांच्या नादाला लागू नये.

हो ना असेही इथं कोणीं मेल तरी काय फरक पडतो

असाही देशद्रोही च होता तो, त्याला खरेतर फासावर लटकवून मारायला हवं होतं पण सध्या इतक्या केसेस पेंडिंग आहेत त्यात कुठं लटकवा रांगेत म्हणून सोडून दिलं

@आशुचॅम्प

तुमची तळमळ मी समजू शकतो, किंवा भक्तगण हे टिपिकली विरोधात गेलेल्याचा (WhatsApp युनिव्हर्सिटी) इतिहास खोदायला तडफडायला लागतात ते पण दिसून येते.

तरीही, ऑन फ्लिप साईड ऑफ अफेअर्स

सोनम वांगचुक किंवा इतर कोणीही आंदोलक जे सरकार विरोधी आहेत किंवा ठळकपणे कैक आंदोलनात दिसलेले आहेत ते सुद्धा सार्वजनिक आयुष्यात आहे, त्यांच्या मोटीव वर किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाची स्क्रुटिनी सुद्धा पब्लिक लाइफ मध्ये होणार.

कधी ती अंधभक्त करतील, कधी त्या आंदोलनात प्रवेश न मिळालेले इतर आवाज करतील कधी सामान्य जनता करेल, मीडिया पण करेल ह्यातले भक्त अन् स्पेसिफिक गोदी मीडिया आउटलेट सोडले तर इंडिपेंडंट मीडिया, जनता, विषयाचे एक्स्पर्ट हे प्रश्न उपस्थित करणारच ना ?

I mean, rightfully so if the Govt. is under scrutiny, the people who are questioning the govt would also be scrutinized as they too are in the public life and deemed to be questioned.

त्यामुळे मनाला लावून घेऊ नका असे अनाहूतपणे तुम्हाला सांगावे वाटले तुमचा वरील प्रतिसाद वाचून.

कमी जास्त वाटल्यास आगाऊ माफी मागतो पण मनापासून बोलावे वाटले म्हणून बोललो आहे. Happy

वांगचुक यांना आता चांगलं खायला प्यायला द्या. फुटबॉल क्रिकेट मॅच दाखवा. खूप सोसलं त्यांनी. बरं वाटतंय त्यांच्यासाठी.

>>> तुमची मळमळ मात्र समजली नाही ! असो !

तुम्हाला नाही हसलो दादा. आणि माझी काहीच मळमळ नाही. आंदोलन सुरू कशामुळे झाले, जिवंत कोणी ठेवले, चालले कोठे आहे, ह्या प्रक्रियेत येथील काहींची मध्येच वाचा का बसली व त्याबाबत तळमळ हे गौरवोद्गार काढले गेले म्हणून हसू आले.

तुम्हाला नाही हसलो.

जेम्स
धन्यवाद तुमची भावना समजली
नाही मी काय त्रास करून घेत नाही
माझं चुकलं तर तसे मान्य करायलाही मला काही वाटत नाही
शेवटी आपण अंधभक्त थोडीच आहोत काहीही झालं तरी पाठराखण करायला

एकेकाळी मीही मोदी समर्थक होतो पण एकंदरीत त्यांच्या कारभाराला निर्णयांना वैतागून गेलो
उद्या अन्य कोणी सत्तेत आलं तरी भूमिका हीच राहणार आहे

वांगचुकची परिस्थिती बिकट होतेय हे वाचल्यावर सतत गाईड चित्रपट आणि त्यातला उपोषणाला बसलेला देवानंद आठवायला लागला होता.

कॉक्रोच पार्टी काहीही असो, मला काही देणे घेणे नाही पण सोनम वाण्गचुक त्यात का अडकला तोच जाणे. उपोषण करायचेच तर दिपकेने करायला हवे होते. तो राहिला बाजुला, आरामात खात पित आणि हा उगीच अडकला.

आता पोलिसांनी हॉस्पिटलात नेला हे बरे केले. काहीतरी बरेवाईट झाले असते तर किती कांगावा केला गेला असता बघायला नको.

वांगचुकला दीर्घायुष्य लाभो आणि परत असल्या लोकांच्या नादी लागायचे नाही एवढे त्याला समजो. बाकी तो इतर वेळी जे राजकारण करतो ते करण्याचा त्याला हक्क आहेच.

उद्या अन्य कोणी सत्तेत आलं तरी भूमिका हीच राहणार आहे

माणसाची personality कळणारे वाक्य, जियो! प्रश्न विचारण्याची मुभा ही मर्म आहे लोकशाहीचे !

वॉल्टेयर जिवंत राहायला हवा इतकाच काय तो भाबडा आशावादी ईच्छा उसासा !

पण सोनम वाण्गचुक त्यात का अडकला तोच जाणे.>>>>
विरला जानन्ति गुणान्
विरला कुर्वन्ति निर्धने स्नेहम् ।
विरला: परकार्यरता:
परदु:खेनापि दु:खिता विरला:।।

इतका परदु:खाने दु:खी व्हायचा सोस होता तर दिपकेपासुन सुरवात करुन प्रत्येकाने दोन दोन दिवस उपोषण करायचे होते.

स्वतःच्या व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस व इन्स्टाग्रामवर पाठिंबा द्यायचा सोडुन तिथे जाऊन उपोषण करायचे होते. साखळी उपोषण हाही एक प्रकार आहेच की विरोध दाखवायचा. तसे करायला हवे होते.

बिचार्‍या साठ वर्षांच्या माणसाला का इतके दिवस तंगवत ठेवले. आणि म्हणे हे समर्थक तिथेच त्याच्यासमोर सामोसेही खात होते. मी विडिओ पाहिले नाहीत पण विरोधकांनी असे लिहिलेय.

एनी वेज, जंतरमंतरवर या आधी झालेल्या उपोषणानंतर तिथे जमणार्‍या उपोषणकर्त्या लोकांबद्दल मला काहीही वाटेनासे झालेय. उच्चशिक्षित राजकारणात आले तर ही गटारगंगा सुधारेल हे वाक्य केजरीवालने डोळ्यांसमोर टराटरा फाडुन फेकुन दिले. तेव्हापासुन नो ट्रस्ट.

साधना +७८६

मलाही हल्ली कुठल्याही नेत्यावर किंवा आंदोलकावर विश्वास ठेवायला भीतीच वाटते.

म्हणून मी आता कुठल्या व्यक्तीला, पक्षाला, संघटनेला सपोर्ट न देता मुद्द्याला सपोर्ट देतो.

शेवटी तुम्ही म्हणता तसे ही गटारगंगा कोणी दुसरा येऊन साफ करेल असा विचार केला तर दुसरा कोणीतरी मसीहा बनवून आपल्याला फसवेल. त्यामुळे आपण जनतेनेच आता हा माझा लढा म्हणून याकडे बघितले पाहिजे.

Pages