Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेच काल रात्री तिथे एक शीख दांपत्य बर्गर वाटत होते. तेथे एक मुस्लीम बिस्किटांचे पुडे वाटत होता. त्यांच्या मुलाखती ऐकल्या. छान बोलत होते.

Abhijeet Dipke urges farmer unions to join
हे कशाला हवे आहेत?

झुरळं कमी झाली का? कि घरी गेली?

Read more at: https://www.deccanherald.com/india/delhi/cjp-protest-continues-for-third...

The CJP’s indefinite sit-in at Jantar Mantar draws Left student bodies and farmer unions .

Several student organisations were also present, including the Students’ Federation of India (SFI), the All India Students’ Association (AISA), the Krantikari Yuva Sangathan (KYS), and Collective.

आता फक्त तुकडे तुकडे गॅंग येणे बाकी आहे.

तेच वाममार्गी फुरोगामी वैफल्यग्रस्त लोक परत एकदा आंदोलनात उतरताना दिसत आहेत.

नीट ची परीक्षा तर झाली आणि ज्यांना परीक्षा द्यायची होती ते काही आंदोलनात येणारच नव्हते.

बाकी चालू द्या.

मोदी आणि शाह चा राजीनामा झाल्या शिवाय झुरळ आंदोलन बंद नको करायला.

परीक्षा लीक होतच राहणार आहेत हे आहेत तोपर्यंत.

राम मंदिर भ्रष्टाचारावर मोदी समर्थक कधी प्रश्न विचारणार आहेत.

म्हणजे २०३४ पर्यंत झुरळ आंदोलन बंद नको करायला.>>> २०३४ पर्यंत परीक्षा लीक होतच राहणार असे म्हणायचे आहे का Happy Wink

मोदी आणि शाह चा राजीनामा झाल्या शिवाय झुरळ आंदोलन बंद नको करायला.

हे आपणच म्हणालात ना? त्याचे उत्तर आहे

त्याचा परीक्षा पेपर फुटण्याशी काय संबंध आहे?

<<
Maharashtra TET 2026 exam postponed over 'paper leak'!
>>

अरे वाह
नीट फेरपरीक्षा झाली आता पुढे काय असा प्रश्न विचारणाऱ्यांना सरकारनेच उत्तर दिले Happy

तरीही दिपके आणि झुरळे च चूक कारण ते भाजप च्या विरोधात बोलत आहेत त्यामुळे अंधभक्त फक्त तुकडे गॅंग वगैरे नेहमीचे तमाशे करत राहणारच

नीट ची परीक्षा झाली म्हणजे? विषय संपला? मुळात हे कोणी केलं दोषींना शिक्षा वगैरे काही मंद डोक्यात येत नाही का तुमचया
हे म्हणजे झालं की आता ते रेप वगैरे ती पीडित महिला कामावर पण जायला लागली आता का मागणी करयायची शिक्षेची या लायकीचे स्टेटमेंट आहे आणि असे बोलताना किंचितही लाज वाटत नाही हे विशेष

हे तमाम अंधभक्तांना उद्देशून आहे, इथल्या काही तीव्रस्मृती भक्तांनी उगाच उडते बाण अंगावर घेऊ नयेत ही नम्र विनंती

Jaipur paramedical exam leak: Students allege delays, tent seating at centre - India Today https://share.google/dHdUl29jz0PpTMi55

जयपूरला सुद्धा पॅरामेडिकल परीक्षेचा पेपर लीक

मुलांनी परिसरात कागदे उडवून घातला दंगा. बघा व्हिडिओ.
https://www.facebook.com/share/r/1c9h7M6jKh/

मला वाटते हे पेपर लीक धंदा काही वर्षापासून देशभरात चालू होता जो आता जिथे तिथे फुटत आहे.

अजूनही शिक्षण मंत्री राजीनामा देत नसतील तर मलाच हा धागा काढल्याची लाज वाटायला हवी.

प्रतिसादांचे विषय बदलणार असतील तर धाग्याचे शीर्षक तरी बदला नाहीतर झुरळ पार्टीचे आता काय सुरू आहे ते तरी सांगा राव.

>>> अजूनही शिक्षण मंत्री राजीनामा देत नसतील तर मलाच हा धागा काढल्याची लाज वाटायला हवी.

त्यांनी का राजीनामा द्यायचा? आणि दिला तर अशी कोणती सुधारणा होईल की जीमुळे पेपरफुटीमुळे नुकसान झालेल्यांचे नुकसान भरून येईल? नैतिक जबाबदारी तर म्हणत नाही आहात ना? कारण त्यात १९४७ पासून सगळे समाविष्ट होते. शिवाय, शिक्षणमंत्री आता कोणाला करावे ह्याचे थोडे मार्गदर्शन कराल का? धर्मेंद्र प्रधानांना तसेही काढणारच आहेत अशी बातमी होती परवा. मग आता कोणाला करायचे? भाजप व मित्र पक्ष ह्यांच्यापैकीच कोणालातरी की वेगळ्या पक्षातील कोणी? दुसरा एखादा पक्ष फोडून त्यातील नावाजलेला माजी शिक्षणमंत्री घ्यायचा का? त्याचे काय काय पर्याय उपलब्ध आहेत ते कृपया विशद व्हावे. आणि तो माजी मंत्री नाही फुटला तर मग कसे? धागा झुरळ पार्टीच्या आंदोलनाचा आहे. त्यातील पदाधिकारी ह्याबाबत काही म्हणत आहेत का? की त्यांनाही आता असे वाटत आहे की ही पार्टी काढली ह्याची आता आम्हाला लाज वाटायला हवी?

<<< प्रतिसादांचे विषय बदलणार असतील तर..
>>>

वर मी जयपूर पेपर लीक ची बातमी टाकली त्याखाली आपला हा प्रतिसाद.
आपल्याला हा विषय बदललेला वाटतो?

असो...

<<<<
1) त्यांनी का राजीनामा द्यायचा?

2) आणि दिला तर अशी कोणती सुधारणा होईल की जीमुळे पेपरफुटीमुळे नुकसान झालेल्यांचे नुकसान भरून येईल?
>>>>>>

प्रश्न २ मुळे खरे तर इच्छाच मरून गेली प्रश्न १ चे उत्तर द्यायची.
म्हणजे एखादा खून झाल्यावर आता कोणाला शिक्षा करून गेलेला माणूस परत येणार आहे का अश्या प्रकारचा युक्तीवाद वाटला.

असो,
तरी प्रश्न १ चे उत्तर देतो.

एकूणच जे देशभरात शिक्षणक्षेत्रात घडत आहे त्याची नैतिक जबाबदारी (तुमचाच शब्द) घ्यायला हरकत नाही असे प्रामाणिकपणे वाटते.
आजकाल कुठल्याच राजकारण्यांमध्ये नैतिकता राहिली नाहीये याची सुद्धा कल्पना आहे. पण म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून अपेक्षाच ठेवायची नाही असेही नाही ना.
खरे तर मोदींनीच राजीनामा मागून घ्यायला हवा पण तसे ते करणार नाहीत याचीही कल्पना आहेच. पण म्हणून तशी मागणी करायचीच नाही असेही नाही ना. अन्यथा यांना वाटेल की अरे जनतेलाच काहीच पडली नाही तर अजून भ्रष्ट कारभार करूया बिनधास्त!

पण मला वाटते प्रश्न नुसता नैतिक जबाबदारीचा नाही तर ही जी सारी कांड होत आहेत त्यात त्यांना कमिशन सुद्धा मिळत असेल. हा वरपासून सुरू होणारा भ्रष्टाचार वाटतो.
त्यामुळे शिक्षणमंत्र्यावर कारवाई करून काय फरक पडेल या प्रश्नाचे उत्तर फारच सोपे आहे. पुढे जे कोणी येतील ते जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करतील. तसेच आपल्या हाताखालच्यानाही करायला लावतील आणि नाहीच केले तर त्यांनाही हाकलता येईल.

प्रश्न ३ - यांचा राजीनामा घेतला तर पर्याय काय?
माझे याबाबत ज्ञान तोकडे आहे. हे मी सरकारवर सोडतो. एवढ्या मोठ्या पक्षात एक तरी लायक नेता असेलच अशी अपेक्षा आहे.

काय सर! तुम्ही तर माझ्या आधीच उत्तर देऊन मोकळे झालात.
कसे कात हे जमते तुम्हाला. तुमच्या सहन शक्तीला हा घ्या माझा सलाम!
रावणाचा वध व्हायची वेळ आली आहे तर ऐकणारा विचारतोय कि रामाची सीता कोण? ह्या धाग्यावर आता ६७६ प्रतिसाद आले पण...
ह्यावरून मला एक गोष्ट आठवली Moby Dick नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. त्याचे हस्त लिखित जेव्हा प्रकाशकाकडे गेले तेव्हा प्रकाशक म्हणाला, ""ह्या कथेत देवमाशाची गरज आहे काय?"
कठीण आहे.

तेलंगणामधील पेपर लीक (२०२३)
तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे सरकार असताना, तिथल्या १० वीच्या (SSC) बोर्ड परीक्षेचा तेलगूचा पेपर लीक झाला होता. तसेच तेलंगणा लोकसेवा आयोगाचा (TSPSC) पेपरही लीक झाला होता.
तेव्हा तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार आणि भाजप नेत्यांनी अत्यंत आक्रमक होत, तिथल्या शिक्षण मंत्री सबिता इंद्रा रेड्डी आणि आयटी मंत्री के. टी. रामा राव यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. "विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मंत्र्यांनी पदावर राहू नये," असे तेव्हा भाजपचे म्हणणे होते.

राजस्थानमधील REET पेपर लीक (२०२२)
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असताना तिथल्या शिक्षक भरती परीक्षेचा (REET) पेपर लीक झाला होता.
भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जयपूरमध्ये मोठे मोर्चे काढले होते. "नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे," अशी आग्रही मागणी भाजपने लावून धरली होती.

जेव्हा काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांच्या राज्यांमध्ये असे घडते, तेव्हा भाजप "नैतिक जबाबदारी" (Moral Accountability) हा सर्वात मोठा मुद्दा बनवतो आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय शांत बसत नाही.

पण त्यांचे समर्थक तर भाबडेपणाने विचारतात का बुवा घ्यायचा राजीनामा, मज्जाय ना
Happy

नुसती नैतिकता नाही तर सगळीच
ओडीसा मध्ये पाचवी च्या पुस्तकात धड्या ऐवजी ऐश्वर्या चे निंबुडा गाणे छापले आहे
त्यावर गदारोळ होताच अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, हे गाणे मूळचे राजस्थानी लोकगीत असल्याने 'एक भारत श्रेष्ठ भारत' मोहिमेअंतर्गत याचा समावेश करण्यात आला होता, जो चुकीच्या पद्धतीने मांडला गेला

Happy

नुसती धमाल सुरुये

राष्ट्रीय स्तरावर देशाची शिक्षण व्यवस्था पाहणाऱ्या मंत्र्यांच्या स्वतःच्या राज्यात, त्यांच्याच पक्षाच्या सरकारकडून अशा गोष्टी होत असतात

त्याच पुस्तकात आइन्स्टाइनचा उल्लेख महान पायलट असाही केला आहे म्हणे Happy

धर्मेंद्र प्रधानांना तसेही काढणारच आहेत अशी बातमी होती परवा >>> तसेही? परवाच तर मोदी साहेबांनी त्यांची आरती ओवाळली होती. वाहवा वाहवा केली होती. आता एकदम दोन दिवसात काय झाले बुवा?

ऋन्मेष,

धाग्याचा विषय, जो तुम्ही दिला आहेत तो हा खालीलप्रमाणे:

"जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !"
=====

■ ह्यांचा मॅनिफेस्टो राजकीय आहे व असूदेत. पार्टीची निर्मिती नीट परीक्षा पेपरफुटीमुळे झाली होती व मूल्ये व तत्वे ही 'नीट 'पेपरफुटीबद्दल काही म्हणताना दिसत नाहीत. तरीही, नीट पेपरफुटी व इतर सर्व पेपरफुटी हे गुन्हेच आहेत व लोकांची करिअर्स डिस्टर्ब झाली आहेत. काहींनी तर आत्महत्या केल्या आहेत. हे अत्यंत वाईट आहे. मात्र, पेपरफुटी हा उल्लेख त्या साईटवर मला दिसला नाही. परत बघतो, माझे चुकतही असेल.

■ धाग्याचा विषय आहे कॉक्रोच जनता पार्टी झिंदाबाद! हा राजकीय विषय आहे. असूदेत व असणारच. ह्या पार्टीच्या आंदोलनाचे आताचे स्वरूप काय आहे ही शंका एकदोनवेळा विचारली व कोणी काही लिहिले नाही. एखादी पुढची पेपरफुटी झाली की तुम्ही येथे नोंदवत आहात पण ती पार्टी त्याबाबत काय करत आहे तेही कृपया सांगत चला. म्हणून म्हंटले की धाग्याचे शीर्षक तरी वेगळे हवे किंवा प्रतिसाद तरी वेगळे असायला हवेत.

■ नैतिक जबाबदारी - ह्यापुढील तुमच्या प्रतिसादाचा भाग हा अत्यंत भोंगळ स्वरूपाचा आहे. म्हणजे, अपेक्षाच करू नये का, मागणीच करू नये का, जनतेने दबाव आणला नाहीच आहे तर मस्त भ्रष्टाचार करू, मोदींनी राजीनामा द्यावा अशी विधाने ह्या निव्वळ गप्पा आहेत. मुद्दा हा आहे की एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला तर होणार काय आहे? पुढे पेपरफुटी होणार नाही हे कसे निश्चित होणार आहे? नेमके काय बदलले की ह्यापुढे पेपरफुटी होणार नाही? कॉक्रोच जनता पार्टीकडे ह्याचे काय सोल्युशन आहे? (धागा त्यांची झिंदाबाद करणारा आहे, मते तुम्ही मांडत आहात. त्यांची काय मते आहेत? मंत्री बदलले की नक्की काय होईल?)

■ तोकडे ज्ञान, निर्णय सरकारवर सोडतो, त्यांच्यात एक तरी लायक माणूस असेल - ह्याही भोंगळ गप्पाच आहेत. म्हणजे तुम्ही एक वाक्य टाकणार आणि ते वाचून सरकारने पुढची जबाबदारी घ्यावी असे सगळ्यांनी मान्य करायचे. 'हे असे व्हायला हवे, ते तसे व्हायला हवे, हे व्हायलाच नको, कोणीतरी लायक माणूस असेलच, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा' ही विधाने कोणत्याही वयोगटाचा व कोणत्याही वैचारिक स्तरावरचा मनुष्य कोठेही बेजबाबदारपणे करू शकतोच.

असो!

येथील एकूण झुंबड बघता निरुपयोगी हलकल्लोळ माजवणे ह्यापलीकडे काही होणार नाही ह्याची नम्र जाणीव आहे.

धुजप (धुळवड जनता पार्टी ) इथे पण ऍक्टिव्ह झाली आहे.

झुरळांबद्दल बोलायच्या ऐवजी भाजपविरोधाचा धुरळा उडवणे चालू आहे.

मूळ मुद्दा भरकटवला.

आता इतर धाग्यांवर याची व्हॉट अबौटरी पण चालू होईल.

त्यांनी का राजीनामा द्यायचा? आणि दिला तर अशी कोणती सुधारणा होईल की जीमुळे पेपरफुटीमुळे नुकसान झालेल्यांचे नुकसान भरून येईल? नैतिक जबाबदारी तर म्हणत नाही आहात ना? कारण त्यात १९४७ पासून सगळे समाविष्ट होते. >>>
हे सगळ पटलं. धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा देऊन काहीही बदल होणार नाही. कारण ह्या सरकारची शिक्षण क्षेत्राबद्दलची एकंदरीत असलेली अनास्था. खरंतर, ह्या सरकारला सामान्य नागरिकांचीच काही जबाबदारी नकोय आणि ती त्यांच्या एकंदर आचरणातून दिसून येत आहे.

१९४७ पासूनच्या नैतिक जबाबदारी बद्दल म्हणत असाल तर,
लाल बहादुर शास्त्री यांनी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता.

शिवराज पाटील, विलासराव देशमुख आणि आबा पाटील यांना २६ नोव्हेंबर ची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला होता.

शिवाजीराव निलंगेकर ह्या मुख्यमंत्र्याला मुलीसाठी शैक्षणिक क्षेत्रात घोटाळा केला म्हणून राजीनामा द्यावा लागला होता.

जॉर्ज फर्नांडिस यांनी राजीनामा दिला होता कारण संरक्षण खात्यात घोटाळा झाला होता. ते अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते.

इतरही काही उदाहरणे असतील पण ही काही लगेच आठवली म्हणून दिली.

अशी अपेक्षा खरंतर मोदी शाह ह्यांच्याकडून करणे फोल आहे.

मरू द्या हवी तितकी मुलं.

मूळ मुद्दा भरकटवला.>>>
तुम्हाला मूळ मुद्द्यांमध्ये रस होता? सतत तर हे किती फालतू आहे
कोणीच कसे फिरकले नाहीत
आंदोलन कसे फसले
व्यु लाईक्स कसे घसरले असल्याच गोष्टी चवीचवीने टाकत होतात की वो?

आता एकदम तुम्हाला मुद्दा कसा काय आठवला बुवा?

@ बेफिकीर आणि भोंगळ गप्पा

सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आणि अकार्यक्षमतेवर एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून टीका करताना सोबत पुढे काय उपाय योजना करायच्या त्या सुद्धा मुद्देसूद मांडाव्यात आणि भ्रष्ट नेत्यांना पर्यायी नेते सुचवावेत अन्यथा त्या भोंगळ गप्पा समजल्या जातील असे म्हणायचे आहे का की कसे?

बरे मी सखोल अभ्यास करून यावर उपाय योजना आणि ॲक्शन प्लॅन तयार केला तर तो इथे तुम्हाला सुपूर्त करावा की सरकार दरबारी जमा करावा की कसे?

सखोल अभ्यास करून यावर उपाय योजना आणि ॲक्शन>>>>

नुसते इतके उपयोगी नाही, तुम्हाला पेपरफुटीची झळ लागली आहे का याचा पुरावा जोडावा लागेल, नीट दिलीये आजवर कधी हेही सांगावे लागेल, तसेच यासाठी तुम्हाला कुठून आणि कसे फंडिंग होते याची आकडेवारी पण द्यावी लागेल सोबत
त्याशिवाय तुमचा कुठलाही मुद्दा ग्राहय धरला जाणार नाही Happy

ऋन्मेष,

कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सध्या कोणत्या दिशेने कार्यरत आहे व त्यांचे नेते ह्या नंतर झालेल्या पेपरफुटीबद्दल काय म्हणत आहेत हे मला माध्यमांमध्ये सहजपणे कोठे वाचायला मिळाले नाही. येथे हा धागा आहे म्हणून येथे विचारत आलो इतकेच. माझे इतर मुद्दे तुम्ही वा कोणीही दुर्लक्षित करू शकताच किंवा त्यावर सडकून टीकाही करू शकता. ते मुद्दे येथील चर्चेतच उपस्थित झालेल्या मुद्यांवर आहेत इतके नक्की. मी पुन्हा पुन्हा धाग्याच्या मूळ विषयाकडे येत आहे असे माझे गृहीतक आहे.

Pages