Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता तर त्याला neet परीक्षेचे महत्व कळले असते.
Submitted by सुपरचार्ज on 8 June, 2026 - 21:40
देशाचा पंतप्रधान शिकलेला असता तर त्याला neet परीक्षेचे महत्व कळले असते.>>> अगदी +++
Submitted by कंसराज on 8 June, 2026 - 21:53
ज्याने कधी एकही परीक्षा दिली नाहीये त्याला NEET च्या विद्यार्थ्यांचे दुःख कसे समजणार!">>>
तुम्ही आणि मी ही NEET परीक्षा दिली नाही. इतरही इथे अनेक इथे ह्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत कारण त्यांना नीट आणि इतर परीक्षा फुटी मुळे होणारा त्रास, दुःख समजू शकतात.
Submitted by कंसराज on 23 June, 2026 - 04:05
दुतोंडीपणा यालाच म्हणतात काय ?. आपल्याला सोयीचं असेल तेवढं आणि तसं लिहायचं
इथे एवढा काथ्याकूट करणारे लोक आहेत पण नीट एकानेही दिलेली नाही.
मी दोन वेळेला नीट दिलेली आहे.
आणि
पहिल्या वेळेस प्रवेश न मिळाल्यावर काय काय होतं हे एक वर्ष अनुभवलेलं आहे. प्रवेश न मिळाल्यास एका रात्रीत तुम्ही हुषार पासून ढ विद्यार्थी होता आणि लोक तुम्हाला मोडीत काढतात( write off) हे एक वर्ष भर अनुभवलेलं आहे.
पण तरीही मी शिक्षणपद्धतीला दोष देत नाही.
शिक्षण पद्धती हि न्याय पद्धती सारखी असते. त्यातील फटी पळवाटा काढायला, त्याच्या त्रुटींचा फायदा घेण्यासाठी तांत्रिक मुद्द्यावर किस काढण्यासाठी निष्णात वकील बसलेले असतात.
तसेच पेपर फोडण्यापासून, आपले पेपर कुठे जातात तेथे पेपर तपासनीसाना लाच देण्यापासून निकालात गडबड करण्यासाठी माणसं टपून बसलेली असतात.
हा एक फार वेगळा विषय आहे आणि १५ वर्षे प्राध्यापकी करताना यातील अनेक खाचाखोचा मी स्वतः पाहीलेल्या आहेत.
२२ लाख विद्यार्थ्यांसाठी भारतभरात परीक्षा घेणे हि सोपी गोष्ट नाही. त्यांना पेपर तयार करणे वेळेत पुरवणे ते गोळा करणे ते तपासून घेणे निकालाची तालिका बनवणे हे सर्व अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि साधन सामग्री लागते.
त्यातून या प्रणालीत गडबड कशी करायची यासाठी मोठ्या प्रमाणावर डाम्बरट लोक टपून बसलेले असतात. यात मोठ्या प्रमाणावर पैसा आणि धाक दमन पद्धतीचा अवलंब होतो.
कितीहि उत्तम पद्धतीने परीक्षा संचालित केली तरी सर्व लोकांचे कधीही समाधान होउ शकत नाही.
सार्वजनिक सेवेत आपल्या विरुद्ध फारशा तक्रारी आल्या नाहीत म्हणजेच आपण उत्तम काम करतो आहोत असे मी माझ्या कनिष्ठांना आणि विद्यार्थ्यांना सांगत असतो.
रेल्वेच्या आरक्षणाच्या रांगेत उभे राहून आपण आपला क्रमांक येण्याची वाट पाहत असतो त्यावेळेस तो कारकून दोन मिनिटं निसर्ग विधी साठी किंवा चहा पिण्यासाठी गेला तर आपलं त्याला लगेच मनात दूषणे देऊ लागतो. आता कुठे नंबर लागत होता तेवढ्यात आताच याला जायची गरज होती का?
आपण आठवून पहा किती वेळेस आपण त्या कर्मचाऱ्यास धन्यवाद दिलेले आहेत. त्या कर्मचाऱ्यांची जराशी चूक झाली आणि पैसे कमी पडले तर ते त्याला स्वतःच्या खिशातून त्याच दिवसाखेरीस भरावे लागतात हे किती लोकांना माहिती आहे.
असो.
पेपर फुटणे याचे हे समर्थन नाहीच किंवा असंख्य विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणे हे नक्कीच भूषणास्पद नाही.
पण उंदीर मारण्याच्या खात्यात असलेल्या लोकांनी ज्या तर्हेने अश्लाघ्य भाषेत टीका केली ती समर्थनीय नाही.
लोकांच्या मनातील असंतोषाचा फायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात अग्रेसर असणारे हलकट लोक यांबद्दल कोणतीही सहानुभूती असायचे कारण नाही.
हि जिकडे तिकडे जमा झालेली झुरळं यातील एकानेही नीट दिलेली नाही आणि ज्यांनी परत नीट दिली आहे त्यांना झुरळांच्या आंदोलनात सहभागी होणे शक्य झालेले नाही.
हि मूलभूत वस्तुस्थिती लक्षात न घेता इथे तेच धुळवड पार्टीचे सदस्य शिमगा करत आहेत.
जनरल फेकाफेक नंबर २!
जनरल फेकाफेक नंबर २!
कुछ जलने की बू आ रही है
कुछ जलने की बू आ रही है
दुतोंडीपणा इतक्या लवकर उघड पडेल असं वाटलं नव्हतं ना?
Why there are always issues
Why there are always issues with NEET and not with IIT-JEE? If NEET gose online mode like JEE this paper leak issue will go away.
Candidates reported anomalies
Candidates reported anomalies where candidates with lower raw scores received higher percentiles than those who scored higher, which impacted the eligibility cutoff for the JEE Advanced exams. Additionally, the NTA faced heavy criticism for initially releasing, then quickly taking down and re-uploading final answer keys, creating a tense atmosphere for aspirants.
India has approximately 1.49 million (14.9 Lakh) undergraduate engineering seats approved by the All India Council for Technical Education (AICTE) across roughly 8,800 colleges.
India currently offers approximately 1,29,805 MBBS seats across 824 medical colleges nationwide.
Government Medical Colleges: ~63,657 seats (includes AIIMS and Central Institutes).
Private and Deemed Universities: ~66,148 seats
खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची फी ७५-८० लाख आहे चार वर्षाची. यात हॉस्टेल जेवण्याखाण्याचा खर्च अंतर्भूत नाही.
इंजिनियरिंगच्या फी २४ लाख पर्यंत आहे उदा बिट्स पिलानी पण हॉस्टेल जेवण्याखाण्याचा खर्च अंतर्भूत आहे .
तुमच्याकडे आहे ना एक नेता
तुमच्याकडे आहे ना एक नेता करिष्मा करू शकणारा मग तुम्ही का इथे वेळ वाया घालवत आहात.
हेच लोकं जास्त वेळ वाया घालवत असतात, त्यांचा नेता कसला भारी करत
एकदा सगळं गहाण टाकलं की मग दुसरं उरतं काय
करिष्मा
करिष्मा
"To boldly go where no Indian PM has gone before."
>>> हेच लोकं जास्त वेळ वाया
>>> हेच लोकं जास्त वेळ वाया घालवत असतात, त्यांचा नेता कसला भारी करत
एकदा सगळं गहाण टाकलं की मग दुसरं उरतं काय
यातील 'हेच लोक' हा शब्दप्रयोग काही उचित वाटला नाही.
बाकी: - सिरियसली??
तुम्ही, भरत, भ्रमर, पृथ्वीकर, उदय, विकू, कंसराज, आग्या, वेंगुर्लेकर, सुपरचार्ज हे सगळे महिनोंमहिने येथे फिरकत नाहीत?
>>> हि मूलभूत वस्तुस्थिती
>>> हि मूलभूत वस्तुस्थिती लक्षात न घेता इथे तेच धुळवड पार्टीचे सदस्य शिमगा करत आहेत.
सुबोध खरे,
तुम्ही 'हेच लोक' ह्या सदरात मोडता. त्यामुळे तुम्ही 'तेच धुळवड पार्टीचे सदस्य' असे लिहिण्याचा अधिकार घालवून बसला आहात. 'हेच लोक' वगैरे वक्तव्ये करण्याचा अधिकार येथील काही प्रिव्हिलेज्ड लोकांना आहे.
, भरत, भ्रमर, पृथ्वीकर, उदय,
, भरत, भ्रमर, पृथ्वीकर, उदय, विकू, कंसराज, आग्या, वेंगुर्लेकर, सुपरचार्ज हे सगळे महिनोंमहिने येथे फिरकत नाहीत?>>>
मी इथे comments टाकत नाही याचा अर्थ असा नाही की मी मायबोलीवर फिरकत. नाही. मी रोज इथे येतो आणि मला हवे ते वाचतो.
राजकारण रे राजकारण
राजकारण रे राजकारण
अबु धाबी सेण्टर बातमी बद्दल
अबु धाबी सेण्टर बातमी बद्दल पुढे त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाकडून काही प्रतिवाद येतोय का चेक केले पण तसे काही दिसत नाही. त्याला नागपूर मधले सेण्टर नंतर दिले गेले आणि त्याने तेथे परीक्षाही दिली. त्याच्या वडिलांचे वक्तव्य इथे आहे ज्यात काही प्रतिवाद नाही. इतर कोठे काही दिसले नाही.
https://gulfnews.com/amp/story/world%2Fasia%2Findia%2Fneet-ug-row-nagpur...
एकूण रागाने ही बातमी उचलण्याइतके काही नव्हते. जनरल अॅप्लिकेशन एरर होता. एकदा कानफाट्या नाव पडले की पब्लिक कशाचाही इश्यू करते तसे झाले.
फा +७८६
फा +७८६
मला सुद्धा हे अबुधाबी प्रकरण इतके हाईप होण्याचे कारण समजले नाही.
पेपर फुटीचे कांड, त्यातून मुलांच्या आत्महत्या, सीबीएससी बोर्डात टेंडरवेळी झालेला भ्रष्टाचार, मुलांना परीक्षेला जाण्यास व्यवस्था नाही म्हणून स्टेशनमध्ये झालेला रेल रोको, तोडफोड, दंगा, खान सर विरुद्ध सरकारी मिडिया वाद इतक्या मोठ्या गोष्टी घडल्या असताना अबुधाबी इतकी वायरल कशी झाली हा प्रश्न पडला. कदाचित यामधील fun element मुळे असावे.
यातील 'हेच लोक' हा शब्दप्रयोग
यातील 'हेच लोक' हा शब्दप्रयोग काही उचित वाटला नाही.>>>
तुम्हाला उचित वाटावं असंच लिहिण्याची सक्ती नाहीये ना माबोवर ?
काय सांगता येत नाही, आपण सर्वगुणसंपन्न आहात त्यामुळे तसा अधिकार किंवा वरदान आपल्याला प्राप्त असेल
यापुढे जमल्यास माझ्या सगळ्या पोस्ट फाट्यावर माराव्यात ही नम्र विनंती, तुम्हाला उचित वाटणारे मी काय लिहीत नसतो
माझ्या पोस्टवर आलेला प्रतिसाद
माझ्या पोस्टवर आलेला प्रतिसाद कोट करून त्या प्रतिसाददात्याची कड घेणारे लिहून अप्रत्यक्षपणे माझ्याबद्दल लिहिलेत म्हणून तो प्रतिसाद मी दिला. अन्यथा, ढुंकून बघत नाही. विंदा यांच्यावरील मी लिहिलेल्या धाग्यावरील तुमची वारा पाहून दिशा बदलण्याची भूमिका कित्येक वर्षांपूर्वी पाहिली तेव्हापासूनच फाट्यावर मारतो. तो धागा मीच अप्रकाशित केला होता हेही नोंदवून ठेवतो.
=====
अवांतर लिहिण्याची वेळ इतरांमुळे आली आहे. मी धाग्याशी संबंधित तेच लिहीत होतो.
आपण स्मृती वर काही उपचार
आपण स्मृती वर काही उपचार करावेत ही नम्र विनंती अत्यंत फालतू गोष्टी वर्षानुवर्षे लक्षात ठेवणे आणि त्यावर बोलणे हे म्हणजे डोक्यात प्रचंड अडगळ झाल्याची लक्षणे आहेत
मोकळे व्हा तुम्हालाच बरे वाटेल
आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणी कोणाबद्दल लिहिलं हे अनुमान काढून त्यावर दात विचकण्याची किमया पण अदभूत आहे
मी म्हणलं तसं आपण सर्वगुणसंपन्न आहात ते काय खोटे नाही
चालेल, जी आज्ञा! आता मी
चालेल, जी आज्ञा! आता मी ह्यावर काही लिहिणार नाही. धाग्याचा विषय वेगळा आहे. तो विषय सुरू राहो.
मंडळ आभारी राहील आपले, कायम
मंडळ आभारी राहील आपले, कायम उपकृत
हे तुम्ही बोललेलं लिहिलेलं तुमच्या लक्षात राहीलच आपल्या कारण फालतू गोष्ट लक्षात ठेवण्याची आपली क्षमता विलक्षण आहे
>>> मंडळ आभारी राहील आपले,
>>> मंडळ आभारी राहील आपले, कायम उपकृत
हे तुम्ही बोललेलं लिहिलेलं तुमच्या लक्षात राहीलच आपल्या कारण फालतू गोष्ट लक्षात ठेवण्याची आपली क्षमता विलक्षण आहे
विनंती करतो की धाग्याच्या विषयावर लिहू.
अहो बस करा की, तुम्ही पण
अहो बस करा की, तुम्ही पण दुसरे सर व्हायला लागला काय
नका लिहू माझ्यावर म्हणत दळण दळत बसलाय
आम्ही धाग्यावर लिहू नाहीतर अजून कशावर
तुम्ही फाट्यावर मारणार एकदा ठरवलंय तर तसे वागा म्हणजे झालं
कोणी मग धाग्याच्या विषयावर लिहितोय का नाही हे धागाकर्ते आणि अडमीन बघून घेतील, आपली पिरपीर थांबवा
>>> अहो बस करा की, तुम्ही पण
>>> अहो बस करा की, तुम्ही पण दुसरे सर व्हायला लागला काय
नका लिहू माझ्यावर म्हणत दळण दळत बसलाय
आम्ही धाग्यावर लिहू नाहीतर अजून कशावर
तुम्ही फाट्यावर मारणार एकदा ठरवलंय तर तसे वागा म्हणजे झालं
कोणी मग धाग्याच्या विषयावर लिहितोय का नाही हे धागाकर्ते आणि अडमीन बघून घेतील, आपली पिरपीर थांबवा
=====
नाही, तसे काही नाही. तुम्ही लिहा हवे ते. मी आपला धाग्यानुसार येथील वाचकांना एक शंका विचारतो, की हे आंदोलन आता कितपत गंभीरपणे घेतले जात आहे व नीट परीक्षा पार पडल्यानंतर या आंदोलनाची दिशा काय असेल.
Nagpur NEET aspirant's story:
Nagpur NEET aspirant's story: NTA says candidate 'selected Abu Dhabi'; Dubai
“We have complete logs of his activities on the NEET portal. Despite downloading the admit card on June 16, neither the candidate nor his family contacted the NTA and did not send any mail regarding this. Instead, his father approached the media on June 20, just a day before the exam. We are now allotting him a centre in Nagpur, but our cyber team is examining whether the changes were made by the candidate himself or by someone who may have gained access to his account,” the official said.
<<<<येथील वाचकांना एक शंका
<<<<
येथील वाचकांना एक शंका विचारतो, की हे आंदोलन आता कितपत गंभीरपणे घेतले जात आहे व नीट परीक्षा पार पडल्यानंतर या आंदोलनाची दिशा काय असेल.
>>>>
फेरपरीक्षा पार पडली. पण काही विद्यार्थ्यांचे जीव गेले. जे परत येणार नाहीत. त्यांना न्याय मिळावा आणि पुन्हा अशी वेळ कोणावर येऊ नये असे ज्यांना वाटत असेल त्यांचा लढा चालू राहील.
>>> पण काही विद्यार्थ्यांचे
>>> पण काही विद्यार्थ्यांचे जीव गेले. जे परत येणार नाहीत. त्यांना न्याय मिळावा आणि पुन्हा अशी वेळ कोणावर येऊ नये असे ज्यांना वाटत असेल त्यांचा लढा चालू राहील.
पूर्णपणे सहमत!
मी आत्ताच झुराळाचे आंदोलन बघत
मी आत्ताच झुराळाचे आंदोलन बघत होतो. तिथे अगदी असाच प्रश्न एकाने विचारला, तेव्हा त्याला झुरळांनी "उचित " उत्तर दिले.
दिपाकेनेही त्याला उत्तर दिले.
"जर धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा दिला तर मी आंदोलन बंद करून घरी जाईन." किंवा असेच काही तरी.
आज तिथे बरेच काही घमासान झाले. त्याची सविस्तर बातमी उद्या वाचा.
>>> जर धर्मेंद्र प्रधान ने
>>> जर धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा दिला तर मी आंदोलन बंद करून घरी जाईन." किंवा असेच काही तरी.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर ते (दिपके) कुठे जाणार असतील? कोण जाणे!
(>>> किंवा असेच काहीतरी - नक्की माहिती उपलब्ध झाली तर वाचायला आवडेल)
ओके
ओके
अभिजित भेटला कि उद्या मी त्याला विचारीन ,"बाबा रे आमच्या #### ना खूप काळजी वाटते आहे कि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर तू कुठे जाशील? "
आणि फार अधीर झाला असाल तर
आणि फार अधीर झाला असाल तर
मेलडी खाओ और खुद जान जाओ!
मी विचार केला कि उद्दया पर्यत कशाला थांबा. म्हणून सरळ दिपकेला फोन लावला. तो बिचारा झोपायच्या तयारीत होता.
तो म्हणाला कि "...... तस झाल तर मी इथेच ठिय्या देऊन बसेन. एनी ऑब्जेकशन ?"
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DZ_u9TlTpUd/?igsh=Mzh5OWpoZGg3MzNt
जंतर मंतर वर शेतकरी पोहोचत आहेत
काल रात्री जंतर मंतर वर खूप
काल रात्री जंतर मंतर वर खूप पाउस झाला. सगळी झुरळे पावसात नाचत होती.
Pages