Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच ! (मूळ धागा)
=====

>>> मलाही हल्ली कुठल्याही नेत्यावर किंवा आंदोलकावर विश्वास ठेवायला भीतीच वाटते. (लेटेस्ट प्रतिसाद)

Uhoh

=====

सध्या तेथे इस्त्रायलविरुद्ध घोषणा सुरू आहेत. ऐकाल ते नवल आहे.

सरकारने या लफड्यात न पडुन बरेच केले असे अजुन दोन दिवस गेले की वाटायला लागेल Happy अजुन मोदींचा राजिनामा मागितला नाही का?

>>> > मलाही हल्ली कुठल्याही नेत्यावर किंवा आंदोलकावर विश्वास ठेवायला भीतीच वाटते. (लेटेस्ट प्रतिसाद)>>>>> यात काही आश्चर्य नाही. ऋन्मेष यांचे राजकीय विचार फारच उथळ आणि अपरिपक्व आहेत. ते फार वाहवत जातात....

मोदीजी यांनी इस्रायलचे पंतप्रधान व्हावे अशा घोषणा दिल्या जात आहेत म्हणे
निषेध करायची ही कुठली पद्धत कळेना आता
Happy

पण झालं ते बरेच झालं कारण आंदोलनाच्या माध्यमातून अनेक अतिरेकी घुसणार होते, तसेच चायनीज आणि नक्षली आणि घातपात करून अनेक मंत्री तसेच नेते याना उडवण्याचा डाव होता म्हणे

मास्टर स्ट्रोक करून वेळीच सरकार ने फुटीरतावादी नेत्यांना उचलले आणि आंदोलनाची हवाच काढून घेतली

देश पुन्हा एकदा सुरक्षित झाला

न कोई घुसके आयेगा ना कोई वापस जायेगा

जिझस, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला
सगळे एका लायनीतले मूर्ख!
बायबल मधला हा उतारा पहा.
... and they all came with vadaapav in one hand and free Coca‑Cola® in other hand to witness crucifixion of Jesus. Few came with costly Apple mobiles. They were busy making reels.
One roman citizen ask Jesus ," Why the hell you got into this lafada? instead why not booze, Bollywood and cricket?
Jesus spake, " o father, they did not bring vadapaav and cola for me!"
then father spoke thus,
"my son , they don't know what they are eating. it is unhealthy food but i will forgive them ."

Maha students claim mismatch in NEET-UG retest scores.
सीलसिला चलता रहेगा!
Olympian Manu Bhaker voices concern amid exam paper leak protests.
one more fool
'When will you wake up?': Hrithik Roshan backs Sonam Wangchuk
चायला! आता काय बोलु ?

साधना,

मोदींचा राजीनामा मागितला.

साधना,
मोदींचा राजीनामा मागितला.>>>>

वा… मग निवडणुका घ्यायच्या की हे नवे तरुण दमाचे नेते थेट राज्यकारभार चालवणार??

आता येथेच पहा.

साधा झुरळांच्या आंदोलन बद्दल धागा आहे त्यात नेहमीच्या वाममार्गी लोकांनी असंबद्ध मुद्दे आणून केवळ आपला मोदी द्वेष व्यक्त केला आहे.

झुरळ पक्षाच्या जाहीरनाम्या बद्दल एकानेही मत मांडलेले नाही किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय अधिक नक्की काय करायला हवे आहे याबद्दल लिहिलेले नाही.

कारण सज्जड असा मुद्दा त्यांना सापडत नाहीये.

श्री सोनम वांगचुक यांनी स्वतः श्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल प्रशंसा केली होती.

https://x.com/Wangchuk66/status/1636408767976988672?lang=en

मग अचानक असं काय झालं?

पेपर फुटला हि वाईट गोष्ट आहेच पण भारतात सायबर फ्रॉड किती होतात आणि त्याचे फटके किती लोकांना बसतात
Indians lost an estimated ₹22,495 crore (over $2.6 billion) to cybercrimes in a recent year, with investment scams accounting for more than 75% of the total stolen money. यात सुद्धा माणसांची आयुष्यभराची कमाई एका क्षणात नाहीशी होते.

असं नाही कि केवळ तरुणच यात अडकलेले आहेत.

नीटची प्रश्नपत्रिका फुटली हा पण एक सायबर क्राईमच आहे.

Yes, the NEET paper leak involves significant cybercrime elements. While the initial leak can be an insider job, the subsequent circulation of stolen questions on messaging apps, digital extortion, and the sale of fake leaked papers on social media are actively investigated by cyber authorities.

त्याचा तपस चालू आहे आणि ज्या तरुणांना याचा फटका बसला आहे त्यांची पुनरपरीक्षाही घेतलेली आहे.

The Central Bureau of Investigation (CBI) has arrested 13 private individuals, including key conspirators and a Chemistry lecturer involved in NTA's paper-setting panel, after discovering that leaked question papers were sold for vast sums. The government also ordered a re-examination, cancelled previous scores, and withheld the results of involved candidates.

The Indian Government and investigative agencies have taken several concrete actions:
CBI Arrests: The CBI has apprehended 13 individuals, including the alleged kingpin P.V. Kulkarni (a Chemistry lecturer on the NTA's paper-setting panel) who leaked question papers during special coaching classes.

Cancellation and Re-test: The initial May 3 NEET-UG examination was officially cancelled, and a nationwide re-examination was successfully conducted on June 21.Strict Penalties on Accused: The National Testing Agency (NTA) has withheld the final scores of identified accused, such as Yash Yadav, despite a court allowing them to take the June 21 retest.

Evidence Recovery: CBI officials have seized multiple digital devices containing 132 handwritten questions, 111 of which matched the NTA master question sets.

Parliamentary Accountability: Top officials from the Union Education Ministry, NTA, and CBI have briefed parliamentary panels and courts to detail the conspiracy and aggressively oppose bail pleas for the arrested suspects.

बेफिकीर
>>>
लेटेस्ट प्रतिसाद
>>>

तुम्ही माझे दोन प्रतिसाद कोट बरोबर केले पण पाहिल्याचा अर्थ चुकीचा काढला.
पहिल्या प्रतिसादात मूळ लेखात जो विश्वास दाखवला आहे तो कुठल्या नेत्या पक्ष संघटनेवर दाखवलेला नसून जेन झी पिढीवर दाखवलेला होता. त्यांच्यात असंतोष भरलेला आहे. बाहेर पडणार येत्या काळात. आता याचा कुठल्या राजकीय पक्षाने फायदा उचलायचा प्रयत्न केल्यास नवल ते काय! पण आपल्याला म्हणजे जनतेला सावध राहायचे आहे. आपण आपल्या हक्कासाठी लढत आहोत हे कायम ध्यानात ठेवायचे आहे.

पण आपल्याला म्हणजे जनतेला सावध राहायचे आहे. आपण आपल्या हक्कासाठी लढत आहोत हे कायम ध्यानात ठेवायचे आहे.>>>>>

लढा म्हणजे नक्की काय करायचे? फेबु इन्स्टा
व्हॉअ‍ॅ मायबोलीवर रान उठवायचे का??

कुठेतरी वाचनात आलं कि, वांगचुकची अनारकली झालेली आहे. २०११-१२ मध्ये अण्णांची झाली होती तशी. दिपके+विरोधी पक्ष वांगचुकको मारना चाहती है, लेकिन बीजेपी उसे मरने नहीं देती…

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय अधिक नक्की काय करायला हवे आहे याबद्दल लिहिलेले नाही.>> त्यांना राजीनामा द्यायची गरज नाही. राममंदिर वाल्यांनी चांगला मार्ग दाखवला आहे. एक पाश्चाताप यज्ञ करायचा फक्त.

रुन्मेष दोष त्यांचा नाहीये
अजून इतक्या पोस्ट वाचूनही त्यांच्या डोक्यात हा प्रकाश पडलाच नाहींये की मुद्दा सरकार च्या चुकांचा आहे

विरोध त्याला आहे, पण त्यांना कुणीच कुठलाच कशाही प्रकारे विरोध केलेलाच नकोय

जे जे विरोध करतील ते कसे चूक आहे कसे देशद्रोही आहेत त्यांची धोरणे कशी चुकलेली आहेत, त्यांच्यात किती दोष आहे याच्याच आरत्या गाण्यात मग्न आहेत कारण त्यांना तेवढंच येतं फक्त

सरकार वर त्यातही लाडक्या मोदींच्यावर टीका म्हणजे वैयक्तिक अपमान वाटतो आपल्या श्रध्दास्थानाला असा धक्का लागला की ते पिसाळून उठतात, आकांडतांडव करतात

मुद्दा सरकारने चूक मान्य करून सुधारणा घडवून आणण्याचा आहे हे ते सपशेल विसरतात, आणि ज्यांनी विरोध केला त्यांना नामोहरम करून आपल्या विजयाचा डंका वाजवत बसतात

काहीही होऊ शकत नाही या लोकांचं
कधीतरी डोळे उघडा रे अंधानो
देशात सगळं आलबेल नाहीये मोदी देव नाहीयेत
मोदी सरकार भरपूर चुका करतात आणि त्या चुका दाखवणारे सगळे देशद्रोही नसतात आणि मोदींच्या भाजपच्या बाजूने बोलणारे सगळे देशभक्त नसतात

कधीतरी जेव्हा समजेल तेव्हा काही उपयोग नसेल

तोवर वाजवत रहा टाळ्या आणि थाळ्या

दिपकेंवर शाई फेकली एका महिलेने - निषेध!

ऋन्मेष - अपेक्षित प्रतिसाद!

सिर्फ अल्ला का नाम रहेगा, सीता के पती नीता के पती, वांगचुक आणि वांगडू ह्यांचा काही संबंधच नाही, नीटच्या सुरळीत पार पडलेल्या परीक्षेनंतर आलेल्या मार्कशीटमध्ये प्रचंड गोंधळ, NEET, CBSE ह्याची पूर्णरूपे माहीत नसलेले लढत आहेत, दिपके ह्यांचे रात्री वातानुकूलित खोलीत आराम करतानाचे व्हिडीओ, दिपके ह्यांच्या तीर्थरूपांनी मोदी ह्यांना मोकळा सोडलेला सांड म्हणणे, तिकडे वांगचुक सलाईनवर व देखरेखीखाली आणि आणखी काय काय...

आंदोलन आहे कशासाठी हेच आता कोणालाही कळत नाहीये

Lol

आंदोलन आहे कशासाठी हेच आता कोणालाही कळत नाहीये>> मला वाटतं त्यांची मागणी स्पष्ट आहे.

आता अभिजीत दिपके उपोषणाला बसणार असं कळतंय.

शर्मिलाजी, कृपया जरूर सांगा त्यांची मागणी.

मला टीव्ही, वर्तमानपत्र, फेसबुक, मायबोली एवढे स्रोत उपलब्ध आहेत माहिती मिळवण्यासाठी. त्यातून असे आकलन झाले की धर्मेंद्र प्रधान ह्यांचा राजीनामा ही एक प्रमुख मागणी होती. मी माझ्या आकलनानुसार येथे लिहिले होते की त्यांचा राजीनामा हा काही उपाय नाही. Damage झालेले आहे व ते सिस्टिममध्ये झालेले आहे. नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला / घेतला तरी पुढे (कोणत्याही सरकारमध्ये) असे होऊ शकेल. आपल्याकडे शिक्षा भीतीदायक नाहीत, आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही.

इतर मागण्या कोणत्या होत्या ते लक्षात नाही. न्यायालयाने अपमानास्पद उल्लेख केल्याने निर्माण झालेल्या संघटनेला पाठिंबा द्यायला उतरलेले सगळे पहिल्यापासूनचे भाजप विरोधकच आहेत. राहुल गांधींनीसुद्धा अगदी शेवटी व सावधपणे पवन खेडा ह्यांना पाठवले. तेही ह्यात पडू इच्छित आहेत की नाही हे स्पष्ट नाही. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात प्रधान जाणार हे नक्की असल्याच्या एक दोन तरी बातम्या वाचल्या.

इथे कोणाहीबाबत वैयक्तिक न लिहिता काहीजण प्रचंड वैयक्तिक आकस ठेवून का लिहितात हे समजत नाही.

नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला / घेतला तरी पुढे (कोणत्याही सरकारमध्ये) असे होऊ शकेल. >> होऊ शकेलच.
त्या त्या वेळी कुणाची तरी accountability असणे गरजेचे आहे.
सध्या कुठेही काहीही घडले तरी जबाबदार कुणीच नाही.
"No one killed jesica"

हे एक बरंय
सगळे विरोधक सातत्याने अपडेट्स देत रहातात इथं
मी तर पहिले इकडेच येतो, न्यूजपेक्षा फास्ट सर्व्हिस आहे यांची Happy
चला बाकी काही नाही याना कामाला लावलं ही एक त्यातल्या त्यात बरी गोष्ट झाली Happy

केवळ काही आरोपींना अटक करून मूळ प्रश्न सुटत नाही. शिक्षण मंत्रालय आणि 'एनटीए' (NTA) सारख्या मोठ्या संस्थांचे उत्तरदायित्व निश्चित व्हावे, यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे.

अगदी योग्य, तो आवाज उठवायला प्रशासनाने पूर्ण परवानगी दिली.

एका माणसाच्या उपोषण करण्यामुळे त्याचे निधन झाले तर कायदा, सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकेल म्हणून त्या माणसाला दवाखान्यात नेले. तसेच, ह्या गोष्टीसाठी कोणी मरू नये हे कारणदेखील असावे.

आता आंदोलन कशासाठी आहे?

देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होतो, तेव्हा सिस्टीम फेल झाली. राजीनामा देणे म्हणजे "आमच्याकडून चूक झाली आणि आम्ही तिची जबाबदारी स्वीकारतो" हे मान्य करणे होय.
पण तसे काही सरकार करताना दिसत नाहीये उलट तशी मागणी कारण्यऱ्यांची बदनामी सुरू आहे

पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायमस्वरूपी आणि अजामीनपात्र कायदा बनवावा.
परीक्षा घेणारी यंत्रणा पूर्णपणे बदलून ती निर्दोष करावी, जेणेकरून भविष्यात डिजिटल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पेपर लीक होणार नाही.

अशाही मागण्या आहेत

खेरीज आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना ₹१ कोटींची भरपाई द्या अशीही मागणी आहे
या मागणीशी मी वैयक्तिक रित्या सहमत नाहीये

इथंच नव्हे तर कुठेच विनाकारण भरपाई ची मागणी नको
अगदीच आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर त्या सापेक्ष निर्णय घ्यावा पण सर सकट सगळ्यांना पैसे वाटत सुटणे चूक आहे

ओके.

दुसरा परिच्छेद पूर्ण पटला.

तसे होणे कितपत शक्य असेल हे माहीत नाही.

तसेच, हे प्रश्न आधी कधी उद्भवले होते का व तेव्हा अश्या मागण्या झाल्या होत्या का हेही माहीत नाही.

परीक्षा घेणारी यंत्रणा पूर्णपणे बदलून ती निर्दोष करावी, जेणेकरून भविष्यात डिजिटल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पेपर लीक होणार नाही.

निर्दोष वर अडखळलो, अशी सिस्टीम मुळातच अस्तित्वात नाही आणि कधी असणंही शक्य नाही, नॉर्डिक स्कॅन्डिनेवियन सिस्टीम्स सुद्धा तितक्या निर्दोष नाहीत (जगातील तथाकथित सर्वत्रीकरण बेंचमार्क सिस्टीम) आपण त्यातल्या त्यात भयानक जास्त डायव्हर्स बहुसांस्कृतिक सेटअप मध्ये जगतोय क्लिअरली. सरकारने किमान फाईन ट्युनिंगची इच्छाशक्ती दाखवली तरी पुरेसे म्हणायचे !

रोज समोसा खाणे सुद्धा तब्येतीसाठी चांगले नव्हते.
खाणाऱ्याच्या पोटात जळजळ आणि बघणाऱ्याच्या पोटात मळमळ.
आता उपोषणाने त्याच्या पोटातील जळजळ थांबेल पण बघणाऱ्यांच्या पोटातील मळमळ मात्र वाढेलच Happy

जोक्स द अपार्ट,
माझा अभिजीत दिपके या व्यक्तीला तसा बिलकुल सपोर्ट नाही. किंवा असे म्हणू शकतो की उद्या जाऊन तो फ्रॉड निघाला तर ते सुद्धा पचवायची मनाची तयारी म्हणून मी आता असे एखाद्या व्यक्तीवर आशा लाऊन बसत नाही. पण तो जे करत आहे त्यामुळे जर असंतोष असलेली जनता संघटित होऊन सरकारला जाब विचारत असेल तर ते आजच्या काळात हवेच आहे. फक्त अशांनी पुढे जाऊन फसवले तर जनतेचा उत्साह कमी होतो. आणि पुढे जो जेन्यूइन असतो त्यालाही सपोर्ट मिळत नाही. म्हणून यांनी असे करू नये इतकीच मनापासून इच्छा आहे.

त्यामुळे जर भाजप आयटी सेल आणि समर्थक अशा आंदोलकांची इमेज जाणून-बुजून डागाळत असेल तर त्याला विरोध राहील.

Pages