Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> जनरल फेकाफेक करणार्या
>>> जनरल फेकाफेक करणार्या व्यक्तीला हे डिटेल्स माहीत नसतील
येथील बहुतांशी धाग्यांवर लागू होईल असे विधान केल्याबद्दल मी व्यक्तिशः आभार मानतो.
=====
App ची चूक असू शकते हे मान्य!
जनरल फेकाफेक क्रमन्क १
जनरल फेकाफेक नंबर १
क्या पीएम-गृहमंत्री ने लाइट-पानी बंद करने का आदेश दिया? दिल्ली पुलिस से अभिजीत दीपके का सवाल.
दिपके बेटा
अशी जनरल फेकाफेक करायची नसते.
घरी परत जा,
आजकाल काही लोक मोदींवर टीका
आजकाल काही लोक मोदींवर टीका करणाऱ्या टिनपाट माणसाला सुद्धा आपला नेता मानायला लागले आहेत!
चालायचंच!
उठले का कोकरोच
उठले का कोकरोच
फेब्रुवारी २०२६ च्या खालील
फेब्रुवारी २०२६ च्या खालील प्रमाणे अनेक बातम्या व अपडेट्स आहेत:
Why Has the NEET UG 2026 Exam City Selection System Changed?
Restricting city selection to the permanent or present address simplifies the allotment process and enhances security. It ensures that candidates are allotted a NEET 2026 exam city close to their verified location. Additionally, this update helps prevent errors in exam city allocation and eliminates the misuse of fake addresses.
https://meduhub.in/news/neet-ug-2026-exam-city-language-rules-changes
तेव्हा अबू धाबीचा घोळ हा साईटवरील तांत्रिक ग्लिचमुळेच झालेला असावा.
अबुधाबी अल्फाबेटिकली पहिले येत असावे आणि फॉर्मवर काही बदल करायचा असल्यास रिसेट होऊन डिफॉल्ट सिटी अबु धाबु येत असावी हा अंदाज (मराठी अंदाजच) बरोबर आहे, पण तसे असल्यास हे आणखी काही विद्यार्थ्यांसोबत झाले असते असे वाटते.
एकुणात बाकी लोकांपेक्षा
एकुणात बाकी लोकांपेक्षा भाजपेच कोक्रोच पार्टीचे जास्त अपडेट्स बघत राहतात असं दिसतंय
कर आहे त्याला डर असणारच
कर आहे त्याला डर असणारच
एकुणात बाकी लोकांपेक्षा
एकुणात बाकी लोकांपेक्षा भाजपेच कोक्रोच पार्टीचे जास्त अपडेट्स बघत राहतात असं दिसतंय Happy
That makes them ruthless and politically qualified. विरोधक कितीही छोटा असेना का लक्ष देऊन पाहायलाच हवा. सत्ताकेंद्र अशीच असतात. नॉन भाजप सत्ताकेंद्र पण अशीच होती भारतात, कायम.
*भाजप माझ्या घरात पीठ मीठ पैसा भरत नाही हे इथे नमूद करतो, पण एक स्थिर निरक्षीर विचार म्हणून बोलतोय. कैक गोष्टी अशा असतात ज्या भाजप आज करताना दिसते आहे ज्या आधीही सर्रास झालेल्या आहेत, होत असतात, होत राहतील. भाजपने तीच playbook deploy केली आहे. अर्थात त्यामुळे त्यांनीही "पार्टी विथ अ डिफरन्स" इत्यादी मखलाशी करुच नये.
राजकारणात सब घोडे बारा टक्के.
"पार्टी विथ अ डिफरन्स" याला
"पार्टी विथ अ डिफरन्स" याला अटल बिहारी वाजपेयींच्या काळातच तिलांजली दिलेली आहे.
पण अजूनही विरोधक आणि डावे फुरोगामी तेच तुणतुणं वाजवत आहेत
एक मताने सरकार पडले आणि upa चा राक्षस उरावर बसला.
२००२ च्या गुजरात दंगलीतुन सर्वोच्च न्यायालयाने मुक्तता केली तरी विरोधक आणि डावे फुरोगामी अजून श्री मोदींना धारेवर धरत राहतात
पण १९८४ सालच्या शीख हत्याकांडात काँग्रेसी लोकांना सदोष मनुष्यवधाचा शिक्षा झाल्या तरी ते धुतल्या तांदळासारखे आहेत.
खटासी पाहिजे महाखट
उद्धटासी पाहिजे उद्धट
हीच आजची नीती आहे.
श्री मोदी हे श्री अटल बिहारी वाजपेयी नाहीत
काल रात्री तीन वाजे पर्यंत
काल रात्री तीन वाजे पर्यंत DB LIVE वर CJP च्या धरण्याचा LIVE SHOW बघत होतो. मजा आली. लोकांच्या प्रतिक्रिया भारी भारी होत्या,
दिपके ने कुठल्या तरी मराठी वाहिनीला चक्क मराठीत मुलाखत दिली. ती ऐकून - सगळा जन समुदाय ऐकत होता - ळूप छान वाटले.
NEET-UG 2026 पुनर्परीक्षेला
NEET-UG 2026 पुनर्परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशील निर्णय घेतला. दिल्ली विमानतळावर दुपारी 1.15 वाजता पोहोचल्यानंतर त्यांनी तब्बल 45 मिनिटे प्रतीक्षा केली आणि परीक्षा सुरू झाल्यानंतरच प्रस्थान केले.
सविस्तर बातमी खालील लिंक वर.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0i3azLPZ33MhwgUGE5Q29v8...
आता तरी आंदोलन बंद करावे.
आता तरी आंदोलन बंद करावे. एवढ्या संवेदनशील पंतप्रधानांनी धर्मेंद्र प्रधान यांची काही चूक असती तर कुणी मागणी न करताही स्वतःच त्यांचा राजीनामा घेतला असता.
Cockroach जनता पार्टी
Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !
हा विषय आहे हे रिमाईंडर देण्याचं रिमाईंडर कोण देतंय?
कर आहे त्याला डर असणारच >>
कर आहे त्याला डर असणारच >> कसला कर आहे हे पुराव्यासहीत लिहावे. या धाग्यावर हवेत काही सांगायचे नाही ना?
संवेदनशील आहे, असे दाखवावे तर
संवेदनशील आहे, असे दाखवावे तर उपरोध! न दाखवावे तर टीका! माणूस मुळात संवेदनशील आहे की नाही हेच त्यामुळे आम्हा सामान्य वाचकांना कळत नाही. हे झाले आपले इथले, मायबोलीवरचे.
आंतरजालावर काय चर्चा होत आहेत ह्याच्याशी सुतराम संबंध नसलेली जनता ह्या आंदोलनाचा दिवसातून एकदासुद्धा विचार करत नसावी. फरक पडतोय कोणाला? कसली, कुठली झुरळ पार्टी काढली आणि जागतिक इतिहासात दैदिप्यमान हास्यास्पद व्यक्तिमत्त्व झाले कोण जाणे!
अरे बाबांनो, करिष्मा करू शकेल असा एक, फक्त एक, किमान एक नेता उभा करा. तुमचे कितीतरी तास वाचतील जे इथे उद्वेग व्यक्त करण्यात उगीच घालवलेत.
आंतरजालावर काय चर्चा होत आहेत
आंतरजालावर काय चर्चा होत आहेत ह्याच्याशी सुतराम संबंध नसलेली जनता ह्या आंदोलनाचा दिवसातून एकदासुद्धा विचार करत नसावी. >> गेल्या चार दिवसात जांभळं विकत आणली. जुन्नरवरून आलेली जांभळं तीनशे रूपये किलो. लोकल ४० रूपये पाव आणि ५० रूपये पाव. ४० रूपये वाली गावरान होती आणि जुन्नरची आजवर खाल्लेल्या जांभळात सर्वात रूचकर होती. पाऊस पडेपर्यंतच सीझन. हीच काळजी जास्त होती.
या वर्षी आंबे घेतले नाहीत. कोकणात आंबे जास्त झाले नाहीत असे ऐकले. जो आंबा येतो तो कर्नाटकातून.
पनीर बंद झाले आहे. चीझचं आमच्या भागात शॉर्टेज आहे. आणि दूधाचे भाव वाढतील असं आमच्या दूधवाल्याने सांगितलं.
या काळज्या आहेत. बाकीच्या आहेतच.
हां, मुद्दे समजले व पटलेही.
हां, मुद्दे समजले व पटलेही.
अरे बाबांनो, करिष्मा करू शकेल
अरे बाबांनो, करिष्मा करू शकेल असा एक, फक्त एक, किमान एक नेता उभा करा. तुमचे कितीतरी तास वाचतील जे इथे उद्वेग व्यक्त करण्यात उगीच घालवलेत.>>>
तुमच्याकडे आहे ना एक नेता करिष्मा करू शकणारा मग तुम्ही का इथे वेळ वाया घालवत आहात.
युवक आंदोलन करत आहेत. त्यांची
युवक आंदोलन करत आहेत. त्यांची मागणीही रास्त आहे. सरकारने शिक्षणाचा जो खेळखंडोबा केला आहे त्याची जबाबदारी घ्यावी. नीट परीक्षा लीक झाली म्हणून परत परीक्षा घेतली की जबाबदारी संपत नाही.
अशा आंदोलनामुळे लोकांच्या पोटात का दुखत आहे.
>>> तुमच्याकडे आहे ना एक नेता
>>> तुमच्याकडे आहे ना एक नेता करिष्मा करू शकणारा मग तुम्ही का इथे वेळ वाया घालवत आहात.
मी तुरळकरीत्या इथे इतर लिखाणही केले आहे म्हणून प्रतिसाद दिला.
क्षमस्व, कंसराज!
क्षमस्व, कंसराज!>>> केलं माफ
क्षमस्व, कंसराज!>>> केलं माफ
धन्यवाद
धन्यवाद
मी आत्तापर्यंत झुरळांचे धरणे
मी आत्तापर्यंत झुरळांचे धरणे बघत होतो. तिथे ऐकलेली ही कमेंट
"ज्याने कधी एकही परीक्षा दिली नाहीये त्याला NEET च्या विद्यार्थ्यांचे दुःख कसे समजणार!"
चला जरा धाग्यात जान फुंकूया..
चला जरा धाग्यात जान फुंकूया..
वर मोदींच्या सविस्तर बातमी खालील लिंक वर क्लिक करा आणि कॉमेंट वाचा.
आवडलेल्या कॉमेंट इथे कॉपी पेस्ट करा.
<<<<< करिष्मा करू शकेल असा एक
<<<<< करिष्मा करू शकेल असा एक, फक्त एक, किमान एक नेता उभा करा.
>>>>
इथे विविध राजकीय कल असलेले सभासद आहेत. त्यामुळे मला इतरांचे माहीत नाही. पण मी यावर माझे उत्तर देतो.
मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाहीये त्यामुळे मला कुठलाही राजकीय नेता उभा करायचा नाहीये. तर जे मी निवडून दिले आहेत तेच सुधरवायचे आहेत.
पात्र नसलेल्यांनी स्वतःच लाज बाळगून राजीनामा द्यावा. पक्षात किंवा मित्रपक्षात इतर पात्र नेते असतील अशी अपेक्षा करतो जे त्यांची जागा घेऊ शकतील. जोपर्यंत हे होत नाही तो पर्यंत मी माझ्यापरीने हे आंदोलन थांबवणार नाही.
कारण जे कोणी भाजप समर्थक असतील त्यांना आपल्या लाडक्या नेत्यांनी केलेला भ्रष्ट कारभार सुद्धा गोड वाटत असेल. पण मी मात्र भारताचा नागरिक आहे. मला असला भ्रष्ट कारभार चालणार नाही.
धर्मेन्द प्रधान कार्टून
धर्मेन्द प्रधान कार्टून
ते साहेब कमळाची एक एक पाकळी काढून "मी इस्तीफा देऊ ? का मंत्रिपदाला चिकटून बसू ?"
पक्या मला नेहमी सांगतो ,
पक्या मला नेहमी सांगतो , "केशव, माझे ऐक पुढील पाच वर्षे बीजेपी भारतावर राज्य करणार."
इतके दिवस माझा विश्वास बसत नव्हता. मी पक्याला बोलायचो , " कुछ भी फोका मारू नकोस."
परंतु आज माझी खात्री झाली.
कशी?
मेलोडी खाओ खुद जान जाओ!
धाग्याचा विषय, क्रांती,
धाग्याचा विषय, क्रांती, आंदोलनातली मागणी, आणि कोणी बातमी पोस्ट केली त्यावरून तो उपरोध होता.
आणि टिके बद्दल इतर धाग्यावर आणि या ही धाग्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारवर टिका करणार. जिथे टिका केलीय/करेन तिथे त्या केलेल्या टिकेला धरून प्रति टिका, आक्षेप , चुका दाखवणे वगैरे वर विचार करून उत्तर देता येईल.
'मायबोलीवर काय लिहिता रस्त्यावर उतरा' बद्दल आधी लिहुन झालेच आहे या धाग्यावर, तेच 'मायबोलीवर काय लिहिता, नवा नेता शोधा, निवडून आणा' यालाही लागु.
ज्याने कधी एकही परीक्षा दिली
ज्याने कधी एकही परीक्षा दिली नाहीये त्याला NEET च्या विद्यार्थ्यांचे दुःख कसे समजणार!">>>
तुम्ही आणि मी ही NEET परीक्षा दिली नाही. इतरही इथे अनेक इथे ह्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत कारण त्यांना नीट आणि इतर परीक्षा फुटी मुळे होणारा त्रास, दुःख समजू शकतात.
सरकार मधले आणि समाजातले जे लोक ह्या आंदोलनाला विरोध करत आहेत किंवा काहीतरी खुसपट काढत आहेत. त्या सगळ्यांची मानसिकता नाझी जर्मन लोकांची आहे. त्यांना कशानेही पाझर फुटणार नाही.
१८ ते १९ मुलांनी आत्महत्या केल्यात खरंतर हे सगळे ह्या सरकारने केलेले खून आहेत.
आताच एक व्हिडिओ बघितला एका बापाने मुलीला काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला प्रवेश दिला गेला नाही म्हणून हतबल होऊन गेट वर डोक आपटून जागीच तडफडत जीव दिला. असे व्हिडिओ बघून ह्या लोकांना काहीही वाटत नाही.
गुड मॉर्निंग कॉक्रोचेस
गुड मॉर्निंग कॉक्रोचेस
सुप्रभात झुरळांनो
Pages