झुरळ

गृहिणींचे शत्रू

Submitted by सेन्साय on 13 February, 2017 - 09:22

आपल्या घरात अडगळीच्या जागी आढळणारा आणि ज्याला पाहून ई .. ऽऽ असे तोंडातून आल्याशिवाय राहात नाही असा प्राणी म्हणजे झुरळ. हे झुरळ एक महिना अन्नाशिवाय जगू शकते. झुरळाला कितीही मारले तरी पटकन ते मरत नाही, असा अनेकदा अनुभव येतो. त्यांच्या शरीराची रचनाच अशा प्रकारची केलेली असते. एकंदर ४ हजार जाती असलेल्या झुरळांच्या फक्त तीसच जाती माणसांच्या सानिध्यात असतात. भारतातली बहुतेक सगळी झुरळे अर्धा इंच लांबीची असली तरी अमेरिकेतली झुरळे त्यापेक्षा दुप्पट लांबीची असतात. झुरळे कुठल्याही वातावरणात चिकाटीने राहू शकत असली तरी त्यांना ऊबदार वातावरण सगळ्यात जास्त आवडते.

पेस्ट कंट्रोल

Submitted by गजानन on 23 January, 2016 - 01:55

पेस्ट कंट्रोलबद्दल माहिती आणि अनुभव इथे शेअर करावेत.

यापूर्वी याबद्दल कधी विचार केला नव्हता. अध्येमध्ये हंगामी अधिवेशन असल्यासारख्या मुंग्या होतात आणि नाहीशा होतात. फारच झाल्या तर लक्ष्मणरेषा नावाचा खडू मेडीकलमधून आणून मुंग्याच्या वाटांवर फिरवला तरी पुरे. नव्या ठिकाणी वास्तव्यास येण्यापूर्वी पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे होते, पण ते राहून गेले. आता झुरळांकरता पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे आहे.

हर्बल पेस्ट कंट्रोल आणि स्प्रे पेस्ट कंट्रोल यांमध्ये कोणते जास्त परिणामकारक, कमी अपायांचे आणि खटाटोपांचे असते? निदान लहान मुलांना आणि वृद्धांना त्रासदायक ठरू नये, इतके तरी.

Subscribe to RSS - झुरळ