Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साराला कशाला नावं ठेवता जाता
साराला कशाला नावं ठेवता जाता जाता!
ट्युनर फार मस्त आहे. theater
ट्युनर फार मस्त आहे. theater मधे लागलाय. हिरो Leo Woodall ला पाहिल्याचे आठवत नाही पण फार भारी काम केलंय.
जाता जाता कशाला, साराला नावं
जाता जाता कशाला, साराला नावं ठेवायला मी तंबू ठोकून येथे थांबू शकते.

काहीच येत नाही हिला, रोमॅन्टिक सीनमधे सुद्धा वेडंवाकडं तोंड करते. डान्स करताना ओंडक्यासारखी स्टेप्स लक्षात ठेवते. दिसायला सुद्धा साधारण आहे. कोणतेच ड्रेसेस छान दिसत नाहीत. काही जमलं नाही तर घसा खरडून ओरडत सुटते. मी अमृता असते तर लेकीची काळजीच वाटली असती.
जसं अमृता चमेली की शादी मधे ठोकून काढते, तेथून प्रेरणा घेऊन सारा ज्यांना क्रशेबल वाटते त्यांना ठोकून काढावं वाटतं आहे.
(No subject)
मला तर तिची अॅक्टिन्ग बघुन
मला तर तिची अॅक्टिन्ग बघुन तिचे एक दोन स्क्रु पडलेत असच वाटत..
अस्मिता सगळेच नेपो किड कमी अधीक ओन्डकेच आहेत.
चमेली की शादी आवडतोच.
चमेली की शादी आवडतोच.
दक्षिणा, "सिस्टीम" काल सुरू
दक्षिणा, "सिस्टीम" काल सुरू केला आहे. >> मला तर आवडला खूप.
तू बघ आणि सांग तुला आवडला का
ते ओंडके परत परत लादले जातात.
ते ओंडके परत परत लादले जातात. काहींना अभिनय जमायला लागतो. उदा. आलिया. की लगेच हे किती ग्रेटचे ढोल
बडवायला सुरवात होते.
अरे ती सारा खरंच बंडल आहे.
अरे ती सारा खरंच बंडल आहे. अनन्या, जानवीला पाहिलेच नाहीये अजुन. म्हणजे पहावे वाटले नाही. तेच आअलियाला पण नाही पहावेसे वाटले अजुन.
नेपोकिडबाबत उगाच आपण हार्श
नेपोकिडबाबत उगाच आपण हार्श भूमिका घेतो असे बरेचदा वाटते. स्वतंत्र धाग्याचा/लेखाचा विषय आहे हा.. नोट करून ठेवतो.
सारा अभिनयाची बोंब आहे खरी पण दिसायला बॉम्ब आहे.
अर्थात दिसण्याबाबत ज्याची त्याची आवड पण मला केदारनाथच्या सर्व गाण्यामध्ये ती फार आवडते. त्यातली गाणी सुद्धा माझी ऑलटाइम फेवरेट असल्याने घरी वरचेवर लावली जातात. युट्यूबवर व्हिडिओ लावला जातो. आणि ऐकायलाच नाही तर पुन्हा पुन्हा बघायलाही आवडतात. कंटाळा येत नाही. त्यात साराचाही वाटा असेलच.
“ त्यात साराचाही वाटा असेलच”
“ त्यात साराचाही वाटा असेलच” - ‘सारा’ प्यार तुम्हारा, मैने बांध लियाँ हैं आंचल में

सिस्टिम - प्राईमवर पाहिला.
सिस्टिम - प्राईमवर पाहिला. सोनाक्षी सिन्हा, आशुतोष गोवारीकर, आदिनाथ कोठारे, ज्योतिका सदाना.
मर्डर मिस्ट्री आणि रिव्हेंज दोन्ही आहे. पिक्चर बरा वाटला. अर्धा पिक्चर झाल्यावर मला एकदम सगळेच कळून गेले आणि कुतूहल राहिले नाही. ते सगळे एका क्षणात झाले, मलाही आश्चर्य वाटले. आधीचा भाग बऱ्यापैकी इंटरेस्टिंग आहे. आशुतोष गोवारीकर सोनाक्षीचा बाबा वाटत नाही. मुलगी वकील, बाबा प्रतिथयश वकील, भाऊ वकील असे कुटुंब. आणि बाबाविरूद्ध आणि थोडाफार बाबांमुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या साठी लढणारी मुलगी म्हणून सोनाक्षीची भूमिका चांगली आहे पण ती अजूनही चांगली होऊ शकली असती. ज्योतिकाचा अभिनय चांगला आहे, तिचे डोळे उदासच आहेत कायम उदास वावर वाटतो. थोडासा कुढत असल्यासारखा. ही भूमिका त्याला साजेशी आहे. सुरवातीला वेगवान नंतर थोडासा संथ आणि नंतर एकदमच प्रिडेक्टेबल होत गेला. गाण्यांची अजिबात गरज नव्हती.
आशुतोष गोवारीकर "आता थांबायचं नाय" मधे खूपच आवडला होता, खूप प्रसन्न वावर होता. येथे पुन्हा बाबा करून विग काढून टाकला आहे. कशाला, कशाला! राहू द्या की चार्मिंग. असाही तो नेहमीच इंटेलेक्च्युअल वाटतो. येथील कामही चांगले आहे, आदिनाथची एक भाऊ म्हणून गोड भूमिका आहे. जो कोणी व्हिलन होता तो मला अभिनयातील सगळ्यात कमकुवत कॅरेक्टर वाटला. हिरो स्ट्रॉंगर वाटायला व्हिलन स्ट्रॉंग वाटायला हवा. येथे हिरो सोनाक्षी आहे. सगळेच अजून प्रखर व्यक्तिमत्त्वाचे पाहायला आवडले असते. कोर्ट रूम ड्रामा मधे तसेही फार लाऊड दाखवायला वाव राहात नाही पण येथे कथानक आणि कोर्ट दोन्ही आहे. तितके इंटेन्स आणि खिळवून ठेवत नाही. दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी आहे, तिच्या काही कथा women oriented वाटल्या आहेत म्हणून उत्सुकता होती. शेवट आवडला, ओव्हरऑल बरा आहे.
दक्षिणा - बहुतेक तुला जेवढा आवडला तेवढा आवडला नाही पण वन टाईम वॉच.
नेपो किड आणि ओंडका म्हटल्यावर
नेपो किड आणि ओंडका म्हटल्यावर मला अभिषेक बच्चन आठवला.
पंकज कपूरच्या पोराचं काय? तो आठवत नाही का कोणाला?
Hidden Figures पाहिला. बरेच
Hidden Figures पाहिला. बरेच दिवस पहायचा होता. इथेही बहुतेक अस्मिताने रेको दिला होता. शेवटी काल मुहूर्त लागला.
या बायकांनी केलेला संघर्ष कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता किंवा प्रचारकी न करता मांडला हे जास्त आवडले. उशिरा का होईना त्यांना रेकग्निशन मिळालं हे आवडलं.
मुलगी शेजारी बसून कलरिंग करत होती पण मधेच बाहेर गेली ते पिक्चर पॉज करून.
या निमित्ताने माझ्याकडे एक बूकमार्क आहे तो आठवला.
ज्ञान के मंच पर सब एक समान है
विधी का विधान पलट दे,
वो ब्रह्मास्त्र ज्ञान है
तो आज से ये ठान ले,
ये गॉंठ बांध ले,
कि कर्म के कुरूक्षेत्र में
न रुप काम आता है,
न झूठ काम आता है,
न जाति काम आती है,
ना बाप का नाम आता है
सिर्फ ज्ञान ही आप को आप का हक़ दिलाता है
पंकज कपूरच्या पोराचं काय? तो
पंकज कपूरच्या पोराचं काय? तो आठवत नाही का कोणाला?
>>>
शाहिद कपूर??
माझेमन, हो मी लिहिले होते
माझेमन, हो मी लिहिले होते हिडन फिगर्स बद्दल. बरे झाले लेकीसोबत पाहिलास.
मला आता मी लिहिलेली पोस्ट सापडेना.... येथे लिंक दिली असती.
पंकज कपूरचा शाहिद असेल तर तो चांगला आहे. पण ईशान खट्टर म्हणत असाल तर तो पंकज कपूरचा नाही. आणि तो बरा वाटला होता होमबाऊंड मधे. खरे ओंडके तर खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान आहेत. त्यांच्या इतके बेकार कुणीही नाही. "नादानियां" आठवू नका!
चमेली की शादी बघितला.
चमेली की शादी बघितला.
इथली अमृता सिंग तुम्हाला आवडते आणि सारा आवडत नाही? सारा किती सारखी दिसते, बोलते!!! केस डोळे चेहरा हसू सगळं सगळं मायलेकींचे सारखं आहे. बोलण्याची पद्धत, खट्याळपणा आणि अभिनय पण. घरी हे म्हटलं तर तुच्छ कटाक्ष मिळाला. असो.
सिनेमा ठीक आहे. गाणी मात्र कसली टुकार आहेत..किशोरकुमार, आशा असून काय गायला लावलंय!
काल 'रात अकेली है -बन्सल
काल 'रात अकेली है -बन्सल मर्डर्स' बघितला. नवाजुद्दीन, चित्रांगदा, रजत कपूर, संजय कपूर, रेवती, इला अरुण, राधिका आपटे असे बरेच लोक आहेत. एका उद्योगपती बड्या खानदानातील लोकांच्या हत्या होतात आणि नवाजुद्दीन तो तपास करणारा इन्स्पेक्टर आहे. सुरुवातीला त्या बन्सल परिवारातील कोणाचे नक्की कोण नातेवाईक आहेत हे कळायला थोडा वेळ लागतो, ते जरा अजून नीट सांगता आलं असतं. तसंच अजून crisp करता आला असता पण सस्पेन्स चांगला आहे.
सिनेमा ठीक आहे आणि सारा मात्र
सिनेमा ठीक आहे आणि सारा मात्र किती छान>>> वा, वा ! तरी बरं मी निःशब्द होत नाही. वर ऋ ने तिला बॉम्ब म्हंटल्यावर दुसऱ्यांना समजून घ्यावे ह्या उदात्त विचाराने सुद्धा फार, फार तर मागच्या दिवाळीतली थंड पडलेली, तुकडे पडलेली मारूतीची शेपूट किंवा धूरच धूर आणि ठसका उठवणारी सापाची गोळी आली होती.
आईसारखी दिसली तर काय नवल आहे पण सतत ऑकवर्ड वाटते, विचित्र हसते, गोरीपान म्हणजे मला सुंदर वाटत नाही उलट ब्लॅन्ड दिसते, खट्याळपणा आणि अभिनय कुठे आहे? ओव्हरॲक्टिंग करते. मी पाहिले आहेत दोन तीन सिनेमे, तिच्यामुळे पाहवले नव्हते. आता आयुष्मान सोबतही एक हिरो, तीन हिरोईन असं काही तरी "पती, पत्नी और वो दो" दिसले. यावेळी नायक तिघींना घुमवणार म्हणे. त्याच्या गाण्यातही हिचे पुन्हा तेच निर्जीव किंवा ओढूनताणून भाव. हिच्यासाठी बायकोला खोटे बोलतोय म्हणजे बघा आता! Is it even worth it.
अभ्यासात हुशार आहे म्हणे, तिकडेच Phd वगैरे करून करियर करावं! पण तेवढं कुठे आपलं नशीब.
---------
अरे हां, काल इथले वाचून Eko पाहायला सुरुवात केली आहे. अर्धा तास पाहिला, खूपच वेगळा आहे. इंटरेस्टिंग वाटतोय.
सुंदर स्मितहास्य आहे साराचे.
सुंदर स्मितहास्य आहे साराचे. सारा छानच आहे . अमितव यांच्याशी सहमत.
जोक्स अपार्ट, पण साराच्या हास्यात काहीतरी क्रुकेड आहे जे सरप्राईझिंगली तिला जास्त गोड बनवते. मला माहीत नाही काय आहे. पॉइन्ट आऊट नाही करता येत.
नव्या हिरोईन vs जुन्या हिरोईन
नव्या हिरोईन vs जुन्या हिरोईन याबाबत नवी गाणी vs जुनी गाणी या सारखे होत असावे का आपले?
आपण काहीतरी वेगळी सादगी शोधायला जातो आणि ती न सापडल्यास आपण फुल्ली मारतो..
असो,
मी केदारनाथ चित्रपटातील उल्लेख केलेली गाणी
१) काफिराना -
https://youtu.be/ZmcBC9-wAXM?si=HIDcm3HbrUqO6IVh
२) जान निसार
https://youtu.be/vdbP_3o73qI?si=X2R_ClVsCo4wRhQr
याच क्रमाने ऐका..
काफिराना मधील तो उष्टे चहा पिण्याचा सीन मस्त रोमँटिक आहे.. दोघांची जोडी एक्स्प्रेशन छान वाटतात पुन्हा पुन्हा बघायला
मी आधी 'अमृता सिंग किती सारा
मी आधी 'अमृता सिंग किती सारा सारखी दिसली आहे' लिहिलेलं खोडलं ते कुठेच गेलं!
तरी बरं मी निःशब्द होत नाही >
तरी बरं मी निःशब्द होत नाही >>>
साराचा एकही पिक्चर बघितलेला नाही. फोटोंमधे अमृतासारखी दिसते मलाही. चांगली वाटते दिसायला. मी अमृता सिंगचेही फार पिक्चर बघितलेले नाहीत. त्यावर मला एकदा बटाट्याची चाळ मधल्या मेंढे पाटलाच्या "येवढी एज्युकेशनल माणसं तुम्ही" च्या टोन मधे तू इतके पिक्चर पाहतोस आणि तिचे चांगले काम असलेले पिक्चर तुला कसे माहीत नाहीत असे तु.क. टाकत अनेक लोकांकडून ऐकवले गेले आहे.
ओंडक्यांमधे अभिषेक? खामोश! युवा पाहा. सरकार (पहिला) पाहा. बंटी और बबली पाहा. दस पाहा. सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न "अॅक्शन हीरों"ना तराजूच्या एका बाजूला टाकले आणि युवा मधला लल्लन दुसर्या बाजूला टाकला तरी तो जड होईल.
वरच्या लिस्ट मध्ये खालील
वरच्या लिस्ट मध्ये खालील व्हरायटी जोडा.
गुरू मध्ये सुद्धा अभिषेकचे बेरिंग छान होते.
ब्लफमास्टर त्याचा एक आवडीचा पिक्चर ज्यात तो आवडला.
बोलबच्चन आणि हॅपी न्यू इयर यातील त्याची कॉमेडी स्टाईल मस्त वाटते.
मर्यादित क्षमता आहे पण तसेही सगळेच कुठे अभिनय सम्राट असतात.
Obsession पाहिला.
Obsession पाहिला.
आवडला. काही ठिकाणी विनोदी तर काही ठिकाणी भीतीदायक आहे.
सिस्टीम, बरा आहे. ज्योतिका
सिस्टीम, बरा आहे. ज्योतिका कसा बदला घेते आणि सुरुवातीला कोणाकोणाला शिक्षा होते ते परत दाखवायचं सोडून काहीतरी वेगळंच दाखवत बसले. डोकं भंजाळलं माझं ते आठवून, नंतर मी नाद सोडून दिला, मरो. आदिनाथला फार काम नाही. सोनाक्षीचा प्रियकर मला सुरुवातीला तिचा खरा नवरा वाटला, पण तो नाहीये.
जरासा म्हणजे ५-६ वर्ष जुना
जरासा म्हणजे ५-६ वर्ष जुना ‘ग्रीन बुक‘ नेटफ्लिक्सवर सापडला. फार म्हणजे फारच आवडला. simple and powerful.
सिस्टिम - प्राईमवर पाहिला
सिस्टिम - प्राईमवर पाहिला
+ १
कोर्टरूम ड्रामाज् इतक्यात खूप बघितलेत म्हणून याला टाळत होतो. पण चांगला आहे, सोनाक्षीचा रोल अजून चांगला होऊ शकला असता हे खरे. One time watch.
सोनाक्षी आणि आशुतोष दोघेही खऱ्या आयुष्यात डावखुरे आहेत. सिनेमात तसेच दाखवले आहेत हे आवडले. Our south paw camaraderie moments ❤️
ज्योतिकाचे डोळे उदासच आहेत + १
इथे भूमिका तशी असल्याने चालून गेले.
सिस्टिमचे पार्श्वसंगीत (हा शब्द वाहियात आहे) मात्र फार लाउड आहे. रसभंग होतो, डायलॉग्स नीट ऐकू येण्यात बाधा.
चमेली की शादी आवडतोच.->
चमेली की शादी आवडतोच.->+१११११११११११
सिस्टिम - अजुन चान्गला होउ शकला असता.
सिस्टिमचे पार्श्वसंगीत (हा
सिस्टिमचे पार्श्वसंगीत (हा शब्द वाहियात आहे) मात्र फार लाउड आहे. रसभंग होतो, डायलॉग्स नीट ऐकू येण्यात बाधा.>>>> हे मला सगळयाच चित्रपट आणि सिरीज बद्दल वाटते. Background music खुप जोरात अचानक मोठया आवाजात सुरु होते आणि संवाद अगदी हळू आवाजात, ऐकायला येतील न येतील असे. संवाद तर मी sub title बघून ऐकते. रात्रीच्या शांततेत बघत असू तर रिमोटशी खेळत बसावे लागते.
Pages